भारत आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध निर्णायकपणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी सक्रियपणे पुढे वाटचाल करत आहे. प्रादेशिक राजकारणातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, भारताने संवाद, रणनीती आणि शक्ती संतुलनाच्या माध्यमातून आपले स्थान भक्कमपणे प्रस्थापित केले आहे. चीनपासून ते इतर दक्षिण आशियाई देशांपर्यंत भारताने प्रत्येक आघाडीवर हे स्पष्ट केले आहे की, तो केवळ प्रादेशिक स्थिरतेसाठीच केंद्रस्थानी नाही, तर भविष्यातील जागतिक दिशा ठरवण्यातही त्याची भूमिका सातत्याने वाढत आहे.
भारत-चीन संबंध
सर्वप्रथम, भारत-चीन संबंधांबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही देशांमध्ये मतभेद असूनही संवाद सुरू आहे. ब्रिक्स चौकटीत सहकार्य अधिक दृढ करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. चीनने भारताच्या अध्यक्षपदाला पाठिंबा दिला आहे आणि भारतानेही या मंचावरील चीनच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. अलीकडेच नवी दिल्लीत झालेल्या एका बैठकीदरम्यान, चीनचे विशेष दूत झाई जून यांनी सांगितले की, दोन्ही देश प्रमुख विकसनशील राष्ट्रे म्हणून आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर सतत संवाद साधतात. भारतानेही प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी ब्रिक्स देशांसोबत मिळून काम करण्याचे संकेत दिले आहेत. गलवान घटनेनंतर ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाचा भारताचा प्रस्तावित दौरा संबंधांना एक नवीन दिशा देत आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (रउड)??????? शिखर परिषदेत सहभागी झालेल्या आपल्या चिनी समकक्षासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेली द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भारत-नेपाळ संबंध
भारत-नेपाळ संबंधांमधील अलीकडील घडामोडी सहकार्याच्या नवीन संधींकडे निर्देश करतात. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून भारताचा नेपाळसोबतचा हा पहिला उच्चस्तरीय संपर्क आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री काठमांडू दौºयाच्या तयारीत आहेत. दोन्ही देशांमधील बहुआयामी सहकार्य वाढवण्यावर भर दिला जात आहे. हा दौरा दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाची संधी मानला जात आहे, ज्यामुळे व्यापार, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांतील भागीदारीला नवी चालना मिळू शकते. याव्यतिरिक्त यातून हे सूचित होते की, नेपाळच्या नवीन नेतृत्वाचे प्राधान्यक्रम समजून घेऊन भारताला पुढे जायचे आहे. अमेरिका आणि चीनसोबत नेपाळचा वाढता सहभाग पाहता भारताचा हा संतुलित दृष्टिकोन राजनैतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.
भारत-बांगलादेश संबंध
भारत-बांगलादेश संबंधांबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडच्या काळात या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले असले, तरी दोन्ही देश आता हे संबंध पुन्हा दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या संबंधांची संवेदनशीलता दर्शवत, भारताने अनुभवी राजकारणी दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. अलीकडील उच्चस्तरीय बैठकांमध्ये व्यापार, ऊर्जा आणि जनसंपर्क यांसारख्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यावर एकमत झाले आहे. बांगलादेशातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यातील भारताच्या सहभागाने संबंध स्थिर आणि सकारात्मक दिशेने नेण्याची भारताची इच्छा दर्शवली आहे. दोन्ही देशांमध्ये सतत संवाद सुरू असतो, जे त्यांच्या दीर्घकालीन भागीदारीची ताकद दर्शवते.
भारत-श्रीलंका संबंध
भारत-श्रीलंका संबंधांचा विचार करता, येथील सहकार्याचे स्वरूप अधिक व्यावहारिक आणि धोरणात्मक असल्याचे दिसते. भारताने श्रीलंकेच्या तटरक्षक दलाची क्षमता मजबूत करण्यासाठी उपकरणे दान केली आहेत, ज्यामुळे सागरी सुरक्षा आणि शोध व बचाव कार्यांमध्ये सुधारणा झाली आहे. याव्यतिरिक्त दोन्ही नौदलांमध्ये संयुक्त सराव आयोजित करण्यात आले, ज्यामुळे परस्पर समन्वय आणि तांत्रिक सहकार्याला चालना मिळाली. या सरावांमध्ये विशेष सागरी कारवाया आणि प्रशिक्षणाचा समावेश होता, ज्यातून सुरक्षा सहकार्याची सखोलता दिसून आली. इतकेच नव्हे, तर भारताने मानवतावादी मदतीचा भाग म्हणून वैद्यकीय पथके पुरवण्याचाही निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांमध्ये मदत होईल.
या संबंधांच्या धोरणात्मक विश्लेषणातून असे दिसून येते की, भारत आपल्या शेजारी देशांशी संतुलित, सहकारी आणि बहुआयामी संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चीनसारख्या प्रतिस्पर्धी देशाशी संवाद कायम ठेवणे असो, नेपाळसोबतचे पारंपरिक संबंध पुन्हा दृढ करणे असो, राजकीय बदल होऊनही बांगलादेशसोबतची भागीदारी मजबूत करणे असो, किंवा श्रीलंकेसोबत संरक्षण आणि मानवतावादी सहकार्याचा विस्तार करणे असो, भारताचे धोरण सुसंगतता आणि स्पष्टता दर्शवते.
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शेजारी देशांना दिलेले प्राधान्य. ‘शेजारी प्रथम’ (ठी्रॅँुङ्म१ँङ्मङ्म िऋ्र१२३)???????? धोरणांतर्गत, भारताने प्रादेशिक स्थिरता आणि विकासात आपली भूमिका महत्त्वपूर्ण राहील याची खात्री केली आहे. हे धोरण संवाद, मदत, गुंतवणूक आणि सुरक्षा सहकार्यावर लक्ष केंद्रित करते. भारताने राजनैतिक संतुलन राखले आहे, त्याचबरोबर व्यावहारिक सहकार्याच्या माध्यमातून विश्वासही दृढ केला आहे.
या प्रयत्नांचा प्रभाव केवळ दक्षिण आशियापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो जागतिक स्तरावरही जाणवेल. जागतिक शांतता, व्यापार आणि आर्थिक विकासासाठी एक स्थिर आणि सहकार्यशील दक्षिण आशिया अत्यंत महत्त्वाचा आहे. जर भारताने आपल्या शेजारच्या प्रदेशात स्थिरता प्रस्थापित केली, तर तो एक जबाबदार आणि प्रभावशाली जागतिक शक्ती म्हणून स्वत:ला स्थापित करेल. तथापि, सध्याच्या घडामोडी असे दर्शवतात की, भारत आणि त्याच्या शेजारी देशांमधील संबंध हळूहळू सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहेत. संवाद, सहकार्य आणि संतुलनाचे हे धोरण भविष्यात प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सकारात्मक बदल घडवून आणू शकते.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा