बुधवार, १४ जुलै, २०२१

रामसे बंधूंचे भयपट


बॉलीवूडमधील एक भयानक बॅनर म्हणजे रामसे बंधूंचा बॅनर. या रामसे बंधूंपैकी कुमार रामसे यांचे गुरुवारी निधन झाले, पण गेली पन्नास वर्ष या रामसे बंधूंनी आपली बॉलीवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली. रामसे म्हणजे भयपट असणारं हे समीकरण बनलं होतं. अर्थात त्यात भीती कमी, विनोदच जास्त वाटायचा. घाबरायच्या ऐवजी प्रेक्षक हसायचेच जास्त. कारण एका ठराविक साच्यातून सगळे चित्रपट बनायचे, पण तरीही त्यांच्या चित्रपटांना गर्दी होत होती आणि रामसे बंधू हे नाव गाजत होतं.


रामसे ब्रदर्स म्हणजे बॉलीवूड चित्रपट निर्माते आणि एफ.यू.च्या मुलासाठी बनविलेले कुटुंब आहे. रामसे कुटुंबात सात भावांचा समावेश आहे, ज्यांनी प्रामुख्याने ७० आणि ८० च्या दशकात हॉरर चित्रपट बनविले. तुळशी रामसे (थोरले), श्याम रामसे, गंगू रामसे, कुमार रामसे, केशु रामसे, किरण रामसे आणि अर्जुन रामसे अशी या भावांची नावे आहेत. खरं तर ही नावं ऐकूनही अनेकांना भीती वाटावी अशी टोळीसारखी ही नावे वाटतात, पण आपल्या कुटुंबाने बनवलेल्या चित्रपटासाठी ही भावंडं एकत्रित येत आणि टीमवर्क दाखवून देत होते हे फार महत्त्वाचे होते. चित्रपट निर्मितीसाठी चित्रपट विभागातील विविध विभागांमध्ये विभागणी केली. कुमार रामसे यांनी पटकथा हाताळली, गंगूने छायांकन सांभाळले, किरण रामसे ध्वनी विभाग सांभाळला, केशूने प्रॉडक्शन हाताळला, अर्जुन रामसे यांनी संपादनाची काळजी घेतली आणि तुलसी रामसे यांच्यासमवेत श्याम रामसे यांनी दिग्दर्शन विभाग हाताळला.

रामसेन्स मूळचे रामसिंगानी होते. त्यांनी कराची आणि लाहोरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने चालविली. भारताच्या फाळणीनंतर फतेहचंद यू. रामसे (एफ. यू. रामसे) हे त्यांच्या सात मुलांना घेऊन मुंबईत गेले आणि लॅमिंग्टन रोड येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान सुरू केले. लवकरच हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरमुळे त्यांना या क्षेत्राची भुरळ पडली आणि ते इकडे ओढले गेले. शहीद-ए-आजम भगतसिंग, रुस्तम सोहराब आणि एक नन्नी मुन्नी लाडकी थी यांसारख्या चित्रपटांद्वारे ते व्यवसायात उतरले, मात्र सुरुवातीचेच हे चित्रपट फ्लॉप झाले आणि रॅम्सेज प्रचंड कर्जामुळे दबले गेले. एक नन्ही मुन्नी लडकी थी मधील एका दृश्यात पृथ्वीराज कपूर दरोडा टाकण्यासाठी भूताचा मुखवटा घालतो आणि मुमताजला घाबरतो. या चित्रपटाने त्यांना यश मिळाले नाही, पण भुताचा मुखवटा आपल्याला तारू शकतो ही कल्पना आली आणि हॉरर चित्रपटांची कल्पना त्यांच्या डोक्यात शिरली. त्यातून त्यांचा दो गज जमिन के नीचे हा पहिला हॉररपट आला. चित्रपट हॉरर असल्यामुळे याची जाहीरात रात्री बारा वाजता गंभीरपणे रेडिओवरून करण्यात आली. रेडिओ सिलोन किंवा श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन, विविधभारतीवरून याची रात्री जाहीरात झाली आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यात ती जाहीरात यशस्वी झाली. त्यामुळे प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपट हाऊसफुलचा बोर्ड झळकून यशस्वी झाला.


त्यानंतर रामसे बंधूंनी एकापाठोपाठ अनेक भयपट चित्रपट बनविल. १९८० ते २००० या वीस वर्षांच्या काळात अनेक हॉरर चित्रपट बनवून बॉलीवूडमध्ये भयपट बनवणारी टोळी अशी ख्याती मिळवली. गेस्ट हाऊस (१९८०), वीराना, पुराना मंदिर, पुरानी हवेली, दरवाजा अशी एक मालिकाच सुरू झाली. ‘झी हॉरर शो’सारख्या मालिकेने झी टीव्हीला प्रेक्षक मिळवून देण्याचे काम रामसे बंधूंनी केले, पण दो गज जमिन के नीचे हा मात्र रामसे कुटुंबाला स्थिरावणारा एक मैलाचा दगड होता. एका वेळी जेव्हा सरासरी हिंदी चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्ष आणि २० लाखांचे बजेट लागत होते, तेव्हा दो गज जमिन के नीचेसाठी ४० लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता.

पण सबूत, पुराना मंदिर, सामरी, विराना हे चित्रपटही तुफान गाजले होते. पुराना मंदिरमध्ये इंग्रजी चित्रपट ज्याप्रमाणे कशाही प्रकारची भीती निर्माण करतात तशाप्रकारचे इंग्रजी चित्रपटांतील दृश्यांची कॉपी केली होती. विशेषत: या चित्रपटावर इव्हील डेड १ या चित्रपटाचा प्रभाव होता. झाडांची मुळं पारंब्या पाठलाग करतात तो सीन इंग्रजी चित्रपटावर बेतला होता, पण प्रेक्षक हे चित्रपट एन्जॉय करत होते. रामसे हे फार मोठे नाव झाले होते. रामसेंचे चित्रपट म्हणजे एक विशिष्ट प्रेक्षक तयार झाला होता. कुठून तरी चार-पाच तरुण-तरुणी एखाद्या हवेलीत येणार आणि त्यापैकी एकेक जण भुताचा बळी ठरणार. मुख्य नायक नंतर कुठल्या तरी देवतेच्या वरदानाने त्या भुताचा खात्मा करणार. दरम्यानच्या काळात त्यांचा प्रेमसीन, कमी कपड्यात अंगप्रदर्शन, एखादी आंघोळ, टबबाथ हे मसाले आंबट शौकिनांना खूश करण्यासाठी टाकले की झाला चित्रपट तयार. शेवटी भुताबरोबर मोठी फायटिंग, त्यात मांत्रिक वगैरे काहीतरी असणार. या मसाल्याची प्रेक्षकांना चटक लागली होती. तो मसाला बनवणारे एक रामसे गुरुवारी काळाच्या पडद्याआड गेले आहेत, पण बॉलीवूडला भयपटांनी समृद्ध करणाºया टोळीतील एक घटक अशारीतीने गळाला आहे.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: