एकाच वेळी राग, संताप, चीड निर्माण होते. केवळ कायद्याचे रक्षक आपले काम चोख करत नाहीत, वकील आणि न्यायव्यवस्था गुन्हेगारांना शिक्षा देत नाही, म्हणून या देशातील गुन्हेगारी वाढत आहे, याचीच साक्ष देणारी ही घटना आहे. पुण्यामध्ये अॅसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील पीडित मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. दररोज तो शाळेबाहेर थांबून पीडितेचा पाठलाग करत होता. ‘तुझ्या चेहºयावर अॅसिड टाकेन आणि तुज्या घरच्यांना मारेन,’ अशी धमकीही त्याने तिला दिली होती. घटनेच्या दिवशी तो जबरदस्तीने पीडितेला वाघोली परिसरात घेऊन गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याचा व्हिडीओदेखील तयार केला. घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पीडितेला दिली. आरोपीचा त्रास वाढत असल्याने पीडितेने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. हा फक्ततपास पोलीस करत आहेत, इथपर्यंतच प्रकार असतो. पोलिसांनी त्या आरोपीला पकडले आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाला, तरी त्याला आम्ही शिक्षा करू शकणार नाही. कारण ही तकलादू न्यायव्यवस्था!केवळ आणि केवळ त्या निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होऊनही त्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही. न्यायालय त्यांचा डेथ वॉरंट काढत नाही, त्यामुळे गुन्हेगार अत्यंत निर्ढावले आहेत. आम्ही कोणाही मुलीवर जाऊन बलात्कार करू शकतो. ही षंढ न्यायव्यवस्था आमचे काही वाकडे करू शकत नाही, असा संदेश यातून जात आहे. त्यामुळेच आता जनतेला आपले रक्षण आपणच करावे लागेल.आज कोणतीही मुलगी या देशात सुरक्षित नाही. कारण गुन्हे केले, तरी त्यांना तुरुंगात चांगले जीवन जगता येते, म्हणजे गुन्हेगार तुरुंगात आरामात जेवणखाण, टीव्ही पाहात जगत आहेत. पोलीस त्यांची बडदास्त ठेवत आहेत. पीडित माणसं तडफडत आहेत, ही आपल्या देशाची व्यवस्था आहे.कमजोर, बुजदिल, डरपोक न्यायव्यवस्थेमुळे गुन्हेगारांचे तुष्टीकरण होत आहे. त्यामुळे उजळ माथ्याने कोणतीही मुलगी आता बाहेर पडू शकेल, याची खात्री देता येत नाही.आता जनतेने रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. मंगळवारी ११ तारखेला जर न्यायालयाने या निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याचे डेथ वॉरंट काढले नाही, तर या देशातील न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडेल, फार मोठे अराजक माजेल आणि या व्यवस्थेला या देशाची न्यायव्यवस्थाच जबाबदार असेल.इतकी का न्यायव्यवस्था हतबल झाली आहे? कोणाचा दबाव आहे त्यांच्यावर की, डेथ वॉरंट काढण्याची हिंमत त्यांच्यात नाही? न्यायव्यवस्थेत कोण हस्तक्षेप करतो आहे आणि ही फाशी लांबणीवर टाकतो आहे, त्या सर्वांना आरोपीच्या पिंजºयात ओढले पाहिजे.देशाचे गृहमंत्री अमित शहा या प्रकरणात का लक्ष घालत नाहीत? बाहेरून येणारे घुसखोर सोडा आधी हे देशात राहून गुन्हेगारी करणारे आणि महिलांची इज्जत लुटणारे सांभाळा. जनतेने कायदे करण्यासाठी तुम्हाला पुन्हा सत्ता दिलेली आहे. कडक कायदा करा आणि गुन्हेगारांना ताबडतोब शिक्षा देण्याची तरतूद करा, नाही तर ही जनता रस्त्यावर उतरेल.आता निषेधासाठी मेणबत्त्या नेण्याची गरज नाही, तर हातात मशाली घ्याव्या लागतील. जनतेने रस्त्यावर उतरून न्याय करण्याची वेळ येईल. तशा घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत. न्यायव्यवस्थेने आपले काम चोख न केल्याने नागपुरात आक्कू यादवसारख्या घटनांमधून महिलांनी गुन्हेगारांना धडा शिकवलेला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलीला त्रास देणाºया गुन्हेगाराला तिच्या भावाने धडा शिकवला आहे. त्यामुळे स्वत:च्या रक्षणासाठी आता हातात शस्त्र घेऊन फिरावे लागेल. ही परिस्थिती कोणी निर्माण केली?गुन्हेगारांना पाठीशी घालणाºया आमच्या या न्यायव्यवस्थेने केली. आता सभ्य सामान्य घरातील तरुणांना आपले शिक्षण, नोकरी, करीअर सोडून महिलांच्या आया-बहिणींच्या रक्षणासाठी शस्त्र घेऊन फिरावे लागेल काय? असा प्रश्न पडतो.जे शस्त्र हातात घेऊन फिरू शकणार नाहीत, गुन्हेगारांचा सामना करू शकणार नाहीत, त्यांना आत्महत्या करून स्वत:ला संपवावे लागेल. इतकी भयानक परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे. याला इथली व्यवस्था जबाबदार आहे.अत्यंत क्रूरपणे बलात्कार करून खून करणाºया त्या नराधमांना फाशीची शिक्षा झालेली असतानाही त्यांना फाशी होऊ नये म्हणून प्रयत्न करणाºया वकिलांची सनद रद्द केली पाहिजे. हेच खरे अतिरेकी म्हणावे लागतील. निरपराधांवर बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी आणि या वकील व गुन्हेगारांना वाचवणाºयांमध्ये काय फरक आहे?अतिशय संताप येईल असाच प्रकार या देशात होत आहे. अराजक माजले आहे. सरकारला आपली सत्ता, काश्मीर, सीएए, एनआरसी हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, पण देशातील महिला असुरक्षित असताना त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे का वाटत नाही?अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहणाºयांनी त्या रामाचा थोडा तरी आदर्श घेतला पाहिजे. आपली पत्नी सीतेला पळवणाºया रावणाला लंकेत जाऊन रामाने ठार केले होते. आपण काय करतो आहोत? पळवून नेऊन बलात्कार करणाºया गुन्हेगारांना तुरुंगात ठेवून त्यांचे रक्षण करतो आहोत. त्यांना शिक्षा न देता सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहोत.अत्यंत वाईट काळ या देशात आलेला आहे. आज मंगळवार, ११ फेब्रुवारीला निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीचे डेथ वॉरंट न्यायालयाने काढले नाही, तर अशा घटना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ही घटना तुमच्या-आमच्या आसपास खुलेआम घडताना दिसेल. वर्धा हिंगणघाटसारखी घटना खुलेआम कुठेही दिसेल. तुमच्या मुली जाळल्या जातील, बलात्कार होतील, अॅसिड हल्ले होतील. पोलीस त्या गुन्हेगारांना पकडतीलही, पण त्यांना शिक्षा देण्याचे काम होणार नाही. सामान्य जनतेला तडफडत राहावे लागेल. पोटी मुलगी असणाºयांची अवस्था अत्यंत बिकट असेल. बेटी बचाओ आंदोलन उभारून मोदी सरकारचा काय उपयोग? त्या बेटीला आम्ही सुरक्षित जगू देत नसू, तर त्याचा काय फायदा? आहे याच्यावर कुणाचे काही उत्तर?आता करा, नाही तर मरा अशी वेळ आली आहे. स्वत:चे रक्षण स्वत: करण्यासाठी शस्त्र हातात घ्या, नाही तर आत्महत्या करा, हा एकच पर्याय जनतेपुढे आहे. हे सुराज्याचे लक्षण आहे का? हे स्वराज्याचे लक्षण आहे का? हे चक्क मोगलाईचे लक्षण आहे. मोगल काळात आया-बहिणींची अशी अब्रू लुटली जात होती. तोच प्रकार अजूनही असेल, तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल. आपला न्याय आपणच करायची हीच ती वेळ आहे. कारण सरकार, न्यायव्यवस्था गुन्हेगारांना शासन करण्यास असमर्थ आहे.
मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०
आता मेणबत्ती नको, मशाल हाती घ्या!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा