केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येत आहे हा एक या देशातील नवा विचार जन्माला येत आहे. नरेंद्र मोदी यांनी विजयी झाल्यानंतर ज्या प्रकारे अहमदाबादमधून भाषण केले त्याला म्हणतात देशाचे नेतृत्त्व. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील आलले हे नवे सरकार म्हणजे हे या देशाचे नवे स्वातंत्र्य आहे. सुराज्याची ती कल्पना आहे.
- नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की या देशात या निवडणुकीत अनेक पक्ष असे असतील की ज्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नसेल. पण मी त्यांचाही आहे, हे सरकार सर्वांचे आहे. निवडणुकीत टिका टिपण्णी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. पण निवडणूक संपली आणि निकाल लागल्यावर ते संपले पाहिजेत. हा विचार खर्या अर्थाने सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा शब्द आहे. हा खर्या लोकशाहीचा अर्थ आहे. नरेंद्र मोदींना खर्या अर्थाने लोकशाही समजली म्हणून ते सातत्याने विजयी होत राहिले आहेत हे या विजयाच्या निमित्ताने देशाला समजले आहे. हा परिपक्व आणि शुद्ध लोकशाहीचा अर्थ आहे.
- गेल्या पासष्ठ वर्षात काँग्रेसने असा विचार कधी या देशात मांडला नाही. तो परिपक्व होवू दिला नाही. कारण संघर्ष आणि तेढ निर्माण करण्याचे काम फक्त काँग्रेसने केले आहे. त्याची शिक्षा या निवडणुकीत काँग्रेसला मिळाली आहे. एका सव्वाशे वर्ष जुन्या पक्षाचा या निमित्ताने अस्त झालेला आहे. हे सांगण्याचे कारण असे की तीन वर्षांपूर्वी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारंभ होता, त्यावेळी त्यानिमित्ताने तत्कालीन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री विलासराव देशमुख यांना पाहुणे म्हणून बोलावले होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकरी कामगार पक्षाची आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या मंत्र्याला पाहुणे म्हणून बोलावले म्हणून काँग्रेसच्या लोकल नेत्यांनी त्यावर टिका केली होती. आमच्या पक्षाच्या मंत्र्याला बोलावले. आमच्या पाया पडायला आले अशा तर्हेची वक्तव्ये राम ठाकूर-प्रशांत ठाकूर यांच्या दीड रिम वर्तमानपत्रातून राम ठाकूर यांनी व्यक्त केली होती. हा अर्थात बालिशपणा होता. कारण या मूर्ख लोकांना लोकशाही कधी कळलीच नाही. निवडणुकीपुरते लोक प्रतिस्पर्धी असतात. पण नंतर जेव्हा जो निवडून येतो तेव्हा तो संपूर्ण मतदारसंघाचा असतो. निवडून आलेला मंत्री हा संपूर्ण राज्याचा, देशाचा असतो. ही लोकशाही काँग्रेसच्या मूर्ख लोकांना कळली नाही, त्यामुळे राम ठाकूर यांनी असला मूर्खपणा केला होता. हाच प्रकार काँग्रेसच्या प्रत्येक माणसाचा आहे. प्रत्येक जण आपली सत्ता आहे म्हणजे आपण या देशाचे, राज्याचे मालक आहोत असे समजतात. हा समज नरेंद्र मोदींनी दूर केला आहे. लोकशाहीचा खरा अर्थ नरेंद्र मोदी यांनी या मूर्ख लोकांना दाखवून दिला आहे. हा अर्थ समजण्यासाठी काँग्रेसला पासष्ठ वर्ष वाट पहावी लागली. हा अर्थ देशाला समजण्यासाठी सहा दशके थांबावे लागले. त्यामुळेच नरेंद्र मोदींचा हा विजय म्हणजे नवी क्रांती आहे. देशाला मिळालेले दुसरे स्वातंत्र्य आहे.
- आज नरेंद्र मोदींच्या रूपाने या देशात परिवर्तनाची लाट आली आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. आज या देशातील पाच राज्ये ही पूर्णपणे काँग्रेसमुक्त झालेली आहेत. 543 पैकी अवघ्या 46 जागा मिळवत काँग्रेसची पार दयनीय अवस्था झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रही अशाचप्रकारे काँग्रेसमुक्त करायचा आहे. कारण काँग्रेसने या देशात चुकीचा अर्थ सांगितला. चुकीचे संदर्भ लावले. देशाला खड्ड्यात घालण्याचे काम केले. आज महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. रोजगार निर्मितीसाठी काँग्रेसने यो देशात गेल्या काही दशकात काही प्रयत्न केले नाहीत. दारिद्य्ररेषेखालील जनतेचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी आज या देशातून काँग्रेस पूर्णपणे नष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छोट्या छोट्या संस्थानांना खालसा करण्यासाठी नंतरही युद्ध करावे लागले तशाच प्रकारे आगामी काळातील निवडणुकांमधून देशातील ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यातील काँग्रेस घालवणे हे या देशाच्या नागरिकाचे, मतदाराचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर अंदमान, दीव, दमण, गोवा, हैद्राबाद अशा अनेक ठिकाणी आपल्याला मुक्तीसंग्राम करावे लागले. आगामी काळात तशाच प्रकारे आपल्याला मुक्ती संग्राम करावे लागणार आहेत. त्याची सुरूवात महाराष्ट्रापासून झाली पाहिजे. महाराष्ट्राला गोवा मुक्ती संग्राम आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा द्यावा लागला आहे. आता आगामी काळात महाराष्ट्र हा काँग्रेसमुक्त करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे.
- आज मराठी माणसाची वाताहात लागण्याचे कारण या देशात काँग्रेसची सत्ता होती हे आहे. काँग्रेस नसती तर या देशाची दुरावस्था का झाली असती? इथल्या माणसाला बेराजगार करून बाहेरच्या माणसाला रोजगार देण्याचे काम काँग्रेसने केले. इथल्या शेतकर्याला भूमीहीन करून त्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम काँग्रेसने केले. इथली कारखानदारी संपुष्टात आणली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. पण त्यातील कारखाने पळवून लावण्याचे काम काँग्रेसने केले. कारखाने बंद पडले आणि त्यामुळे इथला रोजगार संपुष्टात आला. बेरोजगारी वाढली. हे काँग्रेसचे पाप आहे.
- सहकारी चळवळ हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य होते. सहकारातून समृद्धी हे इथले ब्रिदवाक्य होते. पण ही सहकार चळवळ कशी मोडीत निघेल आणि लोक बेरोजगार कसे होतील, आर्थिक विवंचनेत कसे पडतील याचाच विचार काँग्रेसने केेला. सहकारी चळवळीचा, सहकारी संस्थांचा वापर राजकारणाची सत्ता केंद्रे म्हणून केला गेला. त्यामुळे इथला शेतकरीे बेरोजगार झाला. हे सगळे काँग्रेसच्या पापाचे परिणाम आहेत. म्हणूनच उत्तर प्रदेशनंतर देशातील सर्वात मोठे राज्य असलेला महाराष्ट्र हा काँग्रेसमुक्त झाला पाहिजे. आज लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र बर्यापैकी काँग्रेसमुक्त झालेला आहे. तो आता आगामी विधानसभा निवडणुकीतही मुक्त झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारत या संकल्पनेत महाराष्ट्राला नेण्यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसला नामशेष करणे ही काळाची गरज आहे.
- आज नरेंद्र मोदी यांच्या रूपाने या देशाला एक नवी दिशा मिळाली आहे. एक चांगला पर्याय मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली सक्षम आणि विकसीत भारत निर्माण करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असले पाहिजे. म्हणजे ज्या आदरभावाने आपण राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सावधान होवून उभे राहतो, त्या तिरंग्याचा सन्मान करतो, त्याच भक्तीभावाने आता नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीचा सन्मान केला पाहिजे. त्याच निष्ठेने या देशातून काँग्रेस कशी हद्दपार होते आहे हे पाहिले पाहिजे. ज्या रागाने आपण पाकीस्तान या देशाकडे शत्रू म्हणून पाहतो त्याच रागाने आपला अभिमान काँग्रेसला दाखवून हा देश काँग्रेसमुक्त केला पाहिजे हा विचार आबालवृद्धांना पटवून देण्याचे कर्तव्य प्रत्येक भारतीयाचे आहे. प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्यासाठी, घटनेचे, संविधानाचे, कायद्याचे राज्य या देशात येण्यासाठी आज नरेंद्र मोदींना स्विकारले पाहिजे. काँग्रेसला नाकारले पाहिजे. महाराष्ट्र हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता हे वाक्य इतिहासजमा झाले पाहिजे.
- या महाराष्ट्राचा इतिहास फार मोठा आहे. इथे छत्रपती शिवरायांनी प्रत्येकाला अभिमानाने जगण्याची शिकवण दिलेली आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा या राज्याला आहे. शिक्षणासाठी चळवळ करणार्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्राला आहे. असे असताना या राज्यात काँग्रेस दीर्घकाळ कशी काय टीकू शकते?
- काँग्रेस ही या देशाचा शत्रू आहे. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले होते तेव्हा स्वराज्याचे तोरण त्यांना बांधता आले. आज या राज्यातील काँग्रेसचा बंदोबस्त केला तर खर्या अर्थाने महाराष्ट्राचा अभिमान बाळगता येईल. या महाराष्ट्रात कर्मवीरांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून गोरेगरीबांना शिक्षण दिले. पण याच काँग्रेसने शिक्षण महाग करून शिक्षण सम्राट निर्माण केले. आज रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या खारघरच्या शाळेत सर्वाधिक फी आकारली जाते. बिनपावतीची देणगी मागितली जाते. त्यासाठी आपले मंगळसूत्र गोरगरीबांना गहाण ठेवावे लागते. कुठे कर्मवीर आणि कुठे राम ठाकूर? पण दुर्दैवाने त्याच कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत पदाधिकारी म्हणून राम ठाकूर काम करतात. यासारखा कर्मवीरांचा अपमान या देशात कोणी केला नसेल. म्हणूनच सर्वात प्रथम महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाला पाहिजे. गावागावातील, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा प्रत्येक ठिकाणातून काँग्रेसला हुडकून काढली पाहिजे आणि पराभूत करून हाकलली पाहिजे. प्लेगच्या साथीत बिळाबिळातून हुडकून काढून उंदीर मारले जातात त्याप्रमाणे काँग्रेस संपवण्याचा निर्धार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. इथून पुढे काँग्रेसचे हे विष या देशात टिकवले तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे या नव्या स्वातंत्र्यात उरली सुरली काँग्रेस संपवण्याचे काम केले पाहिजे.
- काँग्रेसचे पनवेलचे आमदार इथल्या जनतेला मृत्यूच्या दाढेत सोडतात. भोपाळचा घातक कचरा तळोजात आणून त्याची विषबाधा आसपासच्या पंचवीस किलोमिटर परीसरातील नागरिकांना व्हावी यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे या विषारी काँग्रेसला हाकलण्यासाठी जनतेने सज्ज झाले पाहिजे.
- आज महाराष्ट्रात काँग्रेसला दोनच खासदार निवडून आणता आले आहेत. एक खासदार म्हणजे सरासरी पाच आमदार. त्यामुळे विधानसभेत 85 च्या आसपास आमदार असलेल्या काँग्रेसचे आजचे संख्याबळ दहावर येवून ठेपले आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला शून्य करून महाराष्ट्राची सत्ता चांगल्या लोकांच्या ताब्यात देण्याचा लढा मराठी माणसला करायचा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा