राज्यात ज्या प्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळली आणि त्यावर विजय मिळवला त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत समाधानी दिसत आहेत. कोरोनाचे संकटात त्यांनी घेतलेले परिश्रम हे फारच महत्वाचे आहेत. मुंबईतील धारावीची परिस्थिती संघ स्वयंसेवकांची कसलीही मदत न घेता त्यांनी ज्याप्रकारे हाताळली आहे ती फार महत्वाची आहे. त्यामुळेच जागतीक आरोग्य संघटनेनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे कार्य आणि मुंबईतून कोरोना हद्दपार करण्याच्या त्यांच्या या कार्याची दखल वॉशिंग्टन पोस्टनेही घेतली. त्यामुळे त्यांच्या चेहर्यावर समाधान येणे स्वाभाविकच होते. तीन पक्षांचे सरकार सांभाळत असताना आणि समोर तगडा विरोधी पक्ष असतानाही घरात बसून संपूर्ण राज्याचा गाडा गेल्या चार महिन्यात त्यांनी ज्याप्रकारे हाताळला आहे तो अतिशय समाधानकारक आहे. त्यामुळेच शिवसेना खासदार संजय राउत यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक समाधानाची झलक दाखवली.
म्हणजे आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याची मुलाखत इतकी समाधानकारक बघायला मिळाली नाही. राजकीय नेता म्हटले की सामाजिक प्रश्न, ताणतणाव, बेरोजगारी, नागरिकांच्या समस्या या व्यतिरीक्त नेत्यांनी काही बोलायचे नसतेच. त्यामुळे अशा मुलाखती पहायला नागरिक कंटाळतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहताना मात्र संपूर्ण महाराष्ट्राला आनंद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्राच्या चेहर्यावर समाधान आणि आनंद पसरल्याचे दिसून आले. म्हणतात ना यथा राजा तथा प्रजा. आपल्या राजाचा चेहराच इतका स्वच्छ, समाधानी, आनंदी असेल तर सगळेच आनंदी राहतील. त्यामुळेच मुलाखतकारांनी एखाद्या अभिनेता, मॉडेलला ज्याप्रमाणे त्याचे दिसणे, हसणे, हेअरस्टाईल, चेहर्यावरचे समाधान याबाबत प्रश्न विचारावेत तसे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले तेंव्हा सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे काही वर्षांपूर्वी तेजश्री प्रधानची होणार सून मी या घरची मालिका गाजत असताना, एका वाहिनीवर तिची मुलाखत घेतली होती. त्यावेळी तिच्या मस्त हसण्याचे, काहीही हं श्री याचे जे कौतुक झाले तसेच हे कौतुक करावेस वाटले.
त्यामुळे मुलाखतकारांच्या प्रश्नाला उत्तर देतानाही मुख्यमंत्री तेवढेच हसत म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यामुळे मी तणावमुक्त आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे ताण-तणाव नाहीत. जनतेने दाखवलेला विश्वास हे माझं बळ आहे. जनतेच्या विश्वासाचे, जनतेने दिलेल्या बळाचे इतक्या प्रामाणिकपणे कौतुक करणारे हे राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. आजकाल कोणी कुणाचे आभार मानत नाहीत. पण उद्धव ठाकरे यांचे मनच इतके मोठे आहे की म्हणतात ना, मन मोठे असले की सगळं काही सामावता येते. अर्थात हे जान्हवीनेच म्हटलेले आहे. पण त्यांचे टेन्शन लेने का नाही ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला भारावून टाकणारी अशीच आहे हे नक्की.
सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार, त्याहीपेक्षा महाविकास आघाडीचे प्रवर्तव संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. आपण हे सरकार घडवण्यात यशस्वी झालो याचे पूर्णपणे समाधान मुलाखतकारांच्याही तोंडावर दिसत होते. त्यामुळेच गदीमांनी म्हटल्याप्रमाणे ज्योतीने तेजाची आरती असाच काहीसा प्रकार या सुंदर मुलाखतीत पहायला मिळाला.
या मुलाखतीत संजय राऊत यांनी पहिलाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना त्यांच्या चेहर्यावरुन विचारला. संजय राऊत म्हणाले आज तुमचा चेहरा ताण-तणाव नसलेला दिसतो आहे. यावर पटकन मुख्यमंत्री म्हणाले की आज सामनाची मुलाखत आहे त्यामुळे कोणताही तणाव नाही. त्यानंतर या प्रश्नावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. अर्थात सामनाची मुलाखत म्हणजे सामनानिश्चिती किंवा मॅच फिक्सींग नक्कीच नव्हते. कारण या मुलाखतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली तर ते मॅचफिक्सिंगचा आरोप लावतील म्हणून आधीच त्यावर भाष्य करून टाकतो. कारण शरद पवारांची काही दिवसांपूर्वी मुलाखत अशीच घेतली तेंव्हा त्यांनी मॅच फिक्सींग म्हणजे सामना निश्चिती म्हटले होते, त्यासाठी हा खुलासा इथे करावा लागतोय. पण मुख्यमंत्र्यांनी सामनाची मुलाखत असल्याने तणाव नाही, चिंता नाही असे म्हटले आहे. अर्थात कोणी दुष्ट पत्रकार, विरोधक याचा वेगळा अर्थ काढतील. सामनाची असल्यामुळे चिंता नाही, टेन्शन नाही. दुसर्या कोणी घेतली तर काय विचारतील आणि काय उत्तर द्यायचे याचे टेन्शन असणार का? पण असे प्रश्न विरोधकांना पडतातच. त्या दुष्ट विरोधकांकडे आपण दुर्लक्षच केलेले बरे. पण मुलाखतकारांना मुख्यमंत्र्यांनी छानच उत्तर दिले.
माझा चेहरा स्वच्छच आहे. फेसबुक लाइव्हमध्ये बोलतानाही माझा चेहरा स्वच्छच असतो. फेसबुकच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधला, बौद्धिक घेतलं काहीही म्हणू शकता. तरीही जनतेशी मी नातं तुटू दिलेलं नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी जनतेसोबत असलेलं नातं तुटू दिलेलं नाही. प्रत्येक संकटात प्रत्येक पाऊल टाकत असताना आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास मी जनतेला देऊ शकलो आहे. मी माझ्या फेसबुक लाइव्हमधून किंवा जेव्हा जनतेशी बोललो तेव्हा हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मी तुमच्यासोबत आहे. जनतेने माझ्यावर म्हणजेच सरकारवर विश्वास ठेवला आहे याचं मला समाधान आहे, आनंद वाटतो आहे. जनता सरकारचं ऐकते आहे, सहकार्य करते आहे. माझ्या चेहर्यावर ताण तणाव नाहीत हे जे तुम्ही (संजय राऊत) म्हणालात त्यावर मी एवढंच सांगेन की जनता सोबत असताना कोणत्याही ताण-तणावांची गरज नाही. जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठं बळ देणारा आहे. हा विश्वास जोवर माझ्यासोबत आहे तोवर मला ताण-तणावांची पर्वा करण्याची गरज वाटत नाही.
हा जनतेवरचा दाखवलेला विश्वासच फार महत्वाचा आहे.त्यानंतर बरेच दिवस आपण जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहात.. असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.. जनतेची काळजी अजूनही आहे. आपल्याशी बोलत असतानाही माझ्या डोक्यात जी काही माहिती आत्तापर्यंत माझ्याकडे आली आहे त्याचे विचार आहेतच. पण मुख्यमंत्र्यांनी नुकतेचे केस कापले आहेत, लॉकडाउनच्या काळात मी हातानेच केस कापत होतो अशा गोष्टी आपल्या मुलाखतीतून सांगून आपले साधेपण त्यांनी कसे जपले आहे हे दिसून येते. म्हणजे आपले मुख्यमंत्री आत्मनिर्भर आहेत. सलून, पार्लर चालू नाहीत, कारागीर नाहीत तर तुम्ही आत्मनिर्भर बनले पाहिजे, आपले केस आपण कापले पाहिजेत हे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. मुलाखतीच्या सुरवातीलाच त्यांनी या गोष्टी सांगून साधी राहणी, उच्च विचारसरणी या ध्येयातुन राज्याला कसे महान घडवता येते आणि कोरानासारख्या संकटाला कसे पळवून लावता येते हे दाखवले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा