शुक्रवार, १ जून, २०१८

विकासकांचा साईड बिझनेस ‘पी जी’ व्यवसाय

मुंबईत चरितार्थासाठी, नोकरी धंद्यासाठी म्हणून येणारांचा ओघ सतत असतो. परंतु मुंबईत यायला काही कोणाची हरकत नसते पण प्रश्न असतो तो मुंबईत राहायचे कुठे याचा. मुंबईत असंख्य टॉवर, इमारती, बिल्डीग, चाळी तयार होत असतात. यात अधिकृत अनधिकृत बांधकामेही खूप असतात. त्यामुळे अशा ठिकाणी नेमके कुठे रहायचे असा प्रश्न बाहेरुन आलेल्यांना पडत असतो. अशांसाठी विकासकांनीच आपल्या एजंटमार्फत सुरु केलेला आणि गेल्या ५ वर्षात जोरात विकसीत झालेला व्यवसाय म्हणजे पीजी अर्थाप पेइंग गेस्ट व्यवसाय.कोसळलेली अर्थव्यवस्था, विकासकांच्या पडून राहिलेल्या सदनिका यामुळे एक मोठी अर्थव्यवस्था ब्लॉक झालेली आहे. एका टॉवरमध्ये चाळीस सदनिका असतील आणि त्यातील ३० सदनिका विकल्या गेल्या आणि दहा सदनिका शिल्लक राहिल्या असतील तर त्या दहा सदनिकांचे पैसे अडकून पडतात. विकासकाचा पैसा ब्लॉक होतो. त्यामुळे नवा प्रोजेक्ट अडकून पडतो. ही अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी रोटेशनला पैसा मोकळा होणे गरजेचे असते. त्यासाठी बहुतेक विकासकांनी आता पीजी अर्थात पेइंग गेस्ट ठेवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.मुंबईतील पश्चिम उपनगरातून विरार ते चर्नीरोड आणि मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण ते दादर तसेच हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान शेकडो विकासकांनी आपल्या टॉवरमधील अनेक सदनिका या पीजी व्यवसायासाठी दिलेल्या आहेत. यामध्ये दराप्रमाणे जास्तीत जास्त सुविधा देऊन कमी जागेत चांगले उत्पन््न मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे सेकंड होमप्रमाणे पीजी व्यवसायासाठी सदनिका खरेदी करण्याचाही कल वाढलेला आहे. विकासक सेकंड होमप्रमाणे पीजी बिझनेससाठी सदनिका उपलब्ध करून देऊन आपला पैसा मोकळा करताना दिसत आहेत.पीजी मध्ये रहायला येणाºया लोकांकडून एक महिना भाडे, एक महिना डिपॉझीट अशी रक्कम घेतली जाते. शिवाय एक महिन्याचे भाडे ब्रोकरेज म्हणून घेतले जाते. ते एजंटला जाते. पण विकासकाला किंवा सदनिका मालकाला दोन महिन्याचे भाडे मिळते. एका फ्लॅटमध्ये कमीतकमी ६ ते प्लॅटच्या आकारानुसार ८ ते १० बेड टाकून जागा रहायला दिली जाते. यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र कपाट, व्हायफाय, गीझरगरम पाणी, किचन आणि हॉल कॉमन वापरासाठी, वाशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इस्त्री, मिक्सर, टीव्ही, फ्रीज अशा सर्व अ‍ॅमिनीटीज दिल्या जातात. त्याचप्रमाणे पार्कीगची व्यवस्था असते. त्यामुळे बाहेरून आलेला नोकरदार अगदी राजीखुशीने पैसे देऊन आनंदात राहतो. अनेक ठिकाणी सफाईसाठी स्वतंत्र व्यवस्था असते आणि केअरटेकरही ठेवलेला असतो. हा केअरटेकर जेवण, चहा, नाष्ट्याचीही सोय करतो. त्यामुळे सगळे काही एकाच ठिकाणी उपलब्ध होते.मुंबईत येणाºया आयटी सेक्टर, कॉलसेंटर, मल्टीनॅशनल कंपन्या आणि अन्य खाजगी सरकारी नोकरदारांना ही पीजी व्यवसायाची सुविधा म्हणजे वरदान ठरते आहे. पश्चिम उपनगरात बोरीवली ते दादर या भागात पीजी चे दर जास्त आहेत. मध्य मुंबई उपनगरात भांडुप, पवई, कांजुरमार्ग आणि मुलुंडमधील दर जास्त आहेत. तर नवी मुंबईतील नेरुळ, जुईनगर, कामोठे या भागात स्वस्त दरात पीजी उपलब्ध होतात.विकासक आपल्या काही सदनिका काही व्यवसायीक एजंट अथवा कंपन्यांना तीन ते पाच वर्षाच्या कराराने भाड्याने देतात. त्यापोटी डिपॉजीट आणि काही रक्कम आगाउ घेतली जाते. त्या सदनिकेत तो एजंट अनेक पीजी ठेऊन दुप्पट कमाई करतो. ८०० चौरस फुटांचा एक ३ बीएचके फ्लॅट २५ हजार रुपये भाड्याने घेतला तर त्या सदनिकेतील ३ बेडरुममध्ये प्रत्येकी ३ आणि हॉलमध्ये ४ असे पीजी ठेवले तर १३ जणांची राहण्याची सोय होते. प्रत्येकाकडून महिना ५ हजार घेतले तर साठ ते पासष्ठ हजार रुपये मिळकत होते. त्यातील २५ हजार गेले आणि लाईट व इतर खर्च गेला तर महिना ३५ हजार रुपये उत्पन्न एका सदनिकेतून मिळवले जाते. असे सदनिकेच्या दर्जानुसार कमी जास्त दर ठरतात. पण यामुळे विकासकाला दरमहा सदनिकांचे भाडे आणि डिपॉझीट मिळत असल्यामुळे त्याचा अडकलेला पैसा वसूल होतो.भांडूपची ड्रीम्स सोसायटी, ठाण्यातील कळवा, वर्तकनगर भाग आणि मालाडमधील एव्हरशाईनगर या भागात मेट्रो ट्रेनच्या कामासाठी आलेले बाहेरगावचे इंजिनीअर, मॉल आणि मल्टिनॅशनल कंपन्यांमधील कर्मचारी यांचा मोठा राबता असल्यामुळे त्यांना याचा फायदा होतो.पीजी व्यवसायासाठी अनेकांनी साईटही काढलेल्या आहेत. या संकेतस्थळावरून तुम्ही भारताच्या कानाकोपºयातून कुठुनही पीजी बुक करून अचानक रहायला येऊ शकता. मॅजीक ब्रिक, सुलेख, नो ब्रोकर अशा अनेक संकेतस्थळांच्या मार्फत अशा एजंट आणि विकासकांशी संपर्क साधून आपल्या मुंबईतील राहण्याचा प्रश्न सोडवता येतो. दरपत्रकठाणे ५०००मुलुंड ६०००भांडूप ६५००पवई १००००मालाड ८०००बोरीवली ५०००कांदीवली ६००० दादर १००००बांद्रा १००००गिरगांव चर्नीरोड ८०००नेरुळ ४०००कामोठे ४०००जुईनगर ३००० कळवा ३००० डोंबिवली ४००० कल्याण ३५००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: