शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

मुंबईतील महिला अजूनही असुरक्षित

सर्वांना सामावून घेणाºया मुंबईत आज महिला असुरक्षित आहेत. ही मुंबईच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. गुरुवारी रात्री सीएसएमटी ठाणे लोकलमध्ये मद्यधुंद माणसाने एका महिलेला मारहाण करुन तिची छेडछाड केली. ती महिला लोकलमध्ये एकटी होती, पण शेजारच्या डब्यातून पाहणाºयांनी त्याचे चित्रिकरण करून ती क्लीप व्हायरल केली. शुक्रवारी सकाळी नालासोपाºयात पत्ता विचारण्यासाठी आलेल्या व्यक्तिने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या मुलीने टेरेसवरून उडी मारून स्वत:ला छेडछाडीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तर भयंकर आहे. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आलेला आहे. मुंबईबाबत एकेकाळी अभिमानाने सांगितले जात होते की रात्री-अपरात्रीही महिला उजळ माथ्याने फिरु शकतील. पण आज महिलांच्या मनात ही भीती निर्माण झालेली आहे. गर्दीतही महिलांना छेडछाडीला सामोरे जावे लागते आहे असे नाही, तर छेड काढणारे नराधम घरापर्यंत घुसू लागले आहेत. ही बाब अत्यंत चिंतेची आहे. २०१२ च्या दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेबाबत कायदे कडक केल्याचे बोलले गेले. पण त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. छेडछाड करणाºया प्रवृत्तींना वचक बसेल असा कायद्याचा बडगा अजून पडलेला दिसत नाही. त्याचप्रमाणे समाज नावाचे जे भान असावे लागते त्याचाही अभाव दिसून येतो. अनेक एनजीओ, संघटना, पक्ष मुंबईत सक्रिय आहेत. पण त्यांच्या विषयापलिकडे जाऊन महिलांच्या सुरक्षेबाबत काम करताना कोणीच दिसत नाही. एखादी घटना घडली, बलात्कार, अत्याचार, छेडछाडीची घटना घडल्यानंतर अनेक संघटना रस्त्यावर उतरून निषेध करतात, मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढतात, पण घटना घडू नये यासाठी कोणी प्रयत्न करत नाही. काही दशकांपूर्वी मुंबईचे रक्षण करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे, असे शिवसेना नेते आपल्या भाषणातून बोलत होते. मुंबईत शिवसेना असल्यामुळे महिला उजळ माथ्याने फिरु शकतात असे बोलले जात होते. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. महिलांना सुरक्षितपणे राहणे अवघड झाले आहे. हे मुंबईतून शिवसेना संपल्याचे लक्षण आहे का? मुंबईची सत्ता अनेकवेळा इथल्या मतदारांनी शिवसेनेकडे सोपवली ती याच विश्वासाने की आमच्या आया-बहिणी सुरक्षित राहतील. पण आता महिलांना सुरक्षा पुरवण्यात शिवसेना अपयशी ठरत असताना शिवसेनेचे अस्तित्व संपले म्हणावे लागेल काय? कशी हिंमत होते गुंडांची सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीचे प्रकार करायची? ही गुंडांची दहशत मोडून काढणे आज गरजेचे आहे. कधीही महिलांची छेडछाड काढली, बलात्कारासारखी घटना घडली की त्या महिलेकडे वाईट नजरेने पाहिले जाते. तिलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अशा घटना घडल्यावर महिला निमूटपणे सहन करतात. हे चित्र आपण बदलणार आहोत की नाही? यंत्रणा इतकी अद्ययावत असताना त्याचा वापर का केला जात नाही? या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आज मुंबईतील प्रत्येक रेल्वेच्या डब्यात इंडिकेटर सुरु असतो. पुढील स्टेशन कोणते येणार हे सांगण्याच्या मधल्या वेळेत महिलांच्या हेल्पलाईनचा क्रमांक तिथे लिहिलेला असतो, स्क्रोल होत असतो. त्याचा नेमका उपयोग काय आहे? त्याचा वापर कोणी कसा करायचा? लोकल थांबल्यावरच त्या पिडीतेला त्याबाबतची तक्रार मदत करता येणार का? चालत्या रेल्वेत सुरक्षा पाहिजे असेल तर काही उपाय नाही का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. गुरुवारच्या घटनेत अपंगांच्या डब्यात त्या मद्यपीने घुसून महिलेला मारहाण केली आणि छेड काढली. याचा अर्थ ती महिला अपंग असणार. अपंगांच्या डब्यात सहसा कोणी जात नाही. अशा डब्यात एक मद्यपी कसा घुसू शकतो? त्यावर रेल्वे प्रशासनाचा अंकुश नाही का? रात्रीच्या वेळी महिलांच्या आणि अपंगांच्या डब्यात पोलिस, होमगार्ड असला पाहिजे. तशी व्यवस्था का केली जात नाही? महिलांच्या डब्यात घुसून छेडछाडीचे प्रकारही अनेकदा घडतात. त्यामुळे बºयाचवेळा महिला जनरल डब्यातून गर्दीतून प्रवास करणे पसंत करतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. दुसºया घटनेत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एखादा अनोळखी माणूस येतो आणि छेडछाड काढतो. त्याला घाबरून ती मुलगी स्वत:ला संपवण्याचा प्रकार करते. हा प्रकार म्हणजे एकप्रकारचा जोहारच म्हणावा लागेल. म्हणजे मोगलाईच्या काळात मोगलांच्या अत्याचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी राजपूत स्त्रिया जोहार करुन स्वत:ला संपवायच्या. नुकत्याच गाजलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटातून अशा इतिहासाची उजळणी झालेली आहेच. राजपूत पुरुषांना मारून स्त्रियांचा गैरफायदा घेणारी प्रवृत्ती त्या काळात उफाळून आली होती. आज महाराष्टÑात मोगलाई आहे का असा प्रश्न त्यामुळे विचारावा लागेल. कोणाची सत्ता आहे आज मुंबईत. का नाही मुंबईतील महिलांना निर्भयपणे वावरता येण्यासारखी परिस्थिती निर्माण होत? छेडछाडीचे प्रकार करणारी गुंड प्रवृत्ती आली कुठून? हा महाराष्टÑाचा इतिहास नाही. अन्य कुठेही अशा घटना घडल्या तरी त्या मुंबई आणि महाराष्टÑात घडता कामा नयेत. ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली आहे, त्या महाराष्टÑात महिला असुरक्षित आहेत हे दिसणे ही आपल्या मराठी माणसाला लाजवणारी गोष्ट आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करून या महाराष्टÑात, शिवशाहीत महिलांना सन्मानाने वागवण्याची शिकवण देणाºया महाराष्टÑात महिलांच्या सुरक्षेसाठी आता मराठी माणसाला रस्त्यात उतरावे लागणार का? मुंबईत असे प्रकार करण्याची कोणाची हिंम्मत होणार नाही यासाठी आता ठोस काहीतरी करावे लागेल. महिलांची छेडछाड होणे, त्यांची अब्रू लुटणे हे महिलांवरचे नाही तर मुंबई आणि महाराष्टÑावरचे संकट आहे. कारण हा महाराष्टÑाचा अपमान आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्यात अशी घटना घडताच कामा नये. कोणीही येतो आणि उघडपणे छेडछाड करत असेल तर त्याला मराठी इंगा दाखवावा लागेल. सरकारने, प्रशासनाने तशी पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. छत्रपतींनी दिलेल्या महाराष्टÑाच्या विचारांचा, स्वाभिमानाचा सन्मान करण्यासाठी कठोर यंत्रणा राबवणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: