सोमवार, ४ मे, २०२६

देशहिताला प्राधान्य


सोमवारी (४ मे) पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. याचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले, तर मतदारांनी देशहिताला प्राधान्य दिले हे यातून स्पष्ट झाले. देशासाठी ज्याप्रकारे निकाल येणे अपेक्षित होते, तसा निकाल आल्याने राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असेच म्हणावे लागेल.

सध्या देशात बांगलादेशी घुसखोरांची समस्या फार मोठी आहे. विशेषत: बांगलादेशातील उठाव, अराजक आणि निवडणुकांनंतर हे संकट अधिकच ठळक झालेले दिसत होते. बांगलादेशात एकीकडे हिंदूंवर अत्याचार होत होते. त्याचवेळी बांगलादेशी घुसखोर भारतात घुसत होते. त्यांना खुलेआम दरवाजे उघड करण्याचे काम प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते. हे घुसखोर प. बंगालमध्ये राहायचे, तिथून आधार कार्ड, ओळखपत्र तयार करून देशाच्या कानाकोप‍ºयात घुसत होते. अगदी मुंबई आणि परिसरातही मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आपल्याला आढळतात. त्यामुळे त्यांना भारतातून हुसकावून काढणे हे फार मोठे आव्हान होते. बांगलादेशींना बाहेर काढणे आणि घुसखोरीपासून रोखणे यासाठी सर्वात प्रथम ममता बॅनर्जींना रोखणे महत्त्वाचे होते. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे सरकार यावे यासाठी बांगलादेशात प्रार्थन होत होत्या. बांगलादेशच्या खासदाराने तर भाजप सत्तेवर आला तर आपल्याला धोका असेल असे वक्तव्य केले होते. यातून स्पष्ट होते की, ममता बॅनर्जी बांगलादेशी घुसखोरांना मदत करत होत्या. नक्षलवादी आणि घुसखोर बांगलादेशी हीच तर त्यांची ताकद होती. त्या ताकदीवर त्यांनी तीन वेळा सत्ता मिळवली होती. पण या घुसखोरांनी देशात फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे वातावरण तयार केले होते. त्यामुळे सीमेवरच्या शत्रूला रोखणे सोपे असते, त्यांच्याशी युद्ध करणे सोपे असते, पण अशा अंतर्गत छुप्या शत्रूंशी लढणे सोपे नसते. या शत्रूंना रोखण्यासाठी ममता बॅनर्जींची सत्ता काढूण घेणे काळाची गरज होती. ही गरज भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाची नव्हती, तर देशहितासाठी ती गरज होती. म्हणूनच जनतेला जेव्हा हे वास्तव समजले, तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींना नाकारले.


या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे शुद्धीकरण केले. हे अत्यंत महत्त्वाचे होते. तब्बल ९१ लाख मतदारांची नावे याठिकाणी वगळली होती. हीच ममता बॅनर्जींची ताकद होती. दोन-दोन ठिकाणी नावे लावणे, बोगस मतदान करणे या बळावर त्यांनी सातत्याने विजय मिळवला होता. ही बोगस नावे वगळल्याने ममता बॅनर्जींचे कंबरडे मोडले. ९१ लाख मतदार म्हणजे प्रत्येक मतदारसंघातून सरासरी २५ ते ३० हजार मतदारांची नावे वगळली होती. ही बोगस नावेच निर्णायक होती. ममता बॅनर्जींसाठी बोगस मतदान करून सत्ता देणारी ही मते होती. या मतांमुळेच प. बंगालमध्ये कोणताही विकास त्यांनी केला नाही. पंधरा वर्ष सत्ता उपभोगून फक्त घाणेरडा कारभार केला. ना कुठला उद्योग उभा राहू दिला ना कुठे रोजगार निर्मितीचा प्रकल्प येऊ दिला. कोणत्याही गुंतवणुकीला प्राधान्य न देता सत्ता चालवली. राज्याच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

आज देशात सर्वात जास्त तरुणांची संख्या असताना प. बंगालमधील तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात चीड होती. एक काळ असा होता की, देशातील फार मोठे औद्योगिक राज्य म्हणून प. बंगालकडे पाहिले जात होते. या बंगालला फार उजाड करण्याचे काम अगोदर डाव्या पक्षांनी आणि नंतर ममता बॅनर्जींनी केले. रोजगार नसल्यामुळे तरुणांना गुन्हेगारीकडे नाही तर स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे तरुणांनी ममता बॅनर्जींना नाकारले आहे. नाकारण्यासाठी सक्षम पर्याय असावा लागतो. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून इथल्या मतदारांना तो एक आशेचा किरण दिसला.


प. बंगाल हा हिंदू बहुल भाग म्हणून बांगलादेशात समाविष्ट झालेला नव्हता. पण ममता बॅनर्जींच्या काळात इथल्या हिंदूंची संख्या कमी होत गेली आणि मुस्लीम व्होट बँक वाढत गेली. ही संख्या भारतातील मुसलमानांची असती तर चालले असते. पण ही संख्या बांगलादेशी घुसखोरांमुळे वाढत होती. हाच देशासाठी फार मोठा धोका होता. या धोक्याचे आश्रयस्थान असलेल्या ममता बॅनर्जींना हटवणे हेच महत्त्वाचे होते. त्यामुळे मतदारांनी भाजपला कौल दिला असे नाही तर देशहिताला प्राधान्य दिले हे लक्षात घेतले पाहिजे. प. बंगालसारखे सीमावर्ती राज्य हे सुरक्षित हातात सोपवणे फार महत्त्वाचे होते. देशाची सुरक्षा आणि पश्चिम बंगालच्या हितासाठी, विकासासाठी, परिवर्तनसाठी मतदारांनी हा कौल दिला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

या निवडणुकीत जेवढे वाईट प्रकार आणि अपप्रचार करता येईल तितका प्रयत्न ममता बॅनर्जींनी केला. यामध्ये हिंदू मुस्लीम भेदभावाची दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशी घुसखोरांना होत असलेला विरोध आणि मज्जाव याचा अर्थ ममता बॅनर्जींनी मुसलमानांना विरोध असे भासवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर इथल्या लोकांना शाकाहारी भोजनच करावे लागेल, मांस खाण्यावर बंदी घातली जाईल अशी भीती घालून इतक्या खालच्या थराचा प्रचार त्यांनी केला. पण याचे वास्तव मतदारांनी ओळखले होते. आहार कोणी काय करावा हे कोेणताही पक्ष ठरवू शकत नाही. भारतीय जनता पक्षात मांसाहार करणारे लोक नाहीत का? पण पंतप्रधान मोदींनी कोलकात्यातील कालीमातेची पूजा करून नकळत याला उत्तर दिले होते. कालीमातेला मांसाहाराचा नैवेद्य असतो. तो दाखवून आमचा मांसाहाराला विरोध नाही हे सहजपणे दाखवून दिले आणि ममता बॅनर्जींच्या कुटील षड्यंत्राला हाणून पाडले. हे सगळे तिथल्या जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले. शेवटी देशहित आणि आपल्या भल्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे हे ओळखून मतदारांनी योग्य कौल दिला. आता पश्चिम बंगालला विकासाच्या प्रवाहापासून रोखणे कोणालाही शक्य होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: