गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

prafulla phadke mhantat: पुणेकरांची लोकशाही

prafulla phadke mhantat: पुणेकरांची लोकशाही: लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात झालेल्या राज्यातील मतदानात सर्वात कमी मतदान हे पुण्यात झाले. पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. त्याप्...

पुणेकरांची लोकशाही

लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात झालेल्या राज्यातील मतदानात सर्वात कमी मतदान हे पुण्यात झाले. पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. त्याप्रमाणे पुणेकरांनी उत्तर दिले आहे की,‘ पुणे तिथे मतदानाबाबत उत्साह उणे’ झाला आहे. संपूर्ण देशभरात आणि  स्थानिक प्रशासनाद्वारे  मतदान करा असे सातत्याने आवान केले जात असतानाही पुणेकरांनी त्याला  प्रतिसाद दिला नाही यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पण आपला वेगळेपणा जपणे किंवा आपले विचित्रपणाचे वागणे यामुळे पुणेकर नेहमीच चर्चेत असतात. त्याप्रमाणे आपला हा विचित्रपणा पुणेकरांनी दाखवला असेच म्हणावे लागेल. म्हणजे आम्हाला कोणीही गृहीत धरू नये हे पुणेकरांचे नेहमी सांगणे असते त्याप्रमाणे पुणेकरांनी त्यांना साजेशीच ही कृती केलेली आहे. हे  आजच झाले आहे असे नाही. पुणेकर आपल्या मर्जीनेच वागत असतात. त्यांच्यावर कसल्याही प्रचाराचा, आवाहनाचा परिणाम होत नसतो तर ते आपल्याच तंद्रीत वागत असतात. पुणेकरांना धर्म, जात, प्रांत  वा देश काहीही माहिती नसते. त्यांचा धर्म पुणेकर, त्यांची जात पुणेकर, त्यांचा प्रांत पुणेकर आणि त्यांचा देशही पुणे हाच असतो. त्यामुळे त्यांचे वागणे नेहमीच स्वतंत्र संस्थानिकाप्रमाणे असते.चौदा वर्षांपूर्वी विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी संपूर्ण राज्यात ट्प्प्याटप्प्याने  ही हेल्मेटसक्ती केली होती. त्यावेळी महाराष्ट्रात फक्त पुणेकरांनी या हेल्मेट सक्तीला विरोध केला होता. आम्ही नाही हेल्मेट वापरणार, आम्हाला ते जाचक आहे हे दाखवून ही सक्ती स्थगिती आणणे भाग पाडले होते.  हेच पुणेकरांचे  वैशिष्ट्य आहे. त्यांची लोकशाहीची कल्पनाच वेगळी आहे. आम्हाला कोणी गृहीत धरायचे नाही. कोणतेही नियम आमच्याबाबत लागू होत नाहीत. आमचे स्वत:चे असेच नियम असतात. ते आम्ही शंभर टक्के पाळतो. म्हणजे देशभरात चालणारे वाहतुकीचे नियमही येथे मान्य नसतात. डावीकडून, उजवीकडून कुठूनही कट कसा मारायचा हे पुणेकरांनाच जमते. त्याप्रमाणेच त्यांनी मतदानालाही कट मारून आपल्या कामांकडेच लक्ष दिले.एक काळ असा होता की राज्याच्या राजकारणात पुण्याचे नाव मोठे होते. पुणेकरांचे मत हे राजकारणाची दिशा ठरवत होते. पुण्यातील साडेतीन शिरोमणी त्यासाठी ओळखले जात होते. यामध्ये बॅरिस्टर विठ्ठराव गाडगीळ, जगन्नाथराव जोशी, ना. ग. गोरे आणि जयंतराव टिळक हे दिग्गज होते. पण कालांतराने याच पुण्याचा कारभार पुण्यातून बारामतीत गेला आणि राजकारणाची दिशा पुण्याऐवजी बारामतीतून ठरू लागली. तेंव्हापासून पुणेकरांचा लोकशाहीवरचाच  विश्वास उडाला. त्यांची स्वत:ची अशी पेशवाई थाटाची लोकशाही अमलात आणणे त्यांनी सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणजे मतदानाला न जाणे हा आहे.पुणेकरांचे असे अनेक किस्से सांगितले जातात. म्हणजे आम्हाला हेल्मेटसक्ती कोणी करू शकत नाही तसेच मतदानाचीही सक्ती कोणीच कूरू शकत नाही. आमच्यावर ना प्रचाराचा परिणाम होतो ना कशाचा. आम्ही फक्त पुणेकरांची संस्कृती पाळतो. म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अमपमान कसा करायचा हे आमचे ब्रिद असते. त्याप्रमाणे देशाचा  पंतप्रधान असो वा कोणीही आमच्या वेळेतच त्याने आले पाहिजे. मागच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची सभा पुण्यात होती. त्यावेळी सगळी तयारी अगदी भाजपच्या स्टाईलने झाली होती. पण त्या सभेला पुणेकर फिरकलेच नाहीत. कारण ती दुपारी बारा नंतर सभा होती. रिकाम्या खुर्च्यांमुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली. पण तरीही त्यांनी कौल भाजपलाच दिला होता, हा भाग वेगळा. पण पुणेकरांनी मतदानाला फारसा उत्साह दाखवला नाही हे तितकेच खरे. १२ ते ४ या विश्रांतीच्या काळात पुणेकर कुठेही बाहेर पडत नाहीत. त्यांची वामकुक्षीची वेळ असेल तर ते कुणाचा फोनही घेत नाहीत.त्यामुळे त्याकाळात मतदानाला बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही. पणत्याहीपेक्षा मजेची गोष्ट म्हणजे एका पुणेकराला या कमी  मतदानाबद्दल विचारल्यावर कसलीही खंत वाटली नाही. लोकशाहीत मतदान करणे आवश्यक आहे, ते केले पाहिजे असे एकाने मत मांडल्यावर त्या पुणेकरांनी असे कुठे लिहिले आहे, मत दिलेच पाहिजे अशी आपल्याकडे सक्ती नाही, नियम नाही त्यामुळे आम्ही मतदानाला नाही बाहेर पडलो तर सरकार बनल्याशिवाय राहणार आहे का? आम्ही मतदान केले नाही म्हणून आणीबाणी लागू होत नाही ना? असले सवाल विचारून या देशात सरकारची गरज आहेच कुठे? असे मत मांडतात. म्हणजे आमची पोटं आमच्या पैशातून आम्ही भरतो, मग सरकारचा आणि लोकशाहीचा इथे संबंध येतोच कु? ही आहे पुणेरी लोकशाही.