तो जिद्दी आहे. त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर कठीण अशी कामेही सहज करता येतात. त्यासाठी वडीलधाºयांचे आशीर्वाद आणि सदिच्छा फक्त आवश्यक असतात. या जोरावरच प्रथमेश एक उंच ध्येय गाठू शकला. नियतीने माणसापुढे उभी केलेली काही वैयक्तिक आव्हाने पेलणे खूपच अवघड असते, परंतु धैर्याने आणि सातत्याने प्रयत्न केल्यास अशी आव्हाने पेलता येतात, याचे जिवंत उदाहरण घालून दिले आहे, ते प्रथमेश दाते या मुलाने. आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणारा आणि दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारा हा प्रथमेश ध्रुव ताºयाप्रमाणे आपल्या कर्तृत्वाने अढळ असा आहे. आज प्रथमेश महाराष्ट्राचा अभिमान बनला आहे. त्याच्या या अभिमानास्पद कर्तृत्वाची ही कथा म्हणजे ज्यांच्या घरात मतिमंद मूल असेल, त्यांना दीपस्तंभ असेल, आदर्श असेल, छोट्याशा संकटाने नियतीपुढे माणसे झुकतात आणि नैराश्य प्राप्त करतात, पण प्रथमेश आणि त्याचे आई-वडील, कुटुंबीयांचे कर्तृत्व हे नियतीपुढे हार न मानता नियतीला झुकवणारे असेच आहे.इचलकरंजीचे प्रकाश दाते आणि शारदा दाते यांचा मुलगा प्रथमेश हा जन्मापासून मतिमंद होता. खरं तर हा शब्दच मला आवडत नाही. त्यातून इतके स्वत:ला सिद्ध करून दाखवणारा मतिमंद कसा? तो तर दिव्य गतीचा तारा आहे. त्याच्या कर्तृत्वाकडे पाहिले तर सामान्यांचीच मती गुंग झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सामान्य माणसाला जे जमणार नाही, ते त्याने करून दाखवले आहे. (ऊङ्म६ल्ल र८ल्ल१िङ्मेी) त्याने आज विक्रम प्रस्थापित केला आहे.शिक्षण फक्त इयत्ता ९ वी पर्यंत होऊनदेखील भारतातील सर्वात मोठ्या टेक्सटाईल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ग्रंथपाल सहाय्यक म्हणून गेल्या अकरा वर्षांपासून तो काम करीत आहे. ग्रंथपाल होणे ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी पुस्तकांवर प्रेम करावे लागते. त्यात काय आहे हे माहिती असावे लागते, म्हणूनच आपली शक्ती योग्य ठिकाणी खर्चून प्रथमेशने स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे.प्रथमेशच्या जन्मापासून सतत गेली अठरा वर्षे त्याच्या आई-वडिलांनी त्याला सर्वसामान्य जीवन मिळवून देण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी नियतीचा कौलस्वीकारला व अथक धडपडीतून दगडातून देव घडविला. त्याचे ऊङ्म६ल्ल र८ल्ल१िङ्मेी या आजाराचे निदान झाल्यापासून फक्त वैद्यकीय ज्ञानावर जिद्दीने प्रयत्नांचा पर्वत उभा केला. प्रचंड कष्ट घेतले स्वत:ची तहान-भूक विसरून केवळ प्रथमेश हा केंद्रबिंदू मानून अनेक वैद्यकीय उपचार केले. त्यानेही या साºया प्रयत्नांना खूप साथ दिली आणि या साºया परिश्रमाचे चीज झाले. आज हा मुलगा कठळएफठअळकडठअछ उएछएइफकळ झाला आहे .देवाने हे दु:ख आमच्याच का वाट्याला दिले असा सुरही कधी आळवला नाही आणि त्याची फलश्रुती म्हणजे हिमतीने उभा केलेला हा प्रथमेश. आजपर्यंत अनेक माध्यमांनी त्याच्या कर्तृत्वाची दखल घेतली. प्रथमेशच्या कार्यकर्तृत्वावर, मराठी, हिंदी, इंग्लिश, कोकणी, ओडिसा, गुजराती, कन्नड, वगैरे अशा दहा भाषांच्या दैनिकांतून त्याच्यावर आतापर्यंत ८० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत, तसेच वयाच्या २२व्या वर्षी त्याने ठअळकडठअछ अहअफऊ ऊएछऌक , तसेच पाठोपाठसलग दुसºया वर्षी राष्ट्रपती पुरस्कार मिळवला. सलग दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा ऊडहठ रठऊफडटए मुलगा देशभर प्रसिद्ध पावला. २०१२ सालीकठळएफठअळकडठअछ ऊडहठ रठऊफडटए (छडठऊडठ) अवॉर्ड त्याने मिळवला. अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा पहिला भारतीय आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याचा गौरवपूर्ण सत्कार केला आहे.२०१५ मध्ये चेन्नईत भरलेल्या कठळएफठअळकडठअछ ऊडहठ रठऊफडटएर या परिषदेमध्ये भारतीय वक्ता म्हणून या एकट्या प्रथमेशचीच निवड झाली होती. जगातील २५ देशांच्या ४०० प्रतिंनिधींसमोर प्रथमेशने संवाद साधला. या परिषदेमध्ये दीप प्रज्वलनातही भाग घेतला. इतकेच नव्हे, तर त्याने मोठ्या दिमाखात आपल्या भारताचा तिरंगामिरवत नेला. दाते कुटुंबीयांच्या कित्येक वर्षांच्या कठोर परिश्रमाचे हे फलीत होते. अर्थात, हे कसे केले हे फक्त दाते कुटुंबीयच जाणोत.असा हा दिव्य प्रथमेश इतक्यावर थांबला नाही, तर त्याची कीर्ती जगभर पसरली व जेट एअरवेज या नामांकित विमान कंपनीने त्यांच्या जेट विंग या मासिकात प्रथमेशवरफार मोठे आर्टिकल कव्हर केले. या मुलाला जगाच्या नकाशावर उभे केले, ते फ्रान्समधील भारतीय वंशाचे गिरीश मुजूमदार यांनी. जेट विंगमधील आर्टिकल वाचून ते बनवत असलेल्या मतिमंदांच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी प्रथमेशला फ्रान्सला बोलावले आहे. आतापर्यंत मिळालेल्या सन्मानामध्ये हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. त्यामुळेच अवरळफअछकअ अठऊ इऌअफअळ यांच्या संयुक्त विद्यमातून ऊडउवटएठळअफ ऋकछट बनविण्यात आली. या फिल्मसाठी प्रथमेशची भारतातून निवड झाली. या फिल्मला इडछछहडडऊ अठऊ ऌडछछहडडऊ या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिला क्रमांक मिळाला, तसेच तो ज्या ळएळकछए एठॠकठएएफकठॠ उडछछएॠए कॉलेजमध्ये काम करतो, त्या कॉलेजने त्याच्यावर, त्याच्या कार्यकर्तृत्वावर पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्या ज्या देशांत भारताबाहेर महाराष्ट्र मंडळे कार्यरत आहेत, त्यांच्याकडेमोफत पुस्तके पाठवून तेथील मतिमंद समस्याग्रस्त मुलांना व त्यांच्या पालकांना प्रेरणा देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे. या पुस्तकाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.अशा या प्रथमेशला उभे करताना त्याच्या कुटुंबाने जे कष्ट घेतले, प्रयत्न केले ते सर्वांसमोर यावेत यासाठी हे ते प्रयत्नशील राहात आले आहेत. मतिमंद मुलाच्या चिंतेत पालक सदैवअसतात. या सर्वांना प्रेरणा मिळावी व योग्य प्रयत्न केल्यास निश्चितपणे मतिमंद मूल सामान्य होऊ शकते, याचे प्रथमेश हे ज्वलंत उदाहरण आहे. ज्या कोणाकडे अशी समस्या आहे अशा पालकांनी प्रथमेशच्या आई-वडिलांकडून प्रेरणा घ्यावी. नियतीला झुकवून स्वत:ला सिद्ध करणारा प्रथमेश कायमच कौतुकास पात्र आहे.
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
नियतीलाही झुकवणारा प्रथमेश दाते
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
अंमलबजावणीबाबतही दिशा असावी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच आंध्र प्रदेशचा दौरा केला. या दौºयात त्यांनी दिशा कायद्याचा आढावा घेतला आहे. आता हा कायदा राज्यात लागू करण्याच्या दृष्टीने सरकारी स्तरावर हालचालीही सुरू झाल्या आहेत. आंध्र प्रदेशप्रमाणे राज्यातही लवकरच दिशा कायदा लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कायदा आल्यास आणि त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यास महिलांवरील अत्याचार रोखले जातील, असा दावा केला जात आहे. तेव्हा हा दावा खरा ठरेल आणि महाराष्ट्राला खºया अर्थाने एक नवी दिशा मिळेल, अशी आशा यानिमित्ताने करायला हरकत नाही, पण ही दिशा फक्त तपास आणि शिक्षा सुनावणीपुरतीच मर्यादित राहता कामा नये, तर शिक्षेची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे.आज निर्भया प्रकरणाला आठ वर्षे झाली. तपास आणि खटला हा जलदगती न्यायालयाने चालवला. ८ वर्षे शिक्षा देण्यास लागत असतील, तर त्याला जलद म्हणायचे का? शिक्षा सुनावल्यावरही डेथ वॉरंट निघाल्यावर ते दोन वेळा रद्द केले जाते. आता या ३ मार्चला फाशी देणार असल्याचे जाहीर केले आहे, पण ती होईपर्यंत काही खरे नाही. कारण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत दिशाच नाही. केवळ शिक्षा देण्यास होणारी दिरंगाई आणि वेळकाढूपणामुळे आपल्याकडे गुन्हेगारी वाढत आहे, हे कोणी ध्यानातच घेत नाही का? दिल्लीतील तपास, चौकशी, सुनावणी, निकाल आणि शिक्षेची अंमलबजावणी जर योग्य मुदतीत झाली असती, तर कोणी मायका लाल असे गुन्हे करायला धजावला नसता, पण कायदा आमचं काही करू शकत नाही हा गुन्हेगारांमधला वाढता आत्मविश्वास भयंकर आहे. याला कुठे तरी दिशा मिळण्याची गरज आहे.म्हणजे महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे सामान्यांमध्ये संतापाची भावना आहेच, पण एकीकडे हा संताप असतानाच दुसरीकडे मात्र यानंतरही महिलांवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनाही काही थांबताना दिसत नव्हत्या. नुकतीच सिल्लोडमध्ये अशीच आणखी एक घटना घडली. सिल्लोडमधील डोंगरगाव येथे एका विहिरीत आई आणि मुलीचे प्रेत आढळून आले. या दोघी काही दिवस बेपत्ता होत्या. या दोघींवर अत्याचार करून त्यांना गळफास लावून त्यांची हत्या करत त्यांचे मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप होत आहे. हिंगणघाट, सिल्लोड, सिल्लोड-डोंगरगाव या अशा एकामागोमाग एक घटना घडत असताना लासलगाव येथेही जळीतकांड झाले. पीडित महिलेला मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले, पण दुर्दैवाने तिचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटना घडत असताना मोर्चे निघत होते, निषेध व्यक्त होत होता, पण महिलांवरील अत्याचारांच्या घटना काही थांबत नव्हत्या आणि थांबलेल्याही नाहीत. वर्तमानपत्रांची पाने उलटली की, राज्यात कुठे ना कुठे महिलांवरील अत्याचाराची बातमी डोळ्यांसमोर येतेच. हे कधी थांबणार आहे?आंध्र प्रदेशात पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरनंतर हा कायदा केला गेला. २१ दिवसांत ही शिक्षा दिली जाईल, असे सांगितले गेले. मनात आणले तर हे अवघड नाही. बिल्कूलच नाही. राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते. या गुन्हेगारांना वाचवणारी शक्ती, मानवी हक्क आणि तत्सम ढोंगी बुरखाधारी प्रवृत्ती, पैशासाठी काहीही करायला तयार होणारी वकिली मानसिकता याला आळा घालण्याची गरज आहे. गुन्हेगारांचे वकीलपत्र घेऊन मोठे होणारे लोक या महाराष्ट्रात काही कमी नाहीत. आज विचारवंत म्हणून अनेक वाहिन्यांवर चर्चेत भाग घेणारे एक माजी न्यायाधीश हे चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्यातील जक्कलचे वकील होते. जक्कल सुतार मुनवर शाह आणि जगताप या खुन्यांची फाशी वाचवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले होते. आता तेच पुरोगामीत्वाचा ढोंगी बुरखा घालून विचारवंत म्हणून मिरवत असतात. ती केस घेतली नसती, तर ते इतके मोठे झालेही नसते, पण क्योंकि मैं झूट नहीं बोलता या सिनेमातील गोविंदाप्रमाणे गुन्हेगारांचे वकीलपत्र घेऊन पैसा कमावण्याची मानसिकता असलेले वकील हेच या दिशा नावाच्या यंत्रणेची दुर्दशा करू शकतात, म्हणून कालबद्ध कार्यक्रम ठरवला आणि किमान वेळेत निकाल देण्याचे नियोजन केले, तरी या बुरखाधारींपासून कोण संरक्षण करेल, ही समस्या आहे.बलात्कार पीडिता मरून जाते. तिचे नातेवाईक न्यायासाठी तडफडत राहतात. माध्यमांना खाद्य मिळते, म्हणजे शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड फार अशीच काहीशी अवस्था झालेली असते. त्यामुळे या न्यायप्रक्रियेतील विलंब टाळणे आणि शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नशील होणे हे सर्वस्वी राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असेल. आज पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला आजही एक वस्तू म्हणूनच समजले जात आहे का? असा प्रश्न पडतो. तिच्यावर अन्याय-अत्याचार करा, आपले कुणी काहीही बिघडवू शकणार नाही, अशी एक मुजोर विकृती काही जणांमध्ये निर्माण झाली आहे. असेच नराधम मग महिलांवर अत्याचार करताना दिसत आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात वेळोवेळी कठोर कायदे करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणीही होत आहे, पण प्रत्यक्षात या नराधमांना फाशीसारखी शिक्षा होत नसल्याने महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयश येत असल्याचा आवाज उठू लागला आहे. त्यातूनच महिला अत्याचाराविरोधातील कायदा आणखी कठीण करण्याची मागणी होऊ लागली आहे.आंध्र प्रदेशमध्ये दिशा नावाने अत्यंत कडक कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढण्यात येतात, तर दोषींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. साक्षी-पुरावे मिळवत सात दिवसांत पूर्ण करून पुढील १४ दिवसांत सुनावणी पूर्ण करत एकूण २१ दिवसांत दोषीला फाशी देण्यात यावी, अशी तरतूद या कायद्यात आहे. या कडक कायद्यामुळे कायद्याचा धाक राहून महिला अत्याचार कमी होतील, असे म्हणत आता महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. ही मागणी आणि राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलत राज्यातही दिशा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्याला योग्य दिशा मिळण्याची गरज आहे.आता दिल्लीतील निर्भयाच्या गुन्हेगारांना ३ तारखेला फाशी होईल, याची आशा करूया, पण राज्यात असंख्य निर्भयांना न्याय देणारा दिशा कायदा आला, तर ती खरी दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातील अन्य पीडितांना आदरांजली ठरेल. फक्त असे कायदे करण्यात, त्याची अंमलबजावणी करण्यात कोणी झारीतील शुक्राचार्य येऊ नयेत, एवढीच अपेक्षा. आपल्याकडे आठ वर्षांपूर्वी अंधश्रद्धेबाबतचा जादूटोणा विरोधी कायदाही केला, पण आजपर्यंत त्याद्वारे किती जणांना शिक्षा झाली? उलट या कायद्यासाठी आग्रही असलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचाच खून या राज्यात झाला. त्यावर कहर म्हणजे तपासासाठी पोलसांनी प्लँचेट करून दाभोळकरांचा आत्मा बोलावला होता. हे असले प्रकार जर दिशाबाबत झाले, तर काय करणार? म्हणून पूर्ण राजकीय इच्छाशक्तीने हा कायदा अंमलबजावणीला दिशा देणारा ठरला पाहिजे.
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
मराठी राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज
माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळाहिच्या संगाने जागल्यादºयाखोºयातील शिळा॥किती सहज शब्दातून आपल्या मराठी भाषेचा गौरव कुसुमाग्रजांनी केलेला आहे. मराठी भाषेतील अद्भूत साहित्यिक कवी कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवला जातो. कुसुमाग्रजांचाच जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून का गौरवला गेला आहे, यासाठी त्यांच्या कार्यावरून एक धावती नजर मारणे आवश्यक आहे. धावतीच, कारण शिरवाडकरांचे साहित्य इतक्या सहजासहजी पचनी पडेल आणि एका लेखात त्याचा आढावा घेता येईल असे नाही. म्हणून फक्त ओळखच करून घेता येईल.मराठीतील एक अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक अशा अनेक अंगांनी वि. वा. शिरवाडकरांनी आपले योगदान दिलेले आहे. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस म्हणजे २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे, अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. १९३३ साली त्यांनी ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ. ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. केवळ कवी असलेले वि. वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे, या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णत: लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्यावेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि अविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात.कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाच वेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. कुसुमाग्रजांची नाविन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नाविन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामिलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाजजीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाºयामध्ये हीच एक शक्ती अशी आहे की, जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही.अनुभवावर आधारित लेखनाला कुसुमाग्रजांनी प्राधान्य दिलेले आहे. माणसे संपत नाहीत, माणसाचे अनुभव संपत नाहीत, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही.कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद असतो. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसºयापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यांची ‘कणा’ ही कविता जगभर प्रसिद्ध आहेच, पण आणखी एक कविता मला फार आवडते. ती म्हणजे ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार...’ ही कविता बंडखोरांना आणि नव्याने काही करू पाहणाºयांना प्रेरणा देणारी आहे. ते एक क्रांतीचे महान गीत झालेले आहे. कायम इतिहासात रमणाºयांना आपल्या एका कवितेतून कुसुमाग्रज सुनावतात, पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका। मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका॥ काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वत:कडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे या मताचे कुसुमाग्रज होते. शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. म्हणून मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्यांची जन्मतारीख निवडली गेली आहे. शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात. ऋषिकेश मुखर्जींचा आणि पहिला सुपरस्टार आणि उगवता सुपरस्टार या राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या आनंद या चित्रपटाचा स्रोत हाच आहे, हे अनेकांना माहिती नाही.कुसुमाग्रज हे नाटककार होते. त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग असतो. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले. म्हणूनच कुसुमाग्रजांचे नटसम्राट, विदूषक ही नाटके प्रचंड गाजली, पण त्यांनी कर्णावर लिहिलेल्या नाटकातून कर्णाचे एक वेगळेच आणि खरे रूप दाखवण्याचे काम त्यांनी धाडसाने केले होते. कौंतेय या नाटकात त्यांनी उभा केलेला कर्ण हा उदारमतवादी नव्हता. कर्णाला महान केला तो शिवाजी सावंतांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीने, पण कर्णाचे वास्तव स्वरूप कौंतेय या नाटकातूनच समोर येते. म्हणूनच ते पचवणेही कठीण आहे, पण एखादा महान साहित्यिकच त्यावर भाष्य करू शकतो.कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली, तरी क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे असते. कुसुमाग्रजांच्या मते, लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो. आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही. लेखक नीतिबाह्य असू शकत नाही. प्रचलित नीतिकल्पनांच्या संदर्भात तो नीतिविरोधी असू शकेल. जुने नीतिनियम हे न्याय देण्यास असमर्थ होतात, मनावर अत्याचार करू लागतात, समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात. प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशावेळी रूढ नीतीचे उल्लंघन लेखक करतात. तेव्हा त्यांच्या प्रतिभेला, माणसाला माणुसकी देणाºया शुद्ध सनातन नीतीचे दर्शन व्हायला हवे. नीतीची ही कल्पना बुद्धिवादी आहे, पारंपरिक नाही. साहित्यात, अश्लिलतेचा प्रश्न सामाजिक बंधनाचा आहे, तसाच तो अनुभव प्रामाणिकतेचाही आहे. ही भूमिका एकदमच निराळी आहे.अशा अत्यंत विशाल अभ्यासकाने मराठी भाषा ही किती खोल, अथांग आहे हे आपल्या साहित्यातून दाखवून दिले आहे. त्या कुसुमाग्रजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
ट्रम्प भेटीमुळे भारताला संधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कुटुंबासह आजपासून म्हणजे २४, २५ फेब्रुवारी रोजी भारत दौºयावर येत आहेत. सोमवारपासून सुरू होणारा आठवडा हा ट्रम्प दौºयाने भारावलेला आणि दौºयाच्याच चर्चेने रंगलेला असणार आहे. मोदी-ट्रम्प जवळीकीमुळे आणि त्यांच्या गुजरात दौºयामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे, पण शेवटी एका मोठ्या महासत्तेचे नेते देशात येत आहेत, त्यामुळे आपणही थोडा समंजसपणा दाखवला पाहिजे. हे सर्व पक्षीयांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येकवेळी टीका केलीच पाहिजे, असे नाही. बाहेरच्यांसमोर घरातली भांडणे, वाद लांब ठेवले पाहिजेत, याचे भान सर्वांनी बाळगणे आवश्यक असते. आतापर्यंत म्हणजे १९५९पासून अमेरिकेच्या ६ अध्यक्षांनी भारताला भेट दिली आहे. ट्रम्प हे सातवे अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी भारताला विविध देशांच्या पंतप्रधानांनी अनेकवेळा भेट दिली असली, तरी अमेरिकेसोबतचे भारताचे नाते पाहता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा भारत दौरा विशेष मानला जात आहे.१९९० च्या दशकात सुरू झालेल्या जागतिकीकरणानंतर देशांतर्गत व्यापारासाठी अमेरिकेलाच नाही, तर जगातील अनेक देशांना भारत हा सर्वात महत्त्वाचा आणि लांब पल्ल्याचा साथीदार वाटू लागला आहे. गत आठवड्यात अमेरिकेने भारताला विकसित देशांच्या यादीतून बाजूला केले असले, तरी अमेरिकेसाठी भारत ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे आणि आपली व्यापारी गरज पूर्ण करण्याच्या हेतूनेच ट्रम्प यांनी या दौºयाचे आपल्या सत्ताकाळातील अंतिम टप्प्यात नियोजन केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक येत्या नोव्हेंबरपासून सुरू होईल. तत्पूर्वी ट्रम्प यांचा कार्यकाल संपलेला असेल. पुढची निवडणूकही ते लढणार असल्याचे संकेत आहेत, त्यामुळे अमेरिकास्थित भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठीच या दौºयाचा घाट घातला असल्याचे बोलले जात आहे, पण तो त्यांचा राजकीय हेतू असला, तरी आपल्याला त्याचा काही लाभ मिळतो का?, हे पाहणेही आवश्यक आहेच.अर्थात यानिमित्ताने, भारत आणि अमेरिकादरम्यान सप्टेंबर २०१९ मध्ये स्थगित झालेला व्यापारविषयक संवाद पुन्हा सुरू होणे ही एक स्वागतार्ह बाब आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यांमध्ये नियार्तीत झालेली घट आणि अर्थव्यवस्थेचा ढासळलेला वेग पाहता, ही भेट आणि चर्चा दोन्ही देशांसाठी उपयुक्त ठरत आहे. कोरोनामुळे सध्या चीन सर्व बाजूने कमकुवत पडत असतानाच अमेरिकेने भारतासमोर व्यापार करारासाठी चर्चा करणे हे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची मान उंचावणारे आहे. ही भारतासाठी संधी आहे. त्यात कोणी खोडा घालायची गरज नाही. दोन्ही देशांना द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सद्यपरिस्थितीत मोठी संधी आहे. त्यांच्या दौºयापूर्वीच दिल्लीच्या सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीम खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येते आहे. भारत याचा उपयोग स्वदेशी, रशियन आणि इस्रायली प्रणालींसोबत मिळून एक बहुस्तरीय ढाल बनवण्यासाठी करू शकेल. या सुरक्षा प्रणालीमुळे राजधानी दिल्ली केवळ मिसाइल हल्ल्यापासूनच नाही, तर ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाइलपासूनही सुरक्षित राहील. परिणामी, दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवून आणणे दहशतवाद्यांना अशक्यप्राय होईल. अमेरिका आपल्या तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या परदेशी लष्करी साहित्य विक्री कार्यक्रमांतर्गत भारताला संरक्षण साहित्याची विक्री करणार आहे. यासाठी अमेरिकेकडून भारताला स्वीकृतीपत्राचा अंतिम मसुदा जुलै-आॅगस्ट महिन्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. असे असले, तरी ट्रम्प यांच्या दौºयात त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. करार झाल्यानंतर पुढच्या चार वर्षांमध्ये अमेरिकेकडून ही सुरक्षा प्रणाली भारताकडे हस्तांतरित केली जाईल.त्याचप्रमाणे विविध मालांच्या निर्यातीसाठी भारताच्या बाजारपेठेत प्रवेश मिळण्याचा अमेरिका आग्रह करत आहे. भारत भेटीत यावर काही निर्णय होणे अपेक्षित आहेत. दोन्ही देशांमध्ये स्वदेशी वस्तूंसाठीचा आग्रह वाढत असल्यामुळे तणाव वाढत आहे. यामुळे नवीन व्यापारी करारात निर्माण झालेले प्रश्न सोडवावे लागतील. ट्रम्प भारताच्या आयातीवरील कर प्रणालीबद्दल नाखूश आहेत. मुख्यत: अमेरिकेतील हर्ले डेव्हिडसन मोटार सायकलींवरील उच्च जकात कराबद्दल त्यांनी भारताला टॅरिफ किंग म्हटले आहे. अमेरिकेने विशेषत: डाळींवरील कर कपात करण्याची मागणी केली आहे, तसेच भारताने काही डाळींच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्याबद्दल जागतिक व्यापार समिती आणि आॅस्ट्रेलिया, कॅनडा यांच्याकडे तक्रार केली आहे. अमेरिकेतून भारतात येणाºया वैद्यकीय उपकरणांवर भारताने कर कपात करावी आणि भारताचे त्या उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण नसावे, असाही एक प्रस्ताव अमेरिकेने भारतासमोर ठेवला आहे. भारतात येणाºया वैद्यकीय उपकरणांच्या आयातीत झालेली परिणामकारक वाढ पाहता यावर निर्णय घेताना आपला अंकुश या उपकरणांवर असणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे आणि म्हणूनच भारत यात तडजोड करणार नाही, हे स्पष्ट असताना याबाबत अमेरिका काय मध्यम मार्ग काढेल, हे पाहावे लागेल.ट्रम्प यांचा हा दौरा आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच असल्याने आपल्याला काही मोबदला मिळतो का?, याचा विचार करावाच लागेल. आणि पंतप्रधान मोदींनी तो केला असल्याशिवाय एवढा मोठा घाट घातला जाणार नाही हे नक्कीच. आज अमेरिकेत भारतवंशी नागरिकांची संख्या ३८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेतील स्थायिक भारतीय ट्रम्प यांच्यासाठी आगामी निवडणूक सोपी करू शकतात. वाढलेल्या भारतीय लोकसंख्येत तेलंगणा, आंध्र, गुजरात, केरळ, पंजाब राज्यातील अनेक लोक असून, गुजरातमध्ये आयोजित नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमामागे अमेरिकेची निवडणूक हाच मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. म्हणूनच भारतासाठी ही भेट काही मुद्यांवर लाभदायक ठरू शकते. काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्याच्या ट्रम्प यांच्या इच्छेला भारताने नकार दिला असला, तरी सौदीकडून भारताला होत असलेला तेल पुरवठा, इराणच्या मिसाइल कार्यक्रमामुळे त्रस्त झालेल्या ट्रम्प यांच्यासाठी भारत, इराण, अमेरिका संबंधात मध्यस्थी करू शकेल. अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीयांच्या सहभागासाठी ट्रम्प यांची ही भेट जशी महत्त्वपूर्ण आहे, तशीच ती दक्षिण आशियासाठीही खास आहे. वस्तुत: तीन आठवड्यांपूर्वी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रियाधमधील इस्लामिक सहकार संघटनेत झाली. या बैठकीत सौदी अरेबियाकडून दबाव आल्यानंतर काश्मीरचा मुद्दा चर्चेतून वगळण्यात आला होता, ज्यामुळे पाकिस्तान नाराज झाला होता. त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या तीन बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यास सहमती दर्शविली होती. तथापि, भारताने हा लवादाचा मुद्दा पूर्णपणे नाकारला होता. आता ट्रम्प स्वत: भारतात येत आहेत, आता यासंदर्भात ते आपली बाजू स्पष्ट करतील, अशी शक्यता आहे. काश्मीरच्या मुद्यावर अमेरिकेने अनेकवेळा भारताला पाठिंबा दर्शविला आहे. ट्रम्प यांचा हा भारत दौरा त्यांच्या निवडणूक प्रचाराचाच एक भाग आहे. ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे आणि ते सिनेटमध्ये त्यांच्याविरोधात सुरू असलेला महाभियोगाचा खटला निकाली निघाल्यानंतर येत आहेत. हा दौरा दोन्ही देशांचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरणार आहे. या दौºयामुळे भारत आणि अमेरिका यांचे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, अशी आशा दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे. जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर आजवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर कधी आले आणि कधी गेले ते कळतही नव्हते, यावेळी मात्र देशाच्या कानाकोपºयांत ट्रम्प भारतात येणार हे आधीच कळले आहे. त्यामुळे या भेटीचे फलित काय असेल याची उत्सुकता सामान्य माणसाला आहे, तसेच विरोधकांचेही त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा!
गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू बॉक्सर प्रणव राऊत याने नुकतीच आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील तळोजामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे दोन महिने होऊन गेले, तरी त्यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले नव्हते. आपल्या शेजारीपाजारी कोण, केव्हा येते-जाते याकडे लक्ष न दिल्याने ही गोष्ट लपून राहिली, पण अशा घटना तणावातून होतात. आज मायानगरी मुंबईमधील नागरिक मानसिक तणावाखाली असल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून उघडकीस आले आहे.त्याचप्रमाणे चारकोप परिसरात एका ४० वर्षीय महिलेने नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यातून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याआधी २२ वर्षीय तरुणीने ठाण्यातील स्कायवॉकवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच सुमारास २१ वर्षीय तरुणीने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली होती, म्हणजे प्रत्येक समस्येचे समाधान हे आत्महत्येत कसे काय शोधले जाते? हाच अंतिम उपाय आहे का? आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतोच आहे, आता खेळाडू, सामान्य माणसे, नोकरदार, विद्यार्थी सगळेच आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. हे काय चालले आहे? एवढे नैराश्य मनात का निर्माण होते?आत्महत्येचे विचार मनात येणे हा मनाचा दुबळेपणा आहे. हा दुबळेपणा माणसाला झटकून टाकता आला पाहिजे. तो झटकला पाहिजे.मानसिक तणाव हे या घटनांमागील प्रमुख कारण असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्यांच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे प्राथमिकदृष्ट्या मानसिक तणाव हे प्रमुख कारण असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याशिवाय बेरोजगारी, भविष्याची चिंता, प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध आदी कारणेही आहेत.जीवनाप्रती नकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यानेच असे प्रकार वाढीस लागल्याचे दिसते. आत्महत्या करणाºयांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी, पण तसे होताना दिसत नाही. तणावात जगणे प्रत्येकाला शक्य होत नाही. संघर्षापासून पळ काढण्याची प्रवृत्ती निर्माण होत आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.केवळ रोगमुक्त असणे म्हणजे आरोग्यसंपन्न असणे नव्हे. त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणे याचा अर्थ तो सकारात्मक आहे असे नाही. सकारात्मक व्यक्तिमत्त्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते.सकारात्मकपणे जगले तरच सकारात्मक परिणाम मिळतील याचा विचार केला पाहिजे. मनातील नकारात्मकता दूर होण्यासाठी कुठे तरी श्रद्धा असली पाहिजे. पूर्वी आपण देवावर विश्वास ठेवत होतो. मनातले गाºहाणे घालत होतो. आजकाल आमचा देवावर विश्वास राहिलेला नाही. कारण आम्ही सुशिक्षित झालो. नैराश्य निर्माण होते ते केवळ व्यक्त होता न आल्याने, मन मोकळे करता न आल्याने. साहजिकच मनाची घुसमट वाढत जाते. आपण देवाला साकडे घालून किमान त्याच्यावर सगळे सोडत होतो. त्यामुळे चिंतामक्त होतो. तो भोळा भावही शास्त्रीयच होता की, काय कोण जाणे, पण मनातील ही जळमटे, साचलेले कोणाला तरी सांगण्याची गरज असते. त्यासाठी मित्र असावे लागतात, चांगले नातेवाईक असावे लागतात. तेही नसतील तर एकांतात जाऊन एखाद्या दगडासमोर, झाडासमोर मन मोकळे करा आणि तणावाला मोकळी वाट करून द्या, पण मनातील नैराश्य झटकून टाकण्याची गरज आहे.आपल्या संस्कृतीत मंदिरे त्यासाठीच असतात. प्रार्थनास्थळे त्यासाठीच असतात. मशीद, चर्च, गुरुद्वारा ही सगळी मनाला उभारी देणारी स्थळे आहेत. आपल्या श्रद्धेप्रमाणे प्रार्थना करावी आणि मनाला शांती मिळवावी, जेणेकरून मनाला सकारात्मक ऊर्जा मिळेल असे काही करावे.प्रार्थनास्थळ नको असेल, तर वाचन करावे, नाटक, सिनेमा पाहावा, पण मन दुसरीकडे वळवून नकारात्मक विचार बाजूला केला, तर आत्महत्येचे विचार दूर होतील. मंगेश पाडगांवकर यांची कविता-भावगीत खूप लोकप्रिय आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपण आपल्या जगण्यावर प्रेम केले, तर त्यातील आनंद घेता येईल. आयुष्यात येणारे कटू प्रसंग हे जाण्यासाठी असतात. आत्महत्येने सगळे प्रश्न सुटत नाहीत. नैराश्य झटकण्यासाठी देवळात जा, निसर्गात जा, गाणी ऐका, पण मनाला आनंद मिळेल अशा गोष्टींचा वापर करा. मुंबईतील लोकांनी तर मस्तपैकी समुद्रावर जाऊन त्या अथांग सागराला साकडे घालावे. सगळं काही सामावून घेण्याची ताकद त्याच्यात आहे. सागर आपल्याला काय सांगतो? तो पोटात काही ठेवत नाही. तुम्ही समुद्रात कचरा फेकला, तरी तरी एक लाट येते आणि तो कचरा बाहेर फेकून देते. हे नैराश्य म्हणजे मेंदूतील कचरा आहे. तो फेकता आला, तर मन स्वच्छ होईल. आपोआप नैराश्य दूर होईल आणि आत्महत्येचे विचार दूर होतील.मन करा रे प्रसन्न हे संतांनी का सांगितले आहे? मनात चांगले विचार असतील आणि मन स्वच्छ असेल तर संकटावर मात करता येते. आज या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. नैराश्य दूर करण्यासाठी सामाजिक प्रयत्न व्हायला पाहिजेत.
रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०
इस प्यार को हम क्या नाम दे?
....
२१ फेब्रुवारीच्या शुक्रवारी संपूर्ण देशभरात एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वांनाच अवाक् करून टाकले. विचार करायला लावला. या चित्रपटाचे नाव आहे ‘शुभमंगल ज्यादा सावधान!’ एक वेगळा विचार देणारा उत्कृष्ट चित्रपट म्हणून याकडे पाहावे लागेल. कारण यामध्ये समलैंगिकतेचा विचार ज्याप्रकारे धाडसाने मांडला आहे, त्या धाडसालाही दाद दिली पाहिजे. हितेश केवल्य या लेखक आणि दिग्दर्शकाने अत्यंत संयमाने विनोदी पद्धतीने या विषयाला स्पर्श करून संपूर्ण समाजाला विचार करायला लावला आहे.कोणताही चित्रपट म्हटला की, त्यात हीरो, हिरोईन आली, पण इथे दोन हीरोच परस्परांचे हीरो आहेत आणि हिरोईन आहेत. कार्तिक (आयुष्मान खुराना) आणि अमन (जितेंद्र कुमार) या दोघांची ही लव्ह स्टोरी आहे. आपल्याकडे लव्ह स्टोरी म्हटल्यावर लैला-मजनू, हिर-रांझा, सोहनी-महिवाल, वासू-सपना यांच्या पलीकडे जात नाही. किंबहुना लव्ह स्टोरी ही फक्त एक युवक-युवतीचीच असते असा समज आहे, पण दोन तररुणांमध्येही प्रेमसंबंध असू शकतात, असा विचार रुजवणारा हा अत्यंत धाडसी चित्रपट.उत्तर प्रदेशातील त्रिपाठी कुटुंबातील ही कथा घेतली आहे. अत्यंत व्यंगात्मक आणि हास्यपूर्ण वातावरणात, संयमाने हाताळलेले कथानक हे लेखक आणि दिग्दर्शक कैवल्य यांचे कौशल्य म्हणावे लागेल. समलैंगिक आहे म्हणून कुठेही बिभत्सपणा न दाखवता त्यांच्या भावना, इमोशन्सचा विचार करून हा चित्रपट तयार केला आहे, म्हणून त्याचे कौतुक करावे लागेल.समलैंगिक असणे हा गुन्हा नाही, किंबहुना कोणी आपण होऊन ठरवत नाही, मी समलैंगिक असावे. त्याला निसर्गाने तसे घडवलेले असते. मुलगा होणे, मुलगी होणे हे जसे निसर्गाने ठरवले आहे, तसेच समलैंगिक मानसिकतेचा पिंड तयार होणे हेही निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे घृणेने पाहू नका, त्यांना त्यांचे जीवन जगू द्या, असा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. अत्यंत नाजूक विषय या चित्रपटाने मांडला आहे, म्हणजे एकादा माणूस मी मुलगा आहे, मी मुलगी आहे हे जसे सहजपणे अभिमानाने सांगू शकतो, तसाच मी गे आहे, मी समलिंगी आहे, हे पण अभिमानाने सांगता आले पाहिजे.आज समलिंगी किंवा गे लोकांकडे अत्यंत वाईट दृष्टीने समाज पाहतो, पण याच समाजाचे वाभाडे हा चित्रपट काढतो. जो समाज या गे लोकांना नावे ठेवतो, नाके मुरडतो, तो समाज तरी कुठे धुतल्या तांदळासारखा आहे? ‘हमाम में सब नंगे होते हैं’ त्याप्रमाणे पुरुष किंवा स्त्री म्हणून भिन्नलिंगी प्रेमावर विश्वास ठेवणाºयांचे प्रेमही किती मुखवट्याचे आहे, खोटे आहे हे दाखवताना आमचे प्रेम कसे खरे आहे, हे या शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटातून दाखवून दिलेले आहे.आज एखाद्याला गतीमंद मूल झाले, अंध, अपंग जन्माला आले, तर त्याला कोणी सोडून देत नाही. आहे त्या अवस्थेत त्याला जगवले जाते. त्याला सहानुभूतीने वागवले जाते. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केला जातो. मग गे म्हणून जन्माला आलेल्या अपत्यांबाबत आईबाप का असे वागत नाहीत? आपला मुलगा गे आहे म्हणून स्वत:ची प्रतिष्ठा कमी झाली असे का वाटते? तोही जीव आहे. त्यालाही भावना आहेत. गे म्हणून जन्माला यावे असे त्याने ठरवलेले नसते, पण मुलगा म्हणून त्याची वेगळी ओळख आहे, मुलगी म्हणून तिची वेगळी ओळख आहे, तशीच गे म्हणून किंवा समलिंगी आकर्षण असलेली व्यक्ती म्हणून आमची स्वत:ची ओळख असली पाहिजे, एवढीच त्यांची मागणी आहे, पण समाज त्यांना जगू देत नाही. केवळ शरीर पुरुषाचे आहे, म्हणून तू पुरुष म्हणूनच जगला पाहिजे. तू भिन्नलिंगी व्यक्तीशीच प्रेम केले पाहिजे. पुरुषाचा स्त्रीशीच विवाह झाला पाहिजे, असे त्याच्यावर बिंबवून त्याचा कोंडमारा केला जातो. त्याच्यावर औषधोपचार करून गे व्यक्तीला मूळ लिंगात आणण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्याला ते हवे आहे का? आपण गे आहोत, म्हणून त्याला अपराधी वाटत नसेल, तर आई-वडिलांनी, समाजाने त्याच्यावर जबरदस्ती का करावी? त्यांना त्यांचे जीवन जगू दिले पाहिजे. त्यामुळेच या चित्रपटातील दोन नायकांचा हा जो सहजीवनासाठी हक्क मिळवण्याचा संघर्ष आहे, तो लाजवाब आहे.या चित्रपटात कार्तिकची भूमिका आयुष्मान खुराना जगला आहे. अमनची भूमिकाही जितेंद्र कुमारने तितक्याच सहजतेने केलेली आहे. माझं कार्तिकवर प्रेम आहे हे सांगताना तो घाबरत नाही, तर आपल्या आईव्-वडिलांना ज्याप्रकारे पटवून देतो, त्यातून त्यांचा तो सभ्यतेचा बुरखाच फाडतो. कार्तिकला पाहिल्यावर आपल्या मनात काय आले, ते तुम्ही कधी प्रेम केलेत का? असे आई आणि बापाला विचारतो. आईचे पहिले प्रेम दुसरीकडे असते आणि लग्न दुसºयाशी होते. त्या प्रेमाला ती विसरू शकत नसते. बापाचेही तसेच असते. त्या प्रेमाचीच मला जाणीव झाली आहे, असे सांगून तो धक्का देतो, पण प्रेम कोणावर व्हावे याला काही अर्थ नसतो. ‘गधी पे आया दिल, तो परी भी क्या चीज हैं?’ अशी आपल्याकडे म्हण आहे. एखादा फालतू माणूस असतो, निकम्मा असतो, त्याच्यावर सुशिक्षित तरुणी भाळते. तिच्या जीवावर तो ऐषोआराम करतो, पण त्याला कोणी नावे ठेवत नाही. कारण ते दोन स्त्री-पुरुष आहेत, भिन्नलिंगी आहेत! पण मेड फॉर इच अदर दोन तरुण असतील, तर त्यांच्या सहजीवनाला, लग्नाला कोणी संमती देत नाही. कारण हे अनैतिक म्हणून संबोधले जाते, पण हे अनैतिक ठरवणारे कोण आहोत आपण? त्या दोघांची परस्परसंमती आहे आणि त्यांचे खरोखरच प्रेम असेल, तर राहू देना त्यांना एकत्र.प्रेम हे प्रेम असते. त्याचा शारीरिक आकर्षणाशी संबंध नसतो. त्यामुळे ते पुरुषावर केले काय, स्त्रीवर केले काय किंवा समलिंगी व्यक्तीवर केले काय, ते प्रेमच असते. त्याची तुलना कशाशीच होत नाही. त्यामुळे समलिंगी प्रेमाचे समर्थन करा असा आक्रोश करणारा हा चित्रपट आहे. कार्तिक जन्माला तसा आला म्हणून त्याच्या बापाने त्याला सतत मारहाण करायची, हा त्याचा दोष आहे का? पण तो बंड करून बाहेर पडतो आणि आहे मी गे, मला गे म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे समाजाला तो ओरडून सांगतो. मजनूला जशी मारहाण होते, तसाचा काठीने तो आपल्या प्रेमासाठी मार खातो, पण प्रेमात हार मानत नाही. अखेर त्यांच्या खºयाखुºया प्रेमापुढे समाज झुकतो आणि दोघांच्या लग्नाला समाज मान्यता देतो. गेल्या काही वर्षांपासून ३७७ कलमाची चर्चा या देशात झाली. परस्पर संमतीने कोणी समलिंगी संबंध ठेवले, तर तो अपराध असणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि या लोकांना मोकळा श्वास घेता आला, पण तरीही त्यांच्याकडे अनैतिक किंवा तिरस्काराने पाहण्याची समाजाची दृष्टी असते.आपले अनेक मित्र असतात. ते विवाहित असतात. त्यांच्याशी आपण मैत्री करतो, बोलतो, पण एखादी व्यक्ती समलिंगी आहे हे समजल्यावर सगळे जण त्यांना वाळीत टाकल्याप्रमाणे चार हात लांब राहतात. एखादी व्यक्ती समलिंगी आहे याचा अर्थ ती कोणाही बरोबर जाईल असे नाही. त्यांनाही काही आपला चॉईस आहे. समलिंगी कोणती व्यक्ती आपल्याला आवडते हे सर्वस्वी त्यांना ठरवण्याचा अधिकार असतो, पण उगाचच एखादी व्यक्ती गे आहे म्हणजे ती आपल्याही गळ्यात पडेल, असे समजून अनेक जण त्यांना टाळतात. कोणताही पुरुष किंवा स्त्री कोणाच्याही गळ्यात पडत नाही. त्या जोड्या ठरलेल्या असतात. तशाच गे लोकांच्याही जोड्या ठरलेल्या असतात. ते कोणाच्याही मागे लागत नाहीत.शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटात कार्तिक आणि अमनचा विवाह लावण्यास तो पुरोहित भटजी नकार देतो. त्यावेळी कार्तिक त्याची बाजू मांडताना म्हणतो की, तुम्हीच म्हणता ना, लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे मिलन? पण आत्म्याला कुठे लिंग असते? आज आमच्या आत्म्यांचे मिलन होणार आहे. त्यामुळे तो भटजीही ते लग्न लावतो. त्यांना मोकळे आकाश करून देतो, पण त्याअगोदर त्यांना जो संघर्ष करावा लागतो, तोही फार महत्त्वाचा आहे. आपल्याकडे प्रेम समलिंगींचे असो वा भिन्नलिंगींचे, त्यांना संघर्ष हा करावा लागतोच. लैला-मजून, रोमिओ-जुलिएट, वासू-सपना सर्वांनाच तो करावा लागला. मग अमन आणि कार्तिकला तो करावा लागला, तर आश्चर्य काय? पण प्रेम हे शरीरावर नाही तर आत्म्यावर, मनावर केले जाते. दोन मनांचे मिलन होते, दोन आत्म्यांचे मिलन होते, तेव्हा ते स्त्री-पुरुष आहेत की, समलिंगी, याला काहीच अर्थ नसतो, पण तरीही समाजापुढे आजही प्रश्न पडतो की, ‘इस प्यार को हम क्या नाम दे?’ पचवायला थोडं कठीण आहे, पण अवघड नाही!
तो कीस तितकाच खरा..साधारण लव्ह स्टोरी असलेला चित्रपट असला की त्यात प्रियकर प्रेयसीचा एखादा कीस किंवा चुंबन दृष्य अपरिहार्य असतेच. १९८१ च्या एक दुजे के लिये मध्ये कमल हसत रती अग्निहोत्री यांचे चुंबनदृष्य चांगलेच गाजले होते. त्याचप्रमाणे बेताब या चित्रपटातील सनी देओल अमृता सिंगचा कीस करतो तेंव्हाही प्रेक्षकांना सुखद आनंद मिळत होता. तसाच खरा चुंबनाचा आनंद या चित्रपटात जितेंद्रकुमार या चित्रपटात आयुष्यान खुर्रानाचा कीस घेतो तेंव्हा प्रेक्षकांना मिळतो.
शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०
विनयकुमार तुमचा जावई आहे का?
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार-खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी त्या गुन्हेगारांचे वकील आटापिटा करत आहेत. दोन वेळा फाशीची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता मार्च महिन्याच्या ३ तारखेला पहाटे ६ वाजता फाशी देण्याचे निश्चित झाले आहे, पण ही फाशी पुन्हा एकदा पुढे ढकलली जावी यासाठी दोषींच्या वकिलांचे प्रयत्न सुरू आहेत, हे अत्यंत वेदनादायी आहे. म्हणून या वकिलांना विचारावेसे वाटते की, हे आरोपी, विनयकुमार तुमचा जावई आहे का? विनयकुमारने दोन दिवसांपूर्वी तुरुंगातील भिंतीवर डोके आपटून जखम करून घेतली. फाशी देण्यासाठी निरोगी आणि मानसिक स्थिती योग्य असल्याशिवाय देता येत नाही. त्यामुळे या आरोपीची फाशी पुढे ढकलली जावी अशी याचिका गुन्हेगारांच्या वकिलाने केलेली आहे. आता याचेच अनुकरण अन्य आरोपीही करतील आणि फाशी पुढे ढकलण्याचा नवा फंडा वकील त्यांना शिकवतील. या लोकांना जगवून वकिलांना काय मिळणार आहे? गुन्हेगार हे या वकिलांचे जावई आहेत म्हणून का ते असा आटापिटा करत आहेत?या आरोपींना मनोरुग्ण, मानसिक आजारी, जखमी ठरवून त्यांची फाशी रोखण्याचा बहाणा हे वकील करत असतील, तर ते फार भयानक आहे. सामूहिक बलात्कार करून खून करणाºया निर्दयींना जगता येते आणि निर्भयांना मरावे लागते, हाच संदेश यातून जाईल. त्यामुळे देशभर भीती, अंदाधुंदी माजेल. त्याला हे वकील जबाबदार राहतील. आता दोन वेळा डेथ वॉरंट रद्द करून त्यांचे मरण पुढे ढकललेत. आता ३ मार्चची फाशी जर या गुन्हेगारांच्या वकिलांमुळे पुढे ढकलली, तर देशभर गुन्हेगार मोकाट सुटतील. दिसेल त्या तरुणीवर बलात्कार करतील. कारण त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल की, विनयकुमारच्या वकिलासारखे नराधम वकील या देशात आहेत तोपर्यंत आम्हाला कसलीही भीती नाही. म्हणूनच डेथ वॉरंट निघाल्यानंतर वकिलांनी लुडबूड थांबवली पाहिजे. आपली अक्कल जादा पाजळायची गरज नाही. आता हे आरोपी नाहीत, तर गुन्हा सिद्ध झालेले लोक आहेत. त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. अगदी तुमचे ते जावई असले तरी त्यांना वाचवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुमचे वकिली डावपेच चांगल्या कामासाठी वापरा, असे सांगावेसे वाटते.आरोपी विनयकुमारची वैद्यकीय उपचारांसाठी याचिका दाखल करून आता हे विद्वान वकील म्हणतात की, विनयकुमार शर्मा याने त्याच्या आईसह अनेकांना ओळखले नाही. तो मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे, असा बचाव करून त्याची फाशी वाचवण्याचा प्रयत्न करणारे वकील हे अत्यंत क्रूर असे आहेत, असेच म्हणावे लागेल. या नराधमांनी त्या निर्भयावर एकदाच बलात्कार केला, पण हे वकील असे मानसिक बलात्कार वारंवार करत आहेत आणि बलात्काºयांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे जर या नराधम वकिलांमुळे विनयकुमार आणि निर्भयाच्या बलात्काºयांची फाशी ३ मार्चला पुढे ढकलली, रद्द केली गेली, तर देशातील तमाम जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल. अशा वकिलांनाही शिक्षा करा, अशी मागणी करावी लागेल. जनतेला आपला न्याय आपणच करावा लागेल. तिकडे ती निर्भयाची आई आक्रोश करते आहे आणि या वकिलांना गुन्हेगारांना वाचवण्याचे वेध लागले आहेत.अत्यंत नीच प्रवृत्तीचे हे वकील आहेत असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. कारण वकिली डावपेच म्हणूनच त्याला डोके आपटायला सांगितले गेले असावे. वाईट या गोष्टीचे वाटते की, देशभरातील नामांकित प्रसारमाध्यमे अजूनही या चौघांचा उल्लेख आरोपी असा करत आहेत. त्यांना दोषी ठरवले गेले आहे, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तरीही त्यांचा उल्लेख गुन्हेगार, दोषी असा न करता आरोपी असा केला जात आहे. त्याचा गैरफायदा हे वकील घेत आहेत. त्यांच्या मते दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीने मानसिक विकार, स्मृतिभ्रंश आणि डोक्याला व हाताला झालेल्या जखमांवर अधिक चांगले उपचार करण्याची मागणी करणारी याचिका केली असून, त्याबाबत तिहार कारागृह प्रशासनाला बाजू मांडण्याचे आदेश गुरुवारी दिल्ली न्यायालयाने दिले. या प्रकरणातील आरोपी विनयकुमार शर्मा याने ही याचिका केली असून, त्याबाबत शनिवारपर्यंत म्हणणे मांडावे, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती धर्मेंद्र राणा यांनी तिहार कारागृह प्रशासनाला दिला आहे. शर्मा याने स्वत: तिहार कारागृहातील भिंतीवर डोके आपटून इजा करून घेतली आहे, असे कारागृहातील अधिकाºयांनी सांगितले. त्याचा जर स्मृतिभ्रंश झालेला आहे, तर त्याला याचिका करायची अक्कल कशी सुचली? तिथे का नाही विस्मरण झाले? आई-बापाला ओळखले नाही असा बचाव करून त्याची फाशी लांबवण्याचा प्रयत्न हे वकील करत आहेत, पण हे आई-बाप तरी काय म्हणून अशा नराधम कार्ट्याला भेटायला जात आहेत? त्याने काय पुरुषार्थ गाजवला आहे म्हणून तुरुंगात त्याला भेटायला आले पाहिजे? असली पोरं जन्माला घातली याचा पश्चाताप या आई-बापाला वाटायला पाहिजे. तो आता देशाचा गुन्हेगार आहे, तुमचा मुलगा राहिलेला नाही. तुम्ही मूल जन्माला घातलं होतं, गुन्हेगार नाही. त्यामुळे गुन्हेगाराने ओळखले नाही म्हणून वाईट वाटून घेण्याची गरज नाही. आई-बापाचा मुलगा हा गुन्हेगार नसतो, त्यामुळे त्याने ओळखले नाही, तर त्याचा ऊहापोह वकिलांनी करून फाशी लांबवण्याची संधी साधू नये.१६ तारखेच्या रविवारी दुपारी कारागृह क्रमांक तीनमध्ये ही घटना घडली, त्यामध्ये विनयकुमार याला किरकोळ दुखापत झाली आणि त्यावर कारागृहातच उपचार करण्यात आले, असे अधिकाºयांनी सांगितले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाने या याचिकेला विरोध केला. विनयकुमार शर्मा याने त्याच्या आईसह अनेकांना ओळखले नाही, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. शर्मा याच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून वकिलांनी कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली, तेव्हा विनयकुमार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे, उजवा हात मोडल्याने त्याला प्लास्टर केल्याचे, मानसिक विकाराने व स्मृतिभ्रंशाने त्रस्त असल्याचे आपल्याला आढळले, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. शर्मा याने कारागृहात त्याची आई आणि वकिलांनाही ओळखले नाही, असेही याचिकेत म्हटले आहे. हे कारण दाखवून फाशी लांबवली जात आहे, यासारखे दुर्दैव कोणते?याबाबत पाकिस्तानच्या न्यायालयाचा आदेश आदर्श म्हणावा लागेल.पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना काही दिवसांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी मुशर्रफ बाहेरच्या देशात आणि आजारी असल्याचे जेव्हा न्यायालयाला समजले, तेव्हा न्यायालयाने मुशर्रफ यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या प्रेताला तीन दिवस फासावर लटकवावे, असे आदेश दिले होते. मग असेही यांना मारायचेच आहे, या गुन्हेगारांना मारायचेच आहे, तर डोकी आपटली, फुटली, जखमा झाल्या असतील तरी त्यांना त्या अवस्थेत फासावर लटकवले पाहिजे, पण काही केल्या आता ३ मार्च ही तारीख पुढे जाता कामा नये.फाशी देण्यापूर्वी दोषींचे आरोग्य ठीक असणे महत्त्वाचे
तुरुंग मॅन्युअलनुसार, फासावर चढवण्यापूर्वी दोषींचे आरोग्य पूर्णपणे सामान्य असणे आवश्यक आहे. दोषी हा शारीरिक, तसेच मानसिकदृष्ट्या उत्तम असला पाहिजे. फासावर चढवण्यापूर्वी दोषीने संपूर्ण प्रक्रियेचा सामना केला पाहिजे हा त्यामागील उद्देश आहे. दोषीचे आरोग्य ठीक नसल्यास त्याला फासावर चढवण्यात येत नाही. फासावर चढवण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर दोषींना त्यांनी केलेला गुन्हा आणि शिक्षा याबाबतीत वाचून सर्व माहिती दिली जाते. आपण काय केले आहे, याची त्याला जाणीव व्हावी हा यामागचा हेतू असतो, पण याचा गैरफायदा वकील घेत आहेत. ते मानसिकदृष्ट्या योग्य नाहीत आणि शारीरिक तंदुरुस्त नाहीत या बहाण्याने ही फाशी लांबवली जाण्याचे प्रयत्न हे अत्यंत हीन-दीन असे आहेत.
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
पर्याय तयार होऊ शकतो!
या देशाची जनता कोणालाही केंद्रात दहा वर्षांपेक्षा जास्त सत्तेवर राहू देणार नाही. दहा वर्षांत नवा पर्याय उभा राहू शकतो यावर मतदारांचा आता विश्वास बसत आहे. त्यामुळेच आता मोदी सरकारची ही अखेरची चार वर्षे असू शकतात. कारण यूपीए-२ च्या काळात जे घडत गेले, तेच आता मोदी-२ सरकारबाबत होताना दिसत आहे. यूपीए-२ मध्ये डॉ. मनमोहन सिंग सरकारला प्रचंड नाराजीला, टीकेला सामोरे जावे लागले होते. आता तोच प्रकार मोदींच्या वाट्याला येताना दिसत आहे. त्यामुळे नवा पर्याय तयार होण्याच्या दृष्टीने विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. मोदींच्या उणिवा दाखवून त्यांची कामे झाकण्याचे प्रकार इथून पुढे पाहायला मिळतील. ज्या कलम ३७०, एआरसी, सीएए यामुळे मोदी सरकारचे कौतुक झाले, तेच त्यांना शापव्रत ठरतील काय? अशी भीती आता निर्माण झालेली आहे. विशेषत: महाराष्ट्रातील समीकरण आणि दिल्लीतील निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे अवघड आहे. ज्याप्रमाणे २०१३ च्या सुरुवातीला नरेंद्र मोदींना विकासपुरुष म्हणून भाजपने गोवा मार्गे पुढे आणले, तसाच एखादा उदय येत्या दोन वर्षांत होईल. काही तरी वेगळे घडेल असे वातावरण तयार होताना दिसत आहे.दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशभक्तीच्या मुद्यावरून घेरलें तेव्हा केजरीवाल यांनी आपण 'कट्टर देशभक्त' असल्याचं सांगितलं. त्यांनी किती तरी वेळा याचा उल्लेख केला की, भाजपने त्यांना अतिरेकी म्हटलं असलं, तरी ते 'कट्टर देशभक्त' आहेत. ११ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागला आणि आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला, तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह पक्ष कार्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांना 'कट्टर देशभक्त' म्हणाले, पण हेच केजरीवाल काही तरी चमत्कार करू शकतात. आज दिल्लीपुरती मर्यादित असलेली ताकद ते येत्या दोन वर्षांत देशभरात वाढवू शकतात. पक्षबांधणी करताना अनेक पक्ष विलीन करून घेऊ शकतात. अर्थात, केजरीवाल यांचे वैशिष्ट्य आहे की, ते विरोधासाठी विरोध करत नाहीत, म्हणजे आज काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष विरोधासाठी विरोध करतात. सरकार हा आपला शत्रू आहे या प्रकारे वागतात, तसे केजरीवाल यांचे नाही. दिल्लीने दिलेला निकाल मोदींच्या धार्मिक धोरणांविरोधात नाही. अरविंद केजरीवाल हे पहिले नेते होते, ज्यांनी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवलं, तर मागच्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानाचे आवाहन सर्व देशाला केले, तेव्हा हातात झाडू घेऊनही केजरीवाल उतरले होते. त्यामुळेच आपले वेगळेपण त्यांनी जपले आहे. त्यामुळे त्यांना मोठे होण्यास वाव आहे.अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या रणनीतीला आव्हान दिलेलं नाही. केजरीवाल यांनी या निवडणूक प्रचारात भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचा विरोध केला नाही. केजरीवाल यांच्या संपूर्ण प्रचार मोहिमेतून हाच संदेश गेला की, त्यांना धार्मिक राजकारणाची अडचण नाही, मात्र ते उघडपणे हे बोलणार नाहीत. ही सगळी मोदींच्या २०१४ च्या पावलावर पाऊल टाकण्याची लक्षणे आहेत. नरेंद्र मोदी नावाचे वादळ जेव्हा २०१४ ला आले, त्यापूर्वी वर्ष-दीड वर्ष ते निर्माण करताना सकारात्मकता दाखवली गेली होती. त्यांची प्रतिमा विकासपुरुष अशी केली होती, म्हणूनच अच्छे दिन आयेंगे असे स्वप्न निर्माण केले. त्यांनी थेट काँग्रेसवर टीका त्यावेळी केली नाही, तर मीच कसा चांगला आहे हे दाखवले होते. याउलट काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत मोदींवर प्रचंड टीका करत होती. त्यामुळे ती मनातून उतरत गेली. एकीकडे विकासपुरुष, हिंदुत्ववादी आक्रमक असा चेहरा तरुणांमध्ये लोकप्रिय होत असताना, त्याला मौत का सौदागर संबोधून काँग्रेसने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. तोच प्रकार आज भाजप करत आहे. केजरीवाल यांच्यावर चुकीची टीका करताना कधी त्यांना देशद्रोही म्हटले, तर कधी आणखी काही, पण केजरीवाल यांनी आपल्या कामावर मते मागितली. त्यामुळे हाच पर्यायी चेहरा येत्या दोन वर्षांत परिपक्व नेता म्हणून नव्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनू शकतो, किंबहुना आघाडी न होता १९७७ साली जसे अनेक पक्ष एका जनता पक्षाच्या नांगरधारी शेतकरी या झेंड्याखाली एक झाले. त्यात डावे, उजवे, जनसंघवाले एक झाले, तसेच आम आदमी पार्टीबाबत होउ शकते. कारण आता मोदी विरोधाची प्रचंड लाट निर्माण होताना दिसत आहे.विशेष म्हणजे, मोदींना जशी विजयाची सवय झाली आहे, तसेच केजरीवाल निवडणूक जिंकण्यात पटाईत झाले आहेत, मात्र त्यांना हे ठरवावं लागेल की, निवडणूक जिंकणारी मशीन व्हायचं आहे की, देशाच्या राजकारणात काही निर्णायक भूमिका बजावायची आहे. भाजप आणि मोदी यांची जी राजकीय वचनबद्धता आहे, त्याचा सामना केजरीवाल आपल्या राजकारणाने करू शकतील. त्यामुळेच मोदी आणि भाजपबद्दल जी भीती आहे, त्यावरचा तोडगा केजरीवाल आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. वीज आणि पाणी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचं काम कुठलाही राजकीय पक्ष करू शकतो. भाजपसुद्धा करू शकतो, मात्र आज देशाच्या लोकशाहीला केवळ वीज आणि पाणी हे प्रश्न भेडसावत आहेत का? मोदींचा विरोध करणारे केजरीवाल यांच्या विजयावर खूश होऊ शकतात, मात्र हा विजय पुन्हा त्याच भीतीत बदलू नये.राहुल गांधी यांनी कलम ३७०, सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी यांचा संसदेपासून रस्त्यापर्यंत विरोध केला आहे, मात्र काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळाली नाही. इतकंच नाही तर त्यांचा व्होट शेअरही २०१५ च्या तुलनेत घसरला.दिल्लीचा जनादेश मोदींच्या धोरणाविरोधात असता, तर काँग्रेसचा विजय झाला असता, आम आदमी पक्षाचा नव्हे. कारण मोदींच्या धोरणाचा उघडपणे विरोध राहुल गांधी यांनी केला आहे, अरविंद केजरीवाल यांनी नव्हे. एका मोदीचा पराभव करण्यासाठी घाईघाईत दुसरा मोदी तयार होऊ नये, अशी स्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळेच भारतीय राजकारण एका नव्या वळणावर आलेले आहे. आता कोणाला पक्ष, नेता याच्याशी काही पडलेले नाही. देशासाठी, सामान्यांसाठी, जनतेसाठी काय करणार बोला. दहा वर्षे काँग्रेसला दिली, दहा वर्षे भाजपला दिली आहेत. आता काँग्रेसकडे पर्याय नाही, पण केवळ पर्याय नाही म्हणून भाजपला, मोदींना पुन्हा निवडून देण्याची मतदारांची मानसिकता नाही. त्याचा फायदा उठवत आप हा पक्ष मोठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला आपले काम चोख करावे लागेल. कामावर बोलावे लागेल. वाचाळवीरता कमी करावी लागेल. वादग्रस्त विधाने करणाºया नेत्यांना लांब ठेवावे लागेल. यूपीए-२ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचा कोणी विचारच करत नव्हते. काँग्रेसचे दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर हे काहीही बोलत होते आणि राहुल गांधी त्यांच्या सुरात सूर मिसळत होते. त्यामुळे राहुल गांधींचे हसे होत होते. आज असेच वाचाळवीर भाजपमध्ये तयार होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपला हा धोक्याचा सिग्नल म्हणावा लागेल.तसं पाहिलं तर मोदी आणि केजरीवाल यांच्यात अनेक साम्यं आहेत, म्हणूनच केजरीवाल त्यांना पर्याय होण्याचा प्रयत्न करतील. दोघांनाही पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर विरोध सहन होत नाही. भाजपमध्ये मोदींना प्रश्न विचारणारा कुणी नाही, त्याचप्रमाणे आम आदमी पक्षातही केजरीवाल यांना प्रश्न विचारणारा कुणी नाही. दोघांचाही निवडणूक प्रचार व्यक्तीकेंद्रित असतो. दोघांसाठीही मंत्रिमंडळ आणि सभागृह यापेक्षाही वर त्यांचं मन आहे. आपण मोदींवर धर्मनिरपेक्षतेबाबत विश्वास ठेवू शकत नाही, तर ते केजरीवाल यांच्या भरवशावरही सोडू शकत नाही. ८ फेब्रुवारीला मतदानाला जाण्याआधी अरविंद केजरीवाल आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला अहमदाबादला जातात, तेव्हा ते दृश्य टीव्हीवर लाइव्ह दाखवण्यात येतं.म्हणजे एकीकडे मोदींचा पर्याय, त्यांच्या पद्धतीनेच कार्यपद्धती असलेले नेतृत्व, तीन वेळा मुख्यमंत्रीपद अगदी दिल्लीचे का असेना, पण सांभाळत आहेत. कारण भाजपला दिल्ली सांभाळता आलेली नाही. त्या तुलनेत ती काबिज करणे सोपे नाही. त्यामुळे ज्या प्रकारे यूपीए-२ मध्ये लोकप्रियता घसरत गेली, तशीच आता भाजपची अवस्था होण्याची शक्यता आहे. यूपीए-१ पेक्षा यूपीए-२ मध्ये काँग्रेसला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या होत्या. भाजपचेही तसेच झालेले आहे. त्यामुळे वाढते वाचाळवीर, महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, जनतेची भरकटल्यासारखी संभ्रमावस्था. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करत नसल्यामुळे त्याचा फायदा उठवत नवी शक्ती १९७७ च्या जनता पक्षाच्या फॉर्म्युल्यातून तयार होऊ शकते. खूप मोठा विकास केलेला चेहरा नसला, तरी सामान्यांना हवे असलेले विषय उचलण्यात केजरीवाल मातब्बर आहेत. त्यामुळे सामान्यांपर्यंत ते पटकन पोहोचू शकतात. त्याचा फायदा २०२४ ला पर्याय निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. भाजपचा मार्ग रोखण्याचे काम ते करू शकतात.
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०
युगपुरुष छत्रपती शिवराय!
आज देशातील अन्याय, अत्याचार, महिलांचा अवमान, न्यायास होणारा विलंब, भ्रष्टाचार, प्रशासकीय अधिकाºयांचा गहाळ आणि गलथानपणा पाहिला, तर पुन: पुन्हा वाटते की, ही विस्कटलेली घडी बसवण्यासाठी राजे पुन्हा तुम्हाला जन्माला यावे लागेल. आज शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशाने त्यांच्यापासून प्रेरणा घेतली, तर महिलांबद्दल वाकडे बोलण्याची, त्यांच्याकडे वाईट दृष्टीने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. मुली, आया-बहिणी उजळ माथ्याने फिरू शकतील असे राज्य फक्त छत्रपतींचा विचार, छत्रपतींची धोरणेच करू शकतात. आज त्याची या देशाला गरज आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते.छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर ज्याच्या अंगावर रोमांच आले नाहीत असा माणूसच शोधून सापडणार नाही. नुसती नावाची गर्जना केली, तरी एक प्रकारची ऊर्जा येते. त्या प्रत्यक्ष महाराजांचा इतिहास वाचला तर किती तरी आनंद, ऊर्जा आणि अभिमान मिळाल्याशिवाय राहात नाही. आज जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रूपांतर होऊन हिंदूपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले. भारतातील सर्वात शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते. छत्रपती शिवरायांचा महत्त्वाचा गुण म्हणजे कमालीचा साधेपणा होय. सैन्याबरोबर राहून त्यांनी सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगांना आनंदाने तोंड दिले. आज आपण जेव्हा अडचणींना, समस्यांना सामोरे जातो आणि आता काय करावे, हे सुचत नाही तेव्हा छत्रपतींचे स्मरण केले, तरी बरेच काही सुचू शकते. इतकी ताकद त्या व्यक्तिमत्त्वात आहे.संपूर्ण जगातील सेनानायकांच्या क्रमांकात शिवाजी महाराजांचे स्थान पहिल्या क्रमांकावरच आहे. १६४५-१६८० या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत सामर्थ्यशाली मोगलांचा किंवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किंवा मुस्लिम सेनानायक नव्हता की, ज्याचा महाराजांनी पराभव केला नाही. शहाजादे, इराणी व पठाण सरदार, तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायांपुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजलखानाशी केलेले युद्ध, शाहिस्तेखानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही, तर औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व गोष्टी त्यांच्यातील गुणांची प्रचीती देतात. कोणत्या वेळी नेमका काय निर्णय घेतला पाहिजे हे त्यांच्या रणनीती, युद्धनीती आणि राजकारणावरून समजून येते. सामान्य माणसांसाठी जगणारा राजा अशी त्यांची ख्याती होती, म्हणून प्रत्येकाच्या मनात कैक शतकांनीही त्यांच्या मनात घर केलेले आहे.छत्रपती शिवरायांनी समानतेचे तत्त्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य महाराजांनी निर्माण केले. शेकडो सेनाधुरंधरांना शिवरायांनी प्रशिक्षित केल्यामुळे राजांच्यानंतरही निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मराठ्यांचे स्वातंत्र्य या लोकांनी जगाच्या पाठीवरील सर्व बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून सुरक्षित ठेवले.शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असत. शहाजी राजांची सुटका, मोºयांचे उच्चाटन, अफजलखानाचा पराभव, स्वत:ची पन्हाळ्याहून सुटका, विशालगडावरचा चकवा, सुरतेची लूट, आग्य्राहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्त्व आपणास दिसून येते. केवळ पराकोटीचे मनोबल, धाडस आणि शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या या पराक्रमांतून दिसून येते. कुठेही आततायीपणा नाही, तर शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची त्यांची हातोटी ही त्यांच्या यशाचे रहस्य होते.अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय-धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपात पाहात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाºया अधिकाºयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता, तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाºया व आचरणाºया महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.आज आठ वर्षे निर्भयाच्या बलात्कारी, खुनी यांना फाशी देण्यासाठी लागतात. सर्व पुरावे असताना, फाशी देण्याचे ठरले असताना ती वाचवण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते. आपले कोणी काहीही करू शकत नाही, अशी समाजात प्रवृत्ती वाढते, दुष्ट प्रवृत्ती वाढीस लागते. यावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे छत्रपती शिवरायांसारखे राज्य निर्माण करणे. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारा राज्यकर्ता निर्माण करण्यासाठी छत्रपतींचा अभ्यास करणे हाच त्यावरचा उपाय आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपतींचा इतिहास समजावून घेतला पाहिजे. त्यांचा विचार रक्तात रुजला, तरच कायद्याचे, न्यायाचे, सामाजिक न्यायाचे, समतेचे राज्य निर्माण होईल. त्यालाच आपण शिवशाही म्हणू शकू. नुसतेच आम्ही शिवशाही आणू, शिवथाळी आणू, त्यांच्या नावाचे राजकारण करू यातून काही साध्य होणार नाही, तर महाराजांचा विचार आत्मसात केला पाहिजे. महिला-माता-भगिनींकडे आदराने बघणारा समाज निर्माण करण्याची गरज आहे. तसे कर्तृत्व राज्यकर्त्यांनी दाखवण्याची हीच ती वेळ आहे.
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
लेखा परीक्षकांना जबाबदार धरा!
सातत्याने होणारे बँकांमधील आर्थिक घोटाळे हे या देशापुढचे फारमोठे संकट आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये घोटाळे होत आहेतच, पण सहकारी बँकाही त्यात कुठे कमी नाहीत. कोकणात तर सहकारी बँका या शापीतच राहिल्या आहेत, पण यामुळे एक लक्षात येते की, कोणत्याही घोटाळ्याला बँकांचे संचालक मंडळ जबाबदार असले, तरी त्यांना पाठीशी घालणारी लेखा परीक्षक नावाची यंत्रणा कुचकामी ठरताना दिसत आहे. चार्टर्ड अकाऊंटंट किंवा सनदी लेखापाल यांची जबाबदारी घोटाळे रोखण्याची आहे. आॅडिट करण्याची आहे, पण ते खोटी प्रमाणपत्रे, आॅडिट रिपोर्ट, आॅडिट वर्ग बहाल करतात. त्यामुळे हे घोटाळे वाढत जातात हे लक्षात घेतले पाहिजे.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी लेखापालांना आता निरीक्षकाची नाही, तर रक्षकाची भूमिका घ्यावी लागेल. त्यांनी आक्रमक होणे गरजेचे आहे. आजवर या देशात आपण सहकारी बँका आणि पतसंस्था यांमध्ये घोटाळे झाल्याच्या बातम्या ऐकत होतो. घोटाळ्याची बातमी आली की, लगेच त्या बँकेपुढे रांगा लागतात आणि त्या बँकांवर आर्थिक निर्बंध लागतात, ती बंद पडते, कुठल्या तरी अन्य बँकेत विलीन होते. सगळेजण विसरून जातात. थोड्या दिवसांनी पुन्हा कोणत्या तरी बँकेची बातमी येते. आजवर आपण हे सहकारात पाहत आलो. त्यावेळी प्रत्येकाची प्रतिक्रिया असते की, राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवहार केले म्हणजे सुरक्षित असते. राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचारी हे अगदी काटेकोर नियमांवर बोट ठेवणारे असतात असा समज असतो. त्याचप्रमाणे सरकारी संरक्षण असल्यामुळे त्या बँका बंद पडण्याची भीतीही नसते, पण राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा खाजगी आणि सहकारी बँकांकडे ग्राहकांचा ओढा असतो याचे कारण त्यांच्याकडून मिळणारी जलद सेवा. राष्ट्रीयीकृत बँकांना तुमच्या तातडीची काहीही घाईगडबड, महत्त्व नसते. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी धावून येणाºया बँका या सहकारी, खाजगी क्षेत्रात असतात. त्यामुळे त्यांच्याकडे अनियमितता असणे स्वाभाविक असते. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँका कधीपासून अशा अनियमिततेला जवळ करू लागल्या? गेल्या वर्षी झालेले पंजाब नॅशनल बँकेतील प्रकरण देशाला हादरा देणारे ठरले. याचे कारण स्टेट बँकेच्या नंतर या बँकेचा नंबर लागत होता. असे असताना या बँकेत घोटाळा का झाला? अनियमितपणा का आला? अशी अनियमितता असू नये आणि कोणतेही भांडवलदारधार्जिणे धोरण न आखता सार्वजनिक हिताचे निर्णय घेण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले.
दहा वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक मंदीनंतर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसलेला असताना आणि अमेरिकेसारखा बलाढ्य देशही कोसळून पडलेला असताना भारताची अर्थव्यवस्था सावरली होती. त्यावेळी अमेरिकेने भारतीय धोरणाचे कौतुक केले होते. आमच्याकडे सर्व पैसा, बँका या खाजगी क्षेत्रात असल्यामुळे सगळा पैसा हा भांडवली बाजारात आला. भारताप्रमाणे आम्हालाही विचार केला पाहिजे की काही पैसा, काही टक्के सार्वजनिक क्षेत्रात हिस्सा असला पाहिजे. हा भारतीय धोरणाचा, समाजवादाचा विजय होता. याचे कारण १९६९ ला समाजवाद्यांच्या आग्रहाने इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने जर बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले नसते, तर सगळा पैसा शेअर मार्केटमध्ये गेला असता, पण कृषिप्रधान अर्थव्यवस्थेत शेतकरी, शेतीपुरक उद्योग, रोजगार चालना आणि स्वयंरोजगारासाठी सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून विकास साधता येईल हे धोरण होते. त्याप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांना कार्यक्षेत्र ठरवून दिलेले असते. त्या त्या क्षेत्राला, जिल्ह्याला दत्तक घेण्याचे काम राष्ट्रीयीकृत बँकांनी करायचे असते. तेथील कृषी आणि कृषिपुरक व्यवसायांचा विकास करायचा असतो. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना संरक्षण असते. असे असताना नीरव मोदीसारख्या भांडवलदाराला तिजोरीत हात मारायची संधी पंजाब नॅशनल बँकेसारख्या राष्ट्रीय बँकेने कशी काय दिली? भारतातील दुसºया क्रमांकाचा वित्त पुरवठा करणारी बँक अशाप्रकारे गौरवलेल्या या बँकेने सरकारी धोरणाला अभिप्रेत वित्त पुरवठा किती केला? सरकारी विकासात या बँकेचे योगदान किती आहे, याचा विचार करावा लागेल. सरकारी धोरणाला जर हरताळ फासण्याचे काम या बँकेकडून झाले असेल, तर ते अगोदर लक्षात का आले नाही? हे लक्षात आणून देण्याची जबाबदारी लेखा परीक्षकांची असते, आॅडिटरची असते. बँकांना किती प्रकारच्या आॅडिटला तोंड द्यावे लागते? बँकांचे अंतर्गत लेखा परीक्षण असते. हेड आॅफीसकडून होणारे असते. कंकरंट आॅडिट असते. रिझर्व्ह बँकेचे असते. इतके सगळ्यांचे लक्ष असूनही हे घोटाळे का होतात? याचे कारण बँकांचे आॅडिटर फक्त आॅडिट करताना फायली तपासतात. शेरे मारतात. अनियमित व्यवहार दाखवून देतात. रिझर्व्ह बँक ही मार्गदर्शकाचे काम करत असताना तिचे आॅडिटर समोर येऊन ठराविक मुदतीत या दुरुस्त्या करून घ्या असे सुचवतात. त्या सुधारणा केल्याचा अहवाल पाठवा असे सांगतात, पण प्रत्यक्षात हा अनियमितपणा, चुका दुरुस्त केल्या आहेत का नाही, याची तपासणी आॅडिटरकडून होत नाही. सगळ्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये आॅडिट झालेले असते तरी ते घोटाळे तसेच पुढे का रेटले जातात. कधीही आजपर्यंत अमूक एका आॅडिटरने तमूक एक घोटाळा बाहेर काढला आहे, असे झालेले नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही आॅडिटरला कधी शिक्षा झालेली दिसत नाही. आॅडिटरची भूमिका ही फक्त बघ्याची राहताना दिसते. चुका दुरुस्त करून घेण्यासाठी त्यांनी आक्रमक होणे गरजेचे आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या मानगुटीवर बसून ती अनियमितता दूर करून घेण्याचे अधिकार आॅडिटरला असले पाहिजेत. ही दूर केली नाही, तर आॅडिटरच्या अहवालावरून, तक्रारीवरून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना अटक करण्याची सोय असली पाहिजे. मऊ लागल्यावर कोणीही कोपराने खणणारच. पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदीबाबत तेच केले. अति जवळीक दाखवली. ती आॅडिटरच्या लक्षात आली असली, तरी फक्त हिरव्या शाईच्या शेºयांमध्ये कागदोपत्री राहिली. हे हिरवे शेरे दूर केले पाहिजेत. ते धोक्याचे सिग्नल आहेत हे सांगण्याचे काम आॅडिटरने केले नाही. कारण फक्त व्यवहार तपासायचे. ते चूक की बरोबर हे कागदावर मांडायचे, पण चूक असेल तर ते दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर नसते. त्यामुळे न्याय न होता हे चुकीचे कारभार तसेच सुरू राहतात. सतत होत राहतात. साचत साचत मोठा डोंगर तयार होतो. तसेच पंजाब नॅशनल बँकेचे झालेले आहे. सरकारी क्षेत्रातील बँक असल्याने ती सुरक्षित असली, तरी ही गैरप्रवृत्ती रोखली नाही तर त्याही बँकेला टाळे लागू शकते. अगोदरच बँकांची संख्या कमी करण्याचे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बँकांना टक्कर देण्यासाठी अनेक बँका एकमेकांत विलिनीकरणाचा विचार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यात पंजाब नॅशनल बँक कुठेतरी जाईल आणि यावर पडदा पडेल, पण असे प्रकार बंद होणार नाहीत. पुन्हा दुसरी कुठली तरी बँक सापडेल. हे प्रकार वारंवार होऊ नयेत म्हणून आॅडिटरला जादा अधिकार देऊन हे व्यवहार अधिकाधिक पारदर्शक करता येतील. त्यादृष्टीने लेखा परीक्षक किंवा लेखापाल किंवा आॅडिटर्स यांना आक्रमक होता आले पाहिजे. त्यातूनही घोटाळा झालाच तर त्याला आॅडिटरला जबाबदार धरता आले पाहिजे.
स्पॅनिश कायद्याचे अनुकरण भारतात व्हावे!
काम करता करता सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. साधारणपणे चहा, कॉफी किंवा सिगारेट यांच्यासाठी ब्रेक घेणं ही बाब इतकी मोठी मानली जात नाही, पण आता पुढे वारंवार सिगारेट ब्रेकसाठी गेलात, तर खिशाला कात्री लागू शकते. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे गरजेचे आहे.
स्पेनच्या एका कंपनीने याबाबत एक याचिका कोर्टात दाखल केली होती. सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची पगारकपात करण्याबाबत स्पेनच्या एका कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची पगारकपात करण्याचा अधिकार या कंपनीला प्राप्त झाला आहे. याचे अनुकरण संपूर्ण जगभर करण्याची गरज आहे, किंबहुना भारतात तरी ती होणे आवश्यक आहे. कारण आपल्याकडे काम करण्यापेक्षा टाइमपास करण्याचे प्रमाण जास्त असते. सिगारेट, तंबाखू सेवनाच्या निमित्ताने कामातील दिरंगाईचे प्रमाण वाढत जाते. एक सिगारेट दहा मिनिटे जळत असेल, तर त्यासाठी बाहेर येणे-जाणे यात किमान अर्धा तास वाया जातो. तीच गत तंबाखूची असते. तंबाखू मळायची, तोंडात टाकायची आणि सतरादा बाहेर थुंकायला जायचे. यामध्ये कामात दुर्लक्ष होत असते. भारतात तंबाखू खाऊन काम करणाºयांची संख्या फार मोठी आहे, किंबहुना तंबाखूमुळे अंतरही कमी होते, म्हणजे साहेब आणि शिपाई एका चिमटीत खातात. शिपाई आपल्या हाताने मळून देतो आणि कर्मचारी, शिक्षक खाताना दिसतात. या सगळ्या गलिच्छ प्रकाराला आळा बसला पाहिजे. इतकेच नव्हे, तर कामाव्यतिरिक्त फोनवर घरगुती विषयावर तासन्तास बोलून पॅसेजमध्ये अनेक कर्मचारी फिरत असतात. घरी बोलायला वेळ नाही, म्हणून आॅफिसच्या कामाच्या वेळेत बोलत राहतात. त्यामुळे दफ्तर दिरंगाई वाढत असते. अशा कर्मचाºयांचाही पगार कापला पाहिजे. खरं तर तंबाखू आणि सिगारेटवर कार्यालयीन वेळत बंदीच असली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा कर्मचारी दारू पिऊन आला, तर तो गुन्हा आहे, तसाच हा गुन्हा ठरवला गेला पाहिजे. कारण त्याचा इतरांना त्रास होत असतो.त्यामुळेच स्पेनच्या कंपनीचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. ही कंपनी आता या निकालाची अंमलबजावणी करणार असून, कामाव्यतिरिक्त वेळ घालवणाºया कर्मचाºयांचा पगार कापत असल्याचं ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाºया गल्प या कंपनीनं म्हटलं आहे.
एखादा झटपट घेतलेला कॉफी ब्रेक असो किंवा सहकाºयासोबत नाश्ता करण्यासाठी लागलेला वेळ, गल्पच्या धोरणांनुसार आता याचा पगार कापण्यात येत आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही नियमावली लागू करण्यात आली होती.कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचा विरोध करत कंपनीला कोर्टात खेचलं होतं. पण स्पॅनिश कायद्यांच्या नुसार, कंपनीसाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे. कर्मचार्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं.
ही देखरेख कर्मचाºयांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी, तसंच कामातील लवचिकता वाढवण्यासाठी करण्यात आली होती.यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार, स्पेनमध्ये २०१९ मध्ये तीस लाख तास ओव्हरटाइम करण्यात आला, पण याचा मोबदला कर्मचाºयांना मिळाला नाही. कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्यामुळे, तसंच त्यांना विनामोबदला ओव्हरटाइम करावा लागत असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून हा नियम लागू करण्यात आला. हे भारतातही झाले पाहिजे. कामाच्या वेळेत टाइमपास करायचा आणि नंतर ओव्हरटाइमचे बिल पाठवायचे हा प्रकार म्हणजे कंपनीला बुडवण्याचा प्रकार आहे. आज या निर्णयाचा स्पेनमधील सुमारे १० लाख धूम्रपानकर्त्या कर्मचाºयांवर परिणाम झाला आहे, पण यातून काही तरी चांगले निर्माण होईल, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे जे स्पेनमध्ये घडले, ते भारतात झाले, तर फार मोठी प्रगती होईल. सिगारेट तंबाखू आणि चहाच्या नावाखाली कर्मचारी किती टाइमपास करतात. त्यामुळे फार मोठी दफ्तरदिरंगाई होत असते. त्यामुळे जनतेचे, सार्वजनिक ठिकाणचे नुकसान होत असते. त्यामुळे अशी पगारकपातीची कारवाई या देशातही होणे आवश्यक आहे.
आज परिस्थिती अशी आहे की, आओ-जाओ घर तुम्हारा. त्यामुळे कर्मचारी कार्यालयात कधी येतात, कधी जातात या सगळ्यांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. त्याद्वारे ते किती वेळ काम करतात याची आकडेवारी कंपन्या ठेवू लागल्या. बायोमॅट्रिक थम्ब इम्प्रेशनच्या नोंदीमुळे बºयापैकी आळा बसला आहे. उशिरा कामावर येऊन आधीच्या वेळेची नोंद करायचे प्रकार आता करता येत नाहीत, पण सिगारेट, तंबाखूच्या निमित्ताने टाइमपास करणारी प्रवृत्ती मात्र मोठी असते. याला आळा बसण्यासाठी भारतातही असा कायदा झालाच पाहिजे.आपल्याकडे चार वर्षांपूर्वी भाजप सरकारने कोणत्या कामासाठी किती वेळ असला पाहिजे. नागरिकांची कामे किती दिवसांत पूर्ण झाली पाहिजेत, याबाबत एक कायदा केला होता, पण आज त्याचा परिणाम शून्य आहे. कारण त्याची अंमलबजावणी झाली नाही. प्रशासनाने तो कायदा बासनात गुंडाळून ठेवला.
पण गल्प या कंपनीत आपल्या कामाच्या वेळेत जेवण करणाºया किंवा सिगारेट ब्रेकसाठी बाहेर जाणाºया कर्मचाºयांना पूर्ण दिवसाचा पगार देण्यात आला नाही. या कालावधीतले त्यांचे पैसे कापण्यात आले. त्याचा धक्का जगभर बसला, पण त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे.आता स्पेनच्या हाय कोर्टानेही सिगारेट, कॉफी किंवा नाश्त्यासाठी ब्रेक घेणाºया कर्मचाºयांना त्या वेळेचे पैसे देण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची पगारकपात होणार, हे निश्चित. युरोपियन राष्ट्रे ही शिस्तीने मोठी झालेली आहेत. आपल्यालाही शिस्त बाळगून भारत मोठा करता येईल. महासत्तेचे स्वप्न पाहण्यापूर्वी कर्मचारी वेळेत कामाला येतात की नाही, ते वेळेवर काम करतात की नाही, हे पाहिले पाहिजे. रोजच्या दिवसाचे काम रोज वेळेत करतात की नाही, यावर लक्ष दिले पाहिजे.
प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार युरोपीय देशांमध्ये स्पेनचे कर्मचारी सर्वात जास्त काम करतात. पोर्तुगाल किंवा इटली यांच्याप्रमाणे स्पॅनिश लोक आपला जास्तीत जास्त वेळ कार्यालयाच्या ठिकाणी घालवतात, पण तरीही त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ आलेली आहे. आपल्याकडे भारतात मुळातच कामावर उशिरा येण्याची आणि काम कमी करण्याची प्रवृत्ती आहे. त्यातही सीएल, पीएल, मेडिकल लिव्ह अशा विनाकारण रजा घेण्याची प्रवृत्तीही असते. कर्तव्याची जाणीव नाही, पण हक्काची जाणीव आपल्याकडे असते. रजेचा आमचा हक्क आहे, पण कामाचा नाही, अशी प्रवृत्ती आहे. त्यामुळे भारतातही शिस्तीचा कायदा झाला पाहिजे.
दास रामाचा समर्थ रामदास स्वामी
भक्तीमार्गासाठी नवनाथी संप्रदाय आणि त्यांच्या ८४ सिद्धांची निर्मिती झाली. त्या ८४ सिद्धांपैकी एक म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आज दासनवमी हा रामदास स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस. भक्ती, शक्ती, युक्ती याचा साक्षात्कार म्हणजे समर्थ रामदास स्वामी. केवळ संत नाही, तर त्यांची साहित्य संपदा ही फार मोठी आहे. ते महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाºया समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते संत होते.समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते निस्सीम सूर्योपासक होते. ते रोज ‘आदित्यहृदय’ या स्तोत्राचा पाठ करीत असत. गंगाधर व नारायण या त्यांच्या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदासस्वामी (=नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षांचा असतानाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा, एक लोहाराचा, तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला.नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. या तप:साधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा, तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राममंत्राचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ म्हणून ओळखली जातात. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षांच्या या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षांचे होते.समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली.समर्थांच्या शिष्यमंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते - समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधीसोपी होती.आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली, पण पुढील १२ वर्षांच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गावी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा। यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. डोंगरकपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे, तर गंगा, यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे। या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाºया समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदासस्वामी भारावून गेले.रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत्ा्, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वत:कडे कर्तेपण घेतो, असे ते सांगतात.त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. परमात्मा हा चराचरांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे.समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना, तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरती उदाहरणार्थ ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती, ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ ही शंकराची आरती, काही पदे इत्यादी त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदासस्वामींच्या आरतींनी घराघरांत स्थान मिळवले आहे. आपण ज्या विविध आरती म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजाºयाला आरती येत नाही हे पाहून त्यांनी ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेताना समर्थांना ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ ही आरती स्फुरली. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.दासबोधाशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरती, भूपाळी, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।रामदासस्वामींची वाङ्मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरती त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङ्मयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्मय प्रकाराचा उहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्मयातून समर्थ काय सांगतात, हे पाहतानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. अशा या साहित्यिक संत रामदासांनी कायम रामाचा दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानली होती.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)