वर्तमानपत्रात किंवा कुठेतरी नोकरीची जाहीरात येईल आणि त्या कंपनीसाठी अर्ज करुन इंटरव्'ुवला जाता येईल यावर आता तरुणांचा विश्वास राहिलेला नाही. किंबहुना तेवढा वेळही त्यांच्याकडे नाही. कंपनीने ठरवलेल्या अटीत रोजगार मिळवण्यापेक्षा आपल्या अटीत बसेल ती कंपनी निवडण्यासाठी तरुणांनी विचार केलेला आहे. अशा तरुणांना प्लेसमेंट एजन्सीजच्या मार्फत आपल्या पसंतीचे जॉब-नोकºया मिळत आहेत.मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांमधून आज अनेक प्लेसमेंट कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या फक्त टॅलेंट सर्च करण्याचे काम करतात. तुमच्यातील योग्यतेनुसार तुम्हाला कोठे पाठवायचे याचे उत्तम व्यवस्थापन करतात. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेले तरुण आणि रोजगार देणाºया कंपन्या यांच्यामधला दुवा अशी भूमिका या प्लेसमेंट एजन्सीजची पहायला मिळते. साधारणपणे कोणत्याही कंपनीला आपल्याला आवश्यक असलेला उमेदवार आणि आपल्या बजेटनुसार त्याचे पॅकेज ठरवताना फार वेळ घालवावा लागतो. चार दोन जागांसाठी जाहीरात देणे, उमेदवारी अर्ज गोळा करणे, मुलाखती घेणे आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करणे यामध्ये फार मोठा वेळ घालवावा लागतो. त्यात डोकेदुखीही फार होते. त्याचप्रमाणे ओळखीचे, वशिल्याचे उमेदवार घुसवण्याचे मॅनेजमेंट आणि ओळखीच्या लोकांचा आग्रह या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातून लायक उमेदवार मिळेलच याची खात्री नसते. अशा परिस्थितीत कमी वेळात प्लेसमेंटच्या माध्यमातून उमेदवारांची भरती करण्याचा सोपा मार्ग बहुतेक कंपन्या आजकाल स्विकारत आहेत. त्यामुळे हमखास लायक उमेदवारच मिळतो हे त्याचे रहस्य आहे. याशिवाय सध्या कॉन्ट्रॅक्ट लेबरचा जमाना सर्वत्र पसंत पडत आहे. त्यामुळे कंपनीने डायरेक्ट भरती केलेल्या उमेदवाराला पगाराव्यतिरीक्त सेवा देण्याचे बंधन राहते. यात फंड, निवृत्तीवेतन आणि बरेच काही. त्यापेक्षा काही कालावधीसाठी प्लेसमेंटच्या माध्यमातून मिळणारे मनुष्यबळ सहज सोपे असते. त्यांना फक्त कबूल केलेली रक्कम आणि हक्काची साप्ताहीक सुट्टी दिली की काम भागते. याशिवाय बहुसंख्य कंपन्यांना आपला एच आर विभाग अशा कामासाठी नेमावा लागतो. त्या एच आर विभागावरच इतका खर्च होतो की त्यामुळे कंपनीवर बोजा पडतो. त्यामुळे बहुसंख्य खाजगी कंपन्या या प्लेसमेंट एजन्सीजच्या एच आर विभागाचा वापर करताना दिसतात.नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना थेट कंपनीशी मुलाखत इंटरव्ह्यूव करण्यापेक्षा प्लेसमेंट कंपनीमार्फत भरती होणे आवडते. इथे त्यांना जास्त मोकळेपणाने बोलता येते. आपल्यातील गुणवत्ता काय आहे हे प्लेसमेंट कंपनीला सांगून त्याप्रमाणे आपल्या आवडीची नोकरी मिळवणे हे सोपे जाते. म्हणजे एखाद्या वधू वर सूचक मंडळात नाव नोंदणी करुन आपल्या पसंतीची मुलगी निवडण्यासारखाच हा प्रकार सोपा झालेला आहे.प्लेसमेंट कंपनीचा एच आर विभाग हा टॅलेंट सर्च करुन योग्य व्यक्तिला योग्य संधी देण्याचे काम करतात. त्यामुळे आपल्याकडे आलेल्या तरुणांशी अत्यंत मोकळेपणाने बोलतात. ठाणे, नवी मुंबई, मुंबईतील अनेक प्लेसमेंट एजन्सीजकडे आपण आॅनलाईन अर्ज करु शकतो. त्यानंतर ते फोनवरुनच आपली चौकशी करुन प्राथमिक माहिती घेतात. आपला बायोडेटा पाहून तो कुठे कुठे चालू शकेल त्याची चाचपणी करतात. त्याप्रमाणे एकाचवेळी दोन तीन किंवा जास्ती ठिकाणच्या आॅफरसाठी एजन्सीजवर बोलावले जाते. त्यामध्ये तीन ते चार मिटींग एकाच दिवशी ठरवून तरुणांचा आणि कंपन्यांचाही वेळ वाचवतात. या कंपनीच्या एच विभागातील लोक तरुणांशी इतके आपलेपणाने वागतात की त्यांच्यातील गुण ते सहज हेरु शकतात. चालत फिरत इंटरव्ह्यू करतात. कधी एकमेकांची सिगारेटही आॅफर करतात, एक्स्जेंच करतात. बाहेरच्या कँटीनमध्ये चहा पितापिता या कंपनीसाठी तुझे नाव सुचवतो असे सांगून त्या तरुणाचा उत्साह वाढवतात. त्यानंतर पुढच्या टप्प्यात अन्य कंपन्यांशी थेट इंटरव्ह्यूव आपल्या कार्यालयात घडवून आणतात. परिणामी योग्य उमेदवाराची वर्णी योग्य ठिकाणी लागते. त्यामुळे तरुणांचे रोजगाराचे आवडते सोल्युशन हे प्लेसमेंट एजन्सीज होताना दिसते आहे. सध्या मुंबईत असंख्य प्लेसमेंट एजन्सीज आहेत. यामध्ये ठाणे शहरात स्टेशनजवळ, वागळे इस्टेट येथे, नवी मुंबईत नेरुळ, बेलापूर आणि वाशी आणि मुंबईत दादर, मालाड, गोरेगांव येथील प्लेसमेंट एजन्सीज या नामांकीत म्हणून गणल्या जातात. बोगस प्लेसमेंट एजन्सीजचाही सुळसुळाटकोणतीही चांगली गोष्ट आल्यावर त्याची डुप्लीकेट मार्केटमध्ये येते त्याप्रमाणे प्लेसमेंट एजन्सीजच्या डुप्लीकेट म्हणजे बोगस एजन्सीजही कार्यरत आहेत. या एजन्सीज तरुणांकडून नोकरीसाठी रजिस्ट्रेशनच्या नावाखाली पैसे उकळतात आणि रोजगारही देत नाहीत. कुठले तरी पत्ते देवून तिथे पाठवतात. पण चांगल्या प्लेसमेंट एजन्सीज तरुणांकडून पैसे घेत नाहीत. त्यांना आपल्या कार्यालयातच इंटरव्ह्यू देण्याची सोय करतात आणि जागेवर आॅफर लेटर देतात. त्यासाठी कंपन्या त्यांना पैसे देत असतात.
शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
तरुणांना प्लेसमेंट एजन्सीज मार्फत पसंतीचे जॉब
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा