- भारतीय जनता पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या वाढत्या वर्चस्वाला रोखायला पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ, आपण पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांनी केल्यामुळे, तमिळनाडू राज्यात चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा उभी फूट पडली आहे. काँग्रेसला ज्या ज्या वेळी पराभवाचा झटका बसला आहे त्या त्या वेळी ठिकठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसून येते.
- काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी जयललितांच्या अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाशी युती केल्याच्या निषेधार्थ वासन यांचे वडील जी. के. मुपन्नार यांनी पक्ष फोडून तमिळ मनिला काँग्रेसची स्थापना केली होती. या पक्षाने लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकाही स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. पुढे हा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला होता. त्या फुटीचीच पुनरावृत्ती वासन यांच्या उघड बंडखोरीने पुन्हा एकदा होत आहे.
- पक्षाचे धोरण, ध्वज आणि नाव याबाबत पुढच्या आठवड्यात सहकार्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे वासन यांनी जाहीर केले आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडू राज्यात पक्षाची प्रचंड पीछेहाट झाली. पक्षाचा पारंपरिक जनाधार कमी झाला आणि आता लोकसभेच्या निवडणुकानंतर पक्षाची पाळेमुळेही उखडली गेल्याचा आरोप वासन यांनी केला आहे.
- वासन यांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांचेही पक्षाच्या मजबुतीकडे आणि पक्षातल्या क्रियाशील कार्यकर्त्यांच्याकडे काहीही लक्ष नाही. परिणामी राज्यात पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे वासन म्हणाले आहेत. अर्थात आपल्या पक्षनेतृत्त्वावर टिका करण्याचे धाडस काँग्रेसमध्ये फक्त दाक्षिणात्य नेतेच करू शकतात. बाकी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना हे मान्य असले तरी ते नंदीबैलासारखे गप्प बसतात आणि सोनिया-राहुल आणि गांधी नेहरू यांचे गोडवे गाण्यात धन्यता मानतात.
- गेल्याच आठवड्यात तमिळनाडू प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पी. एस. ज्ञानदेसिकन यांनी दिला, तेव्हाच ही फूट अटळ असल्याचे उघड झाले होते. ज्ञानदेसिकन हे वासन यांचे निकटचे सहकारी आहेत. वासन यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली, तेव्हा तेही या बैठकीला उपस्थित होते. राज्यातल्या 59 पैकी 35 जिल्हाध्यक्षांचा, 2 आमदारांचा आणि बहुतांश खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा वासन यांनी केला आहे. त्यामुळे दक्षिणेत मुळातच क्षीण असलेल्या काँग्रेसला आणखी एका संकटाला सामोरे जावे लागत आहे.
- 44 वर्षांपासून काँग्रेस पक्ष तमिळनाडूच्या सत्तेतून हद्दपार झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही पक्षाने पुन्हा आपले स्थान मिळवले नाही. द्रविड मुनेत्र कळघम आणि सत्ताधारी अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या दोन प्रादेशिक पक्षांच्या सत्तेच्या लढाईत काँग्रेस पक्ष कमकुवत होत गेला. लोकसभेच्या निवडणुकात तर या पक्षाला चार टक्के मतेही मिळालेली नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्यामुळे, ते पक्षाच्या घसरणीबद्दल फक्त चिंता व्यक्त करतात. 2004 पूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पी. चिदंबरम यांनी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर आपला पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन केला होता. परंतु काँग्रेसची ताकद वाढवण्यात चिदंबरम यांना यश आले नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यात त्यामुळेच मरगळ आल्याचे वासन यांचे म्हणणे आहे. एकीकडे गरूड भरारी घेत एकेक राज्य पादाक्रांत करीत असलेला भाजप आणि दुसरीकडे नामशेष होत चाललेला काँग्रेस पक्ष अशी सध्या भारतीय राजकारणात स्थिती दिसत आहे.
- भारतीय जनता पक्षाने मात्र गेल्या 25 वर्षात आपले वर्चस्व हळूहळू वाढवत नेत, सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्याइतकी ताकद मिळवली आहे. बंडखोरी केल्याबद्दल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने वासन यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. पण ही केवळ सोय आहे. जे आधीच बाहेर पडले होते त्यांची हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उरत नाही. पण काँग्रेस ही एक विचारधारा आहे असे आपल्याकडे पूर्वी बोलले जायचे. पण आता काँग्रेसला कसलीही विचारधारा नाही त्यामुळे ती नामशेष होताना दिसत आहे. आपल्या मूळ विचारापासून दूर गेल्यावर असा फटका बसतोच. काँग्रेस म्हणजे विचारधारा नाही तर नेहरू आणि गांधी घराण्याचा उदोउदो करणे असा अर्थ झाला आहे. त्यामुळे सामान्य, युवा कार्यकर्ता काँग्रेसकडे पाठ फिरवताना दिसत आहे.
- राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचा विचार करता सर्वाधिक तरूण नेतृत्त्व हे राहुल गांधींकडे, काँग्रेसकडे होते. सर्वात मोठा मतदार हा युवावर्ग असताना राहुल गांधी तरूणांना आकर्षित करू शकले नाहीत. त्यांच्यात कसलाही दम दिसला नाही की प्रभाव टाकण्याची क्षमताही नव्हती. त्यामुळे तरूणांना ते अगदी मेंगळट आणि नेभळट असे नेते वाटू लागले. तरूणांचा जोष आणि उत्साह ओसंडून वाहणारा असतो. तो जोश न दिसल्यामुळे राहुल गांधींना कोणी स्विकारले नाही.
- अर्थात पराभव होत असलेल्या सैन्यात जाण्यास कोणीच तयार होत नसतो. सेनापती पराभूत होतो आहे म्हटल्यावर पळपुटे लोक पटापट दुसरीकडे जावून आपले शौर्य दाखवायचा प्रयत्न करतात. काँग्रेसबाबत ही काही आजची बाब राहिलेली नाही. 1977 च्या आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जेव्हा इंदिरा गांधी यांचा दारूण पराभव झाला होता तेव्हाही काँग्रेसचे तुकडे झाले होते. इंदिरा गांधींनी गाय वासराला सोडून इंदिरा काँग्रेस नावाच्या पक्षाची स्वत:च स्थापना केली होती. तर समाजवादी काँग्रेस, अरस काँग्रेस, चव्हाण रेड्डी अशी चड्डी काँग्रेस असे अनेक तुकडे पडले होते. पुन्हा सत्ता मिळताच पुन्हा सगळे एकमेकांना चिकटले. दीर्घकाळ इंदिरा गांधींच्या काँग्रेसपासून दूर राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांना पुन्हा इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांना पक्षात घेण्यापासून इंदिरा गांधींनी खूप वेळ ताटकळत ठेवले होते. त्यामुळे कुंपणावर यशवंतराव चव्हाण अशा आशयाची व्यंगचित्रेही त्या काळात गाजली होती. दीर्घ प्रतिक्षेनंतर जेव्हा यशवंतरावांना इंदिरा काँग्रेसमध्ये घेतले गेले तेव्हा त्यांनी आपण स्वगृही आलो असे वक्तव्य केले होते. त्यांची ही लाचार वक्तव्ये त्या काळात टिकेस पात्र ठरली होती. ज्या यशवंतरावांनी स्वाभीमानाचा बाणा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर दाखवला होता आणि त्यांंचा उल्लेख महाराष्ट्राचे प्रतिशिवाजी असा केला जात होता त्याच यशवंतरावांची अखेर अशाप्रकारे लाचारीने झाली होती. इथूनच काँग्रेसची विचारधारा संपुष्टात आली. पुरोगामी, समाजवादी ही सगळी नावे त्यांच्या पक्षातूनही गेली आणि विचारातूनही गेली. गांधींशिवाय आपल्याला कोणी विचारणार नाही यासाठी इंदिरा काँग्रेस किंवा आय काँग्रेसमध्ये जाणे हाच पर्याय लाचारांना वाटत होता. त्यामुळे त्याकाळात एका चित्रपटात दादा कोंडके यांनीही टिका केली होती की ‘ज्याला आय नाय त्याला काय नाय.’
- इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या हत्येनंतर ही लाचारी संपेल आणि विचारधारेवरील काँग्रेस अस्तित्वात येईल अशी अपेक्षा हाती. पण नरसिंहराव यांच सरकार पराभूत झाल्यावर शरद पवारांनीच सोनिया लाओ देश बचाओ अशी हाक दिली. भाजपला रोखण्यासाठी गांधी अस्त्र वापरल्याशिवाय आपण सत्तेपर्यंत जावू शकत नाही याची जाणिव त्यांना झाली आणि सोनिया गांधींना भारतात आणले, त्यांना इंदिरा गांधींच्या वेशभूषेत सादर केले गेले. त्यांच्या येण्याने काँग्रेस पुन्हा सजिव होते आहे हे लक्षात आल्यावर सत्तेची सूत्र त्यांच्या हातात जावू नयेत म्हणून त्याच शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मूळ असल्याचा निषेध करीत स्वाभीमान दाखवला आणि परराष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
- त्यामुळे ज्यावेळी गांधी घराण्याचा, नावाचा फायदा उठवता येतो तेव्हा तो उठवायचा आणि त्याचा फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर पक्षातून बाहेर पडायचे अशी काँग्रेसची स्थिती आहे. प. बंगालमध्येही ममता बॅनर्जींनी अशाच प्रकारे तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. पण ज्यांच्या नावात काँग्रेस आहे अशा कोणत्याही पक्षाला गांधींबाबत ‘धरल तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था झालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा