मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?
गेल्या दोन दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील टीका, प्रत्युत्तरं आणि आव्हानं सोशल मीडियावर गाजत आहेत. कंगना राणावतनं मुंबईला ’पाकव्याप्त काश्मीर’ म्हटलं, त्यानंतर तिच्याविरोधात राजकारणासह सिनेसृष्टीतूनही मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, कंगनानं मागे पाऊल न टाकता आव्हानाची भाषा सुरू केली आहे. सध्या कोरोनामुळे चित्रपटसृष्टी बंद आहे, त्यामुळे काही काम नसल्याने कंगना राणावत असे काही बरळत आहे का? पण तरीही तिला भारतीय नागरिक म्हणून मेरे अंगने में तुम्हाला क्या काम है असे म्हणता येणार नाही. पण कंगनाच्या पाठिमागे फार मोठी ताकद लागली आहे. मुंबईत दशकानुदशके आम्ही पायघड्या घालून या परप्रांतियांचे लाड केले त्या मस्तीतून ही वक्तव्ये होत आहेत. प्रेमाने महाराष्ट्राने या लोकांना खांद्यावर घेतले तर यांनी आपल्याचा कानात मुतायचा प्रकार चालवला आहे. त्यामागे फार मोठ्या शक्ती आहेत, ज्या मराठी माणसाचे, महाराष्ट्राचे खच्चीकरण करणार्या आहेत. त्यांना वेळीच ठेचण्याची गरज आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मिर, तालीबान म्हणत असेल तर तिला वेळीच रोखली पाहिजे. पाकव्याप्त काश्मिरात कोणी जात नाही, त्यामुळे तिला मुंबईत येण्याचा अधिकारच नाही. आता तिला खरोखरच मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है.
कंगनाला हे फिडींग कोण करत आहे? तिला बोलायला मुद्दे कोण सुचवत आहे, तिचा बोलविता धनी कोण आहे हे समोर येणे आवशयक आहे. कारण कंगना म्हणते, महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? कंगनाच्या वक्तव्यामुळे साहजिकच बॉलीवूडमधली तोंडे उघडली गेली. तिच्या वक्तव्यावर रेणुका शहाणे म्हणाली ’उचलली जीभ अन् लावली टाळ्याला’
पण कंगनाच्या या आक्रमक बाण्याला समर्थन देण्यासाठी भाजपचे मुंबईतील आमदार आणि प्रवक्ते राम कदम पुढे आले. त्यांनी तर कंगनाला ’झांशीची राणी’ म्हणत पाठिंबा दिला. खरं तर राम कदमांनी अशावेळी महाराष्ट्राची बाजू घेणे आवश्यक होते. मुळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी काही प्रयत्न चालवले आहेत, पण विरोधासाठी विरोध करण्यात काही अर्थ नसतो.
केवळ राम कदमच नव्हे, भाजपचे नेते अवधूत वाघ, पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश साहीब सिंग, मध्य प्रदेशातील आमदार विश्वास सारंग असे बरेचजण कंगनाच्या समर्थनार्थ पुढे आले. हा वाद भाजप आणि शिवसेना या दिशेने का वळतो आहे? तो खरे तर मराठी विरूद्ध अमराठी असा वळायला पाहिजे होता. संपूर्ण महाराष्ट्राने एक होउन या कंगनासारख्या प्रवृत्तीला जाब विचारायला हवा होता. कंगना ही प्रतिक आहे. पण आज मुंबईत घुसलेले आणि ठाण मांडून बसलेले लाखो परप्रांतीय आज हीच मुजोरी करतील आणि मराठी माणसाला जगणे मुश्किल करतील. त्यामुळे त्यांना वेळीच समज देणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही प्रांतात जाउन बघा आणि अशी मुजोरी खपवून घेतली जाते का पहा. मराठी माणूस दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार किंवा दक्षिणेतील राज्यात जाउन असे आव्हान देईल का? पण कंगनाला इतकी ताकद, बळ येते कुठून? तीने तमाम महाराष्ट्राची माफी मागीतली पाहिजे. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है या गाण्यातील कसलीही बायको असली तरी नवर्याचे नाव मोठे असते. बाकीच्यांनी त्यात नाक खुपसून नावे ठेवायची नसतात. काळी, गोरी, बुटकी, उंच कशीही असली तरी ती आपला संसार चांगलाच करत असते, त्यामुळे तिला नावे ठेवायची नसतात. त्यामुळे आपण जिथे राहतो, ज्या शहराने आपल्याला मोठे केले त्यावरच टिका करण्याचे धाडस कंगना करत असेल तर आता मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है असे म्हणत जा मुंबई सोडून असेच म्हणावे लागेल. कारण कंगनाचा हा पुळका रिकामटेकडेपणाचा आहे. राजकीय हेतुने आहे. भाजपची पुष्टी करणारा आहे. भाजपकडून खासदारकीचे तिकीट मिळावे, पद्म पुरस्कार मिळावा अशा लोभापोटी केलेली ही वक्तव्ये आहेत. पद्म पुरस्काराच्या कमीटीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्यानंतरच आलेले आहे हे दुर्लक्ष करून चालणार नाही.
या सगळ्या गोष्टी गेल्या दोन दिवसात घडल्या. मात्र, गुरुवारी (3 सप्टेंबर) फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर ’आमची मुंबई’ ट्रेंड झाल्यानंतर शुक्रवारी (4 सप्टेंबर) भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट केली. कंगनाच्या मुंबईबाबतच्या भूमिकेशी संबंध नसल्याचे शेलार म्हणाले. ही सारवासारव होती हे कळून आले. त्यामुळे कंगनाच्या पाठीशी भाजप आणि मुंबईतील परप्रांतियांची ताकद गोळा करण्याचा काही प्रयत्न आहे असे दिसू लागले आहे.
मात्र, कंगना राणावत आणि संजय राऊत वाद ’भाजप विरूद्ध शिवसेना’ या दिशेनं जात आहे का किंवा त्याला तसे वळण देण्याचा प्रयत्न आहे का हा खरा प्रश्न आहे.
3 सप्टेंबर रोजी कंगना राणावतनं न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीची लिंक शेअर करत, त्यावर म्हटलं, मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे? हे कंगनाचे वक्तव्य विपर्यास करणारे आहे. संजय राउत यांनी केलेले वक्तव्य बिलकूल चुकीचे नव्हते. आमच्या मुंबई पोलीसांवर अविश्वास कोणी दाखवणार असेल तर त्यांनी केलेले वक्तव्य योग्यच होते. पण कंगनाने जो आक्रस्ताळेपणा आणि नौटंकी चालवली आहे ती पाहता आता तिला खरोखरच मुंबईतून हाकलावी लागेल. सरकारने तिचे 9 सप्टेंबरचे विमानच रद्द केले पाहिजे आणि तिला तिकडेच रहा म्हणून सांगावे लागेल.
कंगनानं मुंबईची तुलना ’पाकव्याप्त काश्मीर’शी केल्यानंतर तिला सांगावे लागेल की पाकव्याप्त काश्मिरमध्ये कोणी जात नाही, तेव्हा तूही मुंबईत फिरकायचे नाही. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?
सर्वसामान्य लोकांसह राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार यांनीही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला.
कंगनावर होणार्या टीकेविरोधात भाजपकडून आमदार राम कदम पुढे आले. कंगनाच्या ट्वीटवर भाजप नेते राम कदम यांनी अशा पोकळ धमक्यांना ’झाशीची राणी’ कंगना घाबरणार नाही असं लिहिलं. हे मात्र दुर्दैव आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा