श्रावण महिना हा खरे तर सर्वांचा आनंदाचा आणि उत्साहाचा महिना असतो. अतिशय आनंदी वातावरणाचा माहिना म्हणून या महिन्याचे वर्णन कवी लोक करत असतात. पण यावर्षी आलेला श्रावण महिना हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचा असल्याने तो नेहमीचा आनंद दिसून येत नाही. शहरातही नाही आणि ग्रामीण भागातलाही श्रावणाचा आनंद हिरावून घेतला आहे असे आजचे चित्र आहे.
नागपंचमी, राखी पौर्णिमा, शुक्रवार, गोकुळ अष्टमी असे कितीतरी सणाचे महत्व या दिवसात असते. धार्मिक वातावरणात घराघरात उत्साह संचारत असतो. पण यावर्षी हा महिना अत्यंत रूक्षपणे सुरू झाल्याचे चित्र आहे. श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा म्हटले जाते. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. श्रावण महिन्यात केल्या जाणार्या शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. यासाठीच बहुतांश लोक मांसाहार वर्ज्य करतात. चार दिवसांपूर्वी झालेल्या गटारीला भरपूर खाउन पिउन झाल्यानंतर मग महिनाभर अजिबात काही मांसाहारी खायचे नाही. माशांकडे तर ढुंकुनही पहायचे नाही. अर्थात यामागचे शास्त्रीय कारण वेगळे आहे. हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो आणि म्हणूनच पुढील काळात माशांची कमतरता होऊ नये, म्हणून मासेमारी बंद ठेवतात. आपल्याकडील मासेमारी करणार्या कोळी लोंकांनी केलेले हे फार मोठे नियोजन आहे. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केलेले हे नियोजन आहे. त्यामुळे या काळात सर्व लोक पूजापाठ करत असतात. जेणेकरून मांसाहार वर्ज केला जाईल.
मोठयांपासून लहानांपर्यंत सर्वांच्या आवडीचा श्रावण महिना आहे. कारण पाऊस पडताच सर्वांना गरमागरम कांदा भजी, चहा यांची मेजवानी मिळते. तर जास्त पाऊस झाला तर विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टीपण मिळते. त्यामुळे विद्यार्थी खूप आनंदात असतात. पण हा आनंद कोरोनाच्या लॉकडाउनने हिरावून घेतला आहे. चार महिने घरात बसल्यामुळे आता कधी एकदा बाहेर पडतो असे प्रत्येकाला झाले आहे. त्यामुळे ना श्रावणातल्या कोणत्या सणाचे अप्रूप आहे की आनंद. श्रावणात कितीतरी सण असतात, शाळा कधी सकाळची, कधी छोटी सहल, कधी सुट्टी असा आनंद विद्यार्थीवर्गाला असतो. त्या आनंदाला प्रत्येकजण मुकला आहे. खरं तर शेतकरीसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टींनी श्रावणाला महत्त्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून वर्णन केले जाते. सणासुदीची घेऊन उधळण आला हा हसरा श्रावण
श्रावणामध्ये पावसाच्या दोन दमदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. पण वातावरणातही इतका बदल झालेला आहे की यावर्षी श्रावण आपल्याकडे आलाच नाही असे म्हणावे लागेल.
श्रावण महिन्यात अनेक उपास, व्रत वैकल्ये केली जातात. ती सगळी आयुर्वेद आणि आरोग्याचेदृष्टीने महत्वाची असतात. कारण या दिवसांत पचनशक्ती कमी होते, तसेच आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. म्हणून या काळात आहार-विहारावर जास्त नियंत्रण हवे. यासाठी चातुर्मासात जास्त व्रत-वैकल्ये सांगितली गेली आहेत. परंतु यावर्षी कोरोनामुळे अन्य रोगांचा कोणी विचारच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. छोटेमोठे आजार नियंत्रीत राखण्यासाटी व्रतं आहेत पण कोरोनासाठी काय? सगळाच श्रावणाचा आनंद हिरावून घेतलेला आहे यावर्षी.
पावसाळ्यात निसर्ग बहरतो. सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. या दिवसांत वृक्षपूजेबरोबरच प्राणीपूजाही आपल्या संस्कृतीत केली जाते. जसे नागपंचमी, बैलपोळा. आपल्या ू पंचांगानुसार आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या काळात देव निद्राधीन असतात, असा समज आहे. मनुष्यप्राणी सदाचरणी होऊन देवाचे कृपाक्षेत्र आपल्यावर राहावे म्हणून प्रयत्न करतो. श्रावण महिना चातुर्मासात श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो. म्हणूनच या महिन्यात सण, व्रतवैकल्ये जास्त असल्यामुळे असे म्हणावेसे वाटते.
मराठी असो वा हिंदी, कोणत्याही भाषेतील कवींना श्रावण महिना हा प्रेरणा देणारा महिना असतो. किंबहुना श्रावण महिन्यावर हिंदी चित्रपटातही अनेक गीते गाजलेली आहेत. असा हा कलाकारांना प्रेरणा देणारा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे श्रावण महिना म्हटला की, बालकवींची कविता आपसुकच आठवते. किती सुंदर निसर्गाचे वर्णन बालकवींनी या कवितेत केले आहे. खरोखरच श्रावण महिन्यात आपल्याला निसर्गाचे सुंदर रूप बघायला मिळते. पण कोरोनाने सर्वांना घरात कोंडल्यामुळे हे रूप दुरापास्त झालेले आहे. उंच उंच पर्वतरांगांमधून धबधब्याचे पाणी पडताना दिसते. नद्या तुडुंब भरून वाहतात. महाराष्ट्रात खूपसे सण श्रावणातच येतात. श्रावण महिन्यातील पाऊस रखरखत्या उन्हातील त्रासानंतर सर्व जीवनात शांती देतो व पाण्यासाठी हाल-अपेष्टा नष्ट होऊन पावसामुळे सर्वांच्या मनाला दिलासा मिळतो.
श्रावणातील सणांची मेजवानी सुरू होते. श्रावणी सोमवारला महादेवाची पूजा करून उपवास केला जातो. जी निसर्गाने पानेफूले दिली ती देवाला अर्पण करून देवाचे आभार मानले जातात. तसेच, आयुष्यातील संकटावर मात करून धीराने पुढे जाण्याची शक्ती आपल्याला येते. उपवासामुळे सहनशक्ती वाढते व तसेच उपवासाच्या निरनिराळ्या पदार्थांचा आस्वादही घेता येतो. पण या कोरोनाने माणसांची घरात बसून सहनशक्तीचा अंत पाहिला आहे. त्यामुळे श्रावणाचा आनंद आपल्याला मिळेनासा झाला आहे.
या पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत. व्रतवैकल्य आणि भरगच्च असा हा पवित्र व उत्सवाचा महिना. सोमवारसारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष. मंगळागौर पूजा केली जाते. संसारातील सौख्य, प्रेम कायम राहावे या भावनेने या दिवशी मंगळागौरीचे व्रत करतात. मंगळागौरीची पूजा, ओव्या, उखाणे, हळदी-कुंकू, ओटी भरणे, रात्री जागरण आणि पारंपारिक खेळ या निमित्ताने माहेर आणि सासर दोन्हीकडचे प्रेम अनुभवास मिळते. पण आता यात अंतर पडले आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे नो फुगडी, नो मंगळागौर.
सर्वांचा लाडका गोपाळकृष्णचा जन्मदिवस गोकुळाष्टमीसुद्धा श्रावणातच येतो. गोकुळाष्टमीला रात्री जागून पाळणा म्हटला जातो. सुंठवडया केल्या जातात. दुसर्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. या दहीहंडीच्या निमित्ताने लोकांमधील एकजूट दिसते. पण ही माणसांची एकजूट कमी करण्याचे काम यावर्षी कोरोनाने केले आहे. त्यामुळे सगळा श्रावण महिना शिमग्याचा महिना झाला आहे. श्रावण महिना आनंद देणारा असूनही तो यावर्षी आनंद देणारा भासत नाहीये. त्यामुळे हसणारा खेळणारा आनंददायी श्रावण यावर्षी मुका झाल्याचे भासत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा