- पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. ुपंधरा दिवसांपूर्वी एक भीषण अपघात या महामार्गावर घडला आणि त्यामध्ये सातार्यातील काही लोकांसह १७ जणांचे प्राण गेले. त्यानंतरही सातत्याने छोटे मोठे अपघात गेल्या पंधरा दिवसात घडले आहेत. एक्स्प्रेस वेवरील या अपघातांकडे पाहताना तात्कालिक कारणांबरोबरच मूलभूत गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबतही पाच-दहा वर्षांचा विचार करून आणि तात्कालिक परिस्थितीनुसार नियोजन केले गेले होते. दहा वर्षांपूर्वी हा रस्ता सुरू झाल्यावर वाढलेल्या गाड्या, वाढलेली रहदारी याचा शास्त्रोक्त पद्धतीने हिशोब केला गेला नाही. यामागचे कारण ठेकेदारांचा चोरटेपणा होता. जास्त गाड्या धावतील असे गणित करून दाखवले असते तर टोल वसूलीची मुदत कमी झाली असती. म्हणून गाड्यांची संख्या कमी दाखवण्याकडे कल ठेकेदार आणि टोल कंपन्यांनी आखला. त्याचा परिणाम अपघाताचे प्रमाण वाढले.
- गेल्या काही वर्षांमध्ये या महामार्गावरून जाणार्या गाड्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचे कारण मुंबई हे जगातील मोठे महानगर म्हणून गणले जाते. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो. पुणे हे मुंबईच्या सावलीत वेगाने वाढलेले महानगर आहे. अशा या दोन महानगरांना जोडणारा रस्ता केवळ सहापदरी असणे योग्य नाही. भारतामध्ये हैदराबादमध्ये सोळापदरी रस्ते आहेत. महानगरांची वाढती लोकसंख्या, धावणार्या वाहनांची वाढती संख्या, त्यांचे टनेज वजन आणि या सर्वांचा भार पेलण्याची क्षमता असणारे रस्ते याबाबत शास्त्रोक्त अभ्यास करून रस्त्यांची निर्मिती करणे आवश्यक असते. मात्र मलिदा जास्त मिळवण्याच्या ठेकेदारी धोरणामुळे आणि ठेकेदारांचा वाटा राज्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना देण्याच्या तंत्रामुळे नागरिकांचा जीव जातो आहे.
- हा द्रुतगती महामार्ग विकसित होत असताना अनेक मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले गेले नाही. दोन्ही लेनमध्ये साडेदहा फुटांचा बफर झोन किंवा नो मॅन झोन असणे आवश्यक असते. हा पट्टा जमिनीपासून किंचित खाली असणे गरजेचे असते. तसेच त्यामध्ये उंच झाडे असणे आवश्यक आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळी पलीकडच्या लेनमधील वाहनांचा प्रकाश वाहनचालकाच्या डोळ्यावर जाणार नाही. तसेच अशा महामार्गावर बायफेन रोपच्या दोन लेन असणे आवश्यक आहे. या गोष्टी असल्यास एखाद्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला तरी तो पलीकडच्या लेनमध्ये जाणार नाही. आज अशाप्रकारची रचना नसल्यामुळे एका बाजूचे वाहन थेट दुसर्या बाजूला येते आणि अपघात घडतात. अशा अपघातांमध्ये निष्पापांचा बळी जातो. याची जबाबदारी कुणाची?
- रस्ते बांधणी करताना प्राथमिक स्तरावरील नियमांचे पालन केले जात नसेल आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली जात नसेल तर वाहनचालकांनी टोल का द्यायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. महामार्गावर नादुरूस्त वाहनांसाठी सर्व्हिस लेन असणे आवश्यक आहे आणि वाहनामध्ये बिघाड झाल्यानंतर वाहनचालकांनी या लेनमध्ये गाडी नेऊन ब्लिंकर्स सुरू करून ठेवणे आवश्यक आहे. मात्र याचे गांभीर्य कोणालाच कळलेले नाही. आज मुंबई-पुणे महामार्गावरच नव्हे तर एकूणच देशभरात रस्ते अपघातात मरण पावणार्यांचे, जखमी होणार्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर साधारणपणे नागरिकशास्त्रामध्ये हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला गेला पाहिजे. ताबडतोबीचा उपाय म्हणून या महामार्गावर एक वाहनतळ उभा करून साधारणपणे ४०-५० अवजड वाहनांमधील एक-दोन वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करावी. वाहनचालकाचे वय, त्याची दृष्टी, त्याची शारीरिक स्थिती तसेच त्याने मद्यपान केलेले आहे का आदी गोष्टी तपासून पाहाव्यात. त्यातून आपल्याला अनेक उणिवा लक्षात येतील. शासन यंत्रणांच्या उणिवांकडे बोट करताना वाहनचालकांच्या बेदरकारपणाकडे आणि बेजबाबदारपणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषतः वाहन चालवताना मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळला गेला पाहिजे. ८० अथवा त्यापेक्षा अधिक वेगाने जात असताना मोबाईलचा वापर चुकूनही करू नये. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो वाहनांच्या टायर्सचा. ८० पेक्षा जास्त वेगाने चालवता येईल असे टायर आपल्याकडे नाहीत. ही बाब वेगाने वाहन चालवणार्यांनी लक्षात घ्यायला हवी. मुळात महामार्गांवरून जाण्यापूर्वी वाहनचालकांनी वाहनांच्या स्थितीकडेही लक्ष दिले पाहिजे. वाहनांची वेळच्या वेळी तपासणी आणि देखभाल दुरुस्ती केली पाहिजे. टायरमधील हवेचा दाब योग्य आहे का हे तपासले पाहिजे. एक्स्प्रेस वेवर गाडी घेऊन जाताना टायरमधील हवेचा दाब किंचीत कमी ठेवणे फायद्याचे ठरते. भविष्याचा विचार करता शालेय अभ्यासक्रमामधून याविषयीची माहिती दिली गेली पाहिजे. सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न केल्यास अशा दुर्घटना निश्चितपणाने टाळता येतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा