- भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते एकनाथ खडसे, मुंबईचे आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्यामुळे युती तुटल्याची सल शिवसेनेला आहे. त्यामुळे या तिघांच्या पराभवासाठी शिवसेनेने विशेष रणनीती आखल्याचे वृत्त आहे. शिवसेना हे जे काही करीत आहे ते अत्यंत योग्य असून अशा स्वार्थी नेत्यांना हटवणे हीच काळाची गरज आहे.
- विनोद तावडे यांच्यासारखा स्वार्थी आणि मतलबी नेता कोणी नसेल. फेब्रुवारी महिन्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीत केवळ अपघाताने ते आमदार झाले. त्यावेळी युती असतानाही तावडे मनसेच्या पायर्या झिजवत होते. परंतु राहुल नार्वेकरांनी गुपचूप आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि ते राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे विनोद तावडेंना विधानपरिषदेची संधी मिळाली. नाहीतर तेव्हाच त्यांना पराभव पत्करावा लागला असता. विनोद तावडे यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही. फोडाफोडीचे राजकारण करून गटबाजी निर्माण करणे एवढेच त्यांचे भारतीय जनता पक्षातील योगदान आहे.
- भारतीय जनता पक्षात मुंडे गट, गडकरी गट हा जो प्रकार सुरू झाला तो या विनोद तावडे यांच्यामुळेच. त्यामुळे एकेकाळी काँग्रेस हा पक्ष जसा गटातटांचा पक्ष होता तसा भारतीय जनता पक्ष हा गटातटांचा पक्ष झालेला आहे. अशी गटबाजी कोणत्याही पक्षासाठी घातक असते त्याचप्रमाणे ती महाराष्ट्रासाठीही घातक आहे. त्यामुळे अशा पक्षाला, विनोद तावडेंसारख्या नेत्याला पराभूत करणे हे मतदारांचे कर्तव्य आहे.
- विनोद तावडे यांच्यासारख्या खोटारड्या नेत्याला अशी अद्दल घडवलीच पाहिजे. उरणमध्ये आल्यावर जाहीर कार्यक्रमात आमदार विवेक पाटील याची स्तुती करतात. त्यांनी केलेल्या विकासकामांबद्दल गौरवोद्गार काढतात आणि प्रशांत ठाकूर यांच्या पक्षप्रवेशावेळी उरणच्या आमदारांवर टिका करतात. हा खोटेपणा केवळ विनोद तावडेंसारखे नेतेच करू शकतात. त्यामुळे अशा नेत्यांना रोखण्याचे काम शिवसेना करणार असेल तर शिवसेनेचे कौतुक करायला पाहिजे.
- कारण छत्रपतींचा आदर्श ठेवून शिवसेना काम करीत असताना शत्रूच्या विरोधात लढण्यापूर्वी शिवरायांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला होता. तसेच हे विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि आशिष शेलार हे महाराष्ट्राचे स्वकीय शत्रू आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव हा केलाच पाहिजे.
- मुळातच भाजपचे नेते इतके भरकटले आहेत की त्यांना आता पराभव समोर दिसू लागला आहे. आपण काय करतो काय नाही याचे कसलेही भान त्यांना राहिलेले नाही. सत्तेसाठी रेडिमेड नेते कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांनी प्रथा चालवली आहे. निष्क्रिय आणि भ्रष्ट अशा प्रशांत ठाकूर यांना भारतीय जनता पक्षात भगव्या पायघड्या घालण्यामागे विनोद तावडे यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या तावडे गटाच्या सगळ्यांना म्हणजेच प्रशांत ठाकूर यांनाही चांगलीच पराभवाची धूळ आता चारावी लागणार आहे.
- आज भारतीय जनता पक्षाला कसलाही चेहरा नाही. सत्ता हातात आल्यानंतर कोण मुख्यमंत्री असावा याचा चेहरा त्यांच्याकडे नाही. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले ते नरेंद्र मोदींमुळे. मोदी हेच भारताचे पंतप्रधान असतील, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे जाहीर केल्यामुळे मतदार तिकडे वळला. पण आज मुख्यमंत्रीपदाबाबत तसे नाही. एकतर बहुमत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत प्रत्येकाला डोहाळे लागले आहेत. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे सगळ्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत. त्यामुळे आपल्याला समर्थन मिळण्यासाठी प्रत्येकजण आपला गट मोठा करू पहात आहे. या गटबाजीमुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले तर विनोद तावडे लगेच बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात असतील. खडसे आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अत्यंत अस्थिर आणि बेभरवशी अशी स्थिती महाराष्ट्रात भाजपची आहे.
- भाजपचा कार्यकर्ता हा शिस्तीत तयार झालेला असतो. संघ मैदानावरील संस्कारातून तो घडत असतो. त्याचे वक्तृत्व, कर्तृत्व हे अभ्यासपूर्ण असते. पण आज हे जे सगळे उपरे आले आहेत ते थेट घुसले आहेत. अत्यंत बेशिस्त आणि बेभरवशी असे हे लोक आहेत. त्यामुळे त्यांना संघ परिवार आणि ओरीजनल भाजपचे लोक कधीही स्विकारणार नाहीत. देशप्रेम आणि अखंड हिंदुस्थान हे संघाचे तत्व आहे. पण जे पक्षातच अखंडता ठेवू शकत नाहीत, गटबाजी तयार करतात त्यांच्याकडे कसले आले आहे देशप्रेम आणि अखंडत्वाची भावना? त्यामुळे तावडेंप्रमाणेच या काँग्रेसमधून आलेल्या उपर्या भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल.
- देशाच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे योग्य नेतृत्त्व असले तरी सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या दृष्टीने भाजप हा हितावह नाही. भारतीय जनता पक्ष हा पळपुट्यांचा पक्ष आहे. काँग्रेसमधून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यावर प्रशांत ठाकूर काँग्रेसमधून पळाले आणि भाजपत घुसले. हेच पळपुटे सत्तेसाठी धर्मांधपणे बाबरी मशिद पाडायला गेले. मशिद पाडल्यानंतर तेथून पळून गेले. आम्ही काही केले नाही म्हणून सारवासारव करू लागले. अगदी अडवाणींपासून मुरली मनोहर जोशींनी तेच केले. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या खंबीरपणे सांगितले की मशिद पाडणारा शिवसैनिक असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. याला म्हणतात पुरूषार्थ. नाहीतर हे भाजपवाले लोकांना फक्त भडकवायचे आणि नंतर पळून जायचे. शिवसेनाप्रमुखांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी मिळाली त्यामुळेच. पण शिवसेनाप्रमुखांना डिवचण्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या लबाड नेत्यांनी, आशिष शेलार, विनोद तावडे यांनी नरेंद्र मोदी जेव्हा दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले होते तेव्हा मुद्दाम हिंदुहृदयसम्राट नरेंद्र मोदी असा उल्लेख करून शिवसेनाप्रमुखांचा अपमान केला होता. सम्राट एकच असतो. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असतील पण ते हिंदुहृदसम्राट नाहीत. तो हक्क फक्त शिवसेनाप्रमुखांचाच असेल. पण शिवसेनेला चिडवण्यासाठी या भाजपच्या मतलबी लोकांनी तावडे बेवड्यांनी नरेंद्र मोदींना हिंदूहृदयसम्राट म्हटले होते. त्याची सल प्रत्येक शिवसैनिकाने ठेवली पाहिजे. अशा तावडेंच्या मागे असलेल्या प्रत्येक उपर्या भाजपच्या नेत्याला, उमेदवाराला निवडून पराभूत केले पाहिजे.
- महाराष्ट्र म्हटल्यावर पहिले नाव पुढे येते ते छत्रपती शिवरायांचे. या छत्रपतींच्या नावाने आता हे भारतीय जनता पक्षवाले मतांचा जोगवा मागू लागले आहेत. शिवरायांचा आशीर्वाद म्हणून ते पोस्टरबाजी करत आहेत. पण त्यांना हा अधिकार पोहोचत नाही. कारण भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाला आहे. अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही तर स्वतंत्र विदर्भाचे तरी होवू असे स्वप्न गडकरी, मुनगंटीवार यांना पडत आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे काम हाच भाजप करीत आहे. त्यामुळेच अशा भारतीय जनता पक्षाला आता त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे.
- अतिशय फसव्या जाहीराती आणि खोटे बोलायचे काम हे उपरे भाजपवाले करीत आहेत. या उपर्यांनी ओरीजनल भाजप कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून पक्ष हायजॅक केला आहे. तीथे निष्ठावंतांचे काहीही चालत नाही. त्यामुळेच पितापुत्रांसारख्या खोटारड्या आणि संधीसाधूंना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे. या लोकांना लाज कशी वाटत नाही? ज्यांच्यावर आपण गेली दहा वर्ष टिका करत आलो. ते कसे वाईट आहेत हे सांगत आलो. तेच आता कसे बरोबर आहेत हे तुम्ही सांगता? मग कबूल करा तेव्हा आम्ही खोटे बोलत होतो म्हणून. पण कसली नीतीमत्ता नसलेली ही माणसे आहेत. विनोद तावडे यांच्यासारख्या स्वार्थी नेत्याने अशा लोकांना भारतीय जनता पक्षात आणून आपला गट मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षाचे, महाराष्ट्राचे तुकडे करणार्यांना हद्दपार करण्याची हीच वेळ आहे.
बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४
उपर्या नेत्यांमुळे भाजप महाराष्ट्राला घातक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा