देशभरात कोरोनाचा कहर असताना त्याच संधीचा फायदा उठवत आपले राजकीय महत्व कसे वाढेल यासाठी राजकीय पक्ष आक्रमक झालेेेले दिसतात. राजस्थानात काँग्रेसमधील वाद घडत असतानाच महाराष्ट्रात सरकार आम्ही पाडणार नाही, ऑपरेशन लोटस नाही असे म्हणत भाजप काही वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया आपोआप आघाडीतील घटक पक्षांकडून उमटताना दिसतात.
महाविकास आघाडीमधील नाराजीचे प्रदर्शन अधूनमधून होत असले तरी त्याचा सरकारच्या अस्तित्वावर परिणाम होऊ द्यायचा नाही, असे या आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी पक्के ठरविले आहे. शरद पवार तर वारंवार म्हणत आहेत की पुढच्या निवडणुकाही आम्ही एकत्रच लढवू. अर्थात हे पुढचे पुढे. कारण जागा वाटपात कोणी किती जागा लढवायचा हा मुद्दा आला तर इतक्या कमी जागा महाराष्ट्रात प्रत्येकाच्या वाट्याला येतील की शेटवी मैत्रीपूर्ण लढत हा काँग्रेसचा फॉर्म्युला पुढे येईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
त्याचवेळी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू, असा जो विश्वास पक्षाध्यक्ष नड्डा यांनी व्यक्त केला आहे, ते स्वप्न प्रत्यक्षात कसे आणि कोण साकारणार, हा खरा प्रश्न आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यामध्ये स्वबळावर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यसमितीस नवी दिल्लीतून व्हर्च्युअल मार्गदर्शन करताना पक्षाध्यक्ष नड्डा यांनी कोरोनाच्या महामारीचा सामना करण्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची माहिती कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे जनतेपुढे मांडण्याची आवश्यकता असल्याचे आवर्जून सांगितले. त्यामुळे पुढच्या निवडणुका या रस्ते, पाणी, बेरोजगारीवर न लढता कोरोना हा त्यातला महत्वाचा मुद्दा असणार आहे हे नक्की झाले आहे.
भाजपच्या या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह काही नेत्यांनी भाषणे केली. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याबरोबरच कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला जी मदत देऊ केली त्याची माहितीही जनतेपुढे गेली पाहिजे, असे पक्षनेतृत्वाने कार्यकर्त्यांना सांगितले. याचा दुसरा अर्थ, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्राने जे विविधांगी प्रयत्न हाती घेतले आहेत त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यामध्ये भाजप कार्यकर्ते कमी पडत आहेत.
महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असल्याचा आरोप भाजप अध्यक्षांनी केला. कोरोना महामारीच्या काळात जो भ्रष्टाचार होत आहे त्याची माहिती जनतेपुढे पोहोचवायला हवी, असे ते म्हणाले. या कार्यक्रमामध्ये बोलताना, राज्यात होणार्या आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर जिंकेल, असा विश्वास व्यक्त करून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वारे भरण्याचा प्रयत्न पक्षाध्यक्षांनी केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की लॉकडाउन उठला की भाजप महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी काहीतरी हालचाली करणार. राज्यात पुन्हा निवडणुका लादणार आणि त्याचा महत्वाच विषय हा कोरोना असणार आहे. पण या निवडणुकीत कोणाला आनंद असणार आहे? मतदारांना सध्या रोजगाराची चिंता आहे, पोटापाण्याची चिंता आहे अन राज्यकर्त्यांना मात्र आपल्या खुर्चीची चिंता आहे हेच यातून दिसते.
या कार्यक्रमामध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार नीट चालवून दाखवा, असे आव्हान दिले. एकूण परिस्थिती पाहता राज्यात सरकार अस्तित्वातच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. कोरोना महामारीचे संकट अद्याप कायम असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या संकटावर मात करण्यासाठी एकदिलाने काम करीत आहेत, असे चित्र खरे म्हणजे दिसायला हवे. पण कोरोना महामारीच्या निर्मूलनाऐवजी सरकार पाडून दाखवा’ आणि सरकार चालवून दाखवा’ असा कलगीतुरा राज्यात सुरू असल्याचे दिसत आहे. म्हणजे संजय राउत, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार पाडून दाखवा असे आवाहन देत आहेत तर देवेंद्र फडणवीस सरकार चालवून दाखवा असा सल्ला देत आहेत. हा फार मोठा राजकीय विनोद आहे. कारण सध्या सरकार चालूच नाहीये. कारभार सगळा प्रशासन करते आहे. कुठे लॉकडाउन वाढवायचा, काय शिथील करायचे हे सगळं प्रशासन ठरवते आहे.
खरं तर राज्यात रोज हजारो जणांना कोरोनाची लागण होत आहे. अनेक रुग्ण महामारीमुळे बळी पडत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार जे प्रयत्न करीत आहे त्यामुळे राज्यामध्ये नव्या रुग्णांपेक्षा कोरोनमुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचे सुचिन्ह दिसत आहे. असे असले तरी कोरोनाचा वेढा मुळीच सुटलेला नाही, हे लक्षात घेऊनच कार्य करण्याची गरज आहे. सरकार चुकत असेल तेथे टीका करणे हे विरोधी पक्षांचे कामच आहे. लोकशाही सुदृढ राहण्यासाठी प्रभावी विरोधी पक्ष असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील सरकार अनेक आघाडयांवर अपयशी ठरत असून सरकारचे हे अपयश जनतेपुढे प्रभावीपणे मांडण्यात यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही कार्यकर्त्यांना केले. पण प्रत्यक्षात सरकारचे कथित अपयश जनतेपुढे मांडण्यात भाजपचे राज्यातील नेतृत्व अजून तरी सफल झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे चालवून दाखवा’ आणि पाडून दाखवा’ यावरून जो कलगीतुरा होत आहे त्याद्वारे या कोरोनाच्या संकटात जनतेची करमणूक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे जे सरकार अस्तित्वात आहे त्या सरकारला खिंडार पाडण्यात वा जनतेच्या मनात त्या सरकारबद्दल वाईट मत निर्माण करण्यामध्ये भाजपच्या राज्यातील नेत्यांना अजून यश मिळत नाही. सध्या मिळण्याचेही चिन्ह दिसत नाही. सरकार कोण चालवीत आहे, स्टिअरिंग कोणाच्या हातात आहे तेच कळत नाही, असे आरोप विरोधक करीत असले तरी सरकार त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करीत आहे. खरं तर हीच आज राज्यातील भाजपची डोकेदुखी आहे. पण यातून एक दिसून येते की फडणवीसांना दूर करून भाजप काही नवा फॉर्म्युला काढते का? कारण बहुतेकांचा विरोध भाजप पेक्षा फडणवीसांना जास्त आहे. त्यांचे कर्तृत्व चांगले असले तरी हा विरोध का होत आहे याचे कारण सर्वांना माहिती आहे. पण म्हणूनच भाजपमधील दादाही राज्याच्या हितासाठी सेनेबरोबर एक येण्याचा विचार व्यक्त करत असावेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा