गुरुवार, २० मे, २०२१

सोशल डिस्टन्सिंग पाळून मान्याच्या वाडीत बारसं


मान्याच्या वाडीतल्या ग्रामस्थांनी एकदा मनात घेतलं की गांव करेल ते राव करेल का म्हणीप्रमाणं असतं. आता कोरोनाची साथ संपूर्ण देशभर असताना मान्याच्या वाडीने मात्र कोणताही कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग पाळूनच करायचा असं ठरवलं होतं. आपल्या गावाचा आदर्श समद्या देशानं बाळगला पायजेल हे वाक्य प्रत्येकाच्या ओठी होतं; पण या मान्याच्या वाडीनं आपलं वेगळेपण कधीच सोडलं नाही.

कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला २५ पेक्षा जास्त लोकांनी जमायचं नाही हा नियम पाळूनच रंगराव मान्यांच्या घरात बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा बारशाचा कार्यक्रम बारा तास चालणार होता. गावचा उंबरा अडीचशेच्या घरात होता. त्यामुळे घरटी दोन माणसं बारशाच्या घुगºया खायला येणार म्हणून तासातासाचे गट पाडून बारशाचं आयोजन करण्यात आलं होतं.


बारशाची तयारीही लई म्हंजे लईच भारी केली व्हती. रंगरावच्या वाड्यात मधल्या चौकात पाळणा ठेवला होता. पाळण्याभोवती चहुबाजूने आठ-आठ फुटाचे अंतर सोडून रांगोळी काढली होती. त्या रांगोळीच्या आत कुनी यायचं न्हाई असा वट्टहुकम काढला होता. रांगोळीनं तो लिव्हला बी हुता. पाळण्याच्या डाव्या अंगाला लेकुरवाळी बसली हुती आणि पाळण्याची दोरी दोन्ही बाजूला लांब घेऊन बारशाला येणाºयांना जोजवायला ठेवली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळून बारशाचा कार्यक्रम सुरू झाला. वाड्याच्या बाहीरपतुर करणे लावले होते. त्यामुळे गावाच्या पारापर्यंत आतल्या बारशाच्या कार्यक्रमाची कॉमेंट्री पोहोचत होती.

बकुळाबाई, हौसाबाई नटून थटून वाड्यावर पोहचल्या. बारशाला सुरवात हुईपतुर दोगींच्यात चर्चा सुरू झाली. ‘काय आनलंस बाळंतइड्याव गं? ’ बकुळेनं इचारलं तसं नाक मुरडत हौसाबाई म्हणली, ‘ काय नाय.. नेमीचंच बग सगळं. अंगडं, टोपटं, दुपटं, कुंची, झबली... झालंच तर हाळीवाचं, डिंकाचं लाडू. अन् चांदीचं वाळंबी आणलंत. अन तू काय आणलंस ग?’ एका दमात हौसाबाईनं सांगितलं तसं, बकुळाबाई म्हणली, ‘म्या बी हेच आणलंय फकस्त यात बाळासाठी मास्क आणलंय. आता आमची सून म्हणाली, नियम पाळाय हवं. बाळाला भी मास्क घालाय नगं? म्हणून तिनंच बाळासाटी मास्कभी शिवलं. लई गुनाची हाय माजी सून.’


‘माज्याबी मनात हुतं, बाळंतविड्याव मास्क द्याचं; पण आमची सून कसली? म्हणतीय, बाळाच्या लंगोटालाच लांब नाडी करा, म्हंजे मास्क अन लंगोट टू इन वन हुईल. बाळाची आईभी बाळाचा लंगोट मास्क म्हणून तोंडाला लावू शकेल. म्हणून म्या पाच रंगीत लंगोट आणले. लंगोट म्हणून वापरा नायतर मास्क म्हणून. कुटलं तरी शेवटी तोंड झाकणं म्हतवाचं.’

इतक्यात बारशाची तयारी झाली. वरवंट्याला कुंची आणि मास्क बांधून रंगराव मान्याची बायकू सगुना अन तिची इहीन शांताक्का यांच्यात कुनी गोविंद घ्या कुनी गोपाळ घ्या सुरुवात झाली. मग सगुनाबाई म्हणाली, कुणी कोव्हीड घ्या, तर शांताक्का म्हणाली कुनी शॅनिटायजर घ्या. अशी वेगवेगळी शब्दावली झाली अन् माईक हातात घिऊन चंद्राक्का बोलायला लागली. ‘आपल्या मान्याच्या वाडीतील प्रतिष्ठीत रंगराव मान्यांची पोरगी सुषमा अन् शेजारच्या गावातील जयंतराव पाटील यांनी गेल्यावर्षी सोशल डिस्टन्सिंग ठेवून गावाला दिलेली भेट म्हणजे आजच्या बारशाचा दिवस हाय. सोशल डिस्टन्सिंग आणि सरकारी नियम म्हणून प्रत्येकाला इथं येता आलं न्हाई. गावात आपल्याकडं फेसबुक लाईव्ह करण्याची सोय नायी. त्यामुळं गावात समद्यांना पाळणा ऐकायला येईल. बारशाच्या घुगºया घराघरात होम डिलीव्हरी केल्या जातील. तरी आता समद्यांनी बारशाला तयार व्हा.’


चंद्राक्कानं हातात माईक घिऊन किनºया आवाजात पाळणा गायला सुरुवात केली.

‘ पहिल्या दिवशी जयंतराव आले


सुशलीला घेऊन गावाला गेले

लॉकडाऊनमुळे गावात अडकले


जू बाळा जू जू रे जू ।।धृ।।

लॉकडाऊनचा फायदा दोघांनी घेतला


मास्क तोंडाला, खाली घोटाळा

त्याचा हो आता परिणाम आला


जू बाळा जू जू रे जू ।।१।।

दुसºया महिन्यात लॉकडाऊन वाढला


बाळाच्या बापाला वेळ मिळाला

कौतुक बाळाच्या आईचं झालं


जू बाळा जू जू रे जू।।२।।

बाळाच्या आईला ढवाळं लागलं


सॅनिटायजर तिला नकोस झालं

उलट्यांनी घर खराब केलं


जू बाळा जू जू रे जू ।।३।।

चवथ्या महिन्यात मळमळू लागलं


डाक्टरांनी स्वॅब टेस्ट हो केलं

रिपोर्ट तिचा पॉझिटिव्ह आला


तो मेला प्रेगाटेस्टीचा होता ।।४।।

समदाच घोटाळा झाला की होता


लॉकडाऊनमुळे वेळ मिळाला होता

दोन्ही घरात आनंद झाला


बारशाच्या समद्यांस्नी वाटू घुगºया ।।५।।

आता बाळाच्या आत्यानं येऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून लांबूनच बाळाच्या कानात कुर्रर्र करा आणि बाळाचं नाव ठिवा.’ चंद्राबाई नं आटोपतं घेतल अन् जोरात माईकवर झिंगाट गाणी सुरू झाली. सोशल डिस्टन्सिंग पाळून गावात बारसं थाटात झालं म्हनून सैराटची कॅसेट लावली अन् घराघरात बारशाच्या गाण्याचा थाट, आली झिंग झिंग झिंगझिंग झिंगाट म्हणत माणसं नाचायला लागली. मोजक्याच माणसात कसा समारंभ करायचा याचा नवा पायंडा मान्याच्या वाडीनं पाडला होता. घराघरात होम डिलीव्हरी जेवनाचं डबं पोचवण्यात रंगरावाच्या घरातील माणसं दंगली होती, तर बाळाची आई बाळंतविड्यावरच्या मास्क आणि लंगोट याचे सॉर्टिंग करत बसली होती.


प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: