-
- या देशात तहहयात ब्रिटीशांचे राज्य राहील हे काही लोकांनी मान्य केले होते. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश लोकशाहीच्या धरतीवर भारतातही एक विरोधी पक्ष असला पाहिजे. या हेतुने ब्रिटीशांच्या मदतीने काँग्रेसची स्थापना झाली होती. ब्रिटीशांकडे ज्याप्रमाणे हुजूर आणि मजूर असे दोन पक्ष होते तसा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची स्थापना झालेली होती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसची स्थापना ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेली होती, असे भासविण्याचे काम पंडित नेहरूंसारख्या लबाड नेत्यांनी केले. त्यावर आता देश स्वतंत्र झाल्याने, काँग्रेस पक्ष बरखास्त करावा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेला वाहून घ्यावे, अशी इच्छा महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर व्यक्त केली होती. पण सत्तेसाठी उतावळ्या झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषत: पंडित नेहरूंनी महात्मा गांधीजींची इच्छा धुडकावून लावली. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष, या पुण्याईवर तब्बल 27 वर्षे लोकसभा आणि बहुतांश राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका जिंकत, सत्तेची मक्तेदारी निर्माण केली.
- सत्तेची चटक लागलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना, देशाच्या स्वातंत्र्यासाठी फक्त काँग्रेसनेच नव्हे, तर हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी, क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे, अपूर्व त्याग केला आहे, हे मान्य करायचीही तयारी नव्हती. आजही ती तयारी काँग्रेसची नसते. गांधी नेहरूंशिवाय कोणीच स्वातंत्र्य मिळवून दिलेले नाही असेच काँग्रेसला आजही वाटते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर त्यापूर्वी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान नेत्यांचे योगदान काँग्रेसने कधीही मान्य केलेले नाही. इंग्रजांचा छळ सोसणार्या, हासत हासत देशासाठी प्राण अर्पण करणार्या या लोकांबद्दल काँग्रेसला जराशीही आपलेपणा नाही. काहीही न करता फक्त आम्ही स्वातंत्र्य मिळवले असा बहाणा काँग्रेसने केला. लोक आणि देशाची सेवा फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो, असा भ्रम काँग्रेसच्या नेत्यांनी निर्माण केला. जनतेतही काँग्रेस पक्षाबद्दल सहानुभूती असल्यामुळे आणि समर्थ विरोधी पक्षाच्या अभावी याच पक्षाला निवडणुका जिंकणे सहज साध्य झाले. काही अपवाद वगळता केंद्रात काँग्रेस पक्षाचीच सत्ता कायम राहिली.
- नेहरू आणि गांधी घराण्याच्या पुण्याईवर, धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटत निवडणुका जिंकायला आणि सत्ता काबीज करायला सोकावलेल्या, काँग्रेस पक्षाची सत्तेची मिरासदारी यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत देशातल्या जागरूक मतदारांनी पूर्णपणे संपवत महात्मा गांधीजींचे काँग्रेस पक्ष विसर्जित करायचे स्वप्न साकारही केले आहे. हे खर्या अर्थाने नवे स्वातंत्र्य आहे.
- लोकसभेच्या निवडणुकात काँग्रेस पक्षाचा प्रचंड पराभव झाला असला, तरी हा पक्ष काही समूळ संपलेला नाही. लोकसभेच्या 543 पैकी अवघ्या 44 जागा मिळवणार्या या पक्षाचे मतदारांनी दिवाळे मात्र काढले आहे. आतापर्यंतच्या निवडणुकात मुस्लीम मतदारांनी परंपरेने काँग्रेस पक्षालाच साथ दिली. दलितांची मतेही याच पक्षाला मिळत राहिली. विरोधकांच्या मतांची फाटाफूट आणि हुकमी मतांवर डल्ला मारत केंद्रातली सत्ता काबीज करायचा प्रयोग, अन्य विरोधी पक्षांच्या कुबड्या घेत यशस्वी करणार्या या ढोंग्यांना यावेळच्या निवडणुकीत मात्र मतदारांनी जबरदस्त अद्दल घडवली आहे. धर्मनिरपेक्षतेचे काँग्रेसचे तुणतुणे मतदारांनी साफ मोडून तोडून टाकले. धर्म-जात, भाषा, भेद आणि मतदारांना फसवायची काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची जादूगिरीही संपवून टाकली.
- आतापर्यंतच्या लोकसभेच्या निवडणुकात बहुमत मिळाले नसले तरीही काँग्रेस पक्षाची मतांची सरासरी 28 ते 30 टक्क्यांच्या आसपास कायम राहिलेली होती. यावेळी मात्र अवघ्या 44 जागा आणि 19.3 टक्के इतकीच मते मिळवणार्या काँग्रेस पक्षाला, अनेक राज्यात पाय ठेवायलाही मतदारांनी जागा शिल्लक ठेवलेली नाही. ‘देश काँग्रेसमुक्त करा’ या नरेंद्र मोदींच्या आवाहनाला तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल वगळता बहुतांश राज्यातल्या मतदारांनी प्रतिसाद दिला. परिणामी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, गोवा, दिल्ली, हिमाचल प्रदेश या राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. 80 पैकी 72 जागा जिंकणार्या, भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाला साफ गंगेच्या प्रवाहात बुडवून टाकले आहे. दिल्लीच्या सत्तेच्या सिंहासनाकडे जाणारा मार्ग उत्तर प्रदेशातूनच जातो. तोच काबीज करत भाजपने काँग्रेसची दाणादाण करत, धर्मनिरपेक्षतेचा ढोलही मतदारांनी फोडून टाकला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा नेते वगळता, या राज्यातल्या काँग्रेसच्या उमेदवारांना संतप्त मतदारांनी पराभवाचे पाणी तर पाजलेच, पण या पक्षाचे राज्यातले उरलेसुरले अस्तित्वही संपवून टाकले आहे.
- माजी पंतप्रधान आणि माजी पक्षाध्यक्ष पी. व्ही. नरसिंहराव वगळता काँग्रेस पक्षावर पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी याच नेत्यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले. इंदिरा गांधींनी तर पंतप्रधानपदाबरोबरच पक्षाध्यक्षपदही आपल्याकडेच ठेवत, पक्ष गांधी घराण्याच्या दावणीला कायमचा बांधून टाकला. 1977 मधल्या आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकात काँग्रेस पक्षाची सत्ता गेली. पण, परंपरागत मतदार मात्र पक्षापासून दूर गेला नव्हता. पक्षाचा पराभव झाला असला, तरी पक्षाच्या विचारधारेचा पराभव झालेला नाही, असे या पक्षाचे नेते तेव्हा सांगत होते आणि ते वास्तवही होते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत, राजीव गांधीनी 1984 मधल्या लोकसभेच्या निवडणुकात 404 जागा आणि 49 टक्के मते मिळवली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली होती. त्यानंतरच्या निवडणुकात मात्र काँग्रेस पक्षाला सतत ओहोटी लागली. केंद्रात आधी आघाडीची आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले. ते सहा वर्षे सत्तेवर राहिले.
- 2004 मधल्या निवडणुकात मिळालेल्या 145 जागा या सोनिया गांधींच्या नेतृत्वाचेच यश असल्याचा जयघोष गांधी घराण्याचा उदो उदो करत, सत्ता मिळवायची चटक लागलेल्या गांधी घराण्याच्या समर्थकांनी केला आणि तोच पुढे सुरूही ठेवला. यावेळच्या निवडणुकांच्या आधी राहुल गांधींच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ घातली गेली.
- ज्या गांधी घराण्याचा गरिबांशी आणि गरिबीशी कधीही संबंध आला नाही, तेच गरिबांचे तारणहार आहेत, असा भ्रम सर्वसामान्य जनतेत निर्माण करण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळत गेले. मुस्लीमांचा तारणहार पक्षही फक्त काँग्रेसच असल्याचा समजही याच नेत्यांनी निर्माण केला आणि तो वाढवलाही. यावेळी मात्र जंगजंग पछाडूनही मुस्लीम मतदारांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली नाही. सत्तेच्या राजकारणाचा खेळ करण्यात तरबेज आणि कुशल असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सरकारला आणि नेत्यांनाही धडा शिकवायचा निर्धारच देशातल्या जनतेने केला होता. महागाई, भ्रष्टाचार, लाचलुचपत हे सारे रोग काँग्रेसच्या सरकारच्या कारकिर्दीतच वाढले. महागाई कमी करायचे सामर्थ्य या पक्षाच्या सरकारमध्ये नाही. भ्रष्टाचार्यांना हे सरकार पाठीशी घालत असल्याचे दिसून आले आहे. काहीही झाले तरी काँग्रेस पक्षाची सत्तेची जहागिरी संपवायचीच आणि या पक्षाला गाडून टाकायचे असा निर्धारच जनतेने केला होता.
- महागाई रोखण्याबरोबरच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि जनतेला सुखी करणारा कारभार, हेच आमच्या पक्षाचे ध्येय असेल, या मोदींच्या सकारात्मक प्रचाराला मतदारांनी जाणीवपूर्वक प्रतिसाद दिला. देश आणि पक्षाला बुडवणार्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे नेतृत्व साफ नाकारत काँग्रेसचे दिवाळेच संतप्त मतदारांनी काढले. यावेळचे मतदान काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाच्या विरोधात तर होतेच, पण ते भाजपच्या सकारात्मक, रचनात्मक कारभाराच्या आश्वासनांच्या बाजूनेही होते. सरकारविरुद्धच्या असंतोषाच्या स्फोटाबरोबरच गरिबांच्या नावाखाली कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच ध्येय झालेल्या, काँग्रेस पक्षाला मतदारांनी शिक्षा दिली. देशातल्या सर्वात जुन्या सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या राष्ट्रीय पक्षाची वाताहत गांधी घराण्याच्या नेत्यांनीच लावली हे या निवडणुकीत दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा