रविवार, १५ मे, २०१६

ऍम्वेच्या विक्रेत्यांवर कारवाई करा बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायद्याखाली कारवाईची गरज




  • सध्या सातार्‍यात ऍम्वेचे विक्रेते फिरत आहेत. आगंतुक सल्ला देत ते रूग्णांवर उपचार करू पहात आहेत. सातार्‍यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून रुग्णांची हिस्ट्री मिळवून त्यांच्या रोगांवर उपचार करण्यासाठी ऍम्वेचे प्रॉडक्ट कसे लाभदायक आहे आणि त्यामुळे तुमच्या आजारावर कसा उपाय होईल हे सांगुन हजारो रूपयांची महागडी उत्पादने गळ्यात मारत आहेत. अशा उत्पादनांवर आणि विक्रेत्यांवर बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची गरज आहे. सध्या ऍम्वेचे हार्ट हेल्थ पॅक आणि हार्ट गार्लिक केअर नावाच्या उत्पादनाची विक्री जोरदार सुरू आहे. लोकांशी भावनीक जवळीक साधून अशी उत्पादने विकण्याचा प्रकार तातडीने थांबवला पाहिजे.
  • कोणत्याही आजारावर वैद्यकीय आणि अधिकृत व्यक्तिंकडून उपचार होणे गरजेचे असते. पण कसलेही शिक्षण न झालेले, आपल्या उत्पादनाबाबत काहीही माहिती नसलेले ऍम्वे कंपनीचे विक्रेते अशा उत्पादनांची जाहीरात करत फिरत आहेत. तुमच्या टूथ पेस्टपासून रात्री झोपेपर्यंत लागणार्‍या प्रत्येक उत्पादनाला खोटे आणि चुकीचे ठरवत आपले उत्पादन कसे चांगले आहे हे दाखवत ते हिंडत आहेत. इतपत ठिक आहे, पण वैद्यकीय शिक्षण न झालेले लोक डायबेटीस, ब्लडप्रेशर, हार्ट डिसीज, पोटांचे विकार, कॅन्सर अशा रोगांवर घरोघर जाऊन उपचार करत असतील तर त्यांच्यावर बंदी घालण्याची गरज आहे.
  • ऍम्वे कंपनीची ही औषधी उत्पादने अत्यंत महागडी अशी आहेत. त्याला हे एजंट औषधे म्हणत असले तरी ती औषधे नाहीत. या कंपनीच्या उत्पादनाच्या माहिती पत्रकात सरळ सरळ म्हटले आहे की, ढहळी ीींरींशाशपीं हरी पेीं लशशप र्शींरर्श्रीरींशव लू ींहश ऋेेव रपव र्ऊीीस अवाळपळीींीरींळेप. ढहळी िीेर्वीलीं ळी पेीं ळपींशपवशव ींे वळरसपेीश, ींीशरीं, र्लीीश, ेी िीर्शींशपीं रपू वळीशरीश. तरीही केवळ धंदा करण्यासाठी ऍम्वेचे एजंट अशी औषधे गळ्यात मारत आहेत. त्यासाठी तुमची बाकीची सगळी औषधे बंद करा आणि ही ऍम्वेची हार्ट केअर, गार्लिक हार्ट केअर औषधे वापरा आणि दोन महिन्यात बरे व्हा असे सल्ले देत आहेत. आमची उत्पादने मिनाक्षी हॉस्पिटल सातारापासून सर्व नामांकीत हॉस्पिटलमध्ये वापरली जातात असे सांगीतले जाते.
  • परंतु कंपनीने आपल्या सोयीसाठी औषधावर शेरा मारलेला असताना हे घरोघर जाणारे विक्रेते चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे अशा उत्पादनांवर, ऍम्वे कंपनीवर आणि विक्रेत्यांवर तातडीने बंदी घालण्याची गरज आहे.
  •  
  • अशाप्रकारची माहिती देण्याचे कंपनीचे धोरण आहे. दर बुधवारी बॉम्बे रेस्टॉरंट येथे होणार्‍या मिटींगमध्ये असाच सल्ला दिला जातो आणि हीच माहिती सर्वत्र द्या असे कंपनीचे धोरण असल्याचे विक्रेते सांगतात. ही उत्पादने ६९० ते २००० रूपये इतकी किमतीची आहेत. जी घेतल्याने काही अपाय होणार नाही पण उपाय होणार नाही हेही तितकेच खरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: