रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

टोकाची भूमिका

 


खरंतर युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सुटतात ते चर्चेने. युद्ध संपुष्टात येते तेही चर्चेनेच. युद्धात केला जाणारा तह हा चर्चेचाच एक भाग असतो, म्हणजे युद्धाचा शेवट जर चर्चेतूनच होत असतो, तर युद्ध टाळण्याचे का प्रयत्न केले जात नाहीत?, आम्ही किती विध्वंसक आहोत, आमचे उपद्रव मूल्य किती आहे, हे बिंबवण्यात कसला आला आहे मोठेपणा? आज ना उद्या रशिया आणि युक्रेन हे चर्चा करून आपसातील प्रश्न सोडवतील. कुणाला गुडगे टेकावे लागतील, कुणाला शरण जावे लागेल; पण हे सगळे चर्चेचेच मार्ग आहेत. मग हा सोपा मार्ग जवळ न करता टोकाची भूमिका का घेतली जाते आणि यासाठी संपूर्ण जगाला का वेठीला धरले जाते, हे कोणालाच न उलगडणारे आहे.


म्हणजे गेले काही दिवस ज्याची भीती होती, तेच अखेर युक्रेनमध्ये घडू लागले आहे. रशिया युक्रेनच्या केवळ दोन रशियावादी प्रांतांना आपली मान्यता देऊनच थांबलेला नाही, तर संपूर्ण युक्रेनवर कब्जा मिळवण्याच्या दिशेने त्याची अत्यंत आक्रमक लष्करी पावले पडू लागली आहेत. रशियाची क्षेपणास्त्रे जेव्हा युक्रेनची राजधानी क्यिवमध्ये धडकू लागली, रशियन रणगाडे जेव्हा तिन्ही बाजूंनी त्या देशात घुसताना दिसले, तेव्हाच व्लादिमिर पुतीन सांगत होते तशी ही केवळ मर्यादित लष्करी कारवाई नसून पूर्ण युद्धाचीच तयारी आहे, हे स्पष्ट होत गेले. रशियाने ज्या प्रकारे युक्रेनवर आपली ताकद दाखवत युद्ध लादले आहे, ते रोखण्यासाठी पाश्‍िचमात्य महासत्ता अमेरिकेने रशियावर, विशेषत: त्यांच्या बँका आणि आस्थापनांवर आर्थिक निर्बंध जारी केलेले असले, तरी ते रशियाचे आक्रमण रोखण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसते. अमेरिकेने आपल्या वर्चस्ववादाचा कितीही डांगोरा पिटला, तरी अमेरिकेचे हे वर्चस्व रशियाने झुगारल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे युक्रेनचे राष्ट्रप्रमुख वोलोदिमिर झेलेन्स्की यांनाही हे सत्य आता कळून चुकले आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन यांच्या विनंत्या धुडकावत पुतीन यांनी युक्रेनमध्ये जो विनाश सध्या चालवलेला आहे, तो जर वेळीच थांबवला गेला नाही, तर त्यातून संपूर्ण जगावरच एक मोठे आर्थिक अरिष्ट घोंगावल्याविना राहणार नाही.

आजचे एकविसाव्या शतकातले जग हे एकमेकाशी घट्ट जोडले गेलेले आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठे एखाद्या अफगाणिस्तानमध्ये, एखाद्या युके्रनमध्ये, एखाद्या सीरियामध्ये युद्ध सुरू आहे म्हणजे त्याची झळ आपल्याला बसणार नाही, या भ्रमात दुसºया टोकावरील देशांनीही राहून चालत नाही, हे सर्व देशांना कळून चुकले आहेच. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तर या युद्धाचा परिणाम होईलच, परंतु त्याचे दूरगामी आर्थिक चटके आपल्यालाही सोसावे लागू शकतात.


खुद्द युद्धग्रस्त युक्रेनमध्ये वीस हजारांहून अधिक भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सर्वोच्च प्राधान्याने व्हायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात नुकतेच झालेले संभाषण हे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुखरूप सुटकेपुरते सीमित होते. मोदी युद्ध थांबवायला सांगतील आणि पुतीन ऐकतील, अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे उगाच भलभलते दावे केले जाऊ नयेत. गेले काही दिवस युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी धावाधाव करीत असताना, विमानाचे तिकीट दर अस्मानाला भिडलेले होते. रशियाने गेले वर्षभर युक्रेनच्या सीमांवर आपली लाखोंची फौज तैनात केली होती. गेल्या काही दिवसांत त्यात जेव्हा मोठी भर घातली गेली, तेव्हाच भारत सरकारने आपल्या नागरिकांना माघारी आणण्याचे व्यापक प्रयत्न हाती घेण्याची जरूरी होती, परंतु वेळीच ते केले गेले नाही. आता त्यांचा परतीचा प्रवास खर्च भारत सरकार सोसणार असे जाहीर झाले असले, तरी सध्या हवाई वाहतूकच बंद पडलेली असल्याने युद्धाचा हा आगडोंब काही प्रमाणात तरी शांत होईपर्यंत त्यांना माघारी आणणे जवळजवळ अवघड आहे.

युक्रेनवरील या घाल्यामुळे निर्वासितांचा फार मोठा प्रश्न उभा राहणार आहे. काही देशांनी युक्रेनच्या नागरिकांसाठी मदतीचा हात जरी पुढे केला असला, तरी सद्यस्थितीत या निर्वासितांना मरणाच्या दारातून प्रवास करावा लागेल. त्यात किती प्राणहानी होईल कल्पनाही करवत नाही. रशियाचे क्षेपणास्त्र व हवाई हल्ले केवळ लष्करी कारवायांपुरते मर्यादित नाहीत. राजधानी क्यिवसह अनेक शहरांमध्ये निवासी वस्त्यांवरही निर्घृण हल्ले झालेले असल्याचे सचित्र पुरावे जगापुढे आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर प्राणहानी चालली आहे. हा नरसंहार थांबवण्यासाठी रशियावर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव येण्याची आवश्यकता आहे, परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नेतृत्वच सध्या रशियाकडे असल्याने एवढे सगळे होऊनही रशियाची युद्धाची खुमखुमी कायम असल्याचे दिसते. अमेरिकेने जरी निर्बंध घातले असले, तरी चीन पाठिशी आहे. एकीकडे युद्धाचे ढग युक्रेनवर जमलेले स्पष्ट दिसत असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या पूर्वनियोजित भेटीवर रशियाला गेले ते काही त्यांना युक्रेनमधील घडामोडींचा पत्ता नव्हता म्हणून नव्हे. या साºया घडामोडींचा अन्वयार्थ स्पष्ट आहे. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे एका बाजूला आणि रशिया आणि चीनसारखी उभरती महासत्ता दुसºया बाजूला अशा एका जागतिक तणावाची ही नांदी आहे. भारताचे रशियाशी संबंध पारंपरिकरीत्या मैत्रिपूर्ण राहिले आहेत. मोदींच्या काळात भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला. आता या परिस्थितीमध्ये समतोल साधण्याची कसरत भारताला करावी लागेल; पण हे युद्ध संपूर्ण जगासाठी घातक आहे. त्यामुळे त्यावर अंतिम चर्चेने नाही, तर फक्त चर्चेनेच तोडगा निघेल. चर्चा न करता सुईच्या अग्राएवढीही जमीन मी पांडवांना देणार नाही, असे म्हणणाºया दुर्योधनाने महाभारतात आपला विनाश करून घेतला होता. अशीच शस्त्र अस्त्र वापरून संहार झाल्यानंतर पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संहार होण्याअगोदर चर्चा होणे आवश्यक आहे. हे जग वाचवण्यासाठी त्याची गरज आहे.

चर्चा होणे आवश्यक

 


खरंतर युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सुटतात ते चर्चेने. युद्ध संपुष्टात येते तेही चर्चेनेच. युद्धात केला जाणारा तह हा चर्चेचाच एक भाग असतो, म्हणजे युद्धाचा शेवट जर चर्चेतूनच होत असतो, तर युद्ध टाळण्याचे का प्रयत्न केले जात नाहीत?, आम्ही किती विध्वंसक आहोत, आमचे उपद्रव मूल्य किती आहे, हे बिंबवण्यात कसला आला आहे मोठेपणा? आज ना उद्या रशिया आणि युक्रेन हे चर्चा करून आपसातील प्रश्न सोडवतील. कुणाला गुडगे टेकावे लागतील, कुणाला शरण जावे लागेल; पण हे सगळे चर्चेचेच मार्ग आहेत. मग हा सोपा मार्ग जवळ न करता टोकाची भूमिका का घेतली जाते आणि यासाठी संपूर्ण जगाला का वेठीला धरले जाते, हे कोणालाच न उलगडणारे आहे.


म्हणजे गेले काही दिवस ज्याची भीती होती, तेच अखेर युक्रेनमध्ये घडू लागले आहे. रशिया युक्रेनच्या केवळ दोन रशियावादी प्रांतांना आपली मान्यता देऊनच थांबलेला नाही, तर संपूर्ण युक्रेनवर कब्जा मिळवण्याच्या दिशेने त्याची अत्यंत आक्रमक लष्करी पावले पडू लागली आहेत. रशियाची क्षेपणास्त्रे जेव्हा युक्रेनची राजधानी क्यिवमध्ये धडकू लागली, रशियन रणगाडे जेव्हा तिन्ही बाजूंनी त्या देशात घुसताना दिसले, तेव्हाच व्लादिमिर पुतीन सांगत होते तशी ही केवळ मर्यादित लष्करी कारवाई नसून पूर्ण युद्धाचीच तयारी आहे, हे स्पष्ट होत गेले. रशियाने ज्या प्रकारे युक्रेनवर आपली ताकद दाखवत युद्ध लादले आहे, ते रोखण्यासाठी पाश्‍िचमात्य महासत्ता अमेरिकेने रशियावर, विशेषत: त्यांच्या बँका आणि आस्थापनांवर आर्थिक निर्बंध जारी केलेले असले, तरी ते रशियाचे आक्रमण रोखण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसते. अमेरिकेने आपल्या वर्चस्ववादाचा कितीही डांगोरा पिटला, तरी अमेरिकेचे हे वर्चस्व रशियाने झुगारल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे युक्रेनचे राष्ट्रप्रमुख वोलोदिमिर झेलेन्स्की यांनाही हे सत्य आता कळून चुकले आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन यांच्या विनंत्या धुडकावत पुतीन यांनी युक्रेनमध्ये जो विनाश सध्या चालवलेला आहे, तो जर वेळीच थांबवला गेला नाही, तर त्यातून संपूर्ण जगावरच एक मोठे आर्थिक अरिष्ट घोंगावल्याविना राहणार नाही.

आजचे एकविसाव्या शतकातले जग हे एकमेकाशी घट्ट जोडले गेलेले आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठे एखाद्या अफगाणिस्तानमध्ये, एखाद्या युके्रनमध्ये, एखाद्या सीरियामध्ये युद्ध सुरू आहे म्हणजे त्याची झळ आपल्याला बसणार नाही, या भ्रमात दुसºया टोकावरील देशांनीही राहून चालत नाही, हे सर्व देशांना कळून चुकले आहेच. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तर या युद्धाचा परिणाम होईलच, परंतु त्याचे दूरगामी आर्थिक चटके आपल्यालाही सोसावे लागू शकतात.


खुद्द युद्धग्रस्त युक्रेनमध्ये वीस हजारांहून अधिक भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सर्वोच्च प्राधान्याने व्हायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात नुकतेच झालेले संभाषण हे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुखरूप सुटकेपुरते सीमित होते. मोदी युद्ध थांबवायला सांगतील आणि पुतीन ऐकतील, अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे उगाच भलभलते दावे केले जाऊ नयेत. गेले काही दिवस युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी धावाधाव करीत असताना, विमानाचे तिकीट दर अस्मानाला भिडलेले होते. रशियाने गेले वर्षभर युक्रेनच्या सीमांवर आपली लाखोंची फौज तैनात केली होती. गेल्या काही दिवसांत त्यात जेव्हा मोठी भर घातली गेली, तेव्हाच भारत सरकारने आपल्या नागरिकांना माघारी आणण्याचे व्यापक प्रयत्न हाती घेण्याची जरूरी होती, परंतु वेळीच ते केले गेले नाही. आता त्यांचा परतीचा प्रवास खर्च भारत सरकार सोसणार असे जाहीर झाले असले, तरी सध्या हवाई वाहतूकच बंद पडलेली असल्याने युद्धाचा हा आगडोंब काही प्रमाणात तरी शांत होईपर्यंत त्यांना माघारी आणणे जवळजवळ अवघड आहे.

युक्रेनवरील या घाल्यामुळे निर्वासितांचा फार मोठा प्रश्न उभा राहणार आहे. काही देशांनी युक्रेनच्या नागरिकांसाठी मदतीचा हात जरी पुढे केला असला, तरी सद्यस्थितीत या निर्वासितांना मरणाच्या दारातून प्रवास करावा लागेल. त्यात किती प्राणहानी होईल कल्पनाही करवत नाही. रशियाचे क्षेपणास्त्र व हवाई हल्ले केवळ लष्करी कारवायांपुरते मर्यादित नाहीत. राजधानी क्यिवसह अनेक शहरांमध्ये निवासी वस्त्यांवरही निर्घृण हल्ले झालेले असल्याचे सचित्र पुरावे जगापुढे आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर प्राणहानी चालली आहे. हा नरसंहार थांबवण्यासाठी रशियावर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव येण्याची आवश्यकता आहे, परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नेतृत्वच सध्या रशियाकडे असल्याने एवढे सगळे होऊनही रशियाची युद्धाची खुमखुमी कायम असल्याचे दिसते. अमेरिकेने जरी निर्बंध घातले असले, तरी चीन पाठिशी आहे. एकीकडे युद्धाचे ढग युक्रेनवर जमलेले स्पष्ट दिसत असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या पूर्वनियोजित भेटीवर रशियाला गेले ते काही त्यांना युक्रेनमधील घडामोडींचा पत्ता नव्हता म्हणून नव्हे. या साºया घडामोडींचा अन्वयार्थ स्पष्ट आहे. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे एका बाजूला आणि रशिया आणि चीनसारखी उभरती महासत्ता दुसºया बाजूला अशा एका जागतिक तणावाची ही नांदी आहे. भारताचे रशियाशी संबंध पारंपरिकरीत्या मैत्रिपूर्ण राहिले आहेत. मोदींच्या काळात भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला. आता या परिस्थितीमध्ये समतोल साधण्याची कसरत भारताला करावी लागेल; पण हे युद्ध संपूर्ण जगासाठी घातक आहे. त्यामुळे त्यावर अंतिम चर्चेने नाही, तर फक्त चर्चेनेच तोडगा निघेल. चर्चा न करता सुईच्या अग्राएवढीही जमीन मी पांडवांना देणार नाही, असे म्हणणाºया दुर्योधनाने महाभारतात आपला विनाश करून घेतला होता. अशीच शस्त्र अस्त्र वापरून संहार झाल्यानंतर पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संहार होण्याअगोदर चर्चा होणे आवश्यक आहे. हे जग वाचवण्यासाठी त्याची गरज आहे.

रंगमंचाची अट नसलेले नाटक


बदलत्या परिस्थितीनुसार रंगभूमीची सेवा आणि कार्य करताना आपणही बदलले पाहिजे. काही प्रथा, फॉरमॅट बदलता आले पाहिजेत. थोडसे लवचिक होता आले पाहिजे, याची जाणिव ठेवून नाटककार आनंद म्हसवेकर यांनी रंगमंचाची अट नसलेले नाटक निर्माण करण्याचा ध्यास घेतला. २२ बाय चौदाच्या रंगमंचावरचे नाटक त्यांनी खुले केले आणि भिंती तोडून ते प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचू लागले. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आणखी एक नाटक नुकतेच आणले आणि त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते नाटक म्हणजे फॅमिली नंबर वन.


फॅमिली नंबर वन या नाटकाचा पहिला प्रयोग सावित्रीबाई फुले रंगमंदिर डोंबिवली येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी झाला. लेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकरांचे हे रंगमंचाची अट नसलेले आठवे नाटक. नाटकाचे नेपथ्य अनिश विनय यांचे आहे, पार्श्वसंगीत आणि शिर्षक गीत सुखदा भावे दाबके यांनी केले आहे. या नाटकात श्रद्धा मोहिते, सुगत उथळे, विनय म्हसवेकर आणि जुन्या जाणत्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नैना आपटे यांनी भूमिका केली आहे.

गेली पन्नास वर्षे रंगभूमीसाठी झटणाºया आनंद म्हसवेकर यांची एकांकिका ही स्पेशॅलिटी असली, तरी १९८६ साली त्यांचे जोडी जमली तुझी माझी हे पहिले नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले आणि त्यानंतर २००२ सालापर्यंत आणखी सात नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली. तोवर प्रायोगिक रंगभूमीवर २५ एकांकिकांचे प्रयोग सादर झाले होते आणि ११ नाटके प्रायोगिक रंगभूमीवर राज्य नाट्य स्पर्धा मंचावर सादर झाली होती, पण रंगभूमीच्या मर्यादा आणि प्रेक्षक आणि नाटक यांच्यातील वाढत दरी लक्षात घेता काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे हे म्हसवेकर यांच्या लक्षात आले आणि त्या प्रयोगातून त्यांनी रंगमंचाची अट नसलेले नाटक तयार करण्याच्या ध्यास घेतला. तो यशस्वी करून दाखवला.


आज होते असे की, नाटकाचे प्रयोग फक्त शनिवारी, रविवारी होतात. ते नाटक हे मुंबई, पुण्याच्या पलीकडे जातच नाही. नाटकाचा खरा प्रेक्षक तर कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यांच्यापर्यंत नाटक पोहोचत नसेल, तर त्याला अर्थ काय? म्हसवेकर यांचे बालपण गावाकडे गेल्यामुळे आणि नाटकाचे बाळकडू गावाकडून घेतल्यामुळे आपले नाटक छोट्या गावापर्यंत जात नाही याची खंत त्यांना वाटली. मुंबई, पुण्याचे मोठे कलाकार असलेले नाटक छोट्या गावापर्यंत सोडाच, पण सातारा, वाई, धुळे, अमळनेर, नांदेड अशा छोट्या शहरांपर्यंतही जात नाही. मग या मुंबईबाहेरच्या मराठी नाट्य रसिकांचे काय? मुंबई, पुण्याचे मोठे कलाकार असलेले नाटक मुंबई, पुण्याबाहेर का जात नाही याची कारणे त्यांनी शोधली. तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, या छोट्या गावांमध्ये मोठी नाट्यगृहे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्‍ट म्हणजे नाटकाचे अर्थकारण. मुंबईबाहेर व्यावसायिक नाटक घेऊन जायचे तर नाटकाची बस लागते आणि तिचाच खूप मोठा खर्च असतो. मग त्यांनी विचार केला की, नाटकाला बस का लागते, तर नाटकाचा सेट नेण्यासाठी आणि नाटकाचे नेपथ्‍य म्हणजे तरी काय असते? घराचा किंवा राजवाड्याचा आभास. पूर्वी संगीत नाटके पडद्यावर व्हायची. मराठी रंगभूमीवरील हजारो प्रयोग झालेली लोकनाट्य नुसत्या काळ्या पडद्यावर सादर झालेली आहेत आणि मग ठरवले की, व्यावसायिक नाटक लिहितानाच असे लिहायचे की, त्याचे नेपथ्‍य भव्य दिव्य नसेल आणि जे एखाद्या छोट्या कारमधून सहज नेता येईल, शिवाय हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरच्या मोठ्या नावाजलेल्या नटांना घेऊनच करायचे, पण कलाकार कमी म्हणजे दोन किंवा जास्ती जास्त तीन-चार घ्‍यायचे आणि असे नाटक करायचे की, ते मुंबई, पुण्याबाहेर छोट्या गावांत सहज करता येईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे नाटक जिथे मोठा रंगमंच नाही अशा ठिकाणी असेल, त्या रंगमंचावर सादर करता येईल. म्हणून या नाटकांना रंगमंचाची अट नसलेले नाटक असे म्हटले गेले. या नाटकांमुळे आनंद म्हसवेकर यांची सात मराठी व्यावसायिक नाटके ज्या नाटकात मोठे नावाजलेले कलाकार होते, छोट्या गावापर्यंत पोहचली आणि गेली एकोणीस वर्षे हा प्रयोग ते सातत्याने करत आहेत.

२००२ साली रंगमंचाची अट नसलेले फिफ्टी फिफ्टी हे पहिले नाटक त्यांनी लिहले. त्यात कलाकार होते अरुण नलावडे आणि विजय गोखले. एक पडदा हे नेपथ्य, पार्श्वसंगीतासाठी एक माणूस आणि एक बॅक स्टेज अवघ्या चार जणांच्या टीममध्ये पंचवीस प्रयोग छोट्या रंगमंचावर मुंबईत आणि मुंबईबाहेर केले. नंतर याच नाटकाचे प्रदीप पटवर्धन, आनंद अभ्यंकर आणि आशा साठे या तीन कलाकारांना घेऊन नंतर दोनशे प्रयोग केले, काही प्रयोग गोव्यातही झाले. या नाटकानंतर नयनतारा, नंदू गाडगीळ आणि आशा साठेला घेऊन त्यांनी सासू नंबर वन हे नाटक केले. या नाटकाचे महाराष्‍ट्रभर २२५ प्रयोग केले.


आनंद अभ्यंकर, आशा साठे आणि विघ्‍नेश जोशी या तीन कलाकारांना घेऊन अस्से नवरे अशा बायका हे नाटक घेऊन महाराष्ट्रभरच काय तर दिल्ली, लखनऊ, चेन्नई येथेही या नाटकाचे प्रयोग केले. तीनशेच्या वर प्रयोग झाले आणि महाराष्‍ट्राबाहेर जो मराठी प्रेक्षक आहे. त्यांच्यापर्यंत नाटक पोचले. २००२ ला सुरू झालेला रंगमंचाची अट नसलेल्या नाटकाचा प्रवास २०२२ पर्यंत सुरूच आहे. आताचे रंगभूमीवर आलेले फॅमिली नंबर वन हे रंगमंचाची अट नसलेले आठवे नाटक. यापूर्वी केलेल्या सात नाटकांचे संपूर्ण महराष्ट्रभर आणि महाराष्‍ट्राच्या बाहेर १५०० च्या वर प्रयोग झाले. अशा या प्रयोगशील नाटककाराचे नवे नाटक फॅमिली नंबर वन हे आता महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. या नाटकाबाबत भरभरून बोलताना आनंद म्हसवेकर म्हणाले की, प्रेक्षकांची इच्छा आहे ना मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणारच. अगदी तुमची इच्छा असेल तर तुमच्या केबिनमध्येही हे नाटक आम्ही करून दाखवू. इतकी लवचिक रंगभूमी करण्याचे केलेले हे काम खरोखरच नंबर वन असेच आहे.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा


9152448055\\

अमेरिकेला धाक


गुरुवारपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले असले, तरी रशियाचे मुख्य लक्ष्य हे अमेरिका आहे. याचे कारण युक्रेन हे अमेरिकेच्या हातातील बाहुले आहे. किंबहुना अशी टीका पुतीन नेहमीच करत असतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी केलेल्या या हल्ल्याद्वारे पाश्चात्य देश व अमेरिकेला धडा शिकवणे हा पुतीन यांचा उद्देश आहे हे लपून राहिलेले नाही. ४८ तास उलटून गेले, तरी अमेरिका गप्पच आहे. याचे कारण रशियाविरुद्ध एकत्रित लष्करी कारवाई करणे अमेरिकेला अवघड आहे. त्यामुळे अमेरिकेला दणका देणे हे या युद्धाचे उद्दिष्ट आहे. ज्या प्रकारे जगभरातील भांडवली बाजार या युद्धानंतर कोसळला ते पाहता भांडवलशाहीला लाल बावट्याने दिलेला तो दणका म्हणावा लागेल.


भारतीय वेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री रशियाने युक्रेनमध्ये सैनिक आणि रणगाडे व अन्य अवजड लष्करी वाहने घुसवली. युक्रेनची राजधानी क्यिववर रशियाची लढाऊ विमाने घिरट्या घालत होती. या शहरातून स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांनी वृत्त दिले. असे आवाज अनेक शहरांमधून ऐकू येत होते. तिथे बॉम्बफेक सुरूआहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. युक्रेनच्या सीमा रशियन सैनिकांनी ओलांडल्याचे युक्रेनच्या सीमा रक्षक दलाने म्हटले आहे, पण एकूणच हा हल्ला होण्यापूर्वीची अमेरिकेची भूमिका आणि प्रत्यक्षात हल्ला झाल्यानंतरची अमेरिकेची भूमिका ही अनाकलनीय आहे. त्यात जमीन असमानाचा फरक आहे. अमेरिकेच्या नुसत्याच गुरगुरण्याला रशियाने भिक घातली नाही, असेच यातून दिसून येते. या युद्धात नाटो सहभागी होणार नाही, असे शुक्रवारी अमेरिकेने जाहीर केले इथेच अमेरिकेची हतबलता दिसून येते. आता आपला बफर स्टॉक खुला करून जगाची तेलाची गरज पूर्ण करण्याचे धोरण अमेरिकेने जाहीर केले असले, तरी अमेरिकेला या दोन दिवसांत जेरीस आणण्याचे काम रशियाने केले हे नक्कीच.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी याला युद्ध असे संबोधलेले नाही. ते याला लष्करी कारवाई म्हटले असले, तरी हे आक्रमण आहे यात शंका नाही. रशियन दूरचित्रवाणीवरून देशास उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी त्याचे समर्थन केले व त्यासाठी कारणेही दिली. पूर्व युक्रेनमधील डॉनेत्स्तक व लुहान्स्क या प्रांतांत युक्रेन हत्याकांड घडवत आहे, तेथील स्वतंत्रतावादी नेत्यांनी आपल्याकडे युक्रेनच्या आक्रमणापासून वाचवण्याची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे प्रांत रशियावादी आहेत. गेल्या आठवड्यात रशियाने सुमारे दीड ते दोन लाख सैनिक युक्रेनच्या सीमेवर आणले, तेव्हाच आक्रमण होणारे हे स्पष्ट झाले होते. युक्रेनच्या लष्करी तळांना रशियाने लक्ष्य केले आहे. पुतीन यांनी युक्रेनच्या सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. हे सगळे होत असताना अमेरिका गप्प बसली होती. सगळ्या देशांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेने दुसºयाच्या चपलेने विंचू मारण्याचा खूप प्रयत्न केला असला, तरी त्यांना फारसे यश आलेले नाही. रशियन आक्रमणापुढे आपले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे अमेरिकेला जाणवू लागले आहे. इराण, इराक या देशांना ज्याप्रमाणे अमेरिकेने बाहुले बनवले आणि बेचिराख करण्याचे धोरण अवलंबले, त्याप्रमाणे रशियाला छळणे सोपे नाही याची जाणिव अमेरिकेला झालेली आहे. कारण रशियाचे विघटन झालेले असले, एकेकाळी असलेले महासत्तेचे अस्तित्व शाबूत नसले तरी तो निद्रिस्त ज्वालामुखी आहे हे अमेरिकेने ओळखले आहे. ही ज्वालामुखीची आगच पुतीन यांनी पेटवून अमेरिकेला इशारा दिलेला आहे.


युक्रेनमधील अनेक बंडखोर म्हणजे ज्यांचा रशियाला विरोध आहे असे आणि पत्रकार यांची हत्या करण्याची रशियाची योजना आहे. अशा रशियाविरोधी व्यक्तींची मोठी यादी तयार असल्याचे पाश्चात्य राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. रशियाने अशी यादी असल्याचे साफ नाकारले असले, तरी पुतीन यांचा इतिहास बघता त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. खुद्द रशियातील नोबेल विजेत्या पत्रकारालाही त्यांनी धमकावले आहे. त्या वृत्त संस्थेतील काही पत्रकारांचा संशयास्पदरित्या मृत्यूही झाला आहे. पुतीनविरोधी नेते अलेक्सी नवाल्नी यांच्यावार विषप्रयोग झाला, त्यातून ते वाचले; पण आता ते तुरुंगात खितपत पडले आहेत. युक्रेनवर आक्रमण करण्याचे निमित्त पुतीन शोधत होते, असे त्यांची विधाने बघता जाणवते. आठवडाभरापूर्वी त्यांनी एक भाषण केले होते त्यात मुख्यत्वे नाटोवर आगपाखड होती. हा पाश्चात्य देशांचा लष्करी सहकार्य गट आहे. त्यात युरोपीय देश जास्त आहेत. युक्रेनचे वर्तन नव नाझींप्रमाणे असल्याचा पुतीन यांचा आरोप आहे. रशिया विरुद्ध द्वेषभावना व भयगंड पसरवत असल्याची टीकाही त्यांनी पाश्चात्य देश व नाटोला उद्देशून केली आहे. त्यामुळे एकूणच या युद्धाला सुरुवात करताना अमेरिकेला इशारा देण्याचे धोरण आखलेले दिसते.

युक्रेनवर पुतीन यांचा राग असण्याचे कारण म्हणजे त्या देशाची पाश्चात्य विशेषत: अमेरिकेशी वाढत असलेली जवळीक. हा देश आता अमेरिकेची वसाहत झाल्याची टीका त्यांनी केली आहे. नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा युक्रेनने व्यक्त केल्याने पुतीन यांचे पित्त अधिक खवळले. युक्रेनला नाटोकडून थेट आदेश मिळत असल्याचा त्यांचा आरोप आहे. पूर्वीच्या सोव्हिएत रशियाची अण्वस्त्रे युक्रेनमध्ये आहेत की नाही? हा अजून संदिग्ध मुद्दा आहे. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर १९९४ मध्ये युक्रेनने अण्वस्त्रे नष्ट करण्यास मान्यता दिली. अण्वस्त्र प्रसार बंदी करारही त्यांनी मान्य केला. त्यावेळी एका तज्ज्ञाने ही चूक असल्याचे मत व्यक्त केले. आता युक्रेन अण्वस्त्र बनवत असल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे. नाटोद्वारे अमेरिका आपल्याभोवती लष्करी फास निर्माण करत आहे, असे त्यांना वाटते. बेलारूसचा हुकूमशहा लुकाशेन्को याच्याकडून तेथे रशियाच्या सैनिकांचा तळ बेमुदत ठेवण्याची परवानगी पुतीन यांनी मिळवली. ही सगळी कारणे पाहता आपले उपद्रव मूल्य दाखवणे योग्य असल्याचे पुतीन यांना वाटते. अर्थात ही सुरुवात काही एकाएकी झालेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते त्यांची मुदत वाढवणे या धोरणापर्यंत एक दीर्घकालीन कार्यक्रम त्यांनी योजल्याचे दिसते, पण युक्रेन हे निमित्त आहे. त्यांना नेहमीप्रमाणे अमेरिकेला धाक दाखवायचा आहे हे नक्की.

गुन्ह्याला एक्स्पायरी असते का?


याठिकाणी खरे कोण, खोटे कोण हा मुद्दा महत्त्वाचा नाही. याठिकाणी चूक की बरोबर हा मुद्दा महत्त्वाचा नाही. गुन्हा घडला की नाही हे पण महत्त्वाचे नाही. पण एक नवाच मुद्दा बुधवारच्या नवाब मलिक प्रकरणातून पुढे आला आहे. त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. ते म्हणजे गुन्ह्याला एक्स्पायरी असते का? नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिकांच्या वकिलांपासून ते नवाब मलिकांचे समर्थक, ईडीची हवा खाऊन आलेले छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते एकाच मुद्यावर युक्तिवाद करत आहेत. तो म्हणजे ही गोष्ट खूप जुनी आहे, ही घटना जुनी आहे किंवा हा तथाकथीत गुन्हा खूप जुना आहे. त्यामुळे तो उकरून काढू नये. म्हणूनच आता प्रश्न निर्माण झालेला आहे की, एखादा गुन्हा घडून गेल्यावर त्याला खूप काळ लोटला की, तो एक्स्पायर होतो का? औषधाला जशी एक्स्पायरी डेट असते तशी गुन्ह्याचा तपास ठराविक दिवसांतच झाला पाहिजे, असा काही नियम आहे का? ठराविक काळात पोलिसांनी, तपास यंत्रणांनी तपास केला नाही, तर गुन्हेगार निर्दोष होतात का?


संपूर्ण बुधवारी एकच युक्तिवाद केला गेला की, हा व्यवहार २० वर्षांपूर्वी झालेला आहे. त्याचा तपास आता करता येणार नाही. म्हणजे २० वर्षांपूर्वी तो केलेला व्यवहार चुकीचा असला, त्यात भ्रष्टाचार झालेला असला, त्यात काही गुन्हा घडला असला, तर त्याचा तपास करता येणार नाही का? यावर कोणीच का बोलत नाहीये हे न समजणारे आहे. कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्याचा ठराविक दिवसांतच तपास केला पाहिजे, असा काही नियम आहे का? त्या ठराविक काळात तपास झाला नाही, तर तो कालबाह्य होऊन तपास करणे बंद करावे लागते का?, असे असेल तर ती कायदा आणि सुव्यवस्थेची त्रुटी म्हणावी लागेल. गुन्हे जास्तीत जास्त लपवण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल.

म्हणजे हा पायंडा महाराष्ट्रातून पडत असेल, तर ती चिंतेची बाब आहे. याचे कारण मागच्याच महिन्यात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्रात घडली. ती म्हणजे अनेक बालकांच्या हत्या करणाºया गावित भगिनींना वीस वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा झाली होती. ती सर्व न्यायालयांनी कायम केली होती. राष्ट्रपतींनीही फाशी देण्यात यावी, अशी शिफारस करून दयेची याचिका फेटाळली होती. पण राज्य सरकारने ती फाशी वेळेत दिली नाही म्हणून त्या राक्षशिणींची फाशी रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. त्यामुळे महाराष्ट्राची ख्याती ही गुन्हेगारांचे पोशिंदे राज्य अशाप्रकारे होताना दिसते आहे. तशाच प्रकारे नवाब मलिकांनी केलेला व्यवहार हा वीस वर्षांपूर्वीचा होता असा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. या व्यवहारात काही अनियमीतता, चूक असेल तरी ती तपासायची नाही असा आग्रह केला जात असेल, तर ते चुकीचे आहे. म्हणूनच कोणत्याही तपासाला विशिष्ट मुदत असली पाहिजे, अशी काही कायद्यात, घटनेत, संविधानात तरतूद आहे का? तसे असेल तर अशा प्रकारचा उल्लेख नेमका कुठे आहे हे जाहीर केले पाहिजे. म्हणजे जे गुन्हेगार भारतात गुन्हे करून पळून गेले आहेत ते त्या मुदतीनंतर परत भारतात येऊ शकतील. अगदी दाऊद इब्राहिमपासून, नीरव मोदी, मल्ल्या हे आर्थिक घोटाळेबाज जे परदेशात पळून गेले आहेत त्यांनी अजून काही वर्षांनी बिनधास्त भारतात यावे, असे जाहीर करून त्या सर्वांच्या ड्यू डेट जाहीर केल्या पाहिजेत.


नवाब मलिकांनी दाऊदशी संबंधित असलेल्या कासकरशी व्यवहार केला का, हसिना पारकरबरोबर व्यवहार केला का, तो बेकायदेशीर आहे का हा भाग वेगळा. पण त्याचा तपासच करता येणार नाही. तो व्यवहार केला तेव्हा अमूक एक कायदाचा नव्हता म्हणून आता त्याचा तपास करता येणार नाही हे म्हणणे कितपत योग्य आहे, यावर कायद्याच्या अभ्यासकांनी भाष्य केले पाहिजे.

वीस वर्षांपूर्वी या प्रकरणाचा तपास का केला नाही?, असा एक मुद्दा उपस्थित केला जात आहे. यात राजकारण करून केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप होत आहे. पण याचा दुसरा अर्थ असाही आहे की, वीस वर्षांपूर्वी तुमचे सरकार असल्याने हे गैरव्यवहार दडपले गेले का? तपास करू दिला नाही का?, असाही प्रश्न सामान्य माणसांना पडला आहे. आज सामान्य माणूस एकच प्रश्न विचारतो आहे की, जर तुम्ही निर्दोष आहात तर इतका कांगावा करण्याची गरज काय? राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते शरद पवार यांनी आपण होऊन ईडी कार्यालयात हजर होतो, असे सांगितले होते. ईडीनेच त्यांना विनंती केली की, तुमची काही आवश्यकता नाही. येऊ नका. मग कर नाही त्याला डर कशाला?


या प्रकरणात आणखी एक प्रश्न उपस्थित होतो आहे. तो म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेव्हा अनिल देशमुख यांच्या चौकशीचा विषय निघाला, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला. त्यांना ऐन दिवाळीत अटक केले गेले. तीन-चार महिने ते तुरुंगात आहेत. पण त्या प्रकरणात त्यांच्या पाठीशी पक्ष दिसला नाही. त्यांच्यावर कारवाई झाली, तेव्हा कोणी फारसे पुढे आले नाही. पण नवाब मलिक यांच्यावर कारवाईचा विषय आला, तेव्हा सगळे कसे इतके रस्त्यावर येण्याची भाषा करू लागले? याचा अर्थ नवाब मलिक यांच्याकडे आणखी काही पुरावे आहेत का? जे बाकीच्यांना अडचणीत आणू शकतील? आज दिवसभर हाच विचार सर्वांच्या मनात होता. टीव्हीवर काय दाखवले आणि टीव्हीवरील वक्तव्ये, पत्रकार परिषदा, टीव्हीवर दिलेल्या प्रतिक्रिया यावर मत तयार होण्याचा काळ आता गेलेला आहे. सामान्य माणूस विचार करत आहे. त्यामुळे कसल्याही आंदोलनामुळे, जाहीर भाषणामुळे सामान्य माणसांचे मतपरिवर्तन होणार नाही. तर त्याच्या मनात असलेली शंका कायदेतज्ज्ञांनी सोडवली तरच त्यात तथ्य असेल. ते म्हणजे गुन्ह्याला एक्स्पायरी असते का?

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

केल्याने होत आहे रे


आज दासनवमी. समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी म्हणजे दासनवमी ही अतिशय श्रद्धेचा दिवस असतो. रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणा‍ºया समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.


हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा समर्थांचा बाणा होता. लग्नमंडपातून पलायन केल्यानंतर आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते १२ वर्षे राहिले. यावेळी ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली. तीच करुणाष्टके म्हणून ओळखली जाते. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते.

समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले, तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापना करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले.


भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांची व समर्थांची भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले- आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता? तेव्हा गुरू हरगोविंद म्हणाले- एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले- आणि हा सारा फौजफाटा? त्यावर हरगोविंद म्हणाले- धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे की, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्र सज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे. त्यानंतर समर्थ गुरू हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. बाहेरून दिसायला कुबडी. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते. भारत प्रवास करीत असताना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत. गुरू हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. यानंतर समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली. हनुमान ही शक्तीची देवता. हनुमान मंदिरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत.

समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती. दाट झाडीत आणि रम्य वनश्रीत त्यांचे मन रमत असे. समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते. समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ती संपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.


आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत, परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणा‍ºया परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. जगातील सर्व देशांत आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षांपूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले की, केल्याने होत आहे रे ेआधी केलेचि पाहिजे॥ ही समर्थांची शिकवण जगाला आजही प्रेरणादायी अशीच आहे.

नवे संकट


एकेकाळी सोव्हियत रशिया देश हा जागतिक महासत्ता होता. रशियाचा संपूर्ण जगभरात दरारा होता. एका बाजूला अमेरिका आणि दुस‍ºया बाजूला रशिया यांच्या शीत युद्धाभोवती जागतिक राजकारण फिरत असे. पुढे सोव्हियत संघराज्यांचे विघटन झाले आणि बघता बघता रशियाचे महासत्तापद लयास गेले. आता तर चीन रशियाहून शिरजोर होत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने जोरदार पावले टाकत आहे. या सगळ्या जागतिक परिस्थितीमध्ये पुतीन आपल्या विस्तारवादी पावलांद्वारे पुन्हा एकवार आपल्या देशात लोकप्रियता संपादन करू पाहत आहेत, असे दिसते. रशियाला पुन्हा पूर्वीप्रमाणे महासत्तेकडे घेऊन येण्याची महत्त्वाकांक्षा पुतीन यांची आहे. अर्थात अशी महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही. मोठे स्वप्न नेहमीच पहावे. पण त्यापायी संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत नेणे हे योग्य नाही.


युक्रेन हा आता स्वतंत्र देश बनला आहे. हे रशियाच्या अजूनही पचनी पडलेले नाही. त्यामुळे त्याचे लचके तोडण्याची एकही संधी रशिया दवडत नाही. बोल्शेविक क्रांतीची परिणती म्हणून युक्रेन घडला. तो रशियाचाच भाग आहे, असाच पुतीन यांचा सतत युक्तिवाद राहिला आहे. २०१४ मध्ये त्याचा क्रिमियाचा भाग बळकावण्यात आला. आता मंगळवारी ज्या दोन प्रांतांना स्वायत्तता आणि मान्यता पुतीन यांनी देऊन टाकली आहे, त्यातून युक्रेनचे आणखी लचके तुटतील. त्यामुळे अवघे जग तिस‍ºया जागतिक महायुद्धाच्या शक्यतेने धास्तावलेले आहे.

अर्थात रशिया मात्र आपल्या या हट्टापासून मागे हटायला तयार नाही. नाटोमध्ये युक्रेनच्या समावेशाच्या प्रयत्नांचे निमित्त साधून त्या देशावर कब्जा करायची संधी रशिया साधू पाहते आहे. डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या युक्रेनच्या दोन प्रांतांमधील रशियावादी बंडखोरांना आपली मान्यता बहाल करून व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनची पुन्हा कुरापत काढली आहे. आधीच युक्रेनच्या सीमांवर आपल्या लाखोंच्या फौजा तैनात करून युद्धाच्या ललका‍ºया देत आलेल्या रशियाला समजावण्याचे प्रयत्न अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान या सगळ्यांनी करून पाहिले. तरीही पुतीन यांनी युक्रेनच्या २०१४ पासून स्वायत्त प्रदेश म्हणून वावरणा‍ºया बंडखोरांच्या प्रांतांना आपली मान्यता देऊन टाकली आहे. त्यांना आपले विस्तारवादी धोरणच पुढे रेटायचे आहे हे स्पष्ट होते. यापूर्वीही जॉर्जियाच्या दोन प्रांतांना अशाच प्रकारे मान्यता दिली गेलेली होती.


रशियावादी बंडखोरांना पाठिंबा याचाच दुसरा अर्थ उद्या पुतीन तेथे आपल्या देशाच्या फौजा घुसवू शकतात. तेथील नागरिकांना रशियन पासपोर्ट देणे असो अथवा तेथील जनमत कौलात त्यांना रशियात जायचे असल्याचा कौल मिळाल्याचे केलेले दावे असोत, पुतीन यांना तेथे आपली पकड मजबूत करायची आहे हे उघड आहे. युक्रेनच्या बंडखोर व दहशतवादी गटांना मान्यता देऊन त्यांच्या अंमलाखालील प्रांत स्वतंत्र घोषित करणे याचाच अर्थ रशिया अमेरिकेसह विविध देशांनी दिलेल्या इशा‍ºयाला जुमानत नाही असाच होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अत्यंत जबर आर्थिक निर्बंधांचा इशारा देऊनही पुतीन यांनी सैन्य माघार केलेली नाहीच, उलट या त्यांच्या कारवाईने संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे. आपल्या निर्णयाची माहिती फ्रान्स व जर्मनीला दिल्याचेही पुतीन यांनी जाहीर केले आहे. पण यावर अमेरिका आणि मित्र राष्ट्र गप्प बसतील असे नाही. अमेरिकेलाही अशी युद्धजन्य परिस्थिती असली की, नवी संधी उपलब्ध असते. ते ही संधी गमावणार नाहीत आणि जगाला युद्धाच्या खाईत ओढतील असे चित्र दिसते.

सध्याचा युक्रेन हा खरेतर अमेरिकेची वसाहत बनून राहिला आहे. अमेरिकेचा कळसूत्री प्रदेश असे ते त्याला संबोधित आहेत. युक्रेनचा वापर अमेरिका आपल्याविरुद्ध करील, नाटो फौजा आपल्याविरुद्ध युक्रेनची भूमी वापरतील ही शक्यता पुतीन यांना वाटते. त्यामुळेच तेथे आपला प्रभाव निर्माण करण्याचा आटापिटा त्यांनी चालवलेला आहे. बळाच्या जोरावर युक्रेनला नमते घ्यायला भाग पाडायचे. नाटो संघटनेमध्ये सामील होण्याचा युक्रेनचा प्रयत्न हाणून पाडायचा यासाठी हे सारे डावपेच आहेत. अमेरिकाच नव्हे, युरोपीय संघराज्यांतील २७ देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घालायचा इशारा दिला, तरीही त्यांना न जुमानता ज्याप्रकारे ही दांडगाई चालली आहे, ती वेळीच आटोक्यात आणली गेली नाही, तर युद्ध अटळ आहे, महायुद्ध होण्याची शक्यता आहे.


खरेतर युद्ध हे कोणाच्याच हिताचे नसते. खरोखरच युद्धाचे ढग जमू लागणे ही आपल्यासाठीही धोक्याची घंटा असेल. आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचे गंभीर दुष्परिणाम घडतील. विशेषत: कच्च्या तेलाच्या किमती आताच कडाडू लागल्या आहेत. अनेक विदेशी कच्च्या मालाची टंचाई भासू लागेल. अर्थव्यवस्थेलाही युद्धामुळे जबर हादरे बसत असतात. त्यामुळे हे संभाव्य युद्ध टळावे यासाठी जोरदार प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणे जरूरी आहे. कोरोनाच्या संकटातून जग अजून सावरलेले नाही. गेली दोन वर्ष ते एकप्रकारचे जैविक युद्ध सुरू होते. यामुळे महागाई, टंचाई, बेरोजगारी या संकटांना जग तोंड देत आहे. अनेकांचा रोजगार गेलेला आहे. अर्थव्यवस्था बरबाद झालेली आहे. अशा परिस्थितीत हे नवे संकट समोर येऊन ठेपले आहे. त्यामुळे हे टाळणे आवश्यक आहे.

ईडीच्या रडारवर


बुधवारी भल्या पहाटे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे राज्यभर खळबळ माजली. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले, पण गेल्या काही वर्षांपासून ईडीची चौकशी, तिचा ससेमिरा अशी चर्चा नेहमीच होताना दिसते. अर्थात ईडीने पकडले, चौकशीसाठी ताब्यात घेतले म्हणजे ते दोषी आहेत, असा अर्थ होत नाही. एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणात चौकशीसाठी तपास यंत्रणा कोणालाही ताब्यात घेऊ शकतात, कोणालाही बोलावू शकतात. याचा अर्थ ते दोषी किंवा चुकीच्या आहेत, असे कधीच होत नाही. जोपर्यंत चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे हातात येत नाहीत, तोपर्यंत हे सगळे लोक सज्जन आणि प्रामाणिकच असतात. त्यामुळे लगेच त्यांच्यावर कसलाही शिक्का मारायची कोणी घाई करू नये. त्यांना वाईट ठरवण्याचा प्रयत्नही कोणी करू नये. म्हणूनच ईडीच्या रडारवर राज्यातले कोणते नेते येऊन गेले आहेत, यावर एक कटाक्ष टाकायला हवा.


महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राजकारण याचा मागच्या काही वर्षांत खूप जवळचा संबंध बघायला मिळाला आहे. त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे ते राजकारण आहे, असाच समज होतो. यामध्ये १४ मार्च २०१६ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ईडीने पहिल्यांदा अटक केली. पैशांची अफरातफर, बेहिशेबी मालमत्ता याप्रकरणी महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय नेत्याला ईडीकडून झालेली ती पहिलीच अटक होती. त्या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर होते. दोन वर्षे भुजबळ जेलमध्ये होते. त्यानंतर भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे ईडी चौकशीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात नव्याने सुरुवात झाली. तेव्हापासून भाजपविरोधी बोलणा‍ºयांना ईडीची भीती दाखवली जाते, असे आरोप तत्कालीन विरोधी पक्षांकडून करण्यात आले. मागच्या ४ वर्षांत भाजपवर हा आरोप वारंवार करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर ईडी कार्ययालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक शिवसैनिकांकडून लावण्यात आला होता. त्यामुळे सगळे वातावरण ढवळून निघाले होते.


त्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी एक नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा दणका बसला होता. यूपीए सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ेकेंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते. २००८-०९च्या काळात परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार यांच्याशी संपर्कात होते. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवार यांनी तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले. त्याबद्दल दीपक तलवार यांना २७२ कोटी रुपये मिळाले. यामुळे एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हे सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या काळात झाल्याचा आरोप ईडीने लावला होता. याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसताना ७० हजार कोटी रुपयांची १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलिनीकरण या प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत होता. पण प्रफुल्ल पटेल यांनी संयमी भूमिका घेत चौकशीला सामोरे गेले.

आॅगस्ट २०१९ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली होती. दादरमध्ये ज्या जमिनीवर कोहिनूर स्क्वेअर टॉवर आहे, त्याठिकाणी कोहिनूर मिल क्रमांक ३ची इमारत उभी होती. बंद पडलेल्या मिलच्या जागेची विक्री करण्याची जबाबदारी नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडे असते. या मिलचा ताबा नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडे आल्यानंतर त्यांनी कोहिनूर मिलच्या ४ एकर जागेचा लिलाव केला. या लिलावात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांची मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर आणि मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची कोहिनूर सीटीएनएल यांनी एकत्रितपणे ४२१ कोटींची बोली लावून ही जागा विकत घेतली. यामध्ये आयएफएलएस या कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा संशय ईडीला होता. त्याचा तपास ईडीने सुरू केला. २२ आॅगस्ट २०१९ ला याप्रकरणी राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. राज ठाकरे यांची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी तपास यंत्रणांना सहकार्य करत कोणतीही आक्रमक भूमिका न घेता, विनाकारण टीका न करता संयमाने परिस्थिती हाताळली आणि तपास यंत्रणांना सहकार्य केले.


सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ जानेवारी २००७ ते २१ मार्च २०१७ या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे २५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माजी संचालकांची ७० नावे आहेत. त्यापैकी ५० जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. ही नोटीस शरद पवार यांना आल्यानंतर २७ सप्टेंबरला मी स्वत: ईडी कार्यालयात उपस्थित राहून ईडीच्या अधिका‍ºयांना माहिती देणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे ईडी अधिका‍ºयांनी असे न करता गरज असल्यास आम्ही स्वत: बोलवू अशी विनंती केली. त्यानंतर पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावले नाही. त्यानंतर या प्रकरणातून सगळ्यांना क्लीन चीटही देण्यात आली.

लॉकडाऊनच्या काळात २४ नोव्हेंबर २०२० शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्याचे पुत्र विहंग सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले. त्यानंतर विहंग सरनाईक यांची ईडीने ५ तास चौकशी केली. टॉप ग्रुप सिक्युरिटीज एमएमआरडीएमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत ही चौकशी केली. या प्रकरणात सरनाईक यांचा व्यावसायिक भागीदार अमित चांदोले याला २५ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. सरनाईक यांच्या वतीने चांदोले यांनी पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. १० डिसेंबरला प्रताप सरनाईक हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले. त्यांची ६ तास चौकशी करण्यात आली. सरनाईक यांनीही ईडीच्या चौकशीत सहकार्य केल्याचे दिसून आले.


भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांना गेल्यावर्षी ईडीचा दणका बसला. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर २०१६ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. याप्रकरणी खडसे यांना डिसेंबर २०२० मध्ये ईडीने नोटीस बजावली. ३० डिसेंबरला खडसे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, पण त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे खडसे उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अनेकवेळा चौकशीला बोलावले गेले. ही चौकशी अजूनही चालूच आहे.

गेल्या वर्षभरात अनिल देशमुख कुटुंबीयांसह अनेकांना ईडीच्या नोटिसा आल्या. पण ईडीची प्रतिमा यामुळेच राजकीय नेत्यांच्या चौकशीची यंत्रणा अशी होताना दिसते आहे. तपास यंत्रणांनी कोणालाही तपासासाठी चौकशीला बोलावणे हे काही चुकीचे नाही. पण त्याचा जो गाजावाजा केला जात आहे. यामुळे विनाकारण अब्रूची लक्तरे काढण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. विरोधकांकडून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. म्हणून यातील राजकारण बाहेर काढून खुशाल कोणाचीही चौकशी करावी आणि दूध का दूध, पानी का पानी करावे. ज्याप्रकारे चुपचाप नवाब मलिकांना ताब्यात घेतले, चौकशी सुरू झाली तशीच चुपचाप कोणाचीही चौकशी करावी, पण त्याचे मीडियापुढे होणारे प्रदर्शन टाळले तर नेत्यांना, सरकारला जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देता येईल.


- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

नेमकी भीती काय?


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतलेल्या प्रदेशांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर रशियन सैन्य पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी भागात पाठवले जाईल. या भागात ते ‘शांतता राखण्यासाठी’ प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले. युक्रेनमधील दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन रशियन समर्थक प्रांतांना पुतीन यांनी स्वतंत्र मान्यता दिली आहे. हे सगळे घडत असताना अमेरिकेने त्यात केलेली मध्यस्ती ही तिसºया महायुद्धाची ठिणगी असू शकते. अर्थात अमेरिकेला मध्यस्ती का करावीशी वाटते आहे? म्हणजे रशियाने पूर्वी कधीकाळी गमावलेला भाग परत मिळवायचा प्रयत्न केला, तर तसा प्रयत्न भारताने का करू नये? भारताचा बराचसा भूभाग पाकिस्तानने गिळंकृत केला. पाकव्याप्त काश्मीर म्हणून तो ओळखला जातो. चीननेही आपला भाग गिळंकृत केलेला आहे. आजही अरुणाचल प्रदेशात चीन आपला हक्क सांगते. नकाशात बदल करण्याचे राजकारण केले जाते. अशा परिस्थितीत लष्करी सामर्थ्य दाखवून या देशांना समज देणे भाग पडते.


पण रशियाने या प्रकाराला सुरुवात केल्यावर याच कारणाने आपले वर्चस्व कमी होईल याची भीती अमेरिकेला वाटत असावी. एखादा भूभाग राज्य हरणे, जिंकणे ही आपल्याकडे सर्वच देशांमधील इतिहासातील, पुराणातील सातत्याची गोष्ट आहे. राजे रजवाडे यांच्या काळात चक्रवर्ती, सम्राट हे असे भूभाग मिळवत असत, परंतु दुसºया महायुद्धानंतर हा प्रकार थांबला होता. तो छुप्या मार्गाने सुरू झाला. युद्ध न करता भूभाग मिळवण्यासाठी अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागले. शांततेच्या नावाखाली याकडे संयमी देश दुर्लक्ष करू लागले. यातूनच अनेक देशांना आपले तुकडे पाडावे लागले. हे प्रकार आशिया खंडात मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे अनेक देशांचे विभाजन झाले. हे विभाजीत झालेले मूळचे स्वकीय आपापसात सतत या भूभागांवरून लढू लागले. हे लढवणे आणि त्यांच्या लढण्याच्या जीवावरच अमेरिका ही मोठी होत गेली.

रशियासाठी युक्रेनचे महत्त्व एवढे अधिक का आहे, हे जाणणे गरजेचे आहे. यामागे काही कारणे महत्त्वाची आहेत. रशिया जे धोरण अवलंबत आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या देशांच्या सीमेजवळ एक धोकादायक लष्करी आघाडी निर्माण होत असल्याचे दिसत आहे. ते युके्रनला नाटोचे सदस्य बनण्यापासून रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. तसे झाल्यास युक्रेनला नाटोच्या सदस्य देशांकडून क्षेपणास्त्र आणि सैनिकांची मदत मिळणार नाही. अगदी मागे जायचे म्हटले, तर १८१२ मध्ये नेपोलियनच्या आक्रमणाच्या वेळेपासूनच युक्रेनच्या परिसराने रशियासाठी बफर झोनच्या रूपात काम केले आहे. युक्रेन रशियाच्या पश्चिम सीमेवर आहे. रशियावर दुसºया महायुद्धात पश्चिमेकडून हल्ला झाला होता, त्यावेळी युक्रेनच्याच परिसरातून रशियाने स्वत:चे संरक्षण केले होते.


जर युक्रेन नाटोबरोबर गेले, तर मॉस्को केवळ ४०० मैल (६४० किलोमीटर) अंतरावर येईल. म्हणजे युक्रेन हा सुरक्षेच्या दृष्टीने असा परिसर आहे, जो त्यांना कोणत्याही स्थितीत त्यांच्याबरोबर हवा आहे. कारण, नेपोलियननंतर या भागाने रशियाचे रक्षण केले आहे. आता रशियाचा असा समज आहे की, त्यांना शत्रूंच्या आघाडीने चारही बाजूने घेरले गेले आहेत. तो या महाशक्तीसाठी चिंतेचा विषय आहे.

याशिवाय १२ जुलै २०२१ला युक्रेनबरोबरच्या संबंधांबाबत विस्तृत लेखामध्ये व्लादिमिर पुतीन यांनी त्यांचा शेजारी देश एका धोकादायक खेळात सहभागी होत असल्याचे म्हटले होते. युक्रेन युरोप आणि रशियामध्ये अडथळा ठरत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले होते. पुतीन हे केवळ संरक्षण आणि या भागाच्या राजकारणाबाबत बोलत होते. त्याचबरोबर त्यांचा इशारा याठिकाणच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांकडेही होता. त्याच्याशी रशिया आणि युक्रेन दोघांचा संबंध आहे. युक्रेन देश म्हणून स्वत:ची ओळख रशियाचा विरोधक म्हणून व्यक्त करत असतो, त्यामुळे रशियात तीव्र भावना व्यक्त होतात.


युक्रेनच्या मुद्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या वैयक्तिक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. पुतीन यांनी युक्रेनमध्ये अनेकदा रशियाला पाठिंबा असलेल्या नेत्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नाही. एक सामान्य धारणा अशीही आहे की, पुतीन दीर्घ काळापासून या मुद्यावर संघर्ष करत आलेले आहे. त्यांना असे वाटते की, हे अर्धवट काम त्यांचा वारसा ठरेल. त्यामुळे त्यांना हे पूर्ण करायचे आहे. त्यामुळेच पाश्चिमात्य देशांनी रशियाला विरोधी व्यासपीठ बनवले आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा निघणे गरजेचे आहे. साहजिकच आहे की, जर रशियाची ही बाजू मान्य केली गेली, तर भारताला अखंड हिदुस्थानचे स्वप्न पाहण्याचा अधिकार का नाही? असे अनेक मुद्दे या संघर्षात निर्माण होतील.

आज अमेरिकेची इच्छा आहे की, त्यांचे भले झाले पाहिजे, बाकीच्यांनी जेवढे मिळाले आहे. त्यावर समाधान मानले पाहिजे. अमेरिकेच्या वर्चस्वाला कोठेही धोका होणार नाही या प्रयत्नात रशियाने डोके वर काढले, तर जगभरात ती प्रथा पडेल. इतके वर्ष अमेरिकेचे मांडलिकत्व स्वीकारणारे देश आता अमेरिकेचे वर्चस्व झुगारून आपल्या देशाचा विचार करतील. आपल्या भूभागाचा विचार करतील. हे बळ रशियाच्या संघर्षामुळे छोट्या तिसºया जगाला मिळाले तर अमेरिका एकाकी पडेल. ही भीतीच जगाला विशेषत: आशिया खंडाला युद्धाच्या खाईत लोटेल. आखातात विध्वंस करून झाल्यावर अमेरिकेचे लक्ष आशिया आहे हे नक्कीच. त्याला तोंड रशिया-युक्रेन वादातून फुटण्याची शक्यता आहे.


बिटवीन द लाईन्स/ प्रफुल्ल फडके

91652448055\\

अंधश्रद्धेचा भांडवली बाजार


आपल्या देशात आणि संस्कृतीत गुरू ही परंपरा असली, तरी या परंपरेचा गैरफायदा उठवत अनेक गुरू, बुवा, बाबा आपला बाजार मांडत असल्याचे चित्र आपण पाहत आलो आहे, पण अंधश्रद्धा किंवा श्रद्धेचा बाजार मांडणारे हे लोक भांडवली बाजारात असतील, अशी कधी कल्पना केली नव्हती. म्हणजे भांडवली बाजारात मांडवली करणारे असतात, पण हे लोक फक्त पैशांच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे लक्ष्मीच्या पूजेशिवाय हे लोक कोणाला नक्की मानतात हे समजणे तसे अवघड होते, पण नुकतेच या भांडवली बाजारातील बाबाचे दर्शन संपूर्ण देशाला घडले आहे. बाजारातील बाबाची चर्चा आणि चेहरा पुढे आलेला आहे.


म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण हे वित्त व राजकीय क्षेत्रातही बडे प्रस्थ होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या व त्यांचे माजी सहाय्यक आनंद सुब्रमणियन यांच्या निवासस्थानावर प्राप्ती विभागाने छापे टाकले. त्याआधी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) या संस्थेच्या एका आदेशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)च्या ढिसाळ कारभाराबद्दल त्यांच्या कर्मचा‍ºयांवर त्यात ताशेरे ओढले आहेत. त्यात चित्रा रामकृष्णदेखील आहेत. विशेष म्हणजे या आदेशातून उघड झालेली धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे, चित्रा रामकृष्ण आपले व्यावसायिक निर्णय कोण्या एका योगीच्या सल्ल्यावरून घेत होत्या. म्हणजे शेअरबाजारातही योगीराज निर्माण झालेले असेल, अशी कधी कल्पनाच केलेली नव्हती. पण एनएसईच्या सर्व व्यवहारांचे तपशील त्या या अज्ञात योगीला कळवत होत्या. त्यांनी सुब्रमणियन यांची एनएसईमध्ये स्वत:च्या सल्लागार पदावर नियुक्ती केली. या क्षेत्रातील काहीही अनुभव नसताना सुब्रमणियन यांना भरमसाठ वेतनही दिले. त्यांची नेमणूक व एनएसईच्या कारभारातील अन्य दोष याबद्दल चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटी रुपयांचा दंडही सेबीने ठोठावला. त्यामुळेच हा योगी कोण? रामकृष्ण यांच्या दाव्यानुसार ते हिमालयात राहतात. त्यांना नाव नाही, त्यांना देहही नाही. ते केव्हाही प्रकट होऊ शकतात; पण त्यांस पैसे पाठवले जात होते. केवढा चमत्कार म्हणावा लागेल ना? पण भांडवली बाजारातील या बुवाच्या किंवा योगीच्या बाजारामुळे सगळेच चक्रावून गेले असतील हे नक्की.

या बाबाच्या किंवा योगीच्या इच्छेनुसार भांडवली बाजार चालवणाºया चित्रा रामकृष्ण यांची कारकीर्द लक्षणीयच अशी म्हणावी लागेल. म्हणजे आयडीबीआय बँकेत सनदी लेखापाल किंवा चार्टर्ड अकाऊंटंट या पदावरून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर १९९०च्या दशकाच्या प्रारंभी हर्षद मेहता या बड्या शेअर दलालाने केलेला मोठा गैरव्यवहार उघड झाला. त्याने एकूण आर्थिक क्षेत्र हादरले. शेअर बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शी व्हावेत या हेतूने सरकारने राष्ट्रीय पातळीवर शेअर बाजार स्थापण्याचे ठरवले. मुंबई शेअर बाजाराला तो पर्याय होता. त्यातून राष्ट्रीय शेअर बाजार किंवा एनएसई अस्तित्वात आला. एनएसईची रचना करण्यात चित्रा रामकृष्ण यांचा मोठा सहभाग होता. विविध कल्पक प्रकल्प राबवून त्याच्या प्रगतीसही त्यांनी हातभार लावला. १९९५ मध्ये एनएसईवर १३५ कंपन्या नोंदल्या होत्या व रोजची उलाढाल १७ कोटी रुपये होती. आता तेथे ७५०० कंपन्यांची नोंद आहे व रोजची उलाढाल सरासरी ६० हजार कोटी रुपये इतकी आहे. २०१३ मध्ये त्यांची नेमणूक व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर झाली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. याच सुमारास त्या शेअर बाजाराची राणी या उपाधीने ओळखल्या जाऊ लागल्या. पण याच राणीचा कारभार कोणा एका बुवा, बाबाच्या सल्ल्याने होत होता हे अत्यंत धक्कादायक असे चित्र आहे.


खरंतर जगातील अत्यंत प्रभावी व्यावसायिक महिलांमध्ये चित्रा रामकृष्ण यांची गणना होत होती. २०१५ मध्ये सिंगापूरहून एनएसईबद्दल तक्रार आली. काही बड्या दलालांचा फायदा व्हावा यासाठी त्यांचे सर्व्हर एनएसईच्या सर्व्हरला जोडले होते किंवा जवळ ठेवले होते. यामुळे काही जणांना एनएसईच्या व्यवहारांची माहिती तात्काळ मिळत होती. सेबीने २०१६ मध्ये त्याची चौकशी सुरू केली. चित्रा रामकृष्ण यांनी त्यावर्षी डिसेंबरमध्ये पदाचा राजीनामा दिला. मात्र सेबीची चौकशी सुरू राहिली. पण यामागे कोणा योगीबाबाचा हात आहे किंवा सल्ला आहे हे खरोखरच अनाकलनीय असेच आहे. म्हणजे सुमारे २० वर्षे त्या एका अज्ञात योगीचा सल्ला घेत होत्या. त्या योगीला एनएसई पैसेही देत होते. या दोघांमधील ई-मेलच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख सेबीच्या आदेशात आहे.

हा जो कोणी तथाकथीत योगी, बुवा, बाबा आहे तो गुप्त आहे. शरीराने समोर आलेला नाही. देहविरहीत आहे. त्याच्या नावाने मोठमोठे व्यवहार होत होते, हा फारच मोठा चमत्कार आहे. म्हणजे जर त्या योगीला देह नाही तर हे मेल कोण पाठवत होते? पैसे कोणास मिळत होते? सुब्रमणियन यांना त्यांच्या आधीच्या नोकरीत वार्षिक १५ लाख रुपयांपेक्षा कमी वेतन होते. त्यांना २०१६ मध्ये ४ कोटी २१ लाख रुपये दिले जात होते. त्यांचे पद चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार असे होते. तरीही त्यांना एनएसईमध्ये बरेच अधिकारही होते. हा भ्रष्टाचार मानला पाहिजे. त्यांचे वेतन व त्यांची भूमिका याबद्दल एनएसईचे संचालक मंडळ अनेक वर्षे गप्प का होते? या सर्व काळात चित्रा रामकृष्ण यांनी स्वत: जादा पैसे कमावले काय, हा मुद्दा आल्याने त्यांच्यावर छापे टाकले गेले. खरेतर अफरातफर हा पैलू लक्षात घेऊनही सरकार या प्रकरणाची चौकशी करू शकते आणि गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांना मोठी शिक्षा झाली पाहिजे, हे तर नक्कीच. एक अज्ञात योगी जगातील एक मोठा शेअर बाजार नियंत्रित करत होता हीच चकित करणारी गोष्ट आहे. म्हणजे हा सरळसरळ अंधश्रद्धेचा भांडवली बाजार म्हणावा लागेल.

निर्बंध

 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनलॉक कधी होणार?, सगळे निर्बंध कधी हटणार?, फेब्रुवारीनंतर शंभर टक्के अनलॉक होणार, मार्च अखेर होणार वगैरे चर्चा सुरू आहेत; पण खरंतर या चर्चा सगळ्या व्यर्थ आहेत. आज पाहिले, तर सगळं काही लख्खपणे सुरू असल्याचे दिसत आहे. सगळे कामासाठी बाहेर पडत आहेत, रेल्वे, बस, सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. मग बंद काय आहे?, शाळाही आता ब‍ºयापैकी सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, बार जोरात चालले आहेत. मग आणखी कोणते निर्बंध हटवायचे बाकी आहेत, हा प्रश्न पडतो.

खरंतर देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी नागरिक व माल वाहतुकीवरील निर्बंध कमी होणे आवश्यक आहे, हे स्वीकारण्याजोगे आहे; मात्र कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही याचेही भान जनतेने व सरकारांनी ठेवले पाहिजे; पण आज खरोखरच बंधने आहेत का? सरकार, प्रशासन सातत्याने गर्दीच्या जागा टाळा, गर्दी करू नका, मास्क वापरा असे सांगत असली तरी बिनामास्क हिंडणारे किती तरी लोक रस्त्याने दिसतात. निवडणुकांचा प्रचार जोरात आहे. राजकीय कार्यक्रम जोरात आहेत. मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरू झालेली आहेत. क्रिकेटचे सामने होत आहेत. भारत विजयही मिळवत आहे, मग अजून नेमके काय सुरू होणे बाकी आहे? अजून काही दिवसांनी राज्यात महापालिका, पालिका निवडणुकांचा हैदोस सुरू झाल्यावर तर कोरोना नावाचा काही प्रकार होता याचे विस्मरणही सर्वांना होईल. आपण पाच राज्यांतील निवडणुकांमधील परिस्थिती पाहत आहोतच ना. मग आता आणखी कोणते निर्बंध कमी होणे अपेक्षित आहे?, मुळात निर्बंध पाळले जात आहेत का, हाच प्रश्न आहे. आज संपूर्ण अनलॉक असल्याचीच परिस्थिती आहे. आमची राज्य परिवहनाची एसटीच काय ती बंद आहे. ती पण काही प्रमाणात; पण त्याचे कारण कोरोना नसून संप आहे. पण बाकी खासगी वाहतूक इतकी तुफान वेगात चालू आहे की, सामान्यांचे काहीही अडलेले नाही. मग आता निर्बंध कसले बाकी आहेत? खरंच हा अनाकलनीय प्रश्न आहे. आता लग्नकार्याचा आकडा हा विषय असू शकतो; पण लग्न आणि मयतावर निर्बंध घातलेले असले, तरी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. राहता राहिला प्रश्न सिनेमा हॉल आणि नाट्यगृहांचा; पण ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आता सिनेमागृहांकडे होणारी गर्दी कमीच होणार आहे. पूर्वी पंचवीस आठवडे चित्रपट चालायचे. आता २५ दिवस नाही, तर एकूण पंचवीश शो झाले तरी पुष्कळ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निर्बंधांची कोणती शिथीलता बाकी आहे, हे समजेनासे झालेले आहे.


खरंतर कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने तिसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आहेत. हे लक्षात घेऊन राज्यांनी लादलेले जादा निर्बंध शिथिल करावेत किंवा ते पूर्ण मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने सर्व राज्यांना केली आहे. यात प्रामुख्याने नागरिकांच्या वावरण्यावरील बंधनांचा विचार आहे. नवी रुग्णसंख्या, सक्रिय रुग्णसंख्या व विषाणू प्रादुर्भावाचा वेग (पॉझिटिव्हिटी रेट) लक्षात घेऊन राज्यांनी लादलेले नवे किंवा जादा निर्बंध सैल करण्याचा किंवा रद्द करण्याचा विचार करावा, असे पत्र केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पाठवले आहे; पण निर्बंध आहेत का, हाच प्रश्न आहे. ज्याप्रकारे निर्बंध नसताना लोक वावरत होते, तसेच फिरताना दिसत आहेत. खरंतर आता कोरोना संपला, तरी प्रत्येकाने कायमस्वरूपी मास्क घालणे गरजेचे आहे. नवनवे रोग येतील जातील. पण त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने कायमच आता मास्क वापरणे आवश्यक आहे. असे असताना निर्बंध शिथिल नाहीत, असे म्हणायचे आणि विनामास्क फिरणारे अनेक जण रस्त्याने दिसतात. लोकल ट्रेनमध्येही अनेक जण अत्यंत बेजबाबदारपणे वावरताना दिसतात. मग कसले निर्बंध हटवायचे हाच प्रश्न पडतो.

कोरोनाच्या साथीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सीमा किंवा विमानतळांवर जादा निर्बंध लादणे काही महिन्यांपूर्वी योग्य होते; पण आता रुग्णवाढीचा आलेख उतरत असल्याने नागरिकांचा वावर व आर्थिक घडामोडींना त्याचा फटका बसता कामा नये, असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे. जानेवारीच्या मध्यास जेवढी रुग्णसंख्या होती किंवा नवे रुग्ण नोंदले जात होते, तेवढा वेग आता राहिलेला नाही हे आकडेवारी वरून दिसत आहे. भूषण यांची सूचना निश्चित योग्य असली, तरी लोकसंख्या आणि जनतेची मानसिकता यांचाही विचार होणे गरजेचे आहे.


ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रसार या वर्षी झपाट्याने झाला. त्यामुळे जगात आणि भारतातही चिंता वाढली. केंद्र व राज्य सरकारांनी अनेक निर्बंध पुन्हा लादले. केंद्राने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे मर्यादित केली. परदेशातून येणाºयांना चाचण्या, विलगीकरण, सक्तीचे झाले. शाळा-महाविद्यालये बंद झाली, सर्व कार्यालयांमध्ये कर्मचाºयांच्या उपस्थितीवर बंधने आली. कारखाने-उद्योग यातील कर्मचारी संख्या रोडावली. याचा फटका अर्थव्यवस्थेला निश्चित बसला. त्याची व्याप्ती कळण्यास एप्रिल उजाडावा लागेल; परंतु ओमिक्रॉन हा अपेक्षेपेक्षा बराच सौम्य असल्याचे नंतर उघड झाले. त्याची लागण झाली, तरी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण खूप कमी होते, तसेच मृत्युदरही कमी आहे. आता बाधितांची संख्या २० हजारांच्या आसपास आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही जानेवारीतील सर्वोच्च संख्येच्या पातळीच्या बरीच खाली आली आहे. देशपातळीवर पॉझिटिव्हिटी दरही २.६१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांनी शाळा-महाविद्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे. महत्त्वाच्या परीक्षाही प्रत्यक्ष म्हणजे ‘आॅफ लाइन’ पद्धतीने होणार आहेत. प्रश्न आहे तो सीमांवरील बंधनांमुळे मालवाहतूक सुरळीत होण्याचा व विमान तसेच रेल्वे, आंतर राज्य बस प्रवासाचा. हे सर्व प्रवास लवकर दोन वर्षांपूर्वीच्या पातळीवर येणे आवश्यक आहे.

खरं म्हणजे आता सरकारने नाही, तर नागरिकांनी आपण होऊन काही निर्बंध मनावर लादले पाहिजेत. सवय लावून घेतली पाहिजे. त्यादृष्टीने नागरिकांनी काळजी घेणे जरूरीचे आहे. गर्दी टाळणे हा विषाणूचा प्रसार टाळण्यातील महत्त्वाचा उपाय आहे; पण धार्मिक सण-कार्यक्रम आले की, नागरिक प्रचंड गर्दी करतात. हे गेल्या वर्षीही दिसले. खरेदीसाठी नागरिक ठराविक बाजारपेठांमध्येच जमतात. त्यामुळे पुन्हा फैलाव होऊ शकतो. बहुधा सर्व देशांनी कोरोना हा विषाणू आपल्याबरोबर कायम राहणार हे गृहीत धरले आहे. निर्बंध रद्द करताना त्याचा विचार करणे व काळजी घेणे अजूनही आवश्यक आहे. पुन्हा निर्बंध लावावे लागू नयेत, अशी स्थिती आता आली पाहिजे.

नेतृत्व कोण करणार?



सध्या देशात नव्या आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. केंद्रातील भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी सर्व स्थानिक, प्रादेशिक विरोधी पक्ष आतूर झाले आहेत. एकीकडून ममता बॅनर्जींनी याविरोधात काही दिवसांपूर्वी हाक दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यासाठी गेल्या काही दिवसांपासून आग्रही आहेत, तर रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे याच उद्देशाने महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षांना भेटले. त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी होणार का याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.

अर्थात या सर्व विरोधी पक्षांचा उद्देश जरी खूप चांगला असला, तरी ते वास्तवात कसे येणार याचा उलगडा होणे कठीण आहे, कारण कोणतीही आघाडी ही नेतृत्वाखाली तयार होत असते. आज या विरोधकांकडे नेतृत्वाचाच अभाव आहे. या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत भाजपला शह देणे तितकेसे सोपे नाही.


अशीच परिस्थिती पूर्वी काँग्रेसची होती. काँग्रेस विरोधात कोणी उभे राहू शकत नव्हते; पण १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. आपले मूळचे झेंडे बाजूला ठेवून जनता पक्षाच्या नांगरधारी शेतकरी या खुणेच्या झेंड्याखाली एक आले, तेव्हा या देशात काँग्रेसला हालवण्याची क्रांती घडली. इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीला शह देता आला.

आज तशी परिस्थिती आहे का?, म्हणजे तशी परिस्थिती निर्माण करत नाही तोपर्यंत हे स्वप्नच पाहणे चुकीचे आहे?, जयप्रकाश नारायण यांच्याप्रमाणे देशव्यापी नेतृत्व कोण आहे? अंधेरे में एक प्रकाश... जयप्रकाश जयप्रकाश... अशी घोषणा दिली तेव्हा त्या अंधारात लख्ख प्रकाश पडणाºया मशाली तयार झाल्या. त्यात जनसंघ होता, समाजवादी पक्ष होते. असे आता सर्वमान्य नेतृत्व या देशात आहे का?


प्रत्येक प्रादेशिक पक्षाला स्वत:ला नेतृत्व करायचे आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संपूर्ण देशभरात त्यांना ओळखले जाते; पण ममता बॅनर्जी यांचे संख्याबळ आणि ताकद त्यांच्यापेक्षा जास्त असल्याने त्या नेतृत्वासाठी आग्रही आहेत. शिवसेनेचीही ताकद राष्ट्रवादीपेक्षा मोठी आहे. त्यामुळे हे नेतृत्व शिवसेनेने करावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे लोकसभेतील संख्याबळ काहीच नाही. तरीही पक्ष म्हणून मोठा असल्याने आणि इतर राज्यांत तो पक्ष पसरलेला असल्याने त्यांनाही नेतृत्वाची इच्छा आहे. त्यात आता तेलंगणामधून के. चंद्रशेखर राव आले आहेत. त्यांचीही महत्त्वाकांक्षा लपलेली नाही. यापैकी कोणीही आपापले झेंडे बाजूला ठेवू शकणार नाही. त्यामुळे या परिस्थितीत सध्या तरी भाजपविरोधात आघाडी करणे कोणालाही शक्य नाही. भाजपविरोधात आघाडी उभी करायची असेल, तर ती काँग्रेसच्या नेतृत्वाखालीलच करावी लागेल, कारण काँग्रेस हा पक्ष संपूर्ण देशभर पसरलेला आहे. लोकसभेतील त्यांचे संख्याबळ अन्य विरोधकांच्या तुलनेने सर्वात जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसला बाजूला ठेवून ही आघाडी शक्य नाही. त्यासाठी फक्त दोनच पर्याय आहेत. काँग्रेसला बरोबर घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी करणे किंवा सर्वांनी आपले झेंडे बाजूला ठेवून नवा पक्ष स्थापन करावा आणि १९७७च्या जनता पक्षाप्रमाणे चमत्कार घडवावा; पण मोदींच्या भाजपच्या भगव्याविरोधात हे हिरवे, नीळे, तांबडे आणि उर्वरित भगवे आपले रंग पुसण्याचे धाडस दाखवणार आहेत का?, मग नवा कोणता रंग बाकी असणार आहे?

रविवारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केसीआर म्हणाले आम्ही पुन्हा एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत. ही चर्चा कशावर असणार आहे? भाजप हटाव हे सर्वांना वाटते, त्यावर एकवाक्यता आहे. पण नेतृत्वाबाबत एकवाक्यता नाही, हेच त्याचे कारण आहे. त्या नेतृत्वावरच चर्चा होणार हे नक्की. सर्वमान्य नेतृत्वाचा चेहरा उभा करणे हे फार मोठे आव्हान असेल. या प्रत्येक चर्चेत काँग्रेसला बाजूला ठेवण्याचे प्रयत्न असतील, तर दुसरीकडे काँग्रेस अधिक प्रबळ होईल, अशी शंका आहे.


केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याचेच संकेत दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हाच मुद्दा अधोरेखित करत एका सुडाचे राजकारण संपले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. यावेळी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटले की, आज एक सुरुवात झाली आहे आणि आम्ही थेट स्पष्टपणे सांगितले. आम्ही इतर नेत्यांशीही खुलेपणाने बोलू. कशाप्रकारे तिसºया आघाडीची सुरुवात होईल, याबाबत आम्ही चर्चा करू. अत्यंत वाईट पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत, यात काही शंकाच नाही. मात्र, केंद्र सरकारला ही नीती बदलावी लागेल, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. याचा अर्थ हा फक्त इशारा आहे. प्रत्यक्षात यातले काही होईलच, असे नाही.

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीनेही असे प्रयत्न केले होते; पण त्यांना भाजपने दिल्लीतच बांधून ठेवले आहे. त्यापुढे त्यांना सरकता येत नाही. दिल्लीच्या थंडीत केजरीवाल मफलरमध्ये इतके पॅकबंद झाले आहेत की, आता त्यांना तिसरी आघाडी हा विषयही आठवत नाही.


ममता बॅनर्जी यांच्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावरून एक नक्की आहे की, महाराष्ट्राच्या नेत्यांशिवाय हा चमत्कार कोणी करू शकरणार नाही. पण महाराष्ट्राचे नेतृत्व मान्य करणे हे बाहेरच्या राज्यांना शक्य होईल का? उत्तरेतील आणि दक्षिणेतील राज्य नेहमीच महाराष्ट्राचा फायदा घेतात; पण लाभ देण्याची वेळ आली की, महाराष्ट्राला डावलतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्राने या आघाडीचे नेतृत्व करण्यावर एकवाक्यता होणार का?

महाराष्ट्राला डावलून कोणालाही हे करता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसला वगळून आघाडी उभी करणे हे सोपे नाही. देशात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोनच मोठे पक्ष आहेत. त्या दोन विचारांना धरूनच बाकी पक्षांना जावे लागेल. काँग्रेसने या आघाडीत आम्ही पंतप्रधानपद आणि नेतृत्वाची अपेक्षा न ठेवता येतो, असे स्वीकारणे शक्य झाले, तर ही आघाडी तयार होईल. पण आज आघाडीचे स्वप्न पाहण्याचे काम जे पक्ष बघत आहेत त्यांची त्यांच्या राज्यातच ताकद इतकी कमी आहे की, संपूर्ण देशव्यापी नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे कोणीच देणार नाही. त्यामुळे जोपर्यंत नेतृत्वाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हे दिवास्वप्नच राहील.


प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स\

अन्नू कपूर


कपूर आडनाव आले की, तो चित्रपटाचा हिरो असणार हे स्पष्ट असतं; पण काही कपूर असेही आहेत की जे नायक बनले नाहीत; पण त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यापैकी एक अभिनेता, निवेदक, संगीताचा अभ्यासक कलाकार म्हणजे अन्नू कपूर. आज त्याचा जन्मदिवस आहे. अन्नू कपूर हा गायक किंवा संगीत क्षेत्राची प्रचंड माहिती असलेला एक कलाकार आहे, याची माहिती संपूर्ण देशाला झी टीव्हीमुळे झाली. १९९३ ते २००६ या काळातील झी टीव्ही वाहिनीवरील अंताक्षरी या कार्यक्रमामुळे त्याला ख्याती प्राप्त झाली. तोपर्यंत तो छोट्या-छोट्या भूमिका करणारा एक विनोदी अभिनेता म्हणूनच ओळखला जात होता.


अन्नू कपूरची खरी ओळख प्रेक्षकांना झाली, ती दूरदर्शनवर आलेल्या कबीर या मालिकेमुळे. यातील कबीरांचा रोल त्यांनी चांगल्याप्रकारे केला होता. त्यामुळे एक चांगला कलाकार म्हणून त्यांची ओळख झाली; पण अंताक्षरीने त्याला ओळख दिली. त्यानंतर काही म्युझिक चॅनेलवर विविध प्रकारचे माहिती देणारे कार्यक्रम सादर करून त्यांनी या क्षेत्रातील आपली मास्टरी दाखवून दिली. काही दिवसांपूर्वी झी मराठीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स-२च्या अंतिम फेरीला ते आले होते. त्यावेळी बराच थकलेले असे ते दिसले; पण त्यांचा उत्साह मात्र अजून कायम आहे.

अन्नू कपूर यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळमधील इटवारा येथे २० फेब्रुवारी, १९५६ रोजी झाला. त्यांची आई कमल बंगाली आहे आणि वडील मदनलाल हे पंजाबी आहेत. त्यांच्या वडिलांची शहर आणि गावात काम करणारी एक पारशी नाट्य कंपनी होती. त्यांची आई कवी आणि प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होती. त्यांचे आजोबा डॉ. कृपा राम कपूर ब्रिटिश सैन्यात डॉक्टर होते आणि त्यांचे पंजोबा लला गंगा राम कपूर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक होते.


कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शिक्षणानंतर त्यांना शाळा सोडावी लागली. ४० रुपये पगारासह त्यांची आई एक शिक्षक म्हणून काम करीत होती. वडिलांच्या आग्रहाने ते आपल्या थिएटर कंपनीत रुजू झाले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे आधीचे विद्यार्थी असलेले त्यांच्या भावाने (रणजित कपूर) यांनी आग्रह धरल्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये प्रवेश घेतला. १९८१ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील पदवीनंतर त्यांनी मुंबईमधील ‘एक रुका हुआ फैसला’ या नाटकात ७० वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना कौतुकाचे पत्र पाठवले आणि १९८३च्या मंडी या चित्रपटासाठी त्यांना साइन केले.

त्यानंतर १९८६ मध्ये बासु चटर्जी यांनी एक रुका हुआ फैसला चित्रपटाचे दिग्दर्शन केले व अन्नू कपूर त्याचा भाग झाले. १९८४च्या उत्सव या चित्रपटासाठी त्यांना विनोदी भूमिका श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. १९९३ मध्ये त्यांनी सरदार चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका केली होती. हा हिंदी चित्रपट सरदार पटेल यांच्या चरित्रावर आधारित असून, मुख्य भूमिका परेश रावल यांनी केली होती. १९९६ मध्ये त्यांनी कालापानी या मल्याळम भाषेतील चित्रपटात विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारली.


तेजाब चित्रपटामध्ये त्यांनी केलेली भूमिकाही लक्षात राहणारी होती. त्याशिवाय मिस्टर इंडियातील त्यांची पोलीस हवालदाराची भूमिका लक्षवेधी होती. यातील केळी खाण्याचा प्रसंग त्यांनी लाजवाब केला होता; पण चित्रपट क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली असली, तरी जुन्या काळातील चित्रपटाचा इतिहास आणि जुन्या गाण्यांवर भाष्य करत कार्यक्रम करण्याची शैली त्यांनी निर्माण केली आणि वाढत्या वाहिन्यांच्या काळात म्युझिक चॅनेलचा ते हिरो बनले. नावात कपूर असेल, तर तो कोणत्याही मार्गाने हिरो बनतो, हे त्यांनी वाहिन्यांच्या जमान्यात करून दाखवले. त्यामुळे जुन्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते अधिक प्रिय आहेत. याचे कारण म्युझिक चॅनेलवर एखादे गाणे, चित्रपट, कलाकार यांची माहिती सांगताना ते ज्या प्रकारे जुन्या जमान्यात घेऊन जायचे, ते पाहता सगळे म्हातारे अगदी आपल्या तरुणपणात येतात. त्यामुळे त्यांचा हा आवडता कार्यक्रम होतो.

अन्नू कपूर निवेदन करताना ज्याप्रकारे भावूक होतात, तेही अनेकांना आवडते. अगदी अंताक्षरीच्या कित्येक कार्यक्रमांत एखादे गाणे गाताना, निवेदन करताना डोळ्यातून पाणी काढण्याचे कसब त्यांनी केले होते. अनेकांच्या जन्मदिवसाला विविध वाहिन्यांवर त्यांनी कार्यक्रम केले आहेत, म्हणूनच या अभिनेत्याचा वाढदिवसही प्रेक्षकांनी लक्षात ठेवला पाहिजे. सत्तरीकडे झुकलेला हा कलाकार सुरुवातीपासूनच पोक्त भूमिका करत राहिला. त्यांचा चेहरा आणि ठेवणच अशी आहे की, ते तरुण म्हणून कोणी त्यांना स्वीकारले नाही; पण लहान वयातच मोठ्या वयाच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्याने हा पोक्तपणा त्यांची ओळख बनत गेली असावी; पण एक गुणी अभिनेता म्हणूनच त्यांचा कायम उल्लेख करावा लागेल.

विश्वास ठेवणे अवघड


अहमदाबाद येथे २००८मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ दोषींना विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची, तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या बॉम्बस्फोटांत ५६ जणांचा बळी गेला होता आणि २०० नागरिक जखमी झाले होते. जन्मठेपवाल्यांचे काही नाही; पण ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे त्यांना ती खरोखरच होणार का, हा खरा प्रश्न आहे. आपल्याकडे फाशीची शिक्षा म्हटल्यावर लगेच अनेकांना उमाळे फुटतात. मानवी हक्क वगैरे सुचते. त्यातून कोणी तरी याचिका दाखल करतो. त्यामुळे त्या सुनावलेल्या फाशीला दिरंगाई होत जाते. सर्व न्यायालयांनी फाशी कायम केल्यावरही ती राष्ट्रपतींकडे जाईपर्यंत अनेक वर्षे जातात. त्यात त्या गुन्हेगाराचा आजारपणात मृत्यू तरी होतो किंवा ती फाशी रद्द होते. असे प्रकार घडत असल्याने या शिक्षेचे गांभीर्य राहत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने फाशीचे गुन्हेगार असल्यामुळे त्यांना खरोखरच फाशी दिली जाईल यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.


मागच्या आठवड्यात हिंगणघाट प्रकरणातील आरोपीलाही फाशीची शिक्षा होईल, असे अपेक्षित होते. पण ती जन्मठेप झाली. त्या अगोदर महाराष्ट्रात वीस वर्षांपूर्वी सुनावलेली फाशीची शिक्षा वेळेत दिली नाही, म्हणून दोन राक्षशिणींना जन्मठेपेचे वरदान मिळाले; पण दया कोणाला दाखवायची?, कोणासाठी उमाळा आला पाहिजे? याचाही विचार होणे गरजेचे आहे. ज्या नराधमांनी एवढे मोठे हत्याकांड घडवले त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी होता कामा नये. लवकरात लवकर फाशी दिली गेली पाहिजे. आधीच या प्रकरणाचा निकाल जवळपास १४ वर्षांनी लागला आहे. आता यावर अपील होणार, वेगवेगळ्या न्यायालयांत जाऊन पुन्हा सर्वोच्च न्यायालयात ती शिक्षा कायम होऊन, पुन्हा दयेचा अर्ज यामध्ये किती कालावधी जातो. त्या घटनेचे गांभीर्य संपून जाते. शिक्षेची दाहकता संपून जाते. सुनावलेली शिक्षा ही तातडीने दिली तरच त्याला अर्थ असतो.

अहमदाबादच्या या स्फोट प्रकरणात न्यायालयाने ७००० पानांच्या या निकालपत्रात बॉम्बस्फोटांच्या मालिकेला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे नमूद करीत ३८ दोषींना मृत्यूपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आणि अन्य ११ दोषींना जन्मठेप सुनावली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निकाल लवकरात लवकर सर्व न्यायालयांत कायम होऊन त्या गुन्हेगारांना फाशी होणे गरजेचे आहे. हे पाकिस्तानातून प्रेरित झालेले असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जरब बसण्यासाठी त्यावर तातडीने कृती होणे आवश्यक आहे, तरच त्या शिक्षेला अर्थ राहील.


या ३८ जणांना भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) आणि १२० बी (गुन्हेगारी कट) आणि बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींनुसार दोषी ठरवण्यात आले. अन्य ११ जणांना गुन्हेगारी कट रचल्याबद्दल आणि यूएपीएच्या विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले. या बॉम्बस्फोटांमागे इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया (सिमी) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित कट्टरपंथी गट इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी होते. गोध्रा प्रकरणानंतर २००२मध्ये झालेल्या दंगलीचा सूड घेण्यासाठी त्यांनी बॉम्बस्फोटांचा कट रचला होता. इतक्या भयंकर गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत जास्त काळ ठेवणे योग्य नाही. त्यांची फाशी रद्द करा, अशा कोणीही याचिका दाखल केल्या, तर त्या फेटाळल्या गेल्या पाहिजेत. तरच यातून न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर राखला, असे म्हणता येईल.

विशेष म्हणजे हा निकाल देताना न्यायालयाने ४८ दोषींना दोन लाख ८५ हजार रुपयांचा, तर अन्य एका दोषीला दोन लाख ८८ हजार रुपयांचा दंड ठोठावला, तसेच बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांच्या नातलगांना एक लाख, गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एक प्रकारे परिपूर्ण निकाल दिलेला आहे. त्याची कदर अंमलबजावणीतून झाली पाहिजे.


या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये बॉम्बस्फोटाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार सफदर नागोरी आणि कमरुद्दीन नागोरी (दोघेही मध्य प्रदेश) तसेच कयुमुद्दीन कपाडिया, जाहीद शेख आणि शमसुद्दीन शेख या गुजरातमधील दोषींचा समावेश आहे. सफदर नागोरी, जाहीद शेख यांच्यावर स्फोटके मिळवण्यासाठी पैसे जमा करण्याचा आणि बंदी घातलेल्या सिमी या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून बेकायदा कृत्य केल्याचा आरोप होता. त्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले. कपाडिया याला बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाइल सिम कार्ड खरेदी केल्याच्या आणि हॉटेलमध्ये खोटी ओळख दाखवून वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. या खटल्यातील सर्व आरोपी अहमदाबादेतील साबरमती मध्यवर्ती कारागृहासह दिल्लीतील तिहार, भोपाळ, गया, बंगळुरू, केरळ आणि मुंबई या आठ तुरुंगांमध्ये आहेत. तेथून ते दूरसंवाद माध्यमांद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते. न्यायालयाने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील ७७ आरोपींविरुद्धच्या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती. खटल्यातील ७८ आरोपींपैकी एक आरोपी माफीचा साक्षीदार झाला होता. एवढी मोठी तपास प्रक्रिया, न्यायप्रक्रिया पार पडून १४ वर्षांनी शिक्षा सुनावली गेली आहे. त्यामुळे पुढे जास्त वेळ न जाता तातडीने हालचाली होणे अपेक्षित आहे.

शिवरायांचा आठवावा प्रताप


शिवरायांचे आठवावे रूप।


शिवरायांचा आठवावा प्रताप।

शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी॥


समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांचे केलेले वर्णन अत्यंत यथार्थ असेच आहे. छत्रपतींचा पराक्रम, काम करण्याची पद्धती आपण समजून घेतली, तर आपल्याला यश कधीच हुलकावणी देणार नाही. इतका आदर्श राजा या जगापुढे आहे. महाराज फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत, तर ते संपूर्ण देशाला, जगाला आदर्शवत आणि आराध्य असे आहेत. त्यांना आपण संपूर्ण जगाचे मार्गदर्शक म्हणू शकतो. शिवरायांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. हिंदवी राज्याची त्यांनी स्थापना केली होती आणि संपूर्ण जगाला ते मार्गदर्शक बनले होते. त्याचे दाखले आपल्याला इतिहास देतो. त्यामुळे केवळ इतिहासात त्यांना कोंडून ठेवता कामा नये. ते नित्य आपल्यासमवेत मार्गदर्शक आहेत, फक्त त्यांचा अभ्यास करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, मग यश आपल्यापासून दूर नाहीच. शिवरायांचे चरित्र म्हणजे एक प्रकारचा धर्मसिंधू आहे. कोणतेही धर्मसंकट आले की, आपल्याला उपाय शोधण्यासाठी धर्मसिंधू हा ग्रंथ निर्णय घेण्यास मदत करतो. छत्रपतींचे कार्य तसेच आहे. अशा संकटात शिवरायांनी काय केले असते? काय केले असेल? याचा विचार केला तर आपले कोणतेही संकट दूर होईल इतकी ताकद त्या शिवचरित्राची आहे.

आजकाल छत्रपती शिवरायांना मॅनेजमेंट गुरू म्हणून जगात गौरविले जाते. पाश्चिमात्य देश त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत आहेत. ही गोष्ट आम्हास अभिमानाची आहे. कारण ते जगाचे आराध्य दैवत आहेत. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आज आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगतो, त्याला शिवरायांच्या आदर्शाची पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राचे हे राजे किती पुरोगामी होते, अनिष्ट प्रथा बंद करणारे होते ते त्यांच्या कार्यावरून दिसून येते. आपल्याकडे इतिहासात सतीची प्रथा १९०५ साली राजा राममोहन रॉय यांच्या पुढाकाराने ब्रिटिशांनी बंद केली असे सांगितले जाते, पण त्यापूर्वीच दोनशे वर्षांअगोदर हा मुद्दा महाराजांनी मांडला होता. शहाजीराजांच्या निधनानंतर आईसाहेब जिजाऊ सती जाण्यास निघाल्या होत्या. त्यांना त्यापासून रोखण्याचे काम महाराजांनी केले, ही त्या काळातील फार मोठी सुधारणा होती. या त्यांच्या कार्याचा अभ्यास करून महाराज कसे दूरदृष्टीचे होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या लढाया, शत्रूचा केलेला वध, छाटलेली बोटे, आग्य्राहून सुटका या पलीकडे इतिहास अभ्यासून त्यांच्या कार्यपद्धती, कौशल्य, व्यवस्थापन याचा अभ्यास करायची वेळ आहे. म्हणून प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवले पाहिजे की, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आज दहशतवादाचा फार मोठा मुद्दा केवळ आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला भेडसावत असताना छत्रपतींच्या नीती नियमांनीच आपल्याला त्यावर विजय मिळवता येईल याचा विचार सरकारने करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले होते. हे संघटन कौशल्य कोणत्याही संघटनेने, पक्षाने किंवा टीमवर्कने ज्यांना काम करायचे आहे त्यांनी लक्षात घेतले, तर त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही महाराजांनी उभारले. हे संरक्षणासाठी फार महत्त्वाचे आहे. सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी घेऊन केलेले ते काम होते. राज्य कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले होते. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिएतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून छोट्याशा व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलाढ्य सैन्याला जेरीस आणले होते, हा अलीकडचा इतिहास आहे. व्हिएतनामसारखे अनेक देश महाराजांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करून यशस्वी होतात हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे.


आम्हाला कोणत्याही संरक्षणासाठी, दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिकेसारख्या महासत्तेच्या परवानगीची, मार्गदर्शनाची गरज वाटते, पण जर महाराजांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला तर दहशतवाद आम्ही केव्हाच संपवू शकतो हे लक्षात येईल. महाराजांनी काही कोणत्या देशाविरोधात, धर्माविरोधात युद्ध केले नव्हते, तर ते जुलूमशाही, अत्याचार आणि दहशतवादाविरोधात केले होते हे लक्षात घेतले पाहिजे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राज्य कारभार यांसंबंधी प्राथमिक मार्गदर्शन महाराजांना शहाजीराजांकडून मिळाले होते. परकीय सत्तेविरुद्ध लढा करण्याकरिता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण आई जिजाबार्इंकडून मिळाले होते. जिजाऊंनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण दिले. शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वत:ची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते, याचा अर्थ, ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साºया विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. अक्षरश: हे खरे ठरले आहे. महाराजांचा नावलौकिक वाढलाच आहे, पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ राजमुद्राच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंद्य झाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या कारभाराचे, त्यांच्या कर्तबगारीचा गौरव करणारे अनेक लेखक हे परकीय आहेत. काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे. इंग्रजी फॅक्टरी रेकॉडर््समध्ये म्हटले आहे की, शिवाजीराजे स्त्रियांना अभय देतात हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेश घालून पळून जात. शिवाजी महाराजांच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेंच, पोतुर्गीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या अलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. त्यावरून निघालेल्या निष्कर्षावरून ते सांगतात की, या बाकीच्या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते, मात्र शिवाजी महाराज हे सर्व गुण संपन्न होते. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

युगपुरुष

19 feb

वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, महिलांचा अवमान, न्यायास होणारा विलंब, भ्रष्टाचार, प्रशासकीय अधिकाºयांचा गहाळ आणि गलथानपणा पाहिला, तर पुन:पुन्हा वाटते की, ही विस्कटलेली घडी बसवण्यासाठी राजे पुन्हा तुम्हाला जन्माला यावे लागेल. आज शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशाने त्यांच्यापासून प्रेरणा घेतली, तर महिलांबद्दल वाकडे बोलण्याची, त्यांच्याकडे वाईट दृष्टीने बघण्याची कोणाची हिमत होणार नाही. मुली, आया-बहिणी उजळ माथ्याने फिरू शकतील, असे राज्य फक्त छत्रपतींचा विचार, छत्रपतींची धोरणेच करू शकतात. आज त्यांची या देशाला गरज आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते.


छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर ज्याच्या अंगावर रोमांच आले नाहीत, असा माणूसच शोधून सापडणार नाही. नुसती नावाची गर्जना केली, तरी एक प्रकारची ऊर्जा येते. त्या प्रत्यक्ष महाराजांचा इतिहास वाचला, तर किती तरी आनंद, ऊर्जा आणि अभिमान मिळाल्याशिवाय राहत नाही. आज जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रूपांतर होऊन हिंदूपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले. भारतातील सर्वात शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते.

छत्रपती शिवरायांचा महत्त्वाचा गुण म्हणजे कमालीचा साधेपणा होय. सैन्याबरोबर राहून त्यांनी सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगांना आनंदाने तोंड दिले. आज आपण जेव्हा अडचणींना, समस्यांना सामोरे जातो आणि आता काय करावे, हे सुचत नाही तेव्हा छत्रपतींचे स्मरण केले, तरी बरेच काही सुचू शकते. इतकी ताकद त्या व्यक्तिमत्वात आहे. संपूर्ण जगातील सेना नायकांच्या क्रमांकात शिवाजी महाराजांचे स्थान पहिल्या क्रमांकावरच आहे. १६४५-१६८० या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत सामर्थ्यशाली मोगलांचा किंवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किंवा मुस्लीम सेनानायक नव्हता की, ज्याचा महाराजांनी पराभव केला नाही. शहाजादे, इराणी व पठाण सरदार, तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायांपुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजल खानाशी केलेले युद्ध, शाहिस्ते खानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही, तर औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व गोष्टी त्यांच्यातील गुणांची प्रचीती देतात. कोणत्या वेळी नेमका काय निर्णय घेतला पाहिजे हे त्यांच्या रणनीती, युद्धनीती आणि राजकारणावरून समजून येते.


सामान्य माणसांसाठी जगणारा राजा अशी त्यांची ख्याती होती, म्हणून प्रत्येकाच्या मनात कैक शतकांनीही त्यांच्या मनात घर केलेले आहे. छत्रपती शिवरायांनी समानतेचे तत्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जाती-धर्मांच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य महाराजांनी निर्माण केले. शेकडो सेना धुरंधरांना शिवरायांनी प्रशिक्षित केल्यामुळे राजांच्यानंतरही निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मराठ्यांचे स्वातंत्र्य या लोकांनी जगाच्या पाठीवरील सर्व बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून सुरक्षित ठेवले.

शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असत. शहाजी राजांची सुटका, मोºयांचे उच्चाटन, अफजल खानाचा पराभव, स्वत:ची पन्हाळ्याहून सुटका, विशालगडावरचा चकवा, सुरतेची लूट, आग्य्राहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते.


केवळ पराकोटीचे मनोबल, धाडस आणि शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या या पराक्रमांतून दिसून येते. कुठेही आततायीपणा नाही, तर शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची त्यांची हातोटी ही त्यांच्या यशाचे रहस्य होते. अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय-धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते.

महाराजांच्या या कार्यांमुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपात पाहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाºया अधिकाºयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता, तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाºया व आचरणाºया महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.


समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारा राज्यकर्ता निर्माण करण्यासाठी छत्रपतींचा अभ्यास करणे हाच त्यावरचा उपाय आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपतींचा इतिहास समजावून घेतला पाहिजे. त्यांचा विचार रक्तात रुजला, तरच कायद्याचे, सामाजिक न्यायाचे, समतेचे राज्य निर्माण होईल. त्यालाच आपण शिवशाही म्हणू शकू.

एकाकी पडलेल्या नलिनी जयवंत


आपल्या ऐन उमेदीच्या काळात चांगले यशस्वी झालेले, पण काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी अज्ञातवासात गेलेले अनेक शापीत कलाकार या इंडस्ट्रीने पाहिले आहेत. हे कलाकार कधी काळाच्या पडद्याआड गेले हे पण कालांतराने कळावे इतकी शोकांतिका त्यांच्या बाबतीत घडलेली दिसते. अशाच शापीत कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री नलिनी जयवंत. आज १८ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस. मुंबईस्थित असलेल्या या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या, हे नव्या पिढीला आज सांगावे लागेल. म्हणजे बॉलीवूडच्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५०च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले आणि आपली ओळख निर्माण केली होती.


नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. त्यांना त्यांच्या नात्यातूनच हा कलेचा वारसा लाभला होता. म्हणजे अगदी बादरायण संबंध जोडायचा नाही तर या सृष्टीत कलाकारांमध्ये परस्परांशी नातेसंबंध खूप असतात. तसेच नलिनी जयवंत यांच्याबाबतीतही होते. ते म्हणजे मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन बाई या नलिनी जयवंत यांच्या आत्या होत्या. आता रतनबाई कोण तर रतन बाईची मुलगी अभिनेत्री शोभना समर्थ होत्या. शोभना समर्थच्या मुली नूतन आणि तनुजा या आहेत. नव्या पिढीच्या माहितीसाठी नूतनचा मुलगा मोहनीश बहेल तर तनुजाची कन्या काजोल. अशा या कलाकारांच्या मागच्या पिढीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नलिनी जयवंत होत्या. कृष्ण-धवल चित्रपटाच्या काळात त्यांनी आपली कारकीर्द गाजवली असली, तर उत्तरार्धात त्यांनी १९८३ मध्ये त्यांनी नास्तिक या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. विशेष म्हणजे नास्तिक या नावाचे दोन चित्रपट बनले त्या दोन्हीतही त्या होत्या हे विशेष. एका चित्रपटात जो १९५४ ला बनला होता त्यात त्या नायिका होत्या, तर १९८३च्या चित्रपटात त्या चरित्र अभिनेत्री होत्या. अर्थात तेव्हा पासून नलिनी मुख्यत: एकाकी जीवन जगत होत्या.

नलिनी जयवंत यांचा विवाह १९४५ मध्ये दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झाला होता, मात्र जेमतेम तीन वर्षांच्या कौटुंबिक सहवासानंतर त्यांचा १९४८ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर जवळपास १२ वर्षे त्या एकट्या होत्या. पण चित्रपट क्षेत्रात काम करत असल्याने त्या व्यस्त होत्या, मात्र नंतरच्या काळात नव्यानव्या नायिका आल्या आणि त्यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये अभिनेते प्रभू दयाल यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्याकाळी बºयाच चित्रपटांमध्ये काम केले होते.


नलिनी जयवंत यांचे २२ डिसेंबर, २०१० रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी, युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथे निधन झाले. या ठिकाणी त्यांचे वास्तव्य जवळपास ६० वर्षे होते, पण एवढी गाजलेली आणि एक जमाना गाजवलेली अभिनेत्री मृत्यू पावल्याचे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. नलिनी जयवंत यांच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर रुग्णवाहिकेने त्यांचा मृतदेह घेऊन जाईपर्यंत तिचा मृत्यू कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यावेळी नलिनी जयवंतच्या शेजाºयांनी सांगितले की, तिने स्वत:ला समाजापासून वेगळे केले होते. त्यांचा जीवनसाथी त्यांच्याअगोदर दहा वर्षे म्हणजे २००१ मध्ये हे जग सोडून गेला होता. त्यामुळे दयालच्या मृत्यूनंतर ती लोकांना भेटत नव्हती. तिचे नातेवाईकदेखील तिच्याशी बराच काळ संपर्कात नव्हते. त्यामुळे या अभिनेत्रीची अखेरही एकाकी अशीच झाली, पण आपण केलेल्या कामामुळे त्यांच्यावर चित्रित झालेल्या काही लोकप्रिय जुन्या गाण्यांमुळे त्या आजही स्मरणात राहतील अशा नोंदी आहेत.

तो काळ हिंदी चित्रपट सृष्टीतील सुमधुर गाण्यांचा असल्याने नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित केलेली काही प्रसिद्ध गाणी आजही अनेकांना आठवतात. कधीतरी म्युझिक चॅनलवर अशी गाणी पाहायला मिळतात. यामध्ये ठंडी हवाएं लहरा के आएं...(नौजवान); नजर लगी राजा तोहरे बंगले पे...(काला पानी); तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार...(नास्तिक); हाए जिया रोए...(मिलन); गिन गिन तारे मैं हार गई रात को...(जादू); हाय जिया रोये पिया नही आए...(मिलन); जिन्दगी भर गम जुदाई का...(मिस बॉम्बे); बुझ गए आशा के दिए बदले रंग जहां के...(शिकस्त); ओ जाने वाले राही इक पल रुक जाना...(राही); कहां ले चले हो बता दो मुसाफिर...(दुर्गेश नन्दिनी); ओ माटी के पुतले इतना ना कर गुमान...(शेरू); जीवन के सफर में राही, मिलते हैं बिछड़ जाने को...(मुनीम जी) ही गाणी आजही अनेकांच्या तोंडावर आहेत.


देवानंदच्या नवकेतन फिल्मची निर्मिती असलेल्या काला पानी यात देव आनंद, मधुबाला आणि नलिनी जयवंत हे प्रमुख कलाकार होते. लॉकडाऊनच्या काळात क्लासिक चॅनलवर हा चित्रपट अनेकवेळा दाखवला जात होता. यात आपल्या वडिलांचे निदोषत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या देव आनंदला अखेरच्या क्षणी पुरावा मिळवून देणारी सहनायिका किशोरीची भूमिका नलिनी जयवंत यांनी केली होती. त्यांचे असे अनेक गाजलेले चित्रपट आहेत की ते त्यांच्या आठवणी जागृत ठेवतील.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन


9152448055\\

अत्यंत वेदनादायी

 


एसटीच्या संपाला शंभर दिवस पूर्ण झाले. राज्यातील महत्त्वाच्या मार्गांवरील आणि फायद्याचे मार्ग असलेली एसटी बंद आहे. सर्वसामान्यांचे सुरुवातीला नुकसान झाले, पण लोकांनी संकटावर मात करण्यासाठी पर्याय निवडले. खासगी वाहनांचा सुळसुळाट झाला आणि आता या संपाचा सर्वांना विसरही पडला. ज्याप्रमाणे गिरणी कामागारांचा संप घडवून त्यांना देशोधडीला लावले, तसेच अगदी एसटीच्या बाबतीत झाले. एक महामंडळ कोलमडून पडताना दिसत आहे. मुठभर लोकांचा त्यात फायदा होत आहे. पण राजकीय पक्ष किंवा सरकार आता त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांनी सुरुवातीला बाजू लावून धरली, पण आता त्या बातमीतला इंटरेस्ट संपल्यावर आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. हे अत्यंत वेदनादायी आहे.


राज्यातील अत्यंत महत्त्वाचे, जिव्हाळ्याचे, सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न बाजूला सोडून सर्व पक्षांचे नेते एकमेकांवर आरोपांची राळ उडविण्यात इतके मग्न झाले आहेत की, सामान्य माणसांची होत असलेली होरपळ त्यांच्या खिजगणतीतही नाही. त्यातलाच प्रकार म्हणजे एसटी संपाचा पडलेला विसर. एसटी कामगारांनी शंभर दिवस संप केला असला, तरी त्यावर तोडगा किंवा निर्णय होताना दिसत नाही. दुसरीकडे कोरोनामुळे सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना प्रत्येकाला नव्या रोजगाराच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे. महागाईवर बोलले पाहिजे. सर्वांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पण याकडे सगळ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. एकमेकांवर फक्त चिखलफेक करायची. याने त्याच्यावर त्याने याच्यावर. सकाळी उठले की, कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा नेता पत्रकार परिषद घेतो आणि कुणावर तरी आरोप करतो. तो जातो न जातो तोच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याचा विरोधक माध्यमांपुढे येतो. सामान्य माणूस याला कंटाळला आहे. जनतेने तुम्हाला तोडगा काढण्यासाठी निवडून दिले आहे. उपाययोजना करण्यासाठी निवडून दिलेले आहे. या साºयाचा विसर पडलेला दिसतो आहे.

जनतेपुढे येऊन, माध्यमांपुढे येऊन एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप कसले करता? भ्रष्टाचार शोधून काढणाºया तपास यंत्रणा आपल्याकडे आहेत ना? त्यांना द्या पुरावे. ते करतील तपास पूर्ण. फक्त जनतेला भडकवण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी चालवलेले हे धंदे सगळ्याच पक्षांनी थांबवले पाहिजेत. जनतेला हे अभिप्रेत नाही. जनतेच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार असेल, तर ते जनतेला पाहिजे आहे. एसटीच्या संपावर तोडगा निघाला पाहिजे. तो संप मिटवला पाहिजे. सामान्यांसाठी एसटी सुरू झाली पाहिजे. एसटीचे हे वैभव कोण रसातळाला नेत आहे त्याला समोर आणले पाहिजे. हे राहिले बाजूला आणि एकमेकांवर चिखलफेकीचे जे राजकारण चालवले आहे त्याने सामान्य माणूस जाम वैतागला आहे. केवळ प्रसारमाध्यमांना दिवसभर चालवण्यासाठी बातमी मिळते म्हणून काहीही बोलायचे आणि स्टंटबाजी करायची. हे प्रकार असह्य होताना दिसत आहेत. सामान्य माणसांच्या नजरेतून हे नेते आणि पक्ष उतरत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता सावरले पाहिजे. चिखलफेक थांबवली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्यात हे जे घाणेरडे राजकारण चालले आहे ते तातडीने थांबले नाही, तर जनता नवा पर्याय शोधेल आणि या सर्वांना बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही.


कोरोनामधून आपण कुठेतरी सध्या बाहेर पडत आहोत. छोटा व्यावसायिक पुन्हा उभा राहण्यासाठी आधार शोधत आहे. खेड्यापाड्यांतील विद्यार्थी कोरोनामध्ये झालेले नुकसान कसे भरून येणार याच्या काळजीत आहे. पण कोणत्याच राजकीय पक्षांनी त्याची फिकीर करायची नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सर्वसामान्य जनतेचे काय व्हायचे ते होवो; पण आम्ही एकमेकांचे तथाकथित हिशेब करणारच, अशा चढाओढीतून हे सर्व एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत तुटून पडत आहेत. हाच आपला महाराष्ट्र आहे का? आता म्हणा कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. तुमच्याकडे आहेत पुरावे, कागदपत्रे तर संबंधित विभागांकडे तक्रार करा आणि तपास करायला लावा. जनतेला का त्याचा त्रास देत आहात? हे दररोज पाहायचा प्रेक्षकांना कंटाळा आलेला आहे. याला राजकारण म्हणता येणार नाही किंवा अशी चिखलफेक करून दुसºयाला बदनाम करून आपला सत्तेचा मार्ग सोपा होईल असे कोणी समजू नये. सत्तेचा मार्ग हा विकासकामातूनच जातो. जनता हिशोब केल्याशिवाय राहणार नाही याचा विचार करून राजकीय पक्षांनी जनहितांच्या प्रश्नांवर बोलले पाहिजे. तातडीने ही चिखलफेक थांबवली पाहिजे.

जनहिताचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही काही निवडणूक नाही किंवा प्रचाराची वेळ नाही. जनतेसमोर येऊन एकमेकांचे बुरखे फाडायला या काही प्रचारसभा नाहीत. आरोप, प्रत्यारोप करायला आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. येत्या काही दिवसांत राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या मुदती संपलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष हे उद्योग करत आहेत का? अर्थात निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप समजून घेण्यासारखे असतात. ते आरोपदेखील एकमेकांच्या पक्षाच्या धोरणांबाबत व चुकीच्या अंमलबजावणीबाबत असावेत, असे महाराष्ट्रातील आधीच्या पिढीतील नेत्यांनी सांगून ठेवले होते. पूर्वीच्या दोन पिढ्यांनी ते सांभाळत केलेले राजकारण त्यांनी बघितले होते. आता मात्र चोवीस तास निवडणूक असल्याचेच वातावरण तयार झाले आहे. महापालिकांच्या निवडणुका वेळेवर होणार की नाही, याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्याची तयारी म्हणून, एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगण्याचे धोरण अवलंबले जात असेल, तर जनता या प्रकारच्या प्रचाराला बळी पडणार नाही. सर्व पक्षांनी चिखलफेक थांबवून जनतेच्या हिताकडे पाहिले पाहिजे.