रविवार, १० एप्रिल, २०१६

गुढी उभारू सत्याची


  • गेल्या दोन तीन वर्षांपासून गुढी पाडव्यासंदर्भात एक अफवा पसरवण्याचे काम फुटीरतावादी प्रवृत्तीचे, ब्रिगेडी अन तत्सम लोक करत आहेत. त्याबाबत घाणेरडे आणि सामाजिक द्वेष पसरवणारे मेसेज फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवले जातात. या मेसेजमध्ये गुढी उभारण्याचे कारण अतिशय विकृतपणे सांगितले जाते. संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली तेव्हापासून ब्राह्मण समाजाने हा सण सुरू केला असा खोटा अपप्रचार सुरू केला. अर्थात हा अपप्रचार करणारे जे ब्रिगेडी आणि ब्राह्मणद्वेष्टे लोक आहेत त्यांना कोणी भिक घातली नाही. कारण युगानेयुगे, शतकानुशतके भारतात हा सण साजरा केला जात आहे. हे हरामखोर म्हणतात की, गुढी पाडवा हा महाराष्ट्रातच फक्त साजरा केला जातो. पण समाजात खोट्या गोष्टी सांगून कधी वाईटाला चांगले ठरवता येत नाही आणि चांगल्याला बदनाम करता येत नाही. संभाजीराजांचा मृत्यू आणि गुढी पाडवा याचा काहीही संबंध नाही. कारण तो अनेक शतकांपासून साजरा केला जात आहे.
  •   आपल्या हिंदूमान्यतेनुसार ग्रंथ आणि पुराणकथांप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा दिवस म्हणजे गुढी पाडवा. तो संपूर्ण देशभर विविध प्रकारे साजरा केला जातो. इंद्राने वृत्तासूराचा वध केला, त्यासाठी दधिची ऋषिंच्या अस्थिंचा वापर केला होता तो हा दिवस. रामायण काळात राम वनवासातून परत आले आणि आपला राज्यकारभार सुरू केला तो हा दिवस. या सगळ्या घटना अनेक सहस्त्र वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत आणि तेव्हापासून हा सण सुरू आहे. परंतु विकृत प्रवृत्तीचे संभाजी ब्रिगेड, बामसेफसारखे माथेफिरू लोक खोट्या कथा रचून समाजातील तरूणांची माथी भडकवण्याचे काम करत असतात. हा दहशतवादाचाच प्रकार आहे. या दहशतवादाला कोणी भिक घालत नाही, हे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. कारण हा अपप्रचार गेली पाच वर्ष चालला आहे. 
  •     या हिंदूंच्या सणामुळे अनेकांच्या पोटात का दुखते, हे अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तिचे निधन एखाद्या सणादिवशी किंवा आसपास झाले तर कोणीच सण साजरा करत नाही. पण याचा अर्थ तो सणच बंद केला जात नाही. तो पुढीलवर्षीपासून पूर्वव्रत साजरा केला जातो. पण त्याचा अर्थ सणाचा आनंद म्हणजे त्या निधन झालेल्या व्यक्तिचा अपमान करणारा आहे, असे कधीच समजले जात नाही. पण विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तिंनी म्हणे तेव्हापासून गुढी पाडवा सुरू झाला असा शोध लावला.
  •      आपल्याकडच्या साहित्य आणि ग्रंथांमधुन गुढी पाडव्याचे वर्णन हे अनेक शतके अनेक वषार्र्ंपासून केलेले आहे. संत चोखोबा हे चौदाव्या शतकातील संत होते. त्यांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की, टाळी वाजवावी, गुढी उभारावी| वाट हे चालावी पंढरीची॥ सकल संतगाथा खंड १ मध्ये हा अभंग आहे. यातील गुढी हा शब्द गुढी पाडवा साजरा केला जात असल्याशिवाय त्यांनी वापरला का? पण कसलाही अभ्यास न करता स्वत:ला काही येत नाही, दुसर्‍याचे चांगले बघवत नाही, अशा दुष्ट आणि विकृत प्रवृत्तीतून या चांगल्या सणाची बदनामी केली जाते. गुढी पाडवा जर संभाजी महाराजांच्या निधनानंतर साजरा होऊ लागला तर त्यापूर्वी कित्येक शतके चोखोबांनी कसा बरे हा अभंग लिहिला असेल? 
  •     संत तुकाराम हे संभाजी महाराजांपूर्वी कित्येक वर्ष वैकुंठवासी झाले होते. त्यांनी त्यांच्या अभंगात लिहीले होते की, बाळकृष्ण नंदाघरी, आनंदल्या नरनारी| गुढीया तोरणे, करीती कथा, गाती गाणे॥ या २८३९ क्रमांकाच्या अभंगात तुकोबारायांनी गुढीचे वर्णन कसे काय केले? याचा अर्थ शंभुराजांच्या निधनाचा आणि गुढी पाडव्याचा कसलाही संबंध नाही. पण केवळ समाजातील एका विशिष्ठ वर्गाला छळण्यासाठी, त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या विकृत वृत्तीने सोशल मिडीयाचा दुरूपयोग केला जात आहे. यातून आपल्या संस्कृतीचा खून केला जात आहे. अशा विकृत दहशतवादी प्रवृत्तींवर कारवाई करण्याची गरज आहे. पाकिस्तानातील शत्रूंपेक्षा स्वदेशातील हे शत्रू अत्यंत घातक आहेत.
  • धर्मशास्त्राचे अभ्यासक, थोर इतिहासतज्ज्ञ डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनीही याबाबत विस्तृत लिखाण करून या अधर्माने खोटा प्रचार करणार्‍या लोकांचे बिंग काही वर्षांपूर्वी फोडले आहे. त्यांनी दिलेल्या सप्रमाण दाखल्यांचा विचार केला तर या ब्रिगेडी देशद्रोही, समाजद्रोहींना उत्तरही देण्याचे धाडस होणार नाही.
  • संत ज्ञानेश्‍वर माऊलींनीही तेराव्या शतकात गुढी पाडव्याचा उल्लेख आपल्या लेखनातून केला आहे. ते तर संभाजी महाराजांच्या चारशे वर्ष अगोदर  होऊन गेले. ज्ञानेश्‍वरांनी म्हटले आहे, अधर्माची अवधीं तोडी| दोषांची लिहीली फाडी| सज्जनांकरवी गुढी| सुखाची उभवी| हे चौथ्या अध्यायात केलेलेे वर्णन आहे. त्याचप्रमाणे गुढीचा उल्लेख ज्ञानेश्‍वरांनी सहाव्या आणि चौदाव्या अध्यायातही केलेला आहे. हा उल्लेख करण्यासाठी गुढी ही अगोदरपासूनच अस्तित्वात होती म्हणून तो केला गेला हे लक्षात घेतले पाहिजे. तात्पर्य, या नवीन वर्षात प्रवेश करताना प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी अभ्यास करूनच बोलले पाहिजे आणि अपप्रचार करणार्‍या प्रवृत्तींना बळी न पडता सत्य काय आहे, ते जाणून घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: