विकास म्हणजे जो जमिनीतून येतो तो विकास...काँग्रेस ही देशविघातक शक्ती आहे याची जाणिव आता नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये होताना दिसत आहे. काँग्रेसचे वास्तव सर्वसामान्यांना समजते आहे ही चांगली गोष्ट आहे. सहा दशकांपासून एका मोहमायेत अडकलेल्या, संमोहीत झालेल्या जनतेला थोडी जागृतावस्था प्राप्त होताना दिसते आहे ही जमेची बाजूच म्हणावी लागेल. या देशात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक काळ काँग्रेसचे राज्य राहिले. त्यामुळे महाराष्ट्र सतत मागे पडत गेला. या देशातील सगळ्या राज्यात सत्तांतर झाले महाराष्ट्रात फकत एकदाच झाले. पण महाराष्ट्र हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. त्यामुळेच सर्वाधिक वाटोळे महाराष्ट्राचे झाले.आज काँग्रेस कितीही विकासाच्या गप्पा मारत असली तर त्यांनी नेमका काय विकास केला हा प्रश्न विचारला तर एकाला तरी सांगता येईल काय? ते मुख्यमंत्री पृथवीराज चव्हाण एक जाहीरात करतात. विकास म्हणजे जो जमिनीतून उगवतो तो विकास. ही काय जाहीरात आहे? जमिनीतून उगवते त्याचे श्रेय काँग्रेस कशी घेवू शकते? त्यामुळे काँग्रेसचे हे वास्तव आता जनतेला समजले आहे. परिणामी काँग्रेसच्या सभांना गर्दी होत नाही. माणसं जमत नाहीत महणून सोनिया गांधींना सभा रद्द करावी लागते. धुळे जळगांवात मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सभांना पैसे वाटप करूनही माणसे उरली नाहीत. विविध वाहिन्यांनी टिपलेले दृष्य काँग्रेसला चपराक मारणारे असे आहे. हाच आगामी काळातील निवडणुकीचा निकाल आहे.काँग्रेस महाराष्ट्रातून संपुष्टात येत आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने शुभलक्षण आहे असेच महणावे लागेल. या काँग्रेसमुळे इथला माणूस लुटला गेला. महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी आहे ती या काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे. इतकं असूनही मुख्यमंत्री जाहीरात करतात विकास म्हणजे जो जमिनीतून येतो तो विकास. कसल्या गपपा करतात हे? जमिनीतून विकास काँग्रेसचा झाला. लोकांच्या जमिनी हडप करायच्या.बिल्डरांच्या घशात घालायच्या. महाराष्ट्र हे निवासी राज्य करून टाकण्याचे काम या काँग्रेसने केलेले आहे.आज शेतकरी कर्जबाजार होतो आहे. शेतकर्यांच्या मुलांना शेती करण्यात रस नाही. शेतीचा उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे जमिनी विकून पैसा कमावण्याकडे शेतकर्यांचे धोरण ठरत आहे. शेतकर्यांना जमिनी विकायला भाग पाडले जात आहे. या जमिनी वसाहतींसाठी वापरायच्या, बिगरशेती करायच्या, भांडवलदारांच्या घशात घालायच्या हे काँग्रेसचे सातत्याने धोरण आहे. शेती उतपादनाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. ही अत्यंत भयानक गोषट आहे. असे असताना विकास महणजे जो जमिनीतून येतो तो विकास असे मुखयमंत्री सांगतात ही किती विसंगत गोष्ट आहे.शेतकर्यांच्या जमिनी कारखानदारांना द्यायच्या. कारखानदारांनी तिथे शेतकर्यांच्या मुलांना रोजगार न देता बाहेरून आलेल्या लोकांना नोकर्या द्यायच्या. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरून आलेले असा संघर्ष सुरू होतो. या संघर्षामुळे कारखाने बंद पडतात. ताळेबंदी होते. दुसरीकडे कारखाने हालवले जातात. कामाचा अनुभव नसल्यामुळे आमचे कामगार दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. कारखानदारांना अल्पदराने दिलेल्या जमिनी कारखानदार प्रचंड भावाने विकतो. तिथे टॉवर उभे केले जातात. मॉल उभे केले जातात. हा जमिनीतून केला जाणार विकास जनतेच्या कधीच फायद्याचा नाही.महाराष्ट्रात गेली चौदा वर्ष काँग्रेसचे सरकार आहे. केंद्रात दहा वर्ष काँग्रेसचे सरकार आहे. या काळात महाराष्ट्रात किती रोजगारात वाढ झाली याचे उत्तर काँग्रेसकडे आहे काय? किती कारखाने बंद पडले? किती कारखान्यांची युनीट परराज्यात हालवली गेली? कारखान्यांची युनीट हालवल्यानंतर त्या जागेवर काय उभे केले गेले? याचा सगळ्याचा हिशोब काँग्रेसने दिला पाहिजे. आज जनता तो हिशोब मागते आहे. नेमका विकास काय केला? तर मुख्यमंत्री महणतात जो जमिनीतून येतो तो विकास. अरे वा.. शेतकर्यांच्या जमिनी लाटून, त्यांना भूमिहीन करून जो होतो तो विकास.रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात तांदूळ पिकवणारा सर्वात मोठा जिल्हा होता. महाराष्ट्रातील तांदुळाचे कोठार असे वर्णन रायगड जिल्हयाचे केले जात होते. आज काय परिस्थिती आहे? आज तांदुळाला एकरी भाव चांगला येत नाही म्हणून तांदूळच पिकवायला नको म्हटले जाते आहे. जो तो आपल्या जमिनी विकू लागला आहे. जमिनी विकलयाने कोणाचे भले होणार आहे? आत्ता हातात येईल तो पैसा क्षणिक असेल. जमिन टिकली तर पिढयान पिढया ती राहील. पण पैसा असाच उधळला जाणार आहे. त्या पैशाची योग्य गुंतवणूक होताना दिसत नाही. पैशापासून पैशाची निर्मिती झाली पाहिजे हा दृष्टीकोन येताना दिसत नाही. जमिनी विकून आलेल्या पैशातून अलिशान घरे बांधली जातील. गाडी खरेदी केली जाईल. हॉटेलमध्ये जेवणाचे, बाहेरून पार्सल मागवण्याचे प्रमाण वाढेल. पण यातून पैसा निर्माण होणार नाही. हे सगळं शेतकर्यांना उत्पादनापासून रोखल्यामुळे झालेले आहे. हा विकास नाही. हा भकास आहे भकास.अंगावर सोनं आले, डोळ्यांना रेबनचा गॉगल आला हा काही विकास नाही. हा धनाचा केलेला गैरवापर आहे. धनसंचयाला लागलेली ती गळती आहे. शहरात बिअर बार, परमिट रूम आणि अलिशान हॉटेल्स वाढली म्हणजे काही विकास झाला असे म्हणता येणार नाही. तो विकास असेल फक्त मूठभरांचा. काँग्रेसने केलेला जमिनीतून विकास हा आहे. शेतकर्यांनी जमिनी विकून पैसे कमवायचे. हा दिसणारा भरपूर पैसा हॉटेल, बारमध्ये उडवायचा. त्यामुळे विकास होतो तो बारवाल्यांचा. त्या बारवाल्यांच्या पैशावर काँग्रेस पोसली जाते. त्यामुळेच डान्सबारवर आलेली बंदी उठवण्याचे काम काँग्रेसने केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगत असलेला जमिनीतून येणारा विकास हा असा आहे. शेतकर्यांचे शोषण, शेतकर्यांची फसवणूक हा काँग्रेसने केलेला विकास आहे. त्यामुळेच जनतेला आता याची जाणिव होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सभांना गर्दी होत नाही. माणसे पाठ फिरवून जात आहेत. सोनिया गांधींना दौरा रद्द करावा लागला. तोच महाराष्ट्र की ज्या महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी जमते. तोच महाराष्ट्र जिथे राज ठाकरेंच्या सभांना लाखोंची गर्दी होते. त्याच महाराष्ट्रात काँग्रेसच्या सभेला कोणी फिरकत नाही. हाच खरा निवडणूकपूर्व काँग्रेसचा लागलेला निकाल आहे. आता निवडून येण्यासाठी गैरमार्ग करून मतदारांची नावे यादीतून गहाळ करून काँग्रेस निवडून येण्याचा प्रयत्न करेल. सभेला माणसं येत नाहीत काय? चला यादीतूनच नावे गायब करू. असला फंडा वापरण्याचे तंत्र काँग्रेसचे चालले आहे. त्याप्रमाणे पुण्यातील एक लाख मतदारांची नावे गायब केली गेली. तसाच प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केला आहे. काही ठिकाणी उघड झाला काही ठिकाणी समजला नाही. पनवेलमध्ये राम ठाकूर यांनी खारघरमधील हजारो मतदारांची नावे अशीच गायब करण्याचा प्रयत्न केला होता. जागृत मतदारांमुळे राम ठाकूर यांचा हा डाव उधळून लावला. पण असे प्रकार का करावे लागतात? तर जमिनीतून उगवलेला हा विकास.आज काँग्रेसने गावागावांत पाणी, रस्ते या प्राथमिक सुविधा दिल्या नाहीत. पण प्रत्येक गावांत बिअरशॉपी मात्र पोहोचली. आज असे एकही गाव राज्यात नाही की तिथे दारूचे दुकान नाही. बिअर शॉपी नाही. हाच काँग्रेसचा विकास आहे. गावात शाळा नाही म्हणून शहराकडे चालत येणारी मुले. वाढत्या वयाबरोबर असुरक्षित वातावरणात एकटं दुकटं जायला नको महणून अर्धवट शिक्षण सोडणार्या मुली. कारण गाव तिथं शाळा हा उपक्रम काँग्रेसला राबवता आला नाही. पण गाव तिथे बिअरशॉपी मात्र पोहोचली. हा सगळा काँग्रेसने केलेला विकास आहे. काँग्रेसचा विकास म्हणजे फक्त काँग्रेस नेत्यांचा, पक्षाचा विकास आहे. काँग्रेसचे नेते कार्यकर्ते श्रीमंत झाले. देश देशोधडीला लागला. हे वास्तव आता सगळ्यांना समजू लागल्यामुळे लोक काँग्रेसच्या सभांना गर्दी करत नाहीत.
सोमवार, २१ एप्रिल, २०१४
विकास म्हणजे जो जमिनीतून येतो तो विकास...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा