एल्गार परिषदेत शेरजील उस्मानी नामक नतद्रष्टाने हिंदूंबद्दल केलेली वाईट वक्तव्यं सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे अनेकजण त्या नराधमाला शिव्या घालत आहेत, पण शेरजीलवर रागावून काय उपयोग आहे, असा प्रश्न आज विचारला गेला पाहिजे. कारण भारतातील हिंदुत्व संपवायला जे टपले आहेत आणि पुरोगामीपणाचा आव आणत आहेत ते मूळचे हिंदूच आहेत. त्यांच्यावर रागावले पाहिजे. स्वत:ला न्यायमूर्ती म्हणवणाºया आणि मनुवाद, मनीवादाला आमचा विरोध आहे असे म्हणणारे न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी त्याला आमंत्रित केलेले होते. रागवायला त्यांच्यावर पाहिजे. मनीवादाला म्हणजे पैशाच्या मागे लागणाºया लोकांना विरोध आहे असे त्यांनी शेरजीलची पाठराखण करताना म्हटले, पण १९७५ मध्ये पुण्यात जे जोशी अभ्यंकर खून प्रकरण घडले होते त्यात जक्कल सुतार अशा आरोपींची वकीलपत्रे कोणी घेतली होती? तो मनीवाद नव्हता का? पैशासाठी कोणाचेही वकीलपत्र घेण्यास तयार होणारी प्रवृत्ती ही कोणती होती, मनुवादी की मनीवादी? त्यामुळे शेरजीलवर रागावून काही उपयोग नाही, तर शेरजीलला प्रोत्साहन देऊन आपल्याच धर्मीयांबद्दल वाईट बोलायला लावणाºयांवर रागावले पाहिजे.
विहिरीतील एका बेडकाने आपल्याच बांधवांना संपवण्यासाठी सापाशी मैत्री केली. तुला रोज एक बेडूक खायला देतो सांगून त्या सापाला बोलावले आणि त्या विहिरीतील सगळी बेडकं एकेदिवशी संपली. तेव्हा मला खायला काय आहे असे सापाने विचारल्यावर त्या बेडकाकडे उत्तर नव्हते. शेवटी त्या सापाने त्या बेडकाला फस्त केले. त्यामुळे ही जी शेरजीलशी बेडकुमैत्री या एल्गारच्या लोकांनी चालवली आहे ती त्यांना त्रास होईल तोपर्यंत राहील. त्यामुळे शेरजील उस्मानीपेक्षा घातक हे लोक आहेत की ज्यांनी पुरोगामीपणाचा बुरखा चढवून देशात जातीयवादाचे, धर्मवादाचे विष पसरवण्यास सुरुवात केलेली आहे.
याबाबत लोखंड आणि सोने यांचे उदाहरण लक्षात घेतले पाहिजे. सोनाराच्या दुकानात सोन्यावर घाव पडत होते आणि लोहाराच्या दुकानात लोखंडावर. सोने मुकाटपणे घाव सहन करत होते. त्याचा आवाज फारसा नव्हता, पण लोखंडाचा आवाज मात्र कर्कश होता. सोन्याचा तुकडा उडाला आणि समोर लोहाराच्या भात्यापाशी पडला. सोने म्हणाले, अरे लोखंडा आपले दोघांचे दु:ख एकच आहे. दोघेही आगीत भाजलो जात आहोत आणि घावही सहन करत आहोत. मग हा आरडोओरडा कशासाठी? मी सहन करतो आहे. तसा तूही कर ना. त्यावर लोखंड म्हणाले, तुझे बरोबर आहे. दोघेही आगीत तावूनसुलाखून निघतो आहोत, पण आगीपेक्षा वरून जो घाव पडतो आहे त्याचे दु:ख आहे. आपल्या दोघांवरही घाव घालणारा एकच आहे. तुझाही हातोडा लोखंडाचा आहे आणि माझाही लोखंडाचा आहे, पण सोन्यावर लोखंडाचा घाव आहे, सोन्याचा नाही. तुझे स्वकीय तुझ्यावर घाव घालत नाहीत, सोन्याचा हातोडा पडत नाही तोपर्यंत तू शांत राहशील, पण मला स्वकीय घाव घालत आहेत त्याचे दु:ख आहे म्हणून मी ओरडतो आहे.
आज नेमके तेच घडते आहे. शेरजील हा कुठल्या परक्या धर्माचा, घाणेरड्या विचारांचा माणूस. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशी करता येईल? पण कोळसे-पाटील तर भारतीय आहेत ना? कदाचित हिंदूही असतील, पण आपल्या लोकांनी केलेल्या पाठराखणीवर हा राग आहे. त्याचप्रमाणे जे सरकार आज आहे त्यामध्ये बहुसंख्य हिंदू आमदार, मंत्री आहेत, तरीही त्यांना राग येत नाही, ते त्या शेरजीलवर काही कारवाई करत नाहीत, सरकार थंड बसले आहे त्याचा राग येतो. हा आपल्या स्वकियांनी केलेला घाव आहे. शेरजील उस्मानी तर परकीय आहे. तो माणूसच नाही तर विकृत आहे, पण स्वत:ला उच्च शिक्षित म्हणणारे लोक त्याची पाठराखण करतात यावर राग आलाच पाहिजे.
आपलेच लोक आपला घात करतात तेव्हा दु:ख होते, राग येतो. पाकिस्तानने भारताचा द्वेष केला तर त्यात वेगळे काय आहे? त्यांचा तो स्वभाव आहे, पण जेव्हा काँग्रेसवाले पाकिस्तानची भाषा बोलतात तेव्हा राग येतो. त्यामुळे आपल्याला समजले पाहिजे की कोणावर रागावले पाहिजे. एल्गार परिषदेत इतके हिंदू लोक असताना जाहीर व्यासपीठावर तो शेरजील उस्मानी अशी भाषा करतो तेव्हा त्या हिंदूंना राग येत नाही. हेच ते सडलेपण आहे. या लोकांनीच हिंदू धर्म सडवण्याचा विडा उचलला आहे. त्यालाच पुरोगामी म्हणायचे आहे का? हिंदू धर्मीयांवर टीका केल्यावर पुरोगामीपण येते ही इतकी सोपी व्याख्या पुरोगामी महाराष्ट्राची करत असतील तर या महाराष्ट्राला पुरोगामीपणाचा खरा वारसा देणारे राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान हे लोक करत आहेत. या लोकांनी कधी द्वेषाची भावना दाखवली नाही, पण सध्या पुरोगामीपणाच्या नावाखाली द्वेषाची भावना प्रकट केली जात आहे. त्यामुळे या शेरजीलपेक्षाही त्याची पाठराखण करणारे महादोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. शेरजील उस्मानीवर रागावून काही साध्य होणार नाही, उद्या हे पुरोगामी लोक पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नातेवाईकांनाही पुढच्या परिषदेला बोलावतील, दाऊदच्या नातेवाईकांना बोलावतील, तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा