मुलायम-अबू आझमी हेच ‘गलती के नतीजे’
‘गलती के नतीजे’
- समाजवादी पार्टी या जातीयवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव आणि अबू आझमी या दोघांचे भारतात झालेले जन्म म्हणजेच त्यांच्या आई बापांच्या गलतीचे ते नतीजे आहेत. या दोघांचा झालेला राजकीय जन्म म्हणजे लोकशाहीच्या गलतीचे ते नतीजे आहेत. परंतु गलती करणार्यांना माफ करा म्हणणार्या मुलायमसिंग यादवांना आता माफ करून चालणार नाही. जनता आपली ही गलती नक्की सुधारेल. कारण महिलांबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्या या नेत्यांना आणि त्यांचे समर्थन नेहमीच घेणार्या काँग्रेसला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे.
- आज देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. महिलांची छेडछाड, अत्याचार, बलात्कार, सामुहीक बलात्कार, त्यांच्यावर होणारे अॅसिड हल्ले, प्राणघातक हल्ले हे प्रकार सातत्याने होताना दिसत आहेत. निर्भया प्रकरणाने महिला निर्भय होण्याऐवजी गुंड प्रवृत्ती अधिक निर्भय होताना दिसते आहे, हे देशात काँग्रेसचे बदमाश सरकार असल्यामुळे होत आहे. मुलायमसिंग यादव अबू आझमी यांच्यासारख्या महिलाद्रोही, देशद्रोही प्रवृत्तींना पाठीशी घालणार्या काँग्रेसच्या प्रवृत्तीमुळे देशात ही गुंडगिरी वाढत आहे.
- निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील सामुहीक बलात्काराला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी या देशात होवू लागली. तशी तरतूद करून मुंबईतील शक्ती मिल सामुहीक बलात्कार प्रकरणात तीन आरोपींना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. पण त्यानंतर काहीच तासात समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव म्हणतात की, ‘बलात्कार्यांना फाशीची शिक्षा नको. मुलांच्या हातून चुका होतात, त्यांना माफ केले पाहिजे.’ मुलायमसिंग यादवाला लाज वाटली पाहिजे असे बोलताना. म्हातारचळ लागल्यामुळे तो असे बोलला असेल कदाचित. पण त्याच्या घरात कोणी आया, बहिणी, मुली, सुना, नाती नाहीत काय? त्यांच्या बाबतीत असा प्रकार झाला तर मुलायमसिंग त्या बलात्कार्यांचे सत्कार करणार आहे काय? मुळात मुलायमसिंग यादवासारखा माणूस हाच त्याच्या आई बापाच्या गलतीचा नतीजा म्हणून जन्माला आला असावा. म्हणूनच असा विकृत विचार तो करू शकतो.
- मुलायमसिंगाने एक पाऊल टाकले तर देशद्रोही अबू आझमीने आणखी चार पावले पुढे टाकली. बलात्कारातील घटनेत फक्त मुलांनाच शिक्षा का? महिलांना पण शिक्षा झाली पाहिजे असे बोलून या नराधमाने आपली अक्कल पाजळली. विवाहबाह्य संबंध ठेवणार्या स्त्री पुरूषांना दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे असे वक्तव्य अबूने केले. आता या अबूला अक्कल असेल तर बलात्कार आणि विवाहबाह्य संबंध यातील फरक समजेल. बलात्काराच्या घटनेत शारिरीक संबंध आले, लैंगिक संबंध आले तरी ते महिलेच्या संमतीने आले असे अबूला म्हणायचे आहे काय? माझ्यावर बलात्कार करा असा आग्रह कोणत्याही महिलेने केला आहे असे अबुला वाटते काय? बलात्काराच्या घटनेत गलती म्हणून मुलांना सोडून द्यायची अपेक्षा करणारा मुलायमसिंग यादव आणि मुलांबरोबर मुलींनाही शिक्षा झाली पाहिजे म्हणणारा अबू आझमी हे दोघे त्यांच्या आईबापाच्या गलतीमुळे जन्माला आलेले राक्षस आहेत. या राक्षसांना भारतीय राजकारणातून दूर केले पाहिजे. कारण यांच्याच दबावावर काँग्रेसचे सरकार चालत आलेले आहे. मुलायमसिंग यादवाच्या समाजवादी पार्टीचा युपीए -1 ला थेट तर युपीए-2 ला बाहेरून पाठींबा होता. अणूकरारासारख्या आणि अन्य मुद्द्यांबाबत जेव्हा काँग्रेस सरकारला पाठिंबा देण्याची वेळ आली तेव्हा मुलायमसिंगाने आपला पाठिंबा देवून काँग्रेसला वेळोवेळी तारलेले आहे. त्यामुळे मुलायमसिंग यादव, अबू आझमी आणि सोनिया काँग्रेस हे या देशापुढे असलेले फार मोठे संकट आहे. जनतेच्या, मतदारांच्या गलतीमुळे राजकारणात आलेल्या या दुष्ट शक्तींना हद्दपार करण्याची हीच वेळ आहे.
- काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार युवराज राहुल गांधी यांच्यावरही बलात्काराचा आरोप आहे. अमेठीतील काँग्रेस कार्यकर्तीवर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी सामुहीक बलात्कार केला होता. याप्रकरणी त्या पिडीत मुलीची आई दाद मागायला आली तर तिच्यासकट तिच्या कुटुंबियांना गायब केले गेले. त्यांचा आजतागायत पत्ता लागलेला नाही. मुलायमसिंग यादवांच्या उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. ज्याठिकाणी मुलायमसिंग यादव यांचे सरकार आहे, ज्या राज्याचे मुख्यमंत्री मुलायमसिंगांचे पुत्र अखिलेश यादव आहेत त्यांच्या राज्यातील हा प्रकार आहे. काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधींची ही गलती त्यांनी यासाठीच माफ केली का? या सगळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे.
- आज महिलांवरील अत्याचार करणार्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही काँग्रेस नेत्यांची आहे. बलात्काराच्या घटनेत पकडले गेलेल्या जास्तीत जास्त गुन्हेगारांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पोलिसांच्या नोंदीत सर्वाधिक गुन्हे हे उत्तर भारतीयांकडून होताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील हे संकटही महाराष्ट्रात आणण्याचे काम केेले जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील गलती इथे होता कामा नये. मुलायमसिंग यादव, अबू आझमी, राहुल गांधी यांच्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात शिरकाव करू देता कामा नये. महाराष्ट्रात आया बहिणी, मुलींची अब्रू सुरक्षित ठेवायची असेल तर अशा मुलायम प्रवृत्तींचा शिरकाव होता कामा नये. हा शिरकाव करण्याचे काम काँग्रेसकडून होताना दिसते आहे. काँग्रेसचे ठेकेदार ठेकेदारी कामावर स्थानिकांना काम न देता हे उत्तर भारतीय बोलावतात. त्यांच्या झोपड्यांचा भार मुंबईसारख्या शहराला सोसावा लागतो. अशा उत्तर भारतातून आलेल्या मुलायमसिंगांच्या प्रदेशातील तरूणांकडून मग अशा गलत्या होतात. अशी गलती झाकण्यासाठी काँग्रेसचे नेते पुढे सरसावतात. कारण त्या गलतीखोरांबरोबर त्यांचे अनेक कुटुंबिय असतात. त्यांचा लवाजमा मोठा असतो. त्यांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होतात. ठेकेदारी कामावर अशा लोकांना आणण्याचा हाच हेतु असतो. राम ठाकूर यांनी पनवेल, कळंबोली परिसरात असे किती लोक घुसवले आहेत त्याचा हिशोबही लागणार नाही. त्यामुळे अशा दुष्ट प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. वेळीच प्रतिबंध घातला पाहिजे. मुलायमसिंग, अबू आझमीचे विचार अतिशय विखारी आहेत. ते महिलांची अवहेलना करणारे आहेत.
- अबू आझमीचे वक्तव्य आहे की विवाहबाह्य संबंध ठेवणार्या स्त्री पुरूष दोघांनाही शिक्षा करायला हवी. परंतु बलात्कार आणि विवाहबाह्य संबंध हे दोन्ही वेगळे दृष्टीकोन आहेत. विवाहबाह्य संबंधात स्त्री पुरूष दोघांच्या संमतीने शरीर संबंध ठेवले जातात. असे संबंध ठेवणारे या देशात उजळ माथ्याने वावरत असतात. लिव्ह अँड रिलेशनशिप हा त्यातलाच एक प्रकार आहे. या प्रकाराला या देशात मान्यता दिली गेली तेव्हा अबू आझमीची नैतिकता कुठे होती? लिव्ह अँड रिलेशनशीपला अबू आझमींनी विरोध का केला नाही? आज काँग्रेसच्या बहुतेक लोकांचे असे विवाहबाह्य संबंध आहेत. राहुल गांधी चाळीशी ओलांडलेले नेते आहेत. ते काय कोरडे राहिले आहेत असे अबू आझमीला वाटते का? मग उत्तर प्रदेशात मुलायमसिंगाचे सरकार आहे. तिथल्या काँग्रेस नेत्यांना शिक्षा करण्याचे काम समाजवादी पार्टी करणार का?
- विवाहबाह्य संबंध आणि बलात्कार, अत्याचार, लैंगिक शोषण याची सांगड घालून बलात्कार्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे मुलायमसिंग यादव, अबू आझमी यांचे हे धोरण या देशाच्या संस्कृतीवरचे फार मोठे आक्रमण आहे. इथल्या महिलांची अवहेलना करणारे हे धोरण आहे. महिलांना कमी लेखण्याचा हा प्रकार आहे. महिलांना दुय्यम स्थान देण्याचा हा प्रकार आहे. महिलांची बेअब्रू होईल असे कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही. इथला समाज अजूनही जिवंत आहे.
- अरविंद केजरीवालला सामान्य माणसांची थप्पड बसली आहे ती याचमुळे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न घेवून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत रान उठवले. मोठ्या आशेने महिलांनी मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीला मतदान केले. अरविंद केजरीवाल यांना बहुमताच्या जवळ नेवून ठेवले. सरकार स्थापनेच्या वेळी अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाची मदत न घेता काँग्रेसची मदत घेतली. ज्या काँग्रेसच्या राजवटीत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. ज्या काँग्रेसच्या कारकीर्दीत दिल्लीत धावत्या बसमध्ये सामुहीक बलात्काराची घटना घडली त्या काँग्रेसची मदत घेतली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आला तेव्हा राजीनामा देवून मोकळे झाले. आता राजीनामा देवून चूक केल्याची कबूली शुक्रवारी केजरीवाल यांनी दिली आहे. पण त्यांना बसलेली थप्पड ही महिलांचे प्रतिनिधीत्व करणार्या आम आदमीची होती.
- मुलायमसिंग यादव, अबू आझमी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांना महिला महणजे काय खेळणे वाटतात काय? निवडणुकीपुरता त्यांचा वापर करून घेतला आणि नंतर सोडून दिले? हे या देशात कदापि खपवून घेता कामा नये. महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला असला पाहिजे. बलात्कारानंतर महिलेलाही शिक्षा झाली पाहिजे, गलती झाली असे मानून मुलांना माफ केले पाहिजे असे वक्तव्य करणार्या मुलायमसिंग यादव आणि अबू आझमी या प्रवृत्तींना हद्दपार केले पाहिजे.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा