सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

खालच्या दर्जाच्या राजकारणाचा नमुना


राहुल गांधी, की जे स्वत: अनेक प्रकरणांमध्ये जामिनावर आहेत, त्यांचे संपूर्ण राजकारण आरोप करण्यावर आधारित आहे. ते भारतात बोलतात किंवा परदेशात, त्यांच्या भाषणांमध्ये फक्त भारत सरकार आणि भारतातील संवैधानिक संस्थांना लक्ष्य केले जाते. राहुल गांधी पूर्वी पंतप्रधानांसाठी ‘चौकीदार चोर हैं’ अशी टिप्पणी करायचे, परंतु जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले, तेव्हा त्यांनी संवैधानिक संस्थांना चोर म्हणण्यास सुरुवात केली आहे. एक दिवस आधी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांना धमकी दिली होती की, तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही आम्ही तुम्हाला शोधू आणि आज त्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी येथे नसलेल्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.


राहुल गांधी यांनी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर केलेले आरोप हे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण आहे. राहुल गांधी श्रीमंत कुटुंबातील असले, तरी ते सभ्यतेच्या बाबतीत खूपच गरीब आहेत, कारण त्यांना ही साधी गोष्टही माहीत नाही की, आपल्या धर्म आणि संस्कृतीत असे शिकवले जाते की, मृत व्यक्तीचा कधीही अनादर करू नये. अरुण जेटली यांनी त्यांना धमकावले असा आरोप राहुल गांधी करत आहेत तर वास्तव असे आहे की, दिवंगत अरुण जेटली जानेवारी २०१९ पासून अंथरुणाला खिळून होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये, जेव्हा जेटली लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री म्हणून संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार होते, तेव्हा अमेरिकेत झालेल्या शस्त्रक्रियेमुळे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना त्यांच्या जागी अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर, जेटलींच्या जागी पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

अरुण जेटली यांची १४ मे २०१८ रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती आणि तेव्हापासून ते घरून काम करत होते. ते त्यांच्या मंत्रालयाच्या बैठकांना आॅनलाइन उपस्थित राहायचे आणि जेव्हा ते अत्यंत आवश्यक होते, तेव्हाच लोकांना भेटायचे कारण डॉक्टरांनी त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई केली होती. अशा परिस्थितीत अरुण जेटली त्यांना धमकावण्यासाठी गेले होते असा राहुल गांधींचा दावा केवळ एक खोटारडा प्रकार नाही तर देशातील प्रामाणिक नेत्यांमध्ये गणल्या जाणाºया व्यक्तीच्या प्रतिमेवर हल्ला आहे. जर आपण ते पाहिले तर राहुल गांधी काँग्रेसच्या कायदेशीर परिषदेत बोलत होते, परंतु येथे त्यांनी बेकायदेशीर गोष्टी बोलल्या.


दुसरीकडे, भाजप नेते राहुल गांधींच्या विधानावर प्रत्युत्तर देत आहेत आणि दिवंगत अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनीही राहुल गांधींचे विधान तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आणि दिवंगत नेत्याच्या स्मृतीचा अनादर करणारे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘माझ्या वडिलांचे निधन २०१९ मध्ये झाले, तर कृषी कायदे २०२० मध्ये लागू झाले. राहुल गांधींचा हा दावा वेळेच्या दृष्टीने अशक्य आहे.’ रोहन म्हणाले की, अरुण जेटली लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवत आणि कधीही दबावाचे राजकारण करत नव्हते. रोहन म्हणाले की ते संवाद आणि सहमती निर्माण करण्यावर विश्वास ठेवत. जरी कोणतेही राजकीय मतभेद असले तरी ते खुल्या आणि रचनात्मक चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत. त्यांनी राहुल गांधींना दिवंगत नेत्यांना राजकीय वादात ओढू नका असा इशारा दिला. रोहन जेटली म्हणाले की, राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकरजी यांच्या बाबतीतही असेच काही केले होते. कृपया दिवंगत नेत्यांना शांततेत विश्रांती घेऊ द्या, अशी विनंतीही त्यांनी केली. यातून राहुल गांधींच्या खालच्या दर्जाच्या राजकारणाचे दर्शन घडते.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘राहुल गांधी यांचे खोटे बोलणे आता असह्य झाले आहे. ते त्यांच्या काल्पनिक विधानांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावे वारंवार ओढतात. अरुण जेटली यांनी कृषी कायद्यांबाबत त्यांना धमकावले हा दावा केवळ हास्यास्पदच नाही तर पूर्णपणे लज्जास्पद आणि घृणास्पद आहे.’ प्रमोद सावंत यांनीही आठवण करून दिली की, राहुल गांधींनी दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या बाबतीतही खोटी विधाने केली होती. ते म्हणाले की, राहुल गांधींनी राफेल करारावर खोटे आरोप करण्यासाठी पर्रिकर यांच्यासोबतच्या भेटीचे चुकीचे वर्णन केले होते. अशा विधानांमुळे केवळ तथ्ये विकृत होत नाहीत तर देशासाठी आपले जीवन समर्पित करणाºया नेत्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचतो.


असो, दिवंगत नेत्यांचे नाव आणि प्रतिमा राजकीय फायद्यासाठी वापरणे ही राहुल गांधींची सवय झाली आहे. हे केवळ राजकीय शिष्टाचाराच्या विरुद्ध नाही, तर सामाजिकदृष्ट्या अनुचित देखील आहे. शिवाय, अशा विधानांमुळे राजकीय चर्चेची पातळी कमी होतेच, परंतु दिवंगत नेत्यांची प्रतिमा अनावश्यकपणे वादात ओढली जाते. राजकीय पक्षांनी त्यांचे युक्तिवाद तथ्यांसह सादर करावेत आणि वैयक्तिक किंवा दिवंगत नेत्यांवर हल्ला करणे टाळावे. सावरकरांना जो सोडत नाही त्यांच्याकडून सभ्य वागणुकीची अपेक्षा करणे चुकीचे असेल, पण यातून राहुल गांधी जनतेच्या मनातून अधिकच उतरत जातील याबाबत तीळमात्र शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: