महाराष्टÑाच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘विना सहकार नही उद्धार’ अशी हाक दिली. सहकारातूनच समृद्धीकडे जाता येईल, हे त्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सांगितले. त्याप्रमाणे सहकाराने एक सुवर्णकाळ पाहिलाही. १९७० आणि १९८०चा काळ हा सहकाराचा सुवर्णकाळ होता, परंतु १९९०च्या दशकात जागतिकीकरणाचे आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यावर या सहकाराला ग्रहण लागले. यामध्ये सहकारातून साधल्या जाणाºया विकासाची कल्पना गिळंकृत केली गेली. मोठ्या माशाने छोट्या माशाला गिळावे त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर असलेल्या सहकाराला मल्टिनॅशनल कंपन्यांच्या धोरणाने गिळंकृत केले. परिणामी सहकारी संस्था बंद पडत गेल्या. सहकार हा शब्द आणि कल्पना नामशेष होण्याची अवस्था आता निर्माण झालेली दिसते. म्हणूनच या सहकाराला वाचवण्यासाठी त्याचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे.
सहकार हा सामान्य माणसांच्या एकत्रीकरणातून निर्माण होत असतो. भांडवलदारांशी स्पर्धा करण्यासाठी आता सहकाराला तयार व्हावे लागेल. म्हणूनच सहकाराची तत्व आता बदलली गेली पाहिजेत. या पारंपरिक तत्वांमधून काळाची गरज म्हणून बाहेर पडले पाहिजे. नवी धोरणे आखली गेली पाहिजेत, कारण सर्वसामान्यांची ताकद ही सहकारात आहे. सहकाराचे धोरण आहे की, नफा मिळवणे हे आमचे काम नाही, तर सेवा देणे हे सहकाराचे काम आहे; पण आता आपण सेवेवरही कर भरत असताना नुसती सेवा म्हणजे फक्त नुकसानीला आमंत्रण असेच म्हणावे लागेल. यासाठीच आता सहकाराचे पुनरुज्जीवन करायला पाहिजे.
महाराष्टÑ सहकार कायद्यात आणि एकूणच सहकारी तत्वांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. १९६० च्या दशकातील परिस्थिती आज शिल्लक नसताना आपण सहकाराचे स्वरूप का बदलू नये? यासाठी सरकारने सहकार कायद्यात बदल करून सध्याच्या परिस्थितीत, मॉल संस्कृतीत सहकाराचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करावे. सहकाराचे उद्दिष्टही भांडवलीबाजाराप्रमाणे नफा मिळवणे हेच असले पाहिजे. सेवेच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार आणि काळा कारभार त्यामुळे थांबेल. यासाठीच आता आम्हाला सहकारातही नफा मिळवण्याचा विचार केला पाहिजे.
महाराष्टÑात सहकार खºया अर्थाने रुजला होता तो पश्चिम महाराष्टÑात. सहकारी साखर कारखाने निर्माण होऊन तिथल्या शेतकºयांचे राहणीमान पूर्णपणे बदलले होते. खेडी अतिशय समृद्ध झाली ती याच सहकाराने. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला होता तो याच सहकाराने. एक सहकारी साखर कारखाना उभा केल्यावर त्यावर आधारित किती संस्था निर्माण झाल्या होत्या याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे निर्माण झालेला रोजगार आणि विकास याचा विचार केला पाहिजे. अशा परिस्थीतीत जागतिकीकरणाच्या प्रवाहात हे वैभव केवळ जुन्या तत्वांमुळे लयास जात असेल, तर त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सहकार हा काही समाजवाद्यांचा नाही, तर तो सामान्य माणसांकडून प्रभावीपणे चालवला जाऊ शकतो हे दाखवणे गरजेचे आहे. एका साखर कारखान्यामुळे कामगारांच्या वसाहती निर्माण होत्या. नवी गावे तयार होत होती. त्यांच्यासाठी सहकारी बँका तयार झाल्या. त्यांच्यासाठी शाळा, हॉस्पिटल्स उभी राहिली. याशिवाय कुक्कुटपालन संस्था, पाणीवाटप संस्था, खरेदीविक्री संघ, ग्राहक भांडार अशा अनेक संस्थांमधून हजारो तरुणांना रोजगार मिळत होता. आज ते चित्र दिसत नाही. १९८० च्या दशकात साखर कारखानदारीवर असलेले सहकारी बझार हे आजच्या मॉलप्रमाणेच समृद्ध होते. एकाच ठिकाणी सर्व काही देण्याचे काम आमच्या बझारनी केलेले होते. तीच कल्पना भांडवलदारांनी उचलून सहकाराचे मातेरे करायचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत सहकार वाचवण्यासाठी आणि बंद पडत चाललेल्या सहकारी संस्थांना वाचवण्यासाठी या सहकाराचे शुद्धीकरण केले पाहिजे. त्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.
हे सहज शक्य आहे, फक्त राजकीय इच्छाशक्तीचे त्याला पाठबळ मिळायला हवे. पश्चिम महाराष्टÑाच्या नावाने बोटे मोडत बसण्यापेक्षा विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातही नव्या प्रकारे सहकार रुजवण्याची गरज आहे. अनेकवेळा पश्चिम महाराष्टÑातले नेते कोकणात सहकार रुजत नाही, असे म्हणून टीका करतात. त्या सगळ्यांची तोंडे बंद करून विकासाचे नवे मॉडेल देणारा सहकार देता येऊ शकतो. त्यासाठी त्याचे योग्य प्रकारे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाप्रमाणे कोकणातील उद्योगांचे सहकाराच्या माध्यमातून विकासाचे चित्र उभे राहू शकते. आंबा, काजू आणि मासे ही कोकणातील महत्त्वाची उत्पादने आहेत. आज बाहेरचे व्यापारी, दलाल येऊन आंब्याच्या बागा चालवायला घेतात. त्याचा फायदा या दलालांना होतो आणि आमचा आंबा उत्पादक शेतकरी मात्र गरीब राहतो. अशा परिस्थितीत एक मोठे सहकारी तत्वावर महामंडळ उभे केले आणि आंब्याचा हमीभाव ठरवून त्यालाच सगळ्यांनी आंबे विकले, तर बँ्रडेड हापूस आंबा जागतिक बाजारपेठेत येऊ शकतो.
आज उत्तर प्रदेशातील भय्ये आम्हाला हापूस आंबे विकतात आणि पावडर, केमिकल लावून आमच्या उत्तम प्रतीच्या आंब्याला बदनाम करतात. त्यापेक्षा सहकारी तत्वावर सगळे आंबे एकाच ठिकाणी विकले जाण्याची यंत्रणा उभी केली, तर सहकारातून समृद्धी येईल. आंबा फळांवरील प्रक्रिया उद्योग हे यातून चालवता येतात, तसेच सहकारी मत्स्योत्पादन संस्था, सहकारी काजू उत्पादन आणि प्रक्रिया संस्था विकसित करता येतील. यातून फार मोठा रोजगार निर्माण होईल. शेअर मार्केटमधील शेअरप्रमाणे आमच्या सहकारी संस्थेतील शेअरचे मूल्यमापन करण्याची तयारी आता केली पाहिजे. किंबहुना अनेक मोठ्या कंपन्यांप्रमाणे सहकारी संस्था, बँका यांच्या शेअरमध्येही बाहेरची गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नियंत्रण आमचे सामान्य माणसांचे असेल; पण गुंतवणूक नफ्याच्या विभागणीसाठी भांडवलदारांची लागली, तर काय हरकत आहे. यासाठी सर्वात प्रथम आम्ही फक्त सेवा देऊ असे न म्हणता आम्ही चांगली सेवा देऊन नफा कमवू, असा विचार करण्याची वेळ आलेली आहे. नफा मिळवणे ही भांडवलदारांची मक्तेदारी नाही, तर तो आमचाही हक्क आहे हे सांगण्यासाठी सहकाराने आता सिद्ध झाले पाहिजे. त्यासाठी सहकाराचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा