prafulla phadke mhantat

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

कोणत्याही पदाची शान वाढवणारे नारायण राणे

महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांचे महत्त्व सगळ्यांनाच पटलेले आहे. त्यामुळे सर्वांनाच ते हवेहवेसे वाटतात. याचे कारण त्यांच्यात असलेल्या विविध गुणांनी ते चतुरस्त्र असे व्यक्तिमत्व बनलेले आहेत. माजी मुख्यमंत्री, अनेक खात्यांचे माजी मंत्री किंवा विद्यमान राज्यसभेचे खासदार ही अनेक पदे त्यांनी भुषवली असली तरी त्या पदांपेक्षा नारायण राणे हे नाव मोठे आहे. त्या पदांची शान वाढवणारे असे नेतृत्व म्हणजे नारायण राणे असेच म्हणावे लागेल. 
       महाराष्ट्र म्हटले की जी नावे समोर येतात त्यामध्ये छत्रपती शिवराय यांचे नाव सर्वात प्रथम येते. त्यानंतर राजकारण समाजकारणातील जी महत्वाची कधीही न पुसली जाणारी नावे म्हणजे यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव घेतले जाते. त्या यादीतच नारायण राणे यांचे नाव घ्यावे लागेल. याचे कारण या सर्वांनी जे काही मिळवले ते स्वसामर्थ्यावर मिळवले. आज मी मी म्हणणारे हे कोणाचे तरी वारसदार आहेत पण या सर्वांनी शून्यातून विश्वनिर्मिती म्हणावी असा चमत्कार केलेला आहे. म्हणूनच त्यांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. या महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे नारायण राणे यांचा उल्लेख करावा लागेल.
एका उत्तम नेत्यात जे गुण अभिप्रेत असतात ते सर्व गुण नारायण राणे यांचे ठायी दिसून येतात. म्हणूनच त्यांच्यामुळे ते भुषवित असलेल्या कोणत्याही पदाला शोभा येते.
 समर्थ रामदासांनी नेतृत्वाची उत्तम लक्षणे सांगितली आहेत. ती सर्वच लक्षणे नारायण राणे यांच्यात असलेली दिसून येतात. रामदासांनी ही उत्तम नेत्याची लक्षणे साक्षात हनुमानाकडे पाहुन वर्णन केलेली आहेत. कारण रामभक्त हनुमान हा नुसताच भक्त नव्हता तर तो एक मंत्री होता. तो एक कुशल मंत्री होता. प्रचंड बुद्धिमान होता. तो किश्किंधा नरेश सुग्रिवाचा उत्तम मंत्री होता. संकटकाळी आणि कठीण समयी नेमके कसे वागावे याचे चातुर्य हनुमंतामध्ये होते. शक्ती, युक्ती, भक्ती याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान. म्हणूनच रामदासांनी हनुमंताकडे एक उत्तम व्यवस्थापक म्हणून पाहिले आहे. हनुमंताकडे पाहूनच त्यांना उत्तम महंताची लक्षणे सुचली असावीत असे वाटते. ही सर्व उत्तम महंताची, व्यवस्थापकाची, नेत्याची आणि मंत्र्याची लक्षणे आपल्याला नारायण राणे यांच्यात दिसून येतात. 
हनुमान ज्याप्रमाणे रामाचे भक्त होते त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी आपले दैवत ज्या शिवसेनाप्रमुखांना मानले आहे त्यांचे ते सदैव भक्त आहेत. हा प्रामाणिकपणा आणि निष्ठा फार महत्वाची आहे. शिवसेनेपासून दूर गेले तरी नारायण राणे शिवसेनाप्रमुखांपासून दूर गेलेले नाहीत. हे उत्तम नेत्याचे लक्षण आहे.
एका उत्तम नेत्याने मंत्र्याने आपले जे काही लिखाण असते ते स्वच्छ नीटनेटके आणि स्पष्ट लिहावे. त्याने इतरांकडून काम करवून घेताना त्याच्या सूचना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी त्या अत्यंत स्पष्ट आणि सोप्या प्रकारे द्याव्यात, असे दासबोधातील अकराव्या दशकात रामदासांनी लिहीले आहे. हे सर्व नारायण राणे यांच्याबाबतीत तंतोतंत लागू पडते. नारायण राणे यांच्या कामात अत्यंत स्पष्टता असते. कोणालाही ते खेळवत ठेवत नाहीत. कामही अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट असते. कामाच्या नोंदी, फायलींग हे सगळे अपटूडेट असते. हे उत्तम नेत्याचे लक्षण आहे. आजकाल सरकारी कार्यालयात अथवा मंत्रालयात फायली गहाळ होणे असले प्रकार घडताना दिसतात. असे प्रकार नारायण राणे यांच्या काळात कधीच
 घडत नव्हते. कारण त्यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण होते. कामात गुंतागुंत न करता स्पष्टता होती. नेत्याचे वाचन उत्तम असले पाहिजे. त्याप्रमाणे नारायण राणे यांचे वाचन बारकाईने असते. एक उत्तम मंत्री, शासक आपल्या सहकार्‍यांकडून व्यवस्थित काम करुन घेतो, त्याच्याकडून झालेल्या चुका सुधारवून घेण्याचे काम करतो. त्या चुका त्यांच्या लक्षात आणून देतो. हे काम करणे फार महत्वाचे असते. नारायण राणे आपल्या पदावर असताना निर्भिडपणे आपले मत मांडून समोरच्याकडून होणार्‍या चुकांची जाणिव करुन देतात. हे एका उत्तम नेत्याचे लक्षण आहे. अशावेळी समोर कोण आहे हे न पाहता खरे ते खरेच सांगण्याचे काम त्यांनी केले आहे.
एका मंत्र्यामध्ये, नेत्यामध्ये सभाचातुर्य हा गुण असावा लागतो. हा गुण नारायण राणे यांच्यात आपल्याला ठायी ठायी दिसून येतो. आपले मत प्रदर्शित करताना, आपला मुद्दा मांडताना नारायण राणे तो अत्यंत व्यवस्थित मांडतात. त्यामुळे तो समोरच्याला, व्यवस्थित समजतो. हा त्यांचा गुण फार महत्वाचा आहे. 
रामदासांनी दासबोधात सांगितले आहे की, एक उत्तम नेता हा अगोदर चांगला अभ्यास करतो. चांगले पाठांतर करतो. केवळ शाद्बिक अर्थात अडकत नाही तर त्यातील गर्भीत अर्थ समजून घेतो. आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून तो अडलेल्या लोकांना शिकवतो. हे काम नारायण राणे सातत्याने करताना दिसतात. सभाशास्त्र, सभागृहात कसे बोलायचे, कसे मुद्दे मांडायचे, त्यासाठी कसा अभ्यास करायचा असतो याचा आदर्श परिपाठच नारायण राणे यांनी घालून दिलेला आहे. त्यामुळे ते सत्तेत असोत वा विरोधक असो सर्वांना ते काय बोलणार, मुद्दा कसा मांडणार हे ऐकताना काही तरी आपण शिकणार आहोत असे जाणवते. त्यामुळेच भलेभले नेते, सत्ताधारीही नारायण राणे बोलायला उभे राहिल्यावर त्यांच्या छातीत धडकी भरायची. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना नारायण राणे हे विरोधीपक्ष नेते होते. तेंव्हा राणे बोलायला उभे राहिल्यावर विलासरावांची बोलती बंद व्हायची. कारण आपले स्पष्टपणे मुद्दे मांडून ते त्यांना म्हणजे सरकारला निरुत्तर करायचे. सरकारचे वास्तव, उणिवा दाखवून दिल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करायचे. हा मोठेपणा फार महत्वाचा असतो. त्यामुळे सरकार कोणाचेेही असो, मुख्यमंत्री कोणीही असो त्यांना नारायण राणे यांचा सल्ला नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे. 
कोणतीही गोष्ट प्रयत्नसाध्य असते यावर नारायण राणे यांचाा विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला ते सहजपणे आणि धाडसाने सामोरेे जातात. 
  नारायण राणे हे कोकणातील नेते आहेत. त्यामुळे त्यांचे मन हे सागरासारखे आहे. सर्वांना सामावून घेण्याचे मोठे मन त्यांचे आहे.       एक उत्तम नेता सागरासारखा असला पाहिजे. तो सागरासारखा शांत असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्याचा तोल जाता कामा नये. त्याने मर्यादेचा भंग करता कामा नये. कितीही वादळं आली तरी सागर आपली मर्यादा कधी ओलांडत नाही. उथळ पाणी असलेली नदी पावसाने रूंद होती, उन्हाने रोडावते. नदी आटते नदीला पूर येतो. पण सागर मात्र कोणत्याही परिस्थितीत स्थिर असतो. तो अथांग असतो. त्याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. तेच गुण नारायण राणे यांच्यात जाणवतात. समुद्र शांत राहतो आणि प्रसंगी खवळून आपले रौद्ररुपही दाखवतो. असे रुप त्यांनी अनेकवेळा दाखवून दिलेले आहे. त्यामुळे नेत्याचे सगळे उत्तम गुण त्यांच्यात ठायी ठायी सामावलेले आहेत.
सर्व पदांची शान वाढवली
नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपद हे राज्यातील सर्वोच्च पद भूषविले. त्या पदाची आपल्या अल्प काळातील कामगिरीने त्यांनी शान वाढवली. कारण त्यांनी या काळात प्रशासनाला पळायला लावून अक्षरश: कामाला लावले होते. विरोधीपक्ष नेते असताना विलासराव देशमुख यांना त्यांनी सळो की पळो केले होते. त्या वेळी आघाडी सरकारने सर्वात प्रथम भारनियमन हा शब्द दिला. तेंव्हा भारनियमनामुळे उद्योग, शेतीचे कसे नुकसान होत आहे, शेतीपंपाला पाणी वीजेअभावी देता येत नसल्याचे जीव तोडून सांगितले होते. त्यावेळी विरोधी पक्षाचा सरकारला धाक कसा असतो हे दाखवून विलासराव देशमुख यांना धारेवर धरले होते. विरोधीपक्ष नेते पदाचे काम काय असते हे त्यांनी दाखवून दिले होते. सभागृह बंद पाडण्यावर सध्या विरोधकांचा भर असतो. पण आपल्याला जनतेची कामे करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी इथे पाठवले आहे याचे भान ठेवून आदर्श विरोधक कसा असावा हे नारायण राणे यांनी दाखवून दिले. त्यांच्यानंतर विरोधीपक्षनेता या पदाला कोणी शोभलाच नाही. याचे कारण अभ्यासाचा अभाव. नारायण राणे यांनी ते पद इतक्या उंचीवर नेले की ते दुसर्‍या कोणाला जमलेच नाही.
गुण पाहूनच संधी
नारायण राणे यांच्यातील गुण पाहुनच त्यांना मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनाप्रमुखांनी गळ्यात टाकली होती. अनेकांना वाटते की ते मराठा आहेत म्हणून निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जोशींना हटवून राणेंना आणले. पण त्यांची जात न पाहता त्यांच्यातील गुण पाहून त्यांना संधी मिळाली होती. कारण मुळातच शिवसेनाप्रमुख हे जातपात मानणारे नव्हते.




येथे एप्रिल १०, २०१८
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

माझ्याबद्दल

माझा फोटो
prafulla phadke mhantat
Mumbai, Maharashtra, India
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ►  2025 (510)
    • ►  डिसेंबर (27)
    • ►  नोव्हेंबर (51)
    • ►  ऑक्टोबर (55)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (44)
    • ►  जुलै (60)
    • ►  जून (61)
    • ►  मे (51)
    • ►  एप्रिल (41)
    • ►  मार्च (38)
    • ►  फेब्रुवारी (37)
    • ►  जानेवारी (44)
  • ►  2024 (3)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (1)
  • ►  2022 (227)
    • ►  मे (15)
    • ►  एप्रिल (52)
    • ►  मार्च (48)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (58)
  • ►  2021 (510)
    • ►  ऑक्टोबर (8)
    • ►  सप्टेंबर (38)
    • ►  ऑगस्ट (49)
    • ►  जुलै (62)
    • ►  जून (61)
    • ►  मे (56)
    • ►  एप्रिल (60)
    • ►  मार्च (60)
    • ►  फेब्रुवारी (56)
    • ►  जानेवारी (60)
  • ►  2020 (427)
    • ►  डिसेंबर (59)
    • ►  नोव्हेंबर (15)
    • ►  ऑक्टोबर (16)
    • ►  सप्टेंबर (53)
    • ►  ऑगस्ट (35)
    • ►  जुलै (59)
    • ►  जून (48)
    • ►  मे (51)
    • ►  मार्च (24)
    • ►  फेब्रुवारी (34)
    • ►  जानेवारी (33)
  • ►  2019 (109)
    • ►  डिसेंबर (45)
    • ►  नोव्हेंबर (11)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (9)
    • ►  फेब्रुवारी (17)
    • ►  जानेवारी (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  डिसेंबर (26)
    • ►  नोव्हेंबर (30)
    • ►  ऑक्टोबर (26)
    • ►  सप्टेंबर (20)
    • ►  ऑगस्ट (27)
    • ►  जुलै (32)
    • ►  जून (36)
    • ►  मे (39)
    • ▼  एप्रिल (35)
      • जनतेचा नव्हे, हा तर काँग्रे्रसचा आक्रोश
      • हमाम में सब..
      • सुट्टी वैकल्पिक असावी
      • मानसा मानसा कधी व्हशीन मशिन.
      • विकास आराखड्यातील पाण्याचे नियोजन काय?
      • कायद्यापुढे कोणी मोठा नाही
      • नक्षली ‘थिंक टँक’चा बिमोड आवश्यक
      • कायद्याचा केवळ धाक नको!
      • यशवंत सिन्हांची नाराजी २००९ पासूनच
      • रेल्वे ते रॉयल पॅलेस
      • मिशन २०३० साठी प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
      • पालिका रुग्णालयांचे खाजगीकरण ही सेनेची लिटमस टेस्ट
      • राहुल गांधी आता मोदींची भाषा बोलू लागले
      • नसलेल्या संकटांची भीती
      • आवडीने पोलिसात भरती व्हा, तडजोडीने नको!
      • क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधायलाच हवी!
      • हा पुरस्कार नेता म्हणून की अभिनेता म्हणून?
      • समताधिष्टित राष्ट्रनिर्मितीचा प्रणेता
      • नारायण राणेंशिवाय पर्याय नाही
      • मंदिर, संस्थांच्या निधीतून सामाजिक कार्ये
      • कोणत्याही पदाची शान वाढवणारे नारायण राणे
      • पुरोगामी विचारांचे जनक
      • सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करणे हाच उपाय
      • रामा राघोबा राणे यांच्या शौर्याची गाथा तरी राज्य स...
      • शिवसेनेने केली सुरगाठीची नीरगाठ
      • मुंबई विद्यापीठाचा घोळ संपणार कधी?
      • वडिलांचा वारसा पुढे नेणार
      • prafulla phadke mhantat: मुंबईतील महिला अजूनही असु...
      • मुंबईतील महिला अजूनही असुरक्षित
      • परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
      • अन्नदात्याच्या मदतीला मुंबईचा डबेवाला
      • नारायण राणेंचे पुढचे पाऊल
      • शिवसेनेची डोकेफोड
      • विरोधकांनी घेतला मोदींचा धस्का
      • व्यापक नियम हवा
    • ►  मार्च (37)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (25)
  • ►  2017 (31)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  ऑगस्ट (11)
    • ►  जुलै (2)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (4)
    • ►  फेब्रुवारी (10)
  • ►  2016 (232)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (25)
    • ►  जुलै (19)
    • ►  जून (26)
    • ►  मे (29)
    • ►  एप्रिल (30)
    • ►  मार्च (31)
    • ►  फेब्रुवारी (29)
    • ►  जानेवारी (42)
  • ►  2015 (165)
    • ►  डिसेंबर (23)
    • ►  नोव्हेंबर (22)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (36)
    • ►  जुलै (33)
    • ►  जून (12)
    • ►  फेब्रुवारी (13)
    • ►  जानेवारी (24)
  • ►  2014 (206)
    • ►  डिसेंबर (27)
    • ►  नोव्हेंबर (26)
    • ►  ऑक्टोबर (9)
    • ►  सप्टेंबर (4)
    • ►  जुलै (12)
    • ►  जून (23)
    • ►  मे (20)
    • ►  एप्रिल (85)
  • ►  2013 (1)
    • ►  जून (1)
  • ►  2011 (2)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
  • ►  2010 (4)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  मार्च (2)

लेबल

  • uttam nirnay

गैरवर्तनाची तक्रार करा

facebook

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

याची सदस्यत्व घ्या

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

हा ब्लॉग शोधा

Pages

  • Home

महासत्ता बनण्यासाठी काळाच्या पुढे पहावे लागेल

अलीकडेच, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियातील बुसान येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली ते...

लोकप्रिय पोस्ट

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...
  • जाते माहेराला जाते माहेराला
    वारीमध्ये भक्तीमार्ग आहे. या भक्तीमार्गाचा पाया प्रेम आहे. प्रेमाचे सर्वोत्कृष्ठ स्थान म्हणजे आई. म्हणूनच आपल्याकडे विठोबा असेल नाहीत...

लेबल

  • uttam nirnay

ब्लॉग संग्रहण

  • ►  2025 (510)
    • ►  डिसेंबर (27)
    • ►  नोव्हेंबर (51)
    • ►  ऑक्टोबर (55)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (44)
    • ►  जुलै (60)
    • ►  जून (61)
    • ►  मे (51)
    • ►  एप्रिल (41)
    • ►  मार्च (38)
    • ►  फेब्रुवारी (37)
    • ►  जानेवारी (44)
  • ►  2024 (3)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (1)
  • ►  2022 (227)
    • ►  मे (15)
    • ►  एप्रिल (52)
    • ►  मार्च (48)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (58)
  • ►  2021 (510)
    • ►  ऑक्टोबर (8)
    • ►  सप्टेंबर (38)
    • ►  ऑगस्ट (49)
    • ►  जुलै (62)
    • ►  जून (61)
    • ►  मे (56)
    • ►  एप्रिल (60)
    • ►  मार्च (60)
    • ►  फेब्रुवारी (56)
    • ►  जानेवारी (60)
  • ►  2020 (427)
    • ►  डिसेंबर (59)
    • ►  नोव्हेंबर (15)
    • ►  ऑक्टोबर (16)
    • ►  सप्टेंबर (53)
    • ►  ऑगस्ट (35)
    • ►  जुलै (59)
    • ►  जून (48)
    • ►  मे (51)
    • ►  मार्च (24)
    • ►  फेब्रुवारी (34)
    • ►  जानेवारी (33)
  • ►  2019 (109)
    • ►  डिसेंबर (45)
    • ►  नोव्हेंबर (11)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (9)
    • ►  फेब्रुवारी (17)
    • ►  जानेवारी (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  डिसेंबर (26)
    • ►  नोव्हेंबर (30)
    • ►  ऑक्टोबर (26)
    • ►  सप्टेंबर (20)
    • ►  ऑगस्ट (27)
    • ►  जुलै (32)
    • ►  जून (36)
    • ►  मे (39)
    • ▼  एप्रिल (35)
      • जनतेचा नव्हे, हा तर काँग्रे्रसचा आक्रोश
      • हमाम में सब..
      • सुट्टी वैकल्पिक असावी
      • मानसा मानसा कधी व्हशीन मशिन.
      • विकास आराखड्यातील पाण्याचे नियोजन काय?
      • कायद्यापुढे कोणी मोठा नाही
      • नक्षली ‘थिंक टँक’चा बिमोड आवश्यक
      • कायद्याचा केवळ धाक नको!
      • यशवंत सिन्हांची नाराजी २००९ पासूनच
      • रेल्वे ते रॉयल पॅलेस
      • मिशन २०३० साठी प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
      • पालिका रुग्णालयांचे खाजगीकरण ही सेनेची लिटमस टेस्ट
      • राहुल गांधी आता मोदींची भाषा बोलू लागले
      • नसलेल्या संकटांची भीती
      • आवडीने पोलिसात भरती व्हा, तडजोडीने नको!
      • क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधायलाच हवी!
      • हा पुरस्कार नेता म्हणून की अभिनेता म्हणून?
      • समताधिष्टित राष्ट्रनिर्मितीचा प्रणेता
      • नारायण राणेंशिवाय पर्याय नाही
      • मंदिर, संस्थांच्या निधीतून सामाजिक कार्ये
      • कोणत्याही पदाची शान वाढवणारे नारायण राणे
      • पुरोगामी विचारांचे जनक
      • सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करणे हाच उपाय
      • रामा राघोबा राणे यांच्या शौर्याची गाथा तरी राज्य स...
      • शिवसेनेने केली सुरगाठीची नीरगाठ
      • मुंबई विद्यापीठाचा घोळ संपणार कधी?
      • वडिलांचा वारसा पुढे नेणार
      • prafulla phadke mhantat: मुंबईतील महिला अजूनही असु...
      • मुंबईतील महिला अजूनही असुरक्षित
      • परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
      • अन्नदात्याच्या मदतीला मुंबईचा डबेवाला
      • नारायण राणेंचे पुढचे पाऊल
      • शिवसेनेची डोकेफोड
      • विरोधकांनी घेतला मोदींचा धस्का
      • व्यापक नियम हवा
    • ►  मार्च (37)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (25)
  • ►  2017 (31)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  ऑगस्ट (11)
    • ►  जुलै (2)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (4)
    • ►  फेब्रुवारी (10)
  • ►  2016 (232)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (25)
    • ►  जुलै (19)
    • ►  जून (26)
    • ►  मे (29)
    • ►  एप्रिल (30)
    • ►  मार्च (31)
    • ►  फेब्रुवारी (29)
    • ►  जानेवारी (42)
  • ►  2015 (165)
    • ►  डिसेंबर (23)
    • ►  नोव्हेंबर (22)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (36)
    • ►  जुलै (33)
    • ►  जून (12)
    • ►  फेब्रुवारी (13)
    • ►  जानेवारी (24)
  • ►  2014 (206)
    • ►  डिसेंबर (27)
    • ►  नोव्हेंबर (26)
    • ►  ऑक्टोबर (9)
    • ►  सप्टेंबर (4)
    • ►  जुलै (12)
    • ►  जून (23)
    • ►  मे (20)
    • ►  एप्रिल (85)
  • ►  2013 (1)
    • ►  जून (1)
  • ►  2011 (2)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
  • ►  2010 (4)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  मार्च (2)

फॉलोअर

साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.