अलीकडेच, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करून केलेल्या वेगळ्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांसह अनेक लोक मारले गेले. परिस्थिती इतकी बिघडली की लष्कर आणि राजकीय पक्षांना तातडीची बैठक बोलावावी लागली. पाकिस्तानमधील अलीकडच्या घडामोडींमुळे अनेक कटू सत्ये नकळत समोर आली आहेत.
प्रथम, पाकिस्तान हे राष्ट्र नसून वसाहतवादी शक्तींनी त्यांच्या निहित स्वार्थासाठी तयार केलेले कृत्रिम अस्तित्व आहे. दुसरे, जगाच्या नकाशावर जिथे पाकिस्तान आहे, त्या बहुतेक लोकांना इस्लामच्या नावावर देशाची फाळणी करायची नव्हती किंवा पाकिस्तानच्या संकल्पनेला पाठिंबाही द्यायचा नव्हता.
आजही अनेकजण त्यांच्याविरोधात आहेत. तिसरे, इस्लामच्या नावाखाली जागतिक मुस्लीम सहकार्य आणि एकतेवर भर देणारी ‘उम्मा’ ही केवळ पुस्तकी गोष्ट आहे. याचा व्यावहारिकतेशी काहीही संबंध नाही. चर्चेत असलेल्या बलुचिस्तानबद्दल बोलायचे तर त्याला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. सातव्या शतकात मुस्लीम आक्रमकांनी भारतावर हल्ला केल्यानंतर येथे इस्लामचा प्रभाव वाढला.
हिंदूंच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असलेले हिंगलज माता मंदिर आजही येथे अस्तित्वात आहे. ब्रिटिश राजवटीत बलुचिस्तानवर कलात संस्थानाचे राज्य होते. १८७६ मध्ये, दोघांमध्ये एक करार झाला आणि ते सशर्त ब्रिटिश अधीनस्थ राज्य बनले. १९४७ मध्ये फाळणीनंतर कलातने स्वतंत्र राहणे पसंत केले, परंतु मार्च १९४८ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या सूचनेनुसार पाकिस्तान सैन्याने ते जबरदस्तीने जोडले. तेव्हापासून ते बलुच राष्ट्रवादीसाठी ‘राष्ट्रवाद आणि आत्मनिर्णयाच्या संघर्षा’चे प्रतीक राहिले आहे.
पाकिस्तानमधील अलिप्ततावाद केवळ बलुचिस्तानपुरता मर्यादित नसून सिंध आणि पश्तून प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. बलुचिस्तान व्यतिरिक्त सिंध, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामध्ये फाळणीपूर्वी इस्लामच्या नावावर स्वतंत्र देशाला विरोध होता. सिंध इत्तेहाद पक्षाचे सर्वोच्च नेते अल्लाबख्श मुहम्मद उमर सुमरो हे अविभाजित भारतात दोनदा सिंधचे पंतप्रधान होते.
धर्माच्या आधारे वेगळा देश निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी इस्लामविरोधी असल्याचे सांगितले होते. अल्लाबख्श यांची १९४३ मध्ये हत्या करण्यात आली, ज्यामध्ये मुस्लीम लीगचा हात असल्याचा संशय होता. अविभाजित पंजाबमध्ये १९४५ पर्यंत पाकिस्तानला राजकीय पाठिंबा नव्हता. १९३७च्या प्रांतीय निवडणुकीत पंजाबच्या जनतेने धार्मिक मुस्लीम लीगपेक्षा ‘सेक्युलर’ युनियनिस्ट पक्षाची निवड केली.
या पक्षाने अकाली दल आणि काँग्रेससोबत सिकंदर हयात खान यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये सरकार स्थापन केले. सिकंदरने १९४०चा ‘पाकिस्तान प्रस्ताव’ नाकारला. त्यांच्या मृत्यूनंतर प्रभावशाली मलिक खिझर हयात तिवाना यांनी १९४२ पासून पंजाब सरकारची सूत्रे हाती घेतली. जिना यांनी तिवाना यांच्यावर दबाव आणला, पण तिवाना झुकले नाहीत आणि पंजाबमधील हिंदू, शीख आणि मुस्लिमांना सोबत घेऊन काम करण्याची घोषणा केली.
त्यामुळे संतप्त झालेल्या जिनांनी पंजाबमध्ये धार्मिक उन्माद भडकावला. १९४६च्या निवडणुकीत युनियनिस्ट पक्षाचे विघटन झाले आणि पंजाब मुस्लीम लीगकडे गेला. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर तिवाना आॅक्टोबर १९४९ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पोहोचले, तेव्हा तेथील इस्लामिक सरकारने रागाच्या भरात त्यांची अफाट संपत्ती जप्त केली. धार्मिक छळापासून वाचण्यासाठी ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि १९७५ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खैबर पख्तुनख्वामध्येही पाकिस्तानला पाठिंबा नव्हता. १९४६च्या प्रांतीय निवडणुकीत मुस्लीम लीगला व्यापक पाठिंबा मिळाला नाही. सरदार अब्दुल गफ्फार खान, ज्यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखले जाते, त्यांच्या कार्यस्थळाने फाळणीला कडाडून विरोध केला होता. गफ्फारने पश्तूनांच्या स्वायत्ततेसाठी लढा दिला, ज्यामुळे त्यांनी आपला बराच काळ तुरुंगात किंवा वनवासात घालवला. त्याचप्रमाणे, पाकिस्तानी सत्तास्थाने पूर्व पाकिस्तानातील बंगाली अस्मिता वारंवार दाबून ठेवत असताना, १९७१ मध्ये शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरीच्या आगीने बांगलादेशला जन्म दिला. आता तीच परिस्थिती बलुचिस्तानमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, ‘उम्मा’वर प्रश्नचिन्ह होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जर ‘उम्मा’ खरोखरच व्यावहारिक असेल, तर सौदी-इराण, तुर्किये-सीरिया आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील वैराचे कारण काय? पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये अहमदिया मुस्लिमांची बहुआयामी भूमिका होती. १९४०मध्ये अहमदिया मुस्लीम मुहम्मद जफरउल्लाह यांनी पाकिस्तानचा धार्मिक विचार लिहिला होता. ते पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री बनले आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीरच्या मुद्द्यावर भारताविरुद्ध लॉबिंगही केले.
आॅक्टोबर १९४७मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला, तेव्हा अहमदिया मुस्लिमांचे खलिफा मिर्झा बशीर-उद-दीन महमूद अहमद यांनी भारतीय लष्कराच्या विरोधात ‘फुरकान फोर्स’ सारखे लष्करी दल तयार केले. कल्पना करा, ज्या पाकिस्तानसाठी अहमदिया मुस्लिमांनी इस्लामच्या नावावर त्यांच्या स्वप्नातील देशासाठी लढा दिला, त्याच पाकिस्तानमध्ये १९४७ मध्ये त्यांना धार्मिक कारणांमुळे गैर-मुस्लीम घोषित करण्यात आले. तेव्हापासून इतर ‘काफिरां’प्रमाणे तेही धार्मिक छळाचे बळी ठरले आहेत.
म्हणूनच पाकिस्तान हे राष्ट्र नाही, तर एक विषारी वैचारिक प्रकल्प आहे, ज्याचा पाया पूर्णपणे भारतविरोधी द्वेषावर केंद्रित आहे. १२ मार्च रोजीच पाकिस्तानी पंजाबच्या शिक्षण विभागाने ‘अनैतिकता आणि अश्लीलता’च्या नावाखाली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिंदी गाण्यांवर बंदी घातली होती. मग पाश्चात्य नृत्य आणि गाण्यांवर बंदी का नाही? त्यामुळे केवळ भारत आणि हिंदू द्वेषाने पछाडलेल्या या देशाचे विघटन अटळ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा