सध्या कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगापुढे आहे. चीनमधून उद्भवलेल्या या संकटाचा सामना भारताला जास्त करावा लागणार आहे, कारण भारत हा चीनचा शेजारी देश आहे. कोणत्याही संकटाची झळ ही शेजाºयाला सोसावी लागते. अर्थात दर चार, पाच, दहा वर्षांनी काही नवे आजार, साथीचे रोग, व्हायरस आजकाल येताना दिसतात. विशेषत: २१वे शतक सुरू झाले आणि सातत्याने आपण अनेक नव्या प्राणीजन्य रोगांना सामोरे जाताना दिसतो आहे. यात कधी बर्ड फ्लू, मग स्वाइन फ्लू आणि आता हे कोरोनाचे संकट. चीनमधून इतर १६ देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूशी मुकाबला कसा करायचा, यावर जगभर सध्या चर्चा सुरू आहे. अर्थात अशाप्रकारच्या विषाणूच्या फैलावाची वा उद्रेकाची ही पहिलीच वेळ आहे. प्राण्यांपासून फैलाव झालेल्या या विषाणूमुळे मानवाला प्राणीजन्य रोग होण्याचा धोका पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कदाचित भविष्यामध्ये हवामान बदल आणि जागतिकीकरणामुळे जसेजसे प्राणी आणि माणसांतले नाते बदलेल तसे कदाचित अशा अडचणींचे प्रमाणही वाढेल. याला काही जण जैविक युद्ध असल्याचे म्हणत आहेत. पण हा संपूर्ण जगासमोरचा धोका आहे, हे निश्चित. चीनने निर्माण केलेल्या या अस्त्राचा फटका पहिल्यांदाच त्यांना बसला आहे. कोणतेही अस्त्र शस्त्र हे दुधारी असते, याचे प्रत्यंतर आता चीनला आले असेल, हे नक्की.गेल्या ५० वर्षांमध्ये अनेक संसर्गजन्य आजार प्राण्यांकडून माणसांकडे येऊन वेगाने पसरले. दुसºया महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाचा हा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होत आहे, पण हे प्रकार गेल्या पाच दशकांत होत आहेत आणि दोन हजार नंतर वाढले आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे. १९८०च्या दशकामध्ये एचआयव्ही एड्सची सुरुवात ग्रेट एप्स म्हणजेच माकडांपासून झाली. माकडांमधून हा रोग जगात पसरला आज त्याचे स्वरूप अत्यंत महाकाय असे आहे. २००४ मध्ये बर्ड फ्लूची साथ पक्षांकडून पसरली, तर २००९ मध्ये डुकरांमुळे स्वाइन फ्लू पसरला. सिव्हियर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा सिव्हेट्समुळे पसरल्याचे नुकतेच आढळले होते, तर इबोलाची लागण माणसांना वटवाघुळांकडून झाली. मानवाला प्राण्यांपासून कायम आजार झाले आहेत. खरंतर बहुतेक संसर्गजन्य आजार हे वन्य प्राण्यांकडूनच आले आहेत.पण आता बदलत्या वातावरणामुळे या प्रक्रियेला वेग आलाय. शहरांमध्ये वाढलेली गर्दी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासांचे वाढलेले प्रमाण, यामुळे आता हे आजार लवकर पसरतात.आजार वाहून नेऊ शकतील, असे विविध रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणू बहुतेक प्राण्यांमध्ये असतात. नवीन शरीरांमध्ये संसर्ग करणे हाच या रोगकारक विषाणूंकडचा टिकून राहण्याचा पर्याय असतो. म्हणूनच एका प्रजातीमार्फत दुसºया प्रजातीत शिरकाव करणे हा त्यासाठीचा एक मार्ग असतो. नवीन प्रजातीच्या शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा हे रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणू मारून टाकण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच या दोन्हींमध्ये एकमेकांवर मात करण्याची स्पर्धा सुरू होते. २००३ मध्ये सार्सची साथ आली, तेव्हा याची बाधा झालेल्यांपैकी साधारण अनेक लोकांचा मृत्यू झाला, पण फ्लूच्या साथीमध्ये त्यामानाने कमी लोकांचा मृत्यू झाला होता. हवामान आणि वातावरणामध्ये होणाºया बदलांमुळे प्राण्यांचा अधिवासही बदलतोय. प्राणी कुठे राहतात, कसे राहतात आणि कोणता प्राणी कोणाला खातो यामध्येही बदल होतोय.माणसाच्या राहणीतही फरक पडलेला आहे. जागतिक लोकसंख्येपैकी ५५ टक्के लोकसंख्या आता शहरांमध्ये राहते. पाच दशकांपूर्वी हे प्रमाण ३५ टक्के होते.मोठ्या शहरांमध्ये उंदीर, घुशी, रॅकून, खार, कोल्हा, लांडगा, माकडे अशा प्राण्यांना नवीन घर मिळते. बागा, उद्याने, माणसांनी केलेला कचरा यामध्ये हे सगळे प्राणी राहू शकतात. त्याचप्रमाणे मुंबईत कुत्री आणि कबुतरे हे मोठ्या प्रमाणात रोग पसरवतात. कबुतरांना खायला घालणारे आणि त्याचे हजारोंचे थवे उडताना हवेत पीसे, त्यांच्या अंगावरील किडे, त्यांची विष्ठा ते टाकतात. ते गर्दीतील माणसांमध्ये श्वासाद्वारे किंवा थेट जातात आणि अनेक रोगांचे बळी मुंबईकर पडतात. अनेकदा जंगलांपेक्षा या प्राण्यांना शहरांमध्ये जगणे सोपे जाते, कारण इथे त्यांना भरपूर अन्न मिळते. परिणामी या शहरी भागांमधल्या रोगराईतही वाढ होते. नवीन प्रजातीतला नवीन रोग हा अनेकदा जास्त धोकादायक असतो. म्हणून एखादा नवीन रोग आढळल्यावर चिंता व्यक्त केली जाते. शहरात राहणारी गरीब लोक ही बहुतेकदा स्वच्छता आणि साफसफाईच्या कामात सहभागी नसतात. त्यामुळे त्यांचा या रोगांच्या स्त्रोतांशी संबंध येऊन त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.शिवाय पुरेसा आहार न मिळणे, स्वच्छ-निरोगी वातावरण न मिळाल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असण्याची शक्यता असते. असे लोक आजारी पडल्यास त्यांना औषधोपचार परवडणारे नसतात. शिवाय शहरांमध्ये लहान जागेत जास्त व्यक्तींचा वावर असतो. हे सगळेच जण लहानशा जागेत श्वास घेतात, त्यांचा स्पर्शही अनेक गोष्टींना होतो. त्यामुळे शहरांमध्ये नवीन संसर्ग जास्त वेगाने पसरतात. काही संस्कृतींमध्ये शहरी प्राणी म्हणजे शहरातच पकडलेले वा परिसरातच जोपासण्यात आलेल्या प्राण्यांचे अन्न म्हणून सेवन केले जाते.आज कोरोना व्हायरसच्या आतापर्यंत ८ हजारांहून जास्त केसेस आढळल्या आहेत, तर यामुळे ३४० जणांचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न विविध देश करत असले, तरी याचे आर्थिक परिणाम होणार हे नक्की. प्रवासावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि आपल्यालाही याची बाधा होऊ शकते या भीतीने लोक एकमेकांशीही वेगळे वागत आहेत. परिणामी सरहद्द ओलांडून जाणे कठीण होते. जागोजागी जाऊन हंगामी काम करणाºयांना स्थलांतर करता येत नाही आणि याचा परिणाम उत्पादनावरही होतो. १५ वर्षांपूर्वी सार्सच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे सहा महिन्यांमध्ये अंदाजे ४० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. यामध्ये लोकांवरच्या उपचारांचा खर्च तर होताच पण आर्थिक व्यवहारांमध्ये झालेली घट, लोकांच्या स्थलांतरावर आलेले निर्बंध, यांचाही हा परिणाम होता. त्यामुळे हे व्हायरस, रोग किंवा जैविक अस्त्र जगाला संपवू शकते, प्रगतीत बाधा आणू शकते हे नक्की. प्रत्येक नवीन संसर्गजन्य आजार ही एक स्वतंत्र समस्या असल्याचे समाज आणि सरकारकडून पाहिले जाते. त्याच्याकडे जग बदलणारी एक गोष्ट म्हणून पाहिले जात नाही. आतापर्यंत जगातल्या एकूण रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणूंपैकी फक्त १० टक्केची ओळख पटलेली आहे. अजूनही इतर रोगकारकांची ओळख पटलेली नाही आणि प्राण्यांमध्ये हे विषाणू असू शकतात.शहरात राहणाºया अनेकांना शहरी प्राणी महत्त्वाचे वाटतात, पण यातल्या काही प्राण्यांमुळे धोके संभवतात, हेदेखील आपण लक्षात घ्यायला हवे. भटकी कुत्री आणि कबुतरे ही भविष्यात अशीच मानवजातीला धोका ठरणारी असू शकतात. आज रस्त्याने जाताना अत्यंत अस्वच्छ रोगी अशी कुत्री अंग फडकवतात, तेव्हा आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. त्यांच्या झटकण्यामुळे हजारो जंतू आपल्या अंगावर येत असतात याचे भान आपण ठेवत नाही. पण वेळी अवेळी होणारी सर्दी, त्वचारोग हे कुत्री आणि कबुतरांमुळे होतात. त्यांच्यापर्यंत असे व्हायरस आले, तर मुंबईत या रोगांची साथ वेगाने पसरू शकते. त्यामुळे शहरात नव्याने आढळणाºया प्राण्यांची नोंद ठेवणे, त्यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. शिवाय लोक जंगली प्राणी मारून खात आहेत का?, ते परिसरातल्या बाजारांमध्ये आणत आहेत का?, यावरही लक्ष ठेवायला हवे. चीनमधून किंवा अन्य देशातून काही पक्षी उडत असे व्हायरस पसरवायलाही येऊ शकतात. त्यामुळे हे दुधारी शस्त्र अत्यंत घातक आहे.
सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०
दुधारी शस्त्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा