लंकादहन करायचे असल्यास काही बिभीषण निश्चितच आवश्यक असतात, असे विधान भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस हे प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा भरल्यामुळे ते आता बेजबाबदार विधाने करू लागले आहेत असे वाटते. एकंदरीतच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कसला तरी गर्व झालेला आहे असे वाटते. त्यामुळे त्यांच्यात उर्मटपणा प्रचंड वाढलेला दिसून येतो आहे. चार दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची एबीपी माझा च्या कट्टावर जी मुलाखत होती त्यामध्ये त्यांच्यातील गुर्मी ही अत्यंत हिडीस वाटत होती. तोच प्रकार सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्यात वाटत होता. एक संयमी आणि नेमके बोलणारा नेता अत्यंत बेजबाबदार विधाने करताना दिसत होता. परंतु नकळत ते खरे बोलून गेेले. आपण नको त्या लोकांना पक्षात घेतल्याबद्दल त्यांना पश्चाताप ्रझाला असावा असेच दिसून येते. लंकादहन करण्यासाठी बिभिषण हवेत याचा अर्थ राक्षसी वृत्तीचे लोक आपल्या पक्षात आले आहेत हे त्यांनी कबूल केले हे लक्षात घेतले पाहिजे.पण या भाजपच्या लोकांनी रामाचे जरी भांडवल केले असले तरी त्यांना खरे रामायण समजलेच नाही हे लक्षात घेतले पाहिजे. लंकादहन हे हनुमानाने केले होते आणि त्यानंतर कैक दिवसांनी बिभिषणाची रामाशी मैत्री झाली. बिभिषणाला रामाने आसरा दिला तरी तो केवळ लंकाधिश म्हणूनच आसरा दिला. रावणाशी युद्ध सुरू करण्यापूर्वी रावणाला चिडवण्यासाठी बिभिषणाला राज्याभिषेक करण्याचा संकल्प रामाने सोडला. रावणवधानंतर मानवाच्या आणि राक्षसांच्या मर्यादा लक्षात घेवून बिभिषणाची इच्छा असूनही बिभिषणाला अयोध्येत राहण्यास रामाने परवानगी दिली नाही. तुमची जागा लंकेत आहे असे सांगून सर्व राक्षसांना परत पाठवले. पण हे भाजपचे लोक त्या रामायणाचा खोटा संदर्भ घेवून बिभिषणाला कायमस्वरूपी आपल्यात घेत आहेत. पराभव करण्यासाठी काही फितुर मिळवणे आणि नंतर त्या फितुरांना इनाम देवून परत त्यांच्या गावात परत पाठवणे ही राजनीती आहे. मग नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काँग्रेसमधील राक्षसांना आपल्यात घेतले आहे त्यांना नंतर कुठे फेकून देणार? हे जे काँग्रेसमधून आलेले भ्रष्ट नेते आज भाजपच्या तिकीटावर निवडणुका लढवत आहेत त्यांना नंतर कुठे अडगळीत टाकणार ते जरा स्पष्ट केले तर फार बरे होईल. खरे तर देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती अभ्यासू म्हणून प्रसिद्ध आहे. विरोधकांवर कागदपत्रांच्या आधारे टीका करणे हा त्यांचा गुण आहे. त्याला व्यक्तिगत स्वच्छ चारित्र्याची जोड मिळाली होती. यामुळेच सरकारविरोधातील त्यांच्या कडव्या मार्याला विश्वासार्हता मिळाली. अन्य नेत्यांबद्दल तोडपाण्याच्या गोष्टी बोलल्या जात असताना फडणवीस हे त्यांच्या स्वच्छ वागणुकीमुळे उठून दिसायचे. अशा फडणवीसांना पक्षासाठी असली उथळ विधाने करायची वेळ यावी याहून दुर्दैवी परिस्थिती नाही. याला नैतिक अध:पतन म्हणतात. नितीमत्तेचा र्हास होवू लागला की माणूस बरळू लागतो. नको त्या लोकांना आपल्या पक्षात घेवून जो भाजप भ्रष्ट केला आहे त्यामुळे फडणवीसांचे संतुलन जात आहे असे वाटते. त्यामुळे छछोर आणि चुकीची विधाने ते करू लागले आहेत. रामायणाचे चुकीचे संदर्भ देवून स्वत:च अडचणीत येत आहेत. फडणवीसांनी ज्यांच्याकडून राजकारणाची मुळाक्षरे गिरवली ते नितीन गडकरी अशी विधाने करण्यात प्रसिद्ध आहेत. गडकरी काहीही बोलतात आणि वेळ मारून नेतात. पनवेलला काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेताना राम ठाकूर यांना आता ते योग्य ठिकाणी आले आहेत असे सांगताना इतके दिवस रावणाकडे होता आता खर्या रामाकडे आला आहात असे सांगितले. रामशेठ खूष झाले पण रावणाकडे बिभिषण होता. त्यामुळे आपल्याला राम म्हटले असे जरी त्यांना वाटत असले तरी घरचा भेदी बिभिषण असेच नितीन गडकरी यांनी त्यांना संबोधले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर या बिभिषणाला कुठे अडगळीत टाकतील याचा नेम नाही. पण नितीन गडकरींची वाक्ये नेहमीच दादा कोंडके सारखी द्वयर्थी असतात. त्याचा सोयीस्कर अर्थ नंतर ते लावतात. पण देवेंद्र फडणवीसांकडून तसे अपेक्षित नाही. उपयुक्तता या एकमेव निकषावर गडकरींचे राजकारण चालते. त्यांच्या असल्या युक्तिवादाकडे जनता गंभीरपणे पाहत नाही. फडणवीस यांचे तसे नाही व ज्यांच्या जिवावर ते मते मागणार आहेत, त्या मोदींनीही असले युक्तिवाद केलेले नाहीत. परंतु सध्या भाजपचा सगळा कारभार विपरीत पद्धतीने चालू असल्याने कुठे काय बोलावे हे नेत्यांना समजत नाही असे झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांची संख्या पाहता खरे तर शत-प्रतिशत भाजप ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याची संधी स्थानिक नेत्यांना होती. पण आता लढून मिळवले ते बोलून घालवले अशी अवस्था या नेत्यांवर येणार आहे.नितीन गडकरींनीच एका मुलाखतीत बोलताना कोणत्याही गोष्टीची एक ठराविक जागा असते. हे बिंबवण्यासाठी सांगितले की अगदी नवे कोरे स्वच्छ असे बेडपॅन असले तरी त्याच्यात कोणी श्रीखंड ठेवेल काय? असा युक्तीवाद केला होता. त्याचा अर्थ असा निघतो की आज केवळ पैसा खर्च करू शकेल म्हणून आणि काँग्रेसची एक जागा कमी होईल म्हणून त्यांनी प्रशांत ठाकूर यांना आपल्यात घेतले आहे. नंतर त्यांची जागा बेडपॅनसारखीच होईल. बेडपॅनच्या मुखात कधी श्रीखंड पडत नसते हे गडकरीच या संधीसाधूंना दाखवून देतील. खरे तर आज भाजपची अवस्था या नागपूरी संत्र्यासारखी झालेली आहे. वरचे साल काढले की सगळ्या फोडी अलग होतात. आज मोदी नावाचे कवच घेवून हे सगळे नेते उड्या मारत असले तरी प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचे तोंड वेगळे आहे. गडकरी, फडणवीस, खडसे आणि विनोद तावडे यांची चार दिशांना तोंडे आहेत. प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. पण स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे राज्यातील नेते एकजुटीने उभे राहिले असते व युती तोडण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच घेतला असता तर चित्र वेगळे दिसले असते. पण आता भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी मतदारच तयार झालेला आहे. काँग्रेसच्याच लोकांना भाजपमध्ये घ्यायचे होते तर नरेंद्र मोदींनी दिल्लीत विधानसभेत भाजपचे सरकार का स्थापन केले नाही. आम आदमी पार्टीला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसच्या चार आमदारांचा पाठिंबा ते मिळवू शकले असते. पण मोदींनी तसे केले नाही. पण महाराष्ट्रातील भ्रष्ट भाजपचे नेते मात्र काँग्रेसजनांनाच कुरवाळत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे.कदाचित मोदींच्या करिश्म्यावर भाजपचाच विश्वास नसावा अशा रीतीने पावले पडत गेली. अन्यथा पाचपुते, गावित अशासारख्यांना पक्षाची दारे उघडी करण्याचा निर्णय घेतला गेला नसता. राजकीय व्यूहनीती म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतात असाही युक्तिवाद फडणवीस यांनी केला आहे. परंतु यातून भाजपची अगतिकता किंवा सत्तेसाठीची व्याकूळता फक्त दिसते. यामध्ये नीती कोणतीही नाही. लोकसभा निवडणुकीनंतर जे वेगळे वारे राज्यात वाहू लागले होते, जनतेमध्ये निवडणुकीबद्दल उत्साह होता; पण नेत्यांच्या अशा वागण्यामुळे तो कमी झाला आहे.बिभीषणाची उपमा देताना फडणवीस यांची गल्लत झाली असे म्हणावे लागते. रामायणातील त्या घटनेचा असा उपयोग निदान फडणवीस यांच्याकडून अपेक्षित नव्हता. रामायणातील युद्ध मुळात एका तत्त्वासाठी होते. ते अन्यायाविरुद्ध होते. तत्त्व शुद्ध असल्यामुळे बिभीषणाचे वर्तन फितुरीत गणले गेले नाही. रामाकडून वालीचा झालेला वध ही फसवणूक होती असे सकृतदर्शनी वाटले तरी त्यामागचा मूळ हेतू शुद्ध असल्याने तो वधही रामासाठी पापाचरण मानले गेले नाही. इथे भाजप कसले तत्त्वाचे राजकारण करीत आहे? कोणत्या तत्त्वासाठी पाचपुते वा गावित, प्रशांत ठाकूर अशांना पक्षात आणले? इथे तत्त्व फक्त सत्ता मिळवणे इतकेच आहे. तत्त्वशून्य राजकारणासाठी बिभीषणाला वेठीस धरणे हे हिंदुत्व मानणार्यांना तरी शोभत नाही. फडणवीस ज्यांचा गौरव करतात ते बिभीषणाचे वंशज नसून संधीसाधू आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करू या एकमेव उद्देशाने सर्वकाही चालू आहे. निव्वळ राजकीय स्वार्थ यापलीकडे त्यामागे काहीही नाही. पण मुंडे महाजनांनंतर महाराष्ट्रातील भाजपची गडकरी, फडणवीस, तावडे, खडसे या चौकडीने वाट लावली. विश्वास उडवला हे निश्चित. भाजप म्हणजे काँग्रेसचीच दुसरी शाखा आहे. संघाच्या शाखेतून बाहेर पडत काँग्रेसची नवी शाखा काढण्याचे काम भाजपने केले आहे.
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४
संघाच्या शाखेला तिलांजली देवून भाजपने काढली काँग्रेसची शाखा
सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४
छोटे पक्ष होतील मोठे
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही म्हणून निवडणूक लढवली असली तरीही भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे आघाडीतील घटक पक्ष सोडून गेले तरी भाजपला चिंता करण्याची गरज नाही असा समज भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झाला आणि त्यांच्यात स्वबळाची भावना निर्माण झाली. प्रत्यक्षात आघाडीच्या राजकारणाला भारतातील मतदारच कंटाळले होते. त्यामुळे कोणत्या तरी पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले पाहिजे असा दृष्टीकोन मतदारांमध्ये गेल्या तीन वर्षात रूजत होता. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले तरी चालेल पण एक हाती सत्ता राज्यात आली पाहिजे असा विचार अनेक ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवला. त्यामुळेच अजून पंधरा वीस दिवसांनी होणार्या या निवडणुकीत महाराष्ट्राचे चित्र नेमके कसे असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. पण सध्याचे वातावरण पाहता या चार मोठ्या पक्षांपेक्षा छोट्या आणि घटक पक्षांची कामगिरी या निवडणुकीत चांगली राहिल असे चित्र दिसते आहे.
पंचवीस आणि पंधरा वर्षांचा संसार मोडून जनतेच्या मनातील संभ्रम संपविण्याचे उत्तम काम महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांनी केले. आजपर्यंत एकमेकांच्या साथीने दंड फुगविणार्या चार पक्षांना आता जनता खरी ताकद दाखवून देईल. मुळात युती वा आघाडी ही मित्रपक्षांतील नव्हती. एकमेकांच्या साथीने मोठे होण्याची धडपड चारही पक्ष करीत होते. त्याला आता आळा बसेल. महाराष्ट्रावर पूर्ण नियंत्रण हाच उद्देश प्रत्येकाच्या मनात होता. हा उद्देश साध्य करण्यास दुसर्या पक्षाबरोबरची युती वा आघाडी ही अडचण होत होती. ती अडचण सर्वांनी स्वत:हून दूर केली. त्यामुळे या निवडणुकीत कौन कितने पानी में हे दिसून येणार आहे.
देशातील जनमत आघाडीकडून एकपक्षीय राजवटीकडे झुकविण्याची कामगिरी नरेंद्र मोदींनी करून दाखविली. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करून दाखविण्याची संधी त्यांना आता मिळेल. लोकसभा निवडणुकीत भाजपची मतसंख्या 30 टक्क्यांवर गेली आहे तर शिवसेनेची 20 टक्क्यांवर रेंगाळली आहे. मोदींनी देशात करून दाखविलेला चमत्कार उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात करून दाखविणे शक्य होईल असे वाटत नाही. यामुळे स्वबळावर सत्तेवर येणे शिवसेनेसाठी अशक्य आहे. राष्ट्रवादीने सरंजामी पद्धतीने काही विधानसभा मतदारसंघ बांधले आहेत. तेथे त्या पक्षाला यश मिळाले तरी अन्यत्र त्यांच्या विरोधात वातावरण आहे. परंतु निवडणूक पूर्व झालेल्या अनेक चाचण्यांचे निकाल उलथवून लावणारी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात काही धक्कादायक निकाल लागलेले पहायला मिळतील यात शंकाच नाही.
विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा ढंग कोण ठरविणार यावर बरेच काही अवलंबून आहे. हा ढंग मोदी ठरवतील. मंगळ अभियान असो वा आजचे मेक इन इंडिया अभियान असो, अप्रत्यक्ष प्रचाराला मोदींनी सुरुवात केली आहे. हे दोन्ही इव्हेंट राज्यातील तरुण, मध्यमवर्ग व प्रगत शेतकर्यांनाही भुरळ घालणारे आहेत. नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौर्यामुळे ते जनतेसमोर रोज राहतील. पाठोपाठ राज्यात 10-12 प्रचारसभा घेऊन ते धुरळा उडवून देऊ शकतात. विकासाचा मुद्दा घेऊन ते प्रचारात उतरले तर महाराष्ट्र त्यांना साथ देऊ शकतो, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचा आहे. परंतु हा विश्वास तेव्हाच सार्थ ठरला असता जेव्हा भाजप हा ओरिजनल भाजप राहिला असता. पक्षवाढीसाठी सरसकट कोणालाही आपल्यात घेण्याच्या प्रवृत्तीने भाजपला मतदार कौल देतील असे समजणे देवभोळेपणाचे ठरेल. जनतेला परिवर्तन हवे असताना अन्य पक्षातून आयात केलेले, कलंकीत, भ्रष्ट, निष्क्रिय नेते ही भाजपची ताकद होवू पहात आहे. त्यांना नाकारण्यासाठी भाजप हा देशापुढे पर्याय निर्माण झालेला असताना त्यांनाच आपल्यात घेऊन भारतीय जनता पक्षाने स्वत:चे आणि मोदींचे अवमूल्यन करून घेतलेले आहे. त्यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही हे निश्चित.
मोदींकडे गुजराती नेता वा शाहू, आंबेडकरांचा वैरी म्हणून पाहिले जात नाही हे अन्य पक्षांना लक्षात घ्यावे लागेल. यामुळे शिवसेनेला भावनेचे राजकारण खेळून फार मजल मारता येणार नाही. तरीही स्वबळावर सत्ता मिळण्यासारखी स्थिती कोणाची नाही. सत्तेसाठी साथसंगत करण्याची मोकळीक असावी म्हणून युती व आघाडी तोडण्यात आली आहे. देशाप्रमाणे राज्यातही एकपक्षीय राजवट आणण्याचा प्रयोग होणार आहे. तो यशस्वी ठरला नाही तर पुन्हा आघाड्यांचे राजकारण होईल व प्रचारातील शत्रू पुन्हा सत्तेसाठी मित्र बनतील. परंतु या गलिच्छ राजकारणात जुने मित्रच बरोबर घेतले जातील असे नाही. कारण ज्या गतीने भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेते आपल्या बरोबर घेतले आहेत, आपल्या पक्षात घेवून त्यांना उमेदवारीही दिली आहे त्यावरून भाजप काँग्रेसशी, राष्ट्रवादीशी सत्तेसाठी हातमिळवणी करू शकतो हे निश्चित आहे.
अशा भ्रष्ट आघाड्यांनाच खरे तर मतदार वैतागले आहेत. गेल्या 20 वर्षात राज्यात स्थिर सरकार नाही. एकपक्षिय सरकार नाही. त्यामुळे राज्याचा खर्च वाढला आणि विकासदर मंदावला अशी स्थिती आहे.
अस्थिर मुख्यमंत्रीपद
गेल्या पस्तीस वर्षात महाराष्ट्रात पाच वर्ष कार्यकाल पूर्ण करेल असा एकही मुख्यमंत्री मिळाला नाही. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी 15 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात. बिहार, छत्तीसगड, आसाम, प. बंगाल, मध्यप्रदेशात, तामिळनाडूत, दिल्लीत, गोव्यात ते शक्य होते. पण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि महत्त्वाचे राज्य म्हणवणार्या राज्यात सलग पाच वर्ष एकच मुख्यमंत्री असत नाही. त्यामुळे अस्थिर सरकार हा महाराष्ट्राला 1980 च्या दशकापासून लागलेला शापच म्हणावा लागेल.
नेता निवडीचा अधिकार आमदारांना नाही
निवडून आलेल्या आमदारांनी आपला गटनेता, मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार गमावलेला आहे. मुख्यमंत्री दिल्लीतून ठरविण्याची प्रथा बॅ. अंतुले यांच्या नियुक्तीनंतर इंदिरा गांधींनी सुरू केली. ती आजही कायम आहे. त्यामुळे राज्यात सातत्याने अस्थिरता राहिली आहे.
अनेक मुख्यमंत्री
1980 पासुन बॅ. अंतुले, बॅ. बाबासाहेब भोसले, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, सुधाकरराव नाईक, पुन्हा शरद पवार, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे 15 वेळा मुख्यमंत्रीपद बदलले गेले. त्यामुळे सरासरी अडीच वर्षाला मुख्यमंत्रीपद बदलले गेले आहे. ही अस्थिरता संपुष्टात येण्याची गरज आहे.
निर्णयक्षमता नाही
आघाडी केली असल्यामुळे मित्र पक्षांना सांभाळण्याच्या नादात कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र ठप्प झालेला दिसून येतो. आमची निर्णय घेण्याची इच्छा आहे पण आघाडीतील घटक पक्ष त्याला मान्यता देत नाहीत त्यामुळे हा निर्णय होवू शकत नाही असे सांगून अनेक निर्णय प्रलंबित राहतात. त्यामुळे आघाडीचे सरकार नको अशी मतदारांची इच्छा आहे.
छोट्या पक्षांची ताकद वाढणार
यावेळी स्वबळावर लढणार्या मुख्य पक्षांमुळे छोट्या पक्षांची ताकद वाढलेली असणार आहे. त्यामुळे साहजीकच कोणत्याही एका मोठ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. आघाडी आणि युती फुटल्यामुळे हे चारही पक्ष आहे त्यापेक्षा कमकुवत होतील असे चित्र आहे. कारण यामध्ये पाडापाडीच्या राजकारणाला फार मोठा उत येण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा छोट्या पक्षांना निश्चित होईल.
मनसेचा चमत्कार
गेल्या काही दिवसांपासून चर्चेतून दूर राहिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष अचानकपणे आपले अस्तित्व दाखवून देईल असे सध्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पक्ष थोडा बॅकफूटवर गेला होता. पण युतीच्या विभाजनामुळे पुन्हा या पक्षाचे महत्त्व वाढेल आणि काही तरी चमत्कार करेल असे चित्र सध्या आहे. त्यात महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट सादर करून राज ठाकरे यांनी थोडा आशावाद निर्माण केला आहे. मागच्या खेपेपेक्षा याखेपेला उमेदवारही जास्त उभे केले आहेत. साहजीकच मनसे काहीतरी चमत्कार करेल यात शंका नाही.
शेतकरी कामगार पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल
गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा विचार केल्याशिवाय कोणालाही काहीही करता येणार नाही अशी परिस्थिती यामुळे निर्माण होईल. आपले संख्याबळ अनेक वर्ष स्थिर ठेवलेला शेतकरी कामगार पक्षाची कामगिरी या निवडणुकीत अधिक ठसठशीत असेल आणि संख्याबळही वाढलेले असेल. गत निवडणुकीत गमावलेली पनवेलची जागा अगदी सहजपणे शेतकरी कामगार पक्ष काबीज करेल. प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी आणि सामान्यांच्या हितासाठी झटणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे मतदार आत्मियतेने पाहतील आणि त्यांना अपेक्षित यश सहज देतील.
निष्ठावंतानाच यश मिळणार
वारा येईल तशी पाठ फिरवायची आणि सत्ता येईल तिकडे जायचे असे ज्याचे गुळखोबरं त्याचे चांगभलं म्हणणार्या नेत्यांना या निवडणुकीत मतदार धडा शिकवतील. जे ओरीजनल, जे निष्ठावंत आणि कार्यक्षम आहेत त्यांनाच मतदार आपला कौल देतील.
शेंदूर फासून देव होण्याचे दिवस संपले
कोणत्याही दगडाला शेंदुर फासून भगवा करायचा आणि लोकांनी श्रद्धेने नमस्कार करायचा हे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे पक्ष पाहून नाही तर व्यक्ति पाहून मतदान या निवडणुकीत होईल. हा निष्ठावंत भाजपचा नाही, हा किती काळ इथे राहणार? त्याच्यामुळे भले होणार नाही. त्यामुळे भाजपचा आहे म्हणून त्याला मतदान करायचे असे अंधश्रद्ध काम आता मतदार करणार नाही. जनहितासाठी झटणार्या नेत्यांनाच या निवडणुकीत संधी मिळेल.
रावणाशी हातमिळवणी करून भाजपच्या रामाने वानरसेनेचा घात केला
जनतेच्या मनातील विश्वास गमावून भारतीय जनता पक्ष आता असूयेने सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप हा सर्वसामान्यांच्या मनातून उतरत आहे. शिवसेनेची युती तोडल्यानंतर आता शिवसेनेशी घरभेदीपणा करण्याचा जो प्रकार भाजपकडून होत आहे तो अत्यंत हिडीस आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या सत्तेपासून आता रोखावेच लागेल.ज्यांना नाकारायचे त्या काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्ट आणि निष्क्रिय नेत्यांना तिकीटे दिल्यानंतर शिवसेनेनेच्या काही नेत्यांना फोडण्याचा जो प्रकार भाजपने केलेला आहे तो अत्यंत संतापजनक आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जायचे ही नीती अत्यंत वाईट आहे. निवडणुका या जिंकण्यासाठी लढायच्या आहेत हा जो भाजपने नवा फॉर्म्युला आणला आहे तो नीतीमत्तेला काळीमा फासणारा आहे. निवडणुका जिंकण्यासाठी चारित्र्यहीन नेत्यांनाही आपल्याकडे ओढायचे, काँग्रेसच्या लोकांनाही आपले लेबल लावून उमेदवारी द्यायची, निवडून येण्याचा निकष लावून उमेदवारी द्यायची, पैसा खर्च करू शकेल अशा शेठजींना आपल्या पक्षात घ्यायचे हा भाजपचा सध्याचा विचार म्हणजे लोकशाहीला लागलेला कलंक म्हणावा लागेल.महाराष्ट्रात शिवसेनेला खर्या अर्थाने सर्वात प्रथम साथ दिली ती ठाणे जिल्ह्याने. या ठाण्यातील एकेका नेत्यांना आपल्याकडे ओढून शिवसेनेची घरफोडी करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. हा प्रकार अतिशय वेदनादायी असाच आहे. शिवसेनेत दीर्घकाळ असलेले कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले, माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांना भारतीय जनता पक्षाने बंडखोरी करायला भाग पाडून भाजपतर्फे उमेदवारी दिली. युती तोडली ती तोडलीच पण आपल्या 25 वर्ष असलेल्या मित्राला संपवायचा चालवलेला हा प्रयत्न भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेने विजय चौगुले यांना उमेदवारी दिल्यामुळे वैभव नाईक यांना बंडखोरी करण्यास भारतीय जनता पक्षाने प्रोत्साहन दिले आणि भाजपच्या तिकीटावर उभे केले. याचा फायदा ना शिवसेनेला होणार ना भजपला होणार. त्याचा फायदा विरोधकांना होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला होणार आहे हे भाजपने का लक्षात घेतले नाही?पुणे जिल्ह्यातही भोर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार ढमाले यांना बंडखोरीला प्रोत्साहन देवून भाजपने उमेदवारी दिली. भारतीय जनता पक्ष आपला खरा शत्रू हा काँग्रेस आहे हे सोडून शिवसेनेला लक्ष करण्याचे ठरवले आहे काय ? किती दुर्दैवी गोष्ट आहे ही? केवळ शिवसेनेला हटवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी सरसकट कोणालाही आपल्याकडे घेण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असेल तर मतदार या भाजपला साथ देणार नाहीत. हा भारतीय जनता पक्ष किमान महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयींचा भाजप नाही. हा भाजप नरेंद्र मोदींचा भाजप नाही. हा भाजप मुंडे महाजनांचा भाजप नाही. तर हा काँग्रेसाळलेला भाजप आहे. खोटेपणाचे तंत्र विकसीत करून, इंग्रजांच्या फोडा आणि झोडा या विचाराचा प्रसार करणारा हा भाजप आहे. त्यामुळे अशा भाजपला आता नाकारावेच लागेल.काँग्रेसच्याच लोकांना आपल्याकडे घेवून, अन्य पक्षांचे नेते आपल्याकडे ओढून बहुमत मिळवू पाहणार्या भाजपकडे कसला विचार असणार आहे? प्रशांत ठाकूर यांची निष्क्रियता, खोटेपणा याला गेली पाच वर्ष मतदार कंटाळले होते. केवळ स्वार्थासाठी पक्षाचा आणि सत्तेचा वापर करायचा आणि जनतेकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांच्या धोरणाला पनवेलकर वैतागले होते. त्याच प्रशांत ठाकूर यांना भारतीय जनता पक्ष तिकीट देत असेल तर हा भाजप नाही हे काँग्रेसचेच नवे रूप आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे ओढायचे आणि आपला पक्ष मोठा करायचा ही काँग्रेसची गेल्या पन्नास साठ वर्षांपासून असलेली परंपरा. या परंपरेमुळेच एकाधिकारशाही, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला उत आला.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेस मोठी करण्यासाठी बेरजेचे राजकारण केले. सत्तेच्या माध्यमातून विकासकामे होतील असे आमिष दाखवून वेगवेगळ्या पक्षातील समाजवादी, डाव्या पक्षातील नेत्यांनाही आपल्याकडे ओढले. यामध्ये खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण यांनाही शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये नेले. सहकारमहर्षी म्हणून कराड आणि वाळवा तालुक्यात ख्याती असलेल्या यशवंतराव मोहीते यांना काँग्रेसमध्ये आणले. अशा प्रकारे छोटे छोटे पक्ष संपवून बेरजेचे राजकारण यशवंतरावांनी केले होते. तोच प्रकार नव्याने आता भारतीय जनता पक्ष करताना दिसत आहे. यातून भाजपला स्वत:चा पक्ष मोठा झालेला आहे हे जगाला दाखवता येईल. पण तो खर्या अर्थाने मोठा झाला आहे काय याचे ते उत्तर मनाला देवू शकणार नाहीत. सत्ता मिळवण्याची ही जी इर्षा भाजपने चालवली आहे ती महाराष्ट्राला, देशाला अत्यंत घातक अशी आहे.भारतीय जनता पक्षाचे मूळचे जे नेते होते त्यामधील ज्येष्ठ असे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी असे अनेक नेते आता भाजपच्या या नव्या पिढीने अडगळीत टाकले आहेत. हा पक्ष आपल्या मूळ अजेंड्यावरून दूर गेला आहे आणि काँग्रेसचीच धोरणे राबवू लागला आहे. हा प्रकार कदापि मतदार सहन करणार नाहीत. कुठे गेले भाजपचे हिंदुत्ववादी विचार? कुठे सोडले अयोध्येतील रामाला त्यांनी? आता अयोध्येतील रामाला पुन्हा वनवासाला जावे लागणार का? कसा पडला या मुद्यांचा विसर भाजपला? आता रामाच्या नावाखाली असलेले रावण भाजपने आपल्या पोटात घेण्यास सुरूवात केल्यामुळे त्यांनी वानरसेनेला फस्त करण्याचा चंग बांधला आहे. रामायणात रामाचे खरे मित्र होते ते वानर. या वानरसेनेमुळे रामाला सीतेपर्यंत लंकेला पोहोचता आले. पण त्याच रावणाशी हातमिळवणी करून वानरांचा विश्वासघात करण्याचे काम भाजपच्या या नव्या रामायणात घडताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील अस्तित्व हे केवळ शिवसेनेमुळे आहे. भाजपला राम मानून शिवसेनेेने वानरसेनेप्रमाणे मैत्री केली. पण तोच भाजप आज त्याच शिवसेनेशी गद्दारी करतो आहे. काँग्रेसमधून आलेल्या भंपक, भ्रष्ट, निष्क्रिय नेत्यांना आपलेसे करून आपल्या जुन्या मित्रांना संपवत आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्राला जसा काळीमा लागला होता तसाच काळीमा या युती तोडण्याच्या भाजपच्या कृतीने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील लोकशाहीला लागला आहे. त्यासाठी आता भाजपला नाकारणे हाच पर्याय आहे. मतदारांना ओरिजनल भारतीय जनता पक्ष हवा आहे. हा असा बाटग्यांचा आणि भ्रष्ट नेत्यांच्या आगमनामुळे फुगलेला भाजप नको आहे. असा भाजप अच्छे दिन आणू शकणार नाही. भाजपने मुळात काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पक्षात स्थान देवून फार मोठी चूक केलेली आहे. त्यामुळे ज्या गतीने भाजपला यश मिळाले त्याच्या चौपट गतीने आता भाजपला अपयशाला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही. जे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गडकरी, फडणवीस, तावडे या त्रिकुटाने आणले आहेत ते काँग्रेसमध्ये केंद्रात, राज्यात सत्ता असताना काही करू शकले नव्हते. ते भाजपमध्ये आल्यावर कसे काय काम करतील? मुळात त्यांना भाजपमध्ये रूळायलाच कितीतरी दिवस जातील. तोपर्यंत त्यांनी नवा घरोबा केलेला असेल. त्यामुळे अशा नेत्यांना उमेदवारी देवून आपल्या सच्चा मित्राला गमावण्याचे जे पाप भाजपने केले आहे त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल. 2008 च्या निवडणुकीत राजस्थानातील सत्ता भाजपला याच धोरणामुळे गमवावी लागली होती. वसुंधरा राजे यांनी त्यावेळी दागी, भ्रष्ट नेत्यांना बाजूला न करता उमेदवारी दिली होती. त्यावेळीच नरेंद्र मोदींनी या गोष्टीला विरोध केला होता. पण मोदींचे न ऐकता, मोदी राजस्थानचे प्रभारी असतानाही त्यांना राजस्थानात हस्तक्षेप करण्यास मज्जाव करून वसुंधरा राजे यांनी ऐकले नाही. त्याचे फळ त्यांना तेव्हा मिळाले. आजही महाराष्ट्रातील युती तोडू नका हे मोदींचे आदेश धुडकावून लावत भाजप नेत्यांनी जो प्रकार केला आहे, त्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रावणाशी हातमिळवणी करून भाजपच्या रामाने वानरसेनेला संपवण्याचा बांधलेला चंग त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. रामाचा बुरखा घातलेला हा रावण आहे हे समोर आल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेसजनांनी भगवी वस्त्र परिधान केली म्हणजे परिवर्तन नव्हे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रागरंग आणि हवा एकदम बदलू लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन होणार आणि युतीचे सरकार सत्तेवर येणार असे चित्र होते. परंतु भारतीय जनता पक्षाच्या स्वार्थी राजकारणामुळे ही हवा गेल्या आठ दिवसात पूर्ण बदलली आणि महाराष्ट्राला अस्थिरतेच्या दिशेने घेवून जाण्याची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे या अस्थिरता निर्माण करणार्या आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती निर्माण करणार्या भाजपला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. ही राष्ट्रपती राजवट काल पुकारलेली म्हणत नाही तर अजून वीस दिवसांनी अस्थिर कौल मिळाला, दिल्ली विधानसभेत गेल्या डिसेंबरमध्ये जे घडले तसेच महाराष्ट्रात घडले तर किमान सहा महिन्यांसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता आहे.असे अस्थिर निकाल यापूर्वी बिहारमध्ये पाच सहावर्षांपूर्वी लागले होते. त्यामुळे बिहारमध्ये सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. भाजप, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती पार्टी, काँग्रेस आणि अन्य अपक्ष अशा सगळीकडे पंचरंगी लढती झाल्या होत्या. त्यावेळी कोणतेही दोन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करू शकत नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नव्हता. नेमके झालेही तसेच. गतवर्षी दिल्लीत आम आदमी पार्टीने केलेल्या शिरकावामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली. गेले वर्षभर दिल्ली विधानसभा अस्थिर अशी राहिली आहे. आता तीच वेळ महाराष्ट्रावर येणार आहे. याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या स्वार्थी नेत्यांवर राहणार आहे. त्यामुळे जर तशी परिस्थिती निर्माण झालीच तर पुन्हा होणार्या निवडणुकीत भाजपचे पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही.सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणारी भाजपची प्रवृत्ती ही काँग्रेसी प्रवृत्ती झालेली आहे. त्यामुळे या भाजपला नाकारण्याची आता वेळ आलेली आहे. केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप यात जमीन आसमानाचा फरक आहे. लोकांना परिवर्तन हवे आहे. परंतु परिवर्तन म्हणजे पक्षांतर असे समीकरण भाजपने मांडून काँग्रेसच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात थारा देवून जनतेची फसवणूक चालवलेली आहे. हे लोक कधीच महाराष्ट्राचे हीत चिंतू शकत नाहीत. जे काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेत असताना आपल्या मतदारसंघासाठी काही करू शकले नाहीत ते भाजपच्या अजून न आलेल्या सत्तेत गेल्यावर काय करणार आहेत? त्यांच्या हातात सत्ता देवून कोणाचे भले होणार आहे? त्यामुळे हे गद्दारी विष फैलावणार्या या भारतीय जनता पक्षाला रोखणे म्हणजेच काँग्रेसला रोखणे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.आज महाराष्ट्रातील भाजपला गडकरी फडणवीस यांनी, तावडे बेवडे यांनी भ्रष्ट केले आहे. इतके वर्ष हा पक्ष जातीयवादी आहे, धर्मांध आहे म्हणून टिका करणार्या काँग्रेसजनांना आपल्यात घेवून भारतीय जनता पक्ष धर्मनिरपेक्ष आहे असे चित्र दिसेल असे गडकरींना वाटते काय? उलट काँग्रेसच्या दुष्ट प्रवृत्ती भाजपमध्ये शिरल्यामुळे जातीयवादाला उत आल्याशिवाय राहणार नाही. हीच काँग्रेस सत्तेचा गैरफायदा उठवत दलितांना हाताशी धरून, सत्ता आणि पैशाच्या जोरावर सर्वसामान्य, सवर्ण विशेषत: ब्राह्मण समाजाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात धन्यता मानत राहिली. त्यामुळे आगामी काळात भाजपसारख्या पक्षाबरोबर काँग्रेसचा हाच विचार गेला या राज्यातील निरपराध ब्राह्मणांना टाचा घासून मरावे लागेल. खोटे गुन्हे नोंदवून सामान्य माणसांना अडकवण्याचे कारस्थान हे लोक करतील. पुरोगामी असलेल्या महाराष्ट्राला जातीयतेच्या विळख्यात अडकवून जातीजातीत फूट पाडण्याचे काम करतील. जे काँग्रेसने केले तेच जर भाजप करणार असेल तर भाजप या राज्यात रूजण्यापूर्वीच त्यांना खुडण्याची हीच वेळ आहे.आज भारतीय जनता पक्ष हा तुकडे पाडणे, विभाजन करणे, फूट पाडणे आणि कलह माजवणे याशिवाय काही करू शकत नाही. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचे काम भाजप आणि काँग्रेस दोघांच्या अजिंड्यात आहे. परंतु या संयुक्त महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी अशा भाजपला बाजूला ठेवणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. छोटी छोटी राज्ये निर्माण करून भाजपशासीत राज्यांची संख्या वाढवणे एवढेच त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडेे पाडण्यासाठी हे लांडगे आतूर झालेले आहेत. महाराष्ट्रापासून विदर्भ कधीही वेगळा होवू द्यायचा नसेल तर भाजप आणि काँग्रेसला नाकारले पाहिजे. कारण भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आंध्रप्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला. त्याचा फटका काँग्रेसला बसला तर त्याचा लाभ भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळवला. आता महाराष्ट्राचे विभाजन करून कधी आपल्याला लाभ तर कधी काँग्रेसला असा खेळ करत हे दोन पक्ष देशाचे तुकडे करतील हे लक्षात घेतले पाहिजे.मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईवर या दोन्ही पक्षांचे डोळे लागले आहेत. महाराष्ट्रापासून ही मुंबई तोडून ती केंद्रशासीत करण्याचा घाट हा पक्ष करताना दिसत आहे. चीनचे राष्ट्रपती भारत भेटीवर आल्यावर मुंबईचा शांघाय करण्यासाठी मुंबईत चीनला गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले. यावर कोणीही कसलीही चर्चा करून आपली मते मांडली नाहीत याचे आश्चर्य वाटले. मुंबईला मुंबईच राहु दिले पाहिजे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. या मुंबईसाठी आमच्या 105 हुताम्यांचा बळी गेला आहे. ते सगळे लाल बावटा हातात घेतलेले गिरणी कामगार होते. या हुतात्म्याचे बलिदान वाया घालवून पुन्हा मुंबई वेगळी करण्याचा हा जो घाट भाजपने घातला आहे त्याला वेळीच विरोध झाला पाहिजे. ती वेळ आत्ताची आहे. या निवडणुकीत भाजपला नाकारून महाराष्ट्राचे हीत साधले पाहिजे.भारतीय जनता पक्षाला जे सध्या मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत त्यांनी आपल्या उमेदवारांवरून जरा नजर फिरवावी आणि 25 उमेदवार किंवा संभाव्य आमदार ओरीजनल भाजपचे आहेत काय हे दाखवावे. सगळे बाटगे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांतून स्वार्थासाठी आलेले डोमकावळे आहेत. राज्याचे लचके तोडण्यासाठी, राज्याला लुटण्यासाठी आलेले हे लुटारू आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तोच ज्याच्यामध्ये प्रबळ देशाभिमान आहे. ज्याच्यामध्ये जाज्वल्य हिंदुत्त्व आहे. जो कधीकाळी संघमैदानावर गेलेला आहे. ज्याला डॉ. हेडगेवार यांनी 1925 साली स्थापन केलेली संघटना माहित आहे. ज्याला गोळवलकर गुरूजींचे विचार पटतात. राजकारणात न जाता बाहेरून अंकुश ठेवण्याचे काम करणार्या संघाच्या मैदानावर जो गेलेला आहे तो खरा भाजपचा कार्यकर्ता, उमेदवार.पण तहहयात भाजप आणि संघावर गलिच्छ टिका करणार्या, संघावर नको ते आरोप करून देशद्रोही ठरवणार्या काँग्रेसजनांना आज भाजप आपल्यात घेत आहे. कसे विसरले गडकरी की 1975 साली याच काँग्रेसने आणीबाणी आणली आणि संघावर बंदी घातली. मिसा कायद्याखाली संघाच्या स्वयंसेवकांना अठरा महिने कारावास भोगावा लागला. अर्थात आणीबाणीच्या काळात शिक्षा भोगावी लागली होती ती अटलबिहारी वाजपेयींना, शिक्षा भोगावी लागली ती अडवाणींना, तुरूंगात गेले ते प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे हे निष्ठावंत संघ मैदानावरून आलेले स्वयंसेवकांना. संधीचा फायदा उठवणार्यांना त्याची काय पत असणार आहे? त्याच वाजपेयींचे सरकार एक मताने पाडून देशाला निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडणार्यांना हेच गडकरी आपल्या पक्षात घेतात आणि खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक करतात. अशा लोकांना आपण कशी काय मते द्यायची? हे भाजप काँग्रेसवाले देशाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याकडून राज्याचे कोणतेही हीत पाहिले जाणार नाही. त्यामुळे परिवर्तनाची लाट आहे, भाजपची लाट आहे असे भासवून जुन्याच भ्रष्ट काँग्रेसजनांना भगव्या वस्त्राखाली घेवून परिवर्तन झाले असे भासवणार्यांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)