आपल्या राजकीय वर्गातील काही लोक संपत्ती निर्माण करणाºया उद्योजकांना खलनायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी वृत्ती भारताच्या प्रगतीला बाधक आहे. पण, हे उद्योजक नेहमीच रोजगार निर्मितीत सातत्याने योगदान वाढवत असतात. अशावेळी देशातील उद्योगपतींवर सातत्याने टीका करणे, त्यांना विरोध करणे हे घातक राहील. त्यामुळे राहुल गांधी जे सातत्याने अदानी, अंबानींसारख्या उद्योजकांना विरोध करून देशाचे नुकसान करत आहेत ते थांबवले पाहिजे.
साधी गोष्ट आहे, अगदी सामान्य घरातील एक मोलकरीण आपल्याकडे घरी कामासाठी येत असे. ती आपल्याशिवाय आणखी किमान इतर नऊ कुटुंबांची भांडी साफ करते. अशाप्रकारे पगारदार कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब स्त्रीयांच्या रोजगाराचा एक भाग बनले. याउलट, दुर्ग शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, एक ज्वेलर्सने त्याच्या उद्योगात आणि घरात सुमारे १०० लोकांना रोजगार दिला. त्याच्या कर्मचाºयांनी कारागिरी आणि विक्री यांसारखी विशेष कौशल्ये शिकली, ज्यामुळे त्यांना घरगुती मदतीपेक्षा १० पट अधिक कमाई करता आली. अशा या व्यावसायिकाने अनेक पटींनी जास्त नोकºया तर दिल्याच, पण प्रत्येक कामाचा पगारही १० पटीने जास्त होता. तर पगारदार कुटुंब संपत्ती निर्माण करण्याऐवजी केवळ उपभोगत होते. रोजगार निर्मितीमध्ये संपत्ती निर्मिती मध्यवर्ती भूमिका दर्शवते. त्यामुळे कोणत्याही मार्गाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणाºयांना विरोध करणे हे चुकीचे आहे.
आपले घर चालवणाºया किंवा आपल्या मुलांच्या शाळेची फी भरणाºया किंवा इतर खर्चासाठी आपण कोणाचे ऋणी आहात? नीट विचार केला तर असलेली ही नोकरी आपल्या क्षमतेमुळे आहे, पण तुमची सर्व क्षमता असूनही तुम्ही जर संपत्ती निर्माण करणारे नसता तर तुम्हाला नोकरी मिळाली नसती. या सृजनशिलतेचा विचार राजकीय लोकांनी विशेषत: विरोधकांनी केला पाहिजे. आपण ज्या रोजगार निर्माण करणाºया उद्योजकांविरोधात सातत्याने बोलतो त्यांनी इतके इतक्या वर्षांत कमावले आहे की, सगळे उद्योग बंद केले, तरी त्यांच्या दहा पिढ्या जगतील. पण हे उद्योग बंद केल्यामुळे लाखो लोक बेरोजगार होतील. त्यांना राहुल गांधी इटलीतून रोजगार देणार आहेत का?
आज जर सरकारने भारतीय रेल्वेत पैसे गुंतवले नसते तर अनेकांना रेल्वेत नोकरी मिळाली नसती. सरकार विविध प्रकल्पात गुंतवणूक करते ते रोजगार निर्मितीसाठी करत असते. अशा या निर्मिती क्षेत्रात अडथळे बनून राहण्यात काय अर्थ आहे? हे कसले राजकारण आहे? कोणताही उद्योगपती त्याच्या व्यवसायात भांडवल गुंतवून नोकºया निर्माण करतात. या अशा नोकºया आहेत ज्या लाखो लोकांना स्वप्न पाहण्याची आणि चांगले भविष्य सुनिश्चित करण्याची संधी देतात. या लाखो लोकांना बेरोजगार करण्याची काँग्रेसची इच्छा आहे का? देशातील उद्योजक हे महत्त्वाचे असतात. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, गोदरेज, किर्लोस्कर अशा उद्योजकांनी गेल्या आठ दशकात कोट्यवधी रोजगार दिला नसता तर सामान्य माणसाचे काय झाले असते? त्यांना विरोध करून राहुल गांधींना काय साधायचे आहे? मूठभर उद्योजकांसाठी मोदी प्रयत्न करतात, असा राहुल गांधींचा आरोप असतो. पण या मूठभर लोकांच्या मागे किती लाखो कोट्यवधी कुटुंबाचे संसार चालवण्याची ताकद आहे याचा कधी विचार करणार?
पगारदार लोकांना दर महिन्याला मिळणºया पगाराबाबत, हा पगार शक्य करणाºयांना कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागतो याचा कधी विचार करतो का? उद्योजक त्याच्या उद्योगात करोडो रुपये गुंतवतो. त्यात अपयश, स्पर्धा, सरकारी अडथळे आणि बाजारातील अनिश्चितता यांचा सामना करावा लागतो. पगारदार कर्मचाºयांच्या खात्रीशीर पगाराच्या विपरित, एखादा उद्योजक तेव्हाच पैसे कमावतो, जेव्हा त्याचा व्यवसाय यशस्वी होतो आणि तोही अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि तणावानंतर. दुसºया किंवा तिसºया पिढीतील उद्योगपतींना तितकी जोखीम किंवा संघर्ष करावा लागला नसला तरी त्यांच्या पूर्वजांनी जोखीम पत्करून संघर्ष केलेला असतो.
एवढी जोखीम पत्करण्याची हिंमत आपल्यापैकी बहुतेकांमध्ये नसते. भारताच्या आर्थिक भवितव्यासाठी अशी जोखीम पत्करणाºया धाडसी लोकांना राक्षसी ठरवणे अत्यंत अदूरदर्शी आहे. त्यांच्याशिवाय ना आर्थिक विकास होणार नाही ना रोजगार निर्मिती होईल. हे वास्तव राहुल गांधींना समजेल, तेव्हाच ते परिपक्व नेते म्हणून यशस्वी होतील.
संपत्ती निर्माण करणाºयांकडे संशयाने पाहणाºया पूर्वग्रहाचे मूळ नेहरूवादी समाजवादात आहे. समाजवाद, साम्यवाद यांसारख्या संकल्पना परकीय आहेत. भारताचे प्राचीन आर्थिक तत्त्वज्ञान संपत्ती निर्मितीला समाजासाठी अत्यंत फायदेशीर मानणारे आहे. ही विचारसरणी भारतीय संस्कृतीचा सखोल विचार प्रतिबिंबित करते की नैतिक पद्धतीने संपत्ती निर्माण करणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. भारतीय तत्त्वज्ञानात धर्म, काम आणि मोक्ष याशिवाय चार पुरुषार्थांपैकी एक मानले गेले आहे. जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ, ऋग्वेदामध्ये श्री सुक्तम नावाचे स्तोत्र आहे, जे संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. हे स्तोत्र संपत्तीला कुटुंब, समुदाय आणि राष्ट्रांचे पोषण करणारे आशीर्वाद मानते. नैतिक संपत्ती निर्माण करणे हे भारतीय परंपरेच्या मुळाशी आहे आणि ते सामूहिक कल्याणाचे साधन आहे. अर्थशास्त्रात, चाणक्याने बाजार आणि व्यापाराच्या भूमिकेवर जोर दिला, जे समृद्धी आणण्यासाठी उपयुक्त आहेत. प्राचीन शहरे त्यांच्या समृद्ध बाजारपेठेमुळे भरभराट झाली, जिथे ज्ञानी राज्यकर्त्यांना समजले की, संपत्तीची निर्मिती सर्वांसाठी फायदेशीर आहे.
संपत्ती निर्मितीला एवढे मोठे महत्त्व असतानाही काँग्रेस आणि राहुल गांधींसारखे काही नेते याच्या मार्गात काटे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यक्तींपेक्षा कंपन्यांवर अधिक कर आकारला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे, पण कंपन्यांनी निर्माण केलेली संपत्ती शेवटी कुठे जाते हे समजते का? हे भागधारकांना लाभांश, सावकारांना व्याज, पुरवठादारांना सेवा, कर्मचाºयांना पगार आणि सरकारला कर प्रदान करते.
प्रवर्तक देखील त्यांच्या लाभांश आणि भांडवली नफ्यातून उत्पादने आणि सेवा खरेदी करतात, त्यामुळे रोजगार निर्मिती आणि आर्थिक क्रियाकलाप वाढतात. एकूणच, कंपन्यांनी निर्माण केलेली संपत्ती भागधारक, कर्जदार, कर्मचारी आणि नागरिकांच्या माध्यमातून समाजात आणि आर्थिक व्यवस्थेत परत येते.
जागतिक स्पर्धेच्या युगात जर आपण कंपन्यांवर जास्त कर लावला तर त्या त्या देशांत जातील जेथे कर कमी आहेत. त्यामुळे रोजगार आणि संपत्ती निर्मितीचे फायदे भारताला मिळू शकणार नाहीत. त्यामुळे कंपन्यांवर भरमसाठ करांची मागणी हा आर्थिक समृद्धीचा स्रोत न समजल्याचा परिणाम आहे. निरोगी व्यावसायिक वातावरण हे जड कॉर्पोरेट करांपेक्षा रोजगार आणि प्राप्तिकराच्या बाबतीत समाजात अधिक योगदान देते. भारताच्या प्रगतीत संपत्ती निर्माण करणाºयांचे महत्त्वाचे योगदान लक्षात घेतले पाहिजे. त्यांना ओळखा आणि त्यांचा आदर करा. साम्यवाद आणि समाजवाद यांसारख्या बाह्य विचारधारा नाकारून भारतीय सांस्कृतिक विचार स्वीकारा. आपल्या सर्वांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे. आजच्या भारतात संपत्ती निर्माण करणारे केवळ व्यवसाय करत नाहीत, तर ते विकसित भारताचा पाया रचत आहेत. त्याच्या पाठीशी सर्वांनी राहिले पाहिजे.
- प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा