पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे केवळ द्विपक्षीय समीकरणच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियातील संबंधांवरही परिणाम झाला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादाचे धोरण सुरू ठेवण्याचा हेतू उघड झाला. पर्यटकांची धार्मिक ओळख विचारून त्यांची हत्या करणे हे लष्करची कठपुतळी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच टीआरएफने केले. याकडे केवळ हत्याकांड म्हणून पाहिले जाऊ नये. हे भू-राजकीय चिथावणीचे सुनियोजित कृत्य होते. पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा कलंकित इतिहास पुन्हा सांगितला, परंतु त्यामागील एक हेतू जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था अस्थिर करणे हा होता.
जागतिक देखरेख आणि आंतरराष्ट्रीय दबाव असूनही, पाकिस्तानने आपल्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट केलेल्या नाहीत. पहलगाम हल्लाही त्याच जुन्या पद्धतीने करण्यात आला, जिथे इस्लामाबादने नेहमीच लष्कर-आयएसआयच्या दहशतवादी कृत्यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या हिरव्या कंदिलाशिवाय असा कोणताही हल्ला झाला असता यात कोणालाही शंका नाही. पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने आर्थिक, राजनैतिक आणि सामरिक आघाड्यांवर अतिशय प्रभावी पावले उचलली आणि पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. दुसरीकडे, पाकिस्तानने चुकीच्या मार्गावर चालत बढाई मारणे सुरू ठेवले. सिंधू पाणी करार मागे टाकून भारताने पाकिस्तान आणि त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी कंबर कसली, तर पाकिस्तान शिमला करारातून माघार घेण्याचा व्यर्थ सूर गात राहिला.
दशकांच्या अस्थिरतेतून सावरत आणि पुन्हा रुळावर आलेल्या काश्मीरमधील पर्यटन उपक्रम दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा अनिश्चिततेच्या भोवºयात अडकले आहेत. तथापि, जम्मू आणि काश्मीरच्या पलीकडे संपूर्ण दक्षिण आशिया याचा फटका सहन करत आहे. या पार्श्वभूमीवर, व्यापार, गुंतवणूक आणि व्हिसा इत्यादी आघाडींवर भारत आणि पाकिस्तानने उचललेल्या पावलांमुळे प्रादेशिक सहकार्य तसेच आर्थिक आणि व्यावसायिक क्रियाकलापांवर परिणाम झाला आहे. अशा प्रकारे, संपूर्ण प्रदेश एका देशाच्या दहशतवाद समर्थक धोरणांची किंमत त्याची शांतता आणि समृद्धी गमावण्याच्या स्वरूपात चुकवत आहे. पाकिस्तानच्या या वृत्तीचा फटका पाकिस्तानच्या लोकांनाही सहन करावा लागत आहे. त्यांना बनावट राष्ट्रवाद दिला जात आहे.
जरी पाकिस्तान स्वत:ला दहशतवादाचा बळी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत असला तरी, त्याची ओळख दहशतवादाचा सामना करण्यात हलगर्जी दाखवणाºया देशाची आहे. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे दहशतवादी कारवायांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानबद्दल चिंता पुन्हा निर्माण झाली आहे. पाकिस्तानला रोखण्यासाठी एफएटीएफसारख्या संघटनांवरही दबाव वाढेल, ज्यांनी पूर्वी पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवले होते. यामुळे पाकिस्तानची प्रतिमा आणखी मलिन होईल. आर्थिक गुंतवणूक आणि विकासाच्या त्याच्या आशा धुळीस मिळतील.
पहलगाम हल्ला हा पाकिस्तानच्या दहशतवादी स्वभावात झालेल्या धोकादायक बदलाचेही संकेत आहे. २००१च्या सुरुवातीपासून, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी प्रामुख्याने जम्मू प्रदेशाला लक्ष्य केले आहे आणि लष्करी दलांवर हल्ला केला आहे. पहलगाम हल्ला हा कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील पहिला मोठा दहशतवादी हल्ला होता. हिंदूंना लक्ष्य करण्यामागील वाईट विचारसुद्धा अगदी स्पष्ट होता- देशात सामाजिक द्वेष वाढवणे आणि काश्मीरमध्ये सरकारचा विकास अजेंडा रुळावरून घसरवणे. भारताला हे चांगले समजले होते. हल्ल्यानंतरच्या प्रतिसादातही त्याचा परिणाम दिसून आला.
भारताने बहुआयामी रणनीती स्वीकारली आणि गुप्तचर यंत्रणा कडक केली, जमिनीवर सुरक्षा कर्मचाºयांची तैनाती वाढवली आणि कोणत्याही संभाव्य दहशतवादी हल्ल्याला निष्प्रभ करण्यासाठी, विशेषत: अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत, कारवाया तीव्र केल्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये अजूनही शेकडो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सक्रिय असल्याने, सुरक्षा दलांसमोरील आव्हान खूप कठीण असणार आहे. सध्या दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी असली तरी, पाकिस्तान आपल्या दहशतवादी कठपुतळींचा सामरिक शस्त्र म्हणून वापर करत राहील. सिंधू पाणी करार रोखून ठेवण्याचा भारताचा निर्धार पाहता, दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकतात अशी दाट शक्यता आहे, जेणेकरून भारत सरकारवर काही दबाव येईल आणि काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चस्व गाजवेल.
भारताने आपले हेतू अगदी स्पष्ट केले आहेत की, भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाला चिथावणी देणारे कृत्य म्हणून पाहिला जाईल. हल्ला झाल्यास दोन्ही देश पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव आणि संभाव्य मध्यस्थी प्रयत्नांना वाव मिळेल. हाही एक पैलू आहे, जो पाकिस्तानच्या नापाक काश्मीर धोरणाशी संबंधित आहे. भारताच्या दृष्टिकोनातून, पहलगाम हल्ला केवळ एक शोकांतिका नव्हती, तर एक निर्णायक वळण होता. भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी दहशतवादी कृत्याला तोंड देण्याची दिशा निश्चित करणारा एक वळणबिंदू किंवा टर्निंग पॉइंट आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादी स्वभावामुळे केवळ दक्षिण आशियाची शांतताच बिघडली नाही तर जागतिक सुरक्षेसाठी तो एक संकट बनला आहे. त्याला तोंड देण्यासाठी अर्धवट कृती केल्याने समस्या सुटणार नाहीत. राजनैतिक सक्रियतेचा काळही निघून गेला आहे. पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट केल्याशिवाय दक्षिण आशियात शांतता शक्य नाही. वेळ केवळ पहलगामसाठीच नाही तर दशकांपासून सुरू असलेल्या या प्रॉक्सी युद्धात गमावलेल्या प्रत्येक जीवासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा