जो विश्वास का पात्र नही हैं, उसका तो कभी विश्वास किया ही नही जाना चाहिए। पर जो विश्वास के योग्य हैं, उस पर भी अधिक विश्वास नही किया जाना चाहिए। विश्वास से जो भय उत्पन्न होता हैं, वह मूल उद्देश्य का भी नाश कर डालता हैं। : विदुरनीती
सध्या देशात येत असलेल्या आणि पुढील आठवड्यापासून सुरू होणाºया लसीकरणाबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. खरं तर त्याचे विनाकारण राजकारण केले जात आहे. म्हणजे मिलीटरी, पोलीस, सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स ही खाती स्वतंत्र आहेत. ती राजकीय पक्षांच्या किंवा सरकारच्या मालकीची आहेत, असा समज करून त्यावरून राजकारण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यातच आता या लसीकरणाचे झालेले आहे. म्हणजे ही लस भाजपची आहे, असा उगाचच कांगावा केला जात आहे. त्यात बाबा रामदेवही ही लस मी घेणार नाही, असे बोलून गेले. अर्थात त्यांनी दावा केलेल्या औषधाला अनेक राज्य सरकारांनी नाकारल्यामुळे रामदेव बाबा लस घेणार नाहीत, हे नक्कीच होते. पण जी लस सरकारमार्फत देणार आहे, त्यावर कोणत्याही पक्षाचा शिक्का लावणे हे चुकीचे आहे.
आपला जर या लसीवर विश्वास नसेल, तर नका घेऊ काही सक्ती नाहीये इथे. यासाठी महाभारतातील एक उपेक्षित पण नितीवान महात्मा विदुराचे नीतीवचन फार महत्त्वाचे आहे. जो विश्वास का पात्र नही हैं, उसका तो कभी विश्वास किया ही नही जाना चाहिए। पर जो विश्वास के योग्य हैं, उस पर भी अधिक विश्वास नही किया जाना चाहिए। विश्वास से जो भय उत्पन्न होता हैं, वह मूल उद्देश्य का भी नाश कर डालता हैं। म्हणूनच आपला या सरकारवर विश्वास नसेल, या लसीवर विश्वास नसेल, तर ती बिल्कुल घेऊ नका. पण तुम्ही घेणार नाही म्हणून ज्यांना घेण्याची ईच्छा आहे त्यांना अडवू नका. त्यांना त्यांच्या विश्वासाचा काय फायदा होतो आहे याचा अनुभव घेऊ देत. विश्वासाच्या आणि अविश्वासाच्या नावावर भीती निर्माण करण्याचे नाटक थांबले पाहिजे. विश्वास आणि अविश्वास या दोन्हींमध्येही भीतीचा अंतर्भाव आहे हे विदुराने सांगितलेले वचन लक्षात घेतलेच पाहिजेत.
आता खरं तर गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाची सगळी लक्षणं ही सर्दी पडशाची आहेत. आपल्याकडे लहानपणापासून सांगितले गेलेले आहे की, सर्दीवर औषध नाही. तीन दिवसांनी ती आपोआप बरी होतेच. सर्दी ही एक शारीरिक प्रक्रिया आहे. घाम येणे, शौचास लागणे तशीच ती एक उत्सर्जनाची प्रक्रिया आहे. तिची व्याप्ती कमी अधिक असू शकते, पण सर्दीवर औषध नसते. या व्हिक्सन वगैरे आपण वापरतो ते श्वासाला आराम पडावा म्हणून पण त्याने सर्दी दूर होत नसते. त्यामुळेच कोरोना जर सर्दीप्रमाणेच असेल, तर त्यावर लस असेल का? जर ती लस यशस्वी ठरत असेल, तर तो सर्दीवरचा रामबाण उपायही ठरू शकतो. कोरोनाची लस घेतल्यामुळे माणसांना सर्दी होणार नाही का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. त्यामुळे या लसीबाबत प्रत्येकाने आपल्या मनाने पटले, तरच ती लस घेतली पाहिजे. पण लस घेतली म्हणजे तो भाजपचा झाला आणि नाही घेतली म्हणजे तो काँग्रेसवाला झाला, विरोधक झाला असला समज कोणी करून घेऊ नये. लसीचा आणि मतदानाचा, मतदानाच्या कौलाचा काहीही संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये इतकीच अपेक्षा आहे.
त्याचप्रमाणे सबसे तेजच्या नादात वृत्तवाहिन्या ही बातमी सर्वात प्रथम आम्हीच दाखवली म्हणून जाहिरात करतात. त्या बातमीची सत्यासत्यता न तपासता ती ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली जाते. नंतर अनेकवेळा त्यांना ती बातमी चुकीची असल्याचे लक्षात आल्यावर तोंडघशी पडायला होते. मग खुलासे करायला लागतात. तसला प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये. आमच्या सरकारच्या काळात कोरोनावर मात केली, आम्ही लवकरात लवकर लसीकरण केले असे राजकारण जर कोणी आगामी जाहिरनाम्यातून, निवडणुकीतून केले तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाने न्यायालयाने तातडीने कारवाई करावी लागेल. याचे कारण लसीकरणाची जाहिरात जर राजकीय पक्षाने केली आणि ते जाहिरनाम्यात, वचननाम्यात असेल तर त्या पक्षावर कडक कारवाई करावी लागेल. कारण ही एक जागतिक आपत्ती आहे. ती आपत्तीही मग त्या राजकीय पक्षानेच आणली असे म्हणावे लागेल. त्यामुळे कोणत्या गोष्टीचे राजकारण करावे, कशाचा बाजार मांडायचा हे राजकीय पक्षांनी ठरवले पाहिजे. ज्याप्रमाणे कोरोना लसीवरून सध्या राजकारण चालवले आहे आणि त्यावरच्या विश्वासाचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे, तो पाहता कोणत्याही राजकीय पक्षाने आगामी निवडणुकीत कोरोनावरून हाताळलेल्या परिस्थितीचा समावेश आपल्या भाषणांतून, जाहिरनाम्यातून केला तर तो आचारसंहितेचा भंग असेल, अशी नोंदही केली पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा