शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५

हीच वेळ आहे

  • भारताला हवा असलेला मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आमच्या देशात नसल्याचा दावा करणारा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. दाऊद हा पाकिस्तानातच असून कराचीतील क्लिफ्टन येथे राहत असल्याचे ठोस पुरावे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती आले आहेत. त्यामुळे आता भारताने गप्प बसता कामा नये. ज्या दाउदसाठी भारताने २२ वर्ष प्रतिक्षा केलेली आहे त्याचा अमेरिकेचे अनुकरण करून पाकीस्तानात घुसून खातमा करण्याची हीच वेळ आहे.
  •  दाउद आता ५९ वर्षांचा आहे. त्याला आता निवृत्त करण्यासाठी मोदी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. दाऊदचा सध्याचा फोटोही भारतीय गुप्तचरांना मिळाला आहे. एवढे बक्कळ पुरावे हाती लागलेले असताना पाकीस्तानला धडा शिकवण्यात आता हलगर्जीपणा करता कामा नये. भारताला महासत्ता व्हायचे आहे. या महासत्तेच्या मार्गातील हे काटे काढणे फार जरूरीचे आहे. महासत्तेसारखेच वागून दाउदला संपवण्याची आता गरज आहे. दाउद हा बिळात लपलेला विषारी साप आहे. तो केव्हा येवून भारताला डसेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याला पाकीस्तानी बिळातून काढून ठेचण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. ही कारवाई केल्याने मोदी सरकारचा वचक बसेल. ही संधी मोदी सरकारने सोडता कामा नये.
  •   पाकीस्तानात बसून दाउदची अनेक बांडगुळे गेल्या वीस बावीस वर्षात सातत्याने भारतात येत आहेत. मुंबईत येणारे हे लोंढे सातत्याने घातपाती कृत्ये करून भारतीयांना त्रास देत आहेत. मुंबईतील मुंब्रा, कळंबोली या भागात अनेक लोक हे अत्यंत भयानक आणि पाकीस्तानी वृत्तीने वावरत असतात. त्यापैकी अनेकजण बेकायदेशीरपणे रहात असतात. या सगळ्यांना दाउद आणि पाकीस्तानची मदत असल्याचे सगळीकडे बोलले जाते. पण सरकार त्याबाबत काहीही करत नाही. पाकीस्तान भारताच्या मागण्यांना दाद देत नाही. लातोंके भूत बातोंसे नही मानते. या न्यायाने पाकीस्तानवर हल्ला करण्याची कृती करण्याची गरज होती. गेल्या दहा वर्षांतील कॉंग्रेस सरकारने भ्रष्ट राजकारणासाठी आणि पाकधार्जिण्या प्रवृत्तींना पोसण्यासाठी पाकवर दबाव आणला नाही. पण आता मोदी सरकारने याबाबत कठोर पावले उचलून आपली ताकद दाखवण्याची गरज आहे.
  •     गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद आपली बेगम महजबीन शेख, मुलगा मोईन नवाझ आणि माहरुख, महरीन व माजिया या तीन मुलींसोबत कराचीतील क्लिफ्ट येथे राहतो. हे सगळे पुरावे मिळाल्यावर भारताने आता आपले लष्कर घुसवण्याची वेळ आली आहे.
  •        दाऊदची बेगम महजबीन शेख हिच्या नावे असलेला एप्रिल २०१५चा टेलिफोन बिलही भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. त्यावर डी-१३, ब्लॉक - ४, कराची डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, एससीएच-५, क्लिफ्टन असा पत्ता आहे. तिथं राहूनच दाऊद अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारी कारवाया करत आहे. त्याच्याकडं तीन पासपोर्ट आहेत. त्यापैकी एका पासपोर्टवर क्लिफ्टचा पत्ता आहे. दुसर्‍या पासपोर्टवर ६ अ, खायाबान तंजीम, फेज-५, डिफेन्स हाउसिंग एरिया असा तर तिसर्‍या पासपोर्टवर मोईल प्लेस, सेकंड फ्लोअर, अब्दुल्लाह शाह गाजी दरग्याहजवळ, क्लिफ्टन असा पत्ता आहे. पासपोर्टवरील फोटोवरून ५९ वर्षीय दाऊदचा आताचा चेहराही समोर आला आहे. स्वच्छ दाढी, डोक्यावरील कमी झालेले केस आणि चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचे व्रण नसलेला दाऊद या फोटोत दिसत आहे. इतके सगळे पुरावे असताना भारताने आता गप्प बसता कामा नये.
  •   अल कैदाने जेव्हा अमेरिकेवर ९/११ चा हल्ला करून वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केले  त्याचा बदला अमेरिकेने दहा वर्षांच्या आत घेतला. आम्ही मात्र पाकीस्तानचे चोचले पुरवत गप्प बसलो. भाजपाने याकूबच्या फाशीचे जे नाटक केले आणि अनावश्यक गाजावाजा केला त्याचे पाप आता धुण्याची संधी भारताकडे आहे. ऑपरेशन दाउद नावाचे एखादे ऑपरेशन राबवून आता थेट पाकीस्तानात कराचीत घुसून दाउदला ठेचून मारण्याची गरज आहे. त्याला भारतात आणून, आणखी वीस पंचवीस वर्ष खटला चालवून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. अमेरिकेने लादेनला ज्याप्रमाणे घरात घुसून संपवले तसे ऑपरेशन भारताने आता करण्याची वेळ आलेली आहे. दाउदला पाकीस्तानने गेली तेवीस वर्ष पाठीशी घातले. लपवून ठेवले. भारतातील कोणत्याही सरकारला पाकीस्तानने जुमानले नाही. दाउदसह २० दहशतवाद्यांची यादी मागच्या एनडीए सरकारच्या काळात पाकीस्तानला लालकृष्ण अडवाणी यांनी दिली होती. पाकीस्तानने त्याला कचर्‍याची टोपली दाखवली होती. त्यामुळे मोदी सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा या देशाला आहेत. मोदींची प्रतिमा आणखी भक्कम मनात ठसण्यासाठी अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनला घरात घुसून ठेचले त्याप्रमाणे दाउदला या पत्त्यावर घूसून संपवले पाहिजे. म्हणजे पुन्हा पाकीस्तानची भारताकडे डोळे वर करून दहशत माजवण्याची हिंमत होणार नाही. अनेक पाकीस्तानप्रेमी नागरिक या देशात आहेत. याकूबच्या समर्थनार्थ ज्याप्रकारे ते रस्त्यावर उतरले होते त्या सगळ्यांची तोंडे बंद करण्याची हीच वेळ आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: