राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा उद्या १२ फेब्रुवारीला जन्मदिवस आहे. अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांपेक्षा लिंकन यांची कारकीर्द ही वेगळी होती, कार्यशैली वेगळी होती आणि प्रचंड बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि प्रसंगावधान त्यांच्याकडे होते. म्हणून ते कायम स्मरणात राहणारे असे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची शैली होती. वादविवादात सरशी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आपले मत पटवून देण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असत.
एकदा लिंकन बग्गीतून आपल्या कार्यालयात जात असताना बरोबर असलेल्या विद्वानाशी वाद घालत होते. लिंकन म्हणत होते की, माणूस कोणतीही गोष्ट निस्वार्थीपणाने करत नाही. कोणत्याही त्याच्या कृतीमध्ये काही ना काही स्वार्थ हा असतोच. त्या विद्वानाला लिंकन यांचे म्हणणे पटत नव्हते. तो प्रत्येकवेळी निस्वार्थी कृती करणारे लोक या जगात आहेत हे सांगत होता. त्यांना जाता जाता रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलाच्या खड्ड्यात एक डुकराचे पिल्लू पडलेले दिसले. ते बाहेर येण्यासाठी धडपडत होते, पण त्याला बाहेर येता येत नव्हते. हे बघून लिंकन यांनी गाडी थांबवली. खड्ड्यातून त्या डुकराच्या पिल्लाला बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्या इस्त्री केलेल्या कपड्यांवरही चिखल उडला, पण ते सुटका झालेले पिल्लू आनंदात पळून गेले. त्यानंतर त्या विद्वानाने आपल्या विजयी मुद्रेने लिंकन यांच्याकडे बघितले आणि म्हटले, आता हे तुम्ही केलेले काम फार महत्त्वाचे आहे. पण यात तर तुमचा काहीच स्वार्थ नाही. तेव्हा हसून लिंकन म्हणतात की, मी कार्यालयात चाललो होतो, पण ते डुकराचे पिल्लू मला दिवसभर आठवत राहिले असते. त्याच्या आठवणीने माझी एकाग्रता भंग झाली असती, म्हणून त्याची सुटका केली. डुकराची सुटका करणे यात माझा स्वार्थच होता. ही त्यांची मुद्दा पटवून देण्याची शैली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ १८६१ ते १८६५ एवढाच होता. पण त्यानंतरही जवळपास दीडशे वर्ष त्यांची ख्याती अजूनही गायली जाते हे विशेष. विशेष म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ते अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते. लिंकन यांचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता. युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही गुलामीचे पाठीराखे असणाºया लोकांनी कट करून त्यांची हत्या केली, पण ते एक अत्यंत प्रभावी असे व्यक्तिमत्व होते.
अब्राहम लिंकन यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काऊंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हँक्स हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुत: त्यांचे वडील ते त्या भागातील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकिंग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केली गेली आहे. त्यांचे वडील मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झालेल्या अशा एका बाप्टिस्ट चर्चचे सदस्य होते. त्यामुळे अब्राहम लिंकन यांना लहानपणापासूनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. ते स्वत: मात्र वडिलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाले नाहीत.
लिंकन सात वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब इंडियानामधील स्पेन्सर काऊंटी येथे हलले. लिंकन यांच्या या हलण्यामागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती. लिंकन नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचा दुधातून होणाºया विषबाधेच्या आजारपणामुळे मृत्यू झाला. लवकरच लिंकन यांच्या वडिलांनी सारा बुश जॉन्स्टन हिच्याशी दुसरा विवाह केला. लिंकन यांच्या सावत्र आईने त्यांचा स्वत:च्या मुलासारखाच मायेने सांभाळ केला, मात्र वयाच्या बावीसाव्या वर्षी लिंकन यांनी स्वबळावर जगण्याचे ठरविले. डेंटन ओफुट या व्यापाºयासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे काम न्यू सेलम ते न्यू आॅर्लिअन्स येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. या काळात त्यांनी आॅर्लिअन्स येथे गुलामांचा लिलाव पाहिला व ही घटना त्यांच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली. इथेच त्यांना गुलामगिरीविरोधात लढण्याचे बळ मिळाले.
हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे त्यांचे स्वत:चे बरेच शिक्षण झाले. बायबल, शेक्सपियरचे लेखन व इंग्लिश आणि अमेरिकन इतिहासाचा त्यांनी खोलवर अभ्यास केला. याच काळात त्यांनी अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे. खाण्याकरिता देखील प्राणी मारण्याची कल्पना त्यांना पसंत नसल्याने त्यांनी शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही.
अब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स थिएटरमध्ये अवर अमेरिकन कझिन नावाचे नाटक पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. बूथच्या खिशात डेरिंजर नावाचे लहानसे पिस्तूल होते. त्याच्या लहान आकारामुळे ते कोठेही लपवण्यास अगदी सोपे होते म्हणूनच बूथने ते शस्त्र निवडले होते. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत बूथ दबा धरून थांबला. हेतू हा, की संवादानंतरच्या हास्य कल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसºया दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाºयावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोट्याचे हाड मोडले. तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.
लिंकन यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ १८३० साली इलिनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. याच काळात त्यांनी इलिनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवा केली. या काळात त्यांना युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही. त्यांनी दारू विकण्याचा परवाना घेऊन व्हिस्की विकली. त्यांनी स्टीफन टी. लोगन यांच्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. अब्राहम लिंकन यांनी १८३४पासून इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम केले. याच काळामध्ये त्यांनी व्हिग पक्षाचा सभागृहातील नेता म्हणूनही काम केले. त्यांनी १८३७ मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिल्यांदा निषेध केला. या वेळेस त्यांनी या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हटले. लिंकन यांनी १८४१ साली विल्यम हर्नडॉन या व्हिग पक्षाच्या सदस्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. या दोघांनीही १८५६ नव्यानेच सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. लिंकन यांच्या रूपाने अमेरिकेला एकमेव विद्वान आणि विचारवंत अध्यक्ष लाभला होता.
- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा